मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लेख

पहिलं प्रेम

बिपीन सुरेश सांगळे ·
पहिलं प्रेम ------------ तो बारमध्ये शिरला. एकटाच. रात्री उशिराची वेळ. रस्त्यावरची गर्दी मंदावलेली. आठवड्याच्या मधला दिवस. त्यामुळे आतही गर्दी कमी. त्याने अगदी कोपऱ्यातलं एक टेबल धरलं आणि तो आत सरकून भिंतीच्या आधाराने बसला. त्याला आधाराची गरज वाटत होती. त्याने ऑर्डर दिली. पेगमध्ये कोल्ड्रिंक ओतल्यावर ग्लासच्या काचेवर पाण्याचे नाजूक थेंब जमा झाले. अन तस्सेच त्याच्या डोळ्यांतही. त्याचं सुरु झालं . थोड्या वेळाने एक वयस्कर माणूस आला. त्याच्याजवळ आला. “बसू का ?” त्याने विचारलं . “बसा “ , हा म्हणाला . तो बसला. वेटरने त्याची ऑर्डर आणून दिली. न सांगताच. याच लक्ष नव्हतं. अर्थातच तोही एकटा होता. शांत.

स्वप्नपूर्ती..!!

सुजित जाधव ·
जेव्हा एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला बराच वेळ वाट पहावी लागते, कित्येक वेळा तुम्ही ती मिळवण्याच्या अगदी समीप जाता पण ती प्राप्त करनं तुम्हाला शक्य होत नाही. अशी गोष्ट जेव्हा तुम्हाला मिळते तेव्हा जो आनंद होतो तो अवर्णनीय असतो, माऊंट एव्हरेस्ट सर केल्याच्या feeling पेक्षा तो कमी नसतो. सेम feeling व आनंद शनिवारी भारतीय खेळाडू, क्रिकेटरसिक व संपूर्ण भारतवर्षाने अनुभवला..!! ११ वर्षांनंतर भारताने आयसीसी ट्रॉफी जिंकली..!

चहा!

श्रीगणेशा ·
चहा, जिव्हाळ्याचा विषय. चहा तयार करणं बऱ्याच अंशी एक कला आहे. थोडंसं गणित व शास्त्रही आहे म्हणा त्यात. चवीत सातत्य राखायचे असेल, तर त्यातील प्रत्येक घटकाची भूमिका, प्रमाण, आणि वेळ समजावून घेणं गरजेचं. एखादी सुंदर संगीत रचना जर करायची असेल, तर आधी तुम्हाला संगीत वाद्यांशी, प्रत्येक सुराशी समरस व्हावं लागतं, अगदी तसंच. चहापूड (पूड=पावडर) मधील अर्क शोषण्याचं काम पाण्याचं. चहापूड टाकण्याआधीच पाणी उकळतं असणं गरजेचं. आणि चहापूड उकळत्या पाण्यात टाकल्यावर, फक्त काही मिनिटेच थांबावं, नाहीतर कडवटपणा उतरण्याची शक्यता असते.

बकरे की माँ कब तक ख़ैर मनाएगी?

टर्मीनेटर ·
"बकरे की माँ कब तक ख़ैर मनाएगी?" प्रेरणा: मारवा ह्यांच्या 'दावत-ए-ईद पेटा इंडिया चा एक स्तुत्य उपक्रम' ह्या धाग्यावरच्या धर्मराजमुटके ह्यांच्या 'प्रतिसादातील' लिंक वरील "बकरी ईदच्या दिवशी जैन व्यक्तीनं मुस्लीम वेश परिधान करून १२४ बकऱ्या केल्या खरेदी; पण कशासाठी?" हि बातमी वाचत असताना मनात अनुक्रमे 'कौतुक', 'मौज' आणि व्यावहारिक 'चिंता' अशा निरनिराळ्या भावना निर्माण होत गेल्या आणि काही तरुणांच्या समूहाने, एका चांगल्या हेतूने केलेल्या ह्या उदात्त कार्याविषयी जे व्यावहारिक प्रश्न पडले त्यांचा उह

अज्ञाताचे लेख

कर्नलतपस्वी ·
मन कशात लागत नाही, अदमास कशाचा घ्यावा । अज्ञात झऱ्यावर रात्री, मज ऐकू येतो पावा ॥ -ग्रेस मित्रहो अशाच मनस्थितीत गेले काही दिवस चालले होते,चिडचिड होत होती.गदिमांच्या गीतरामायणा मधील प्रभू श्रीरामाच्या तोंडून वदवलेल्या प्रसिद्ध ओळी सांत्वन करण्यास कमी पडत होत्या. "खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा". 'मला भेटलेला कार्व्हर,'प्रभाते चारियासी जाये', 'पावगढ-चंपानेर 'असे तीन लेख अर्धवट लिहीले आहेत पण याच कारणास्तव पुर्ण होत नव्हते. काहीही करावेसे वाटत नव्हते.गाडी जवळ जवळ थांबल्यासारखीच म्हणायचे.

