Skip to main content

लेख

दुनियादारी - माझ्या नजरेने !

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 01/05/2009 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
दुनियादारी ह्या पुस्तकाबद्दल मी सर्व प्रथम मिपावर वाचले व मनात आले हे पुस्तक तर हवेच हवे आपल्याकडे, शोकेससाठी नाही वाचण्यासाठी. सागर ह्यांच्याशी संपर्क झाला व लगेच काही दिवसामध्ये ते पुस्तक हातात मिळाले, माझ्या चपराशीने जरा गोंधळ घातला त्याला ते पुस्तक नावावरुन हिंदी वाटले व संध्याकाळी आलेले कुरियर सरळ घरी घेऊन गेला, पण दुस-या दिवशी क्या साब म्हणत मला परत ही केले.

ट्यूलिप्सच्या गावा...

लेखक स्वाती दिनेश यांनी शुक्रवार, 01/05/2009 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
ऍमस्टरडॅमची आणि आमची परत गाठभेठ होईल, असं वाटलं नव्हतं...पण ट्यूलिप्सची शेतं आणि बागा आम्हाला खुणावत होत्या.आमची मागल्या वेळची भेट ओल्या पावसात चिंब भिजलेली होती.क्रिकेट तिरंगी सामन्यांचे निमित्त होते,पण तेव्हा ट्यूलिप्सचा हंगाम नव्हता.ही नाजूक फूलं मार्च एंड ते मे या काळात बहरतात.कॉकेनहॉफ हे ट्यूलिप्सचे नंदनवन! ऍ' डॅम पासून तासदीड तासाच्या अंतरावर...दरवर्षी इथे लाखो ट्यूलिप्सची लागवड होते,आणि इतरही कितीतरी प्रकारची फुले!

"असं वाटतं की झटकन पावसात ओलंचिंब होऊन जावं."

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 27/04/2009 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रो.देसाई फिरायला येणार नाहीत म्हणून निरोप द्यायला आलेली त्यांची मुलगी वृंदा आणि तिची मैत्रीण मालिनी मला तळ्यावर भेटल्या.मालिनीची माझ्याशी ओळख करून देत वृंदा म्हणाली, "तुमच्याशी गप्पा मारायला बरं वाटतं.आमचे भाऊसाहेब तर तसं नेहमीच सांगतात." हे ऐकून मला अंमळ बरं वाटलं. "ही माझी मैत्रीण मालिनी.हिला दोन मुलं आहेत एक मुलगी कॉलेजात जाते." मी वृंदाला म्हणालो, "तू म्हणालीस की मालिनीला दोन मुलं आहेत आणि एक मुलगी कॉलेजात जाते.पण हिच्याकडे पाहिल्यावर ही दोन मुलांची आई वाटत नाही.असं हिचं काय गुपीत आहे की ती अशी दिसावी?" असं बोलून मला एखाद्या विषयावर गप्पा सूरू करायची कल्पना सुचली.

नाशिकच्या नररत्नांचे हौतात्म्यशताब्दी वर्ष!

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 26/04/2009 23:08 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिपर्वाचा विसाव्या शतकातील पाया म्हणजे अभिनव भारत. नाशिकच्या असंख्य स्वातंत्र्यवीरांचे देशकार्य, समर्पित जीवन आणि तेजस्वी बलिदान स्वातंत्र्यसंग्रामात फार मोलाचे आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्लंडहुन ब्राउनिंगची पिस्तुले पाठविली, पैकी काही नाशिकात पोहोचली. आणि त्या पिस्तुलांचा वापर करायला अनेक कणखर हात सरसावले. लोकशाही व स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्या इंग्रजांनी हिंदुस्थानात साम्राज्यशाही, अत्याचार आणि दडपशाही चालविली होती. कुणालाही तुरुंगात धाडायला पुरावे, पंच वगैरेची गरजच नव्हती.

गौडगावचा जाग्रुत मारुती

लेखक सनविवि यांनी रविवार, 26/04/2009 07:12 या दिवशी प्रकाशित केले.
माझे आई-बाबा दर शनिवारी मारुतीला जातात. मी Agnostic Theist या categoryत मोडत असल्यामुळे मला कधी आग्रह करत नाहीत ते! पण आज म्हटलं, जाऊया आपणपण, तेवढंच सकाळी लवकर उठणं होईल! हे मंदिर अक्कलकोट तालुक्यातल्या गौडगाव (बु.) या गावात आहे. सोलापूरपासून बसने पाऊण तासावर. दर शनिवारी-रविवारी सकाळी ६:२० पासून दर अर्ध्या तासाने बसेस असतात. बरोबर ७ ला पोचलो आम्ही गावात. ४:३० लाच उठावे लागले होते! माझ्या मानाने फ़ार म्हणजे फारच लवकर! पण सकाळच्या ताज्या हवेत बाहेर पडल्यावर सगळा कंटाळा पळून गेला.