भल्याभल्यांसाठी आव्हान ठरणारं रोलँ गॅरोस

पराग१२२६३ ·
पॅरीसमधील रोलँ गॅरोस टेनिस संकुलात (Roland Garros Tennis Complex) यंदाच्या टेनिस हंगामातील दुसरी ग्रँड स्लॅम स्पर्धा सुरू झालेली आहे. क्ले कोर्टवर खेळवली जाणारी ही एकमेव ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा. इथल्या लाल मातीची कोर्ट्स अग्रमानांकितापासून बिगरमानांकित खेळाडूंची कायमच शारीरिक, मानसिक कसोटी पाहत आलेली आहेत. त्यामुळे रोलँ गॅरोस संकुलातील मध्यवर्ती कोर्ट असलेल्या फिलीप चॅर्टिएर कोर्टावर (Philippe Chartier) आजवर अनेक धक्कादायक आणि अनपेक्षित निकाल पाहायला मिळालेले आहेत.

श्रोडिंगरची मांजर, एनटॅन्गल्मेंट आणि भारतीय मतपेटी

चामुंडराय ·
क्वांटम फिजिक्समध्ये श्रोडिंगरची मांजर हा एक अतिशय प्रसिद्ध असा वैचारिक प्रयोग आहे. तुम्ही समजा एखाद्या मांजरीला एका बॉक्समध्ये बंद केले आणि त्यामध्ये जहाल विष यादृच्छिकपणे (randomly) सोडले जाईल अशी व्यवस्था केली तर बॉक्स उघडे पर्यंत ती मांजर जिवंत आहे की मृत हे कळणार नाही. म्हणजे जोपर्यंत आपण बॉक्स उघडत नाही आणि मांजरीचे निरीक्षण करत नाही तोपर्यंत मांजर एकाच वेळी मृत आणि जिवंत आहे. क्वांटम फिजिक्समध्ये ह्या अवस्थेला सुपर पोझिशन असे म्हणतात.

भाकरीचे पीठ

पाषाणभेद ·
कविल सकाळीच उपाशीपोटी शेतात मळणी करण्यास गेला होता तर कायरा कविल साठी जेवण काय न्यावे या चिंतेत होती. भाकरीचे पीठ संपले होते. व्हाटस अपवर तिने पीठ संपल्याचे स्टेटस टाकले. त्यानंतर लगेचच वृशांतची बायको तान्याने ते स्टेटस बघितले आणि तिने वृशांतला आपला मुलगा चिन्मय यास शेताच्या बांधावरून कॉल करून बोलावून घेतले. त्याचेजवळ भाकरीचे पीठ व चटणीचा ठेचा कायराकडे पाठवीला. कायरा आता चिंतामुक्त होती. कविल आज पोटभर जेवणार होता. तिचे मन भरून आले. बांधाला बांध लागून असलेच शेजारी शेतकरी सर्वांना मिळोत अशी तिने प्रार्थना केली. - पाभे

कथा

बिपीन सुरेश सांगळे ·
कथा या विषयावरची चर्चा आपण लहानपणापासून गोष्टी ऐकत आलेलो असतो . पुढे आपली तीच आवड कथेकडे वळते . पण असं म्हणतात की कथा हा प्रकार मूळचा आपला नाही . तरीही आता तो भारतात चांगलाच रुजलाय . सदर चर्चा ही त्या संदर्भात आहे . कथा अनेक प्रकारची असू शकते. ती अनेक प्रकारे मांडता येऊ शकते . काही कथा या कायम मनात घर करून राहतात . मराठी मध्ये चारुतासागर यांची ' नागीण' ही कथा , हिंदी - उसने कहा था , इंग्लिश - द सिक्रेट लाईफ ऑफ वॉल्टर मिट्टी , अशा काही कथांचे संदर्भ नेहमी दिले जातात . आणि अशा अनेक कथा . पूर्वी मराठी कथा त्या वेळच्या काही एक पद्धतीने मांडली जात होती. आता ती तशीच राहिलेली नाही .

जाळं

बिपीन सुरेश सांगळे ·
जाळं ---------------------------------------- रात्र झाली होती .मस्त गार वारं सुटलं होतं. दिवसभराची लग्नाची चाललेली धामधूम हळूहळू मंदावत चालली होती. पण ते लोकांचं . बन्सीकिशनच्या डोक्यातली गडबड मात्र हळूहळू वाढत चालली होती . गावाकडची मोकळी हवा . तो मित्रांबरोबर कडुनिंबाच्या झाडाखाली बसला होता. बाजेवर हवा खात . पलीकडे पोरंटोरं खेळत होती . मित्र काहीबाही सांगत होते. वात्रट बोलत होते ,एकमेकांना टाळ्या देत होते. बन्सीकिशन मात्र अवघडला होता. तो कसंनुसं हसत होता. तो वाट पाहत होता ... सुहागरातीची ! तिच्या घरचे बोलणी करायला आले होते . एकतर अलीकडे मुलगी मिळायची मुश्किल . तशात एवढी सुंदर मुलगी ! ...