साय्लेंट मोड

लेखक मितालि यांनी शुक्रवार, 24/04/2009 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
रस्त्यावर चालत असताना सतत फोनवर बोलणारे काही आनंदि चेहरे आणि पाळीव कुत्र्याला मैत्र बनवलेले काही चेहरे.. प्रत्येकामागे एक कारण असते..प्रत्येकाला सतत बोलायला आणि ऐकायला कुणीतरी हवे असते..

निरोप घेताना..

लेखक प्राजु यांनी बुधवार, 22/04/2009 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
निरोप घेताना... नमस्कार मंडळी. निरोप!! निरोप देणं आणि निरोप घेणं या जशा दोन वेगवेगळ्या कृती आहेत त्याच प्रमाणे त्यांचे अर्थही संदर्भानुसार बदलतात. "जा, जरा समोरच्या काकूला निरोप दे, दुपारी बाजारात जाऊया म्हणून." असं आई म्हणते तेव्हा समोरच्या काकूला आईनं सांगितलेलं सांगणं.. याला आपण निरोप देणं असं म्हणू शकतो. निरोप घेणं यामध्ये सुद्धा बरेच अर्थ निघू शकतात. जसं, " मी बाहेर जाते आहे, आजोबांचा फोन आला तर निरोप घेऊन ठेव." यामध्ये आजोबा जे सांगतील ते लक्षात ठेव असा अर्थ असतो.पण बर्‍याचदा"निरोप घेणं" याचा अर्थ "टाटा, बाय बाय" असाच घेतला जातो. मुलगी सासरी जाताना आई-बाबांचा निरोप घेते.

जेव्हा डोळे पाणावतात.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 22/04/2009 07:57 या दिवशी प्रकाशित केले.
मनोहरच्या आणि माझ्या नेहमीप्रमाणे गप्पा चालल्या होत्या. "अलिकडच्या मुलांना शाळा कॉलेजात इतका अभ्यास असतो,की मान वर काढायला वेळ मिळत नाही.कारण तशी समाजात जिकडे तिकडे चूरस चालली आहे.मग लाखोनी शिकणार्‍या मुलांच्या परिक्षेत आणि पुढच्या करिअरमधे तशीच चूरस कायम राहिली तर त्यात नवल काय.?" असं मनोहर मला म्हणाला. मनोहरचं म्हणणं अगदी खरं वाटलं मला.जसजसं जग पुढे चाललं आहे तसतसं बदल हा होतच राहणार.आमच्या वेळेला असं असं होतं म्हणून आताही तसंच असलं पाहिजे हा काही प्रगल्भ विचार म्हणता येणार नाहीत. "आमचे आजी आजोबा आणि आम्ही ह्या मधलं नातं,जवळीक,ह्या गोष्टी त्यावेळच्या त्या समाजाच्या जडणघडणीवर बर्‍याचश्या अवल

सर्व मिपाकरांना आग्रहाचे निमंत्रण !!!

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी सोमवार, 20/04/2009 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या लग्नाची पत्रीका सर्व मिपाकरांना आग्रहाचे निमंत्रण देतोय लग्न दिनांक ७ मे २००९ गुरुवार ह्या दिवशी आहे

दुनियादारी !

लेखक संदीप चित्रे यांनी सोमवार, 20/04/2009 06:30 या दिवशी प्रकाशित केले.
“तू गपे xxxच्या ! अजून दुनियादारी वाचलं नाहीयेस आणि म्हणे माझं लग्नं करा !” हे ठेवणीतलं वाक्य यायचं आलं की वाक्याचा recipient आपोआप गप्प व्हायचा. बरोबर आहे, वर्मावर का कुठे म्हणतात तिथे बोट ठेवलं जायचं. आपण सुहास शिरवळकरांची जवळपास सगळी पुस्तकं पारायणं करून वाचली पण अजून मास्टर पीस वाचला नाहीये ! मारे ढीगभर हिंदी सिनेमा पाहिले पण ‘शोले नाही पाहिला अजून? ‘दुनियादारी’ नेमकं आत्ताच out of print? हॅत्त तेरी तर !!! एक दिवस अचानक मिळालं. हुर्रे !!! जिओ यार…पुणे नगर वाचनालय जिंदाबाद !! एक दिवसात परत करायच्या बोलीवर मित्राकडून कसंबसं मिळालं. पुस्तक नुसतं हाताळतानाही थरारलो.