कथा
लेखनप्रकार
कथा
या विषयावरची चर्चा
आपण लहानपणापासून गोष्टी ऐकत आलेलो असतो . पुढे आपली तीच आवड कथेकडे वळते . पण असं म्हणतात की कथा हा प्रकार मूळचा आपला नाही . तरीही आता तो भारतात चांगलाच रुजलाय . सदर चर्चा ही त्या संदर्भात आहे .
कथा अनेक प्रकारची असू शकते. ती अनेक प्रकारे मांडता येऊ शकते . काही कथा या कायम मनात घर करून राहतात .
मराठी मध्ये चारुतासागर यांची ' नागीण' ही कथा , हिंदी - उसने कहा था , इंग्लिश - द सिक्रेट लाईफ ऑफ वॉल्टर मिट्टी , अशा काही कथांचे संदर्भ नेहमी दिले जातात . आणि अशा अनेक कथा .
पूर्वी मराठी कथा त्या वेळच्या काही एक पद्धतीने मांडली जात होती. आता ती तशीच राहिलेली नाही . ती काळानुरुप बदलली आहे आणि बदलायला देखील पाहिजे. पण ज्या नेमक्या ठिकाणी नवकथेची दखल घेतली गेली पाहिजे, तिथे ती घेतली जात आहे का ? की अजूनही तीच पद्धत, त्याच कथा आणि जुने कथाकार यामध्येच ती ठिकाणं अडकून पडली आहेत ? …
सध्या सामाजिक माध्यमांवर खूप जण लिहीत आहेत . जे ‘ चांगलं ’ लिहितात त्यांची दखल घ्यायला काय हरकत आहे ? विशेषतः जेव्हा मासिकं बंद पडत आहेत . वर्तमानपत्रं साहित्याला आक्रसून घेण्यात मग्न आहेत. एकूण गंभीर परिस्थिती आहे . विशेषतः रीडर्स डायजेस्टसारखं मासिक बंद पडतं तेव्हा ! ...
अमुक एक कथा चांगली , असं काही नाही . ती कशी लिहिली गेली आहे हे महत्त्वाचं . कौटुंबिक कथा आवडत असतील त्यांना गुन्हेगारी कथा आवडणार नाहीत. हा भाग वेगळा. ही आवडनिवड व्यक्तिनुरूप . पण लोकांना गोष्टी आणि कथा नेहमीच आकर्षित करतात. हे नक्की!
कथेचे अनेक प्रकार आहेत . शशकपासून ते दीर्घ कथेपर्यंत , जीवनावर भाष्य करणाऱ्या अगदी छोट्या कथांपासून ते मोठ्या घडामोडी मांडणाऱ्या कथांपर्यंत.
मराठीमध्ये उत्कृष्ट कथांचं संकलन करण्याचे प्रयोग केले गेले आहेत . उदाहरण म्हणजे राम कोलारकर संपादित काही खंड.
आजही मराठीमध्ये कथा स्पर्धा आयोजित केल्या जातात. जातात… पण आयोजक आणि परीक्षक स्वतःच आयोजित केलेल्या त्या स्पर्धांकडे नक्की कितीशा गांभीर्याने बघतात ?
अलीकडे कथा स्पर्धांमधील पुरस्कार प्राप्त कथा पाहिल्यावर... अरे बापरे! हाती सुतळी बॉम्ब यावा अशी अपेक्षा असताना हाती सुटा लवंगी फटाका येतो. मराठी भाषा मागे पडते आहे ही चर्चा नेहमीच चालते. या चर्चेमध्ये एक अगदी छोटासा का होईना पण हा मुद्दादेखील असावा का ?
माझी अशी विनंती आहे की तुम्ही इथे कथा या विषयावर चर्चा करावी . तुम्ही कथेकडे कसं पाहता याबद्दल व्यक्त व्हावं . कथास्पर्धा, वेगवेगळ्या कथा , वेगवेगळ्या ठिकाणच्या कथा याबद्दल बोलावं.
तुमच्या आवडत्या , लक्षात राहिलेल्या कथा , हे संस्थळ, इतर संस्थळं, सामाजिक माध्यमं , मासिकं - पुस्तकं , भारतीय कथा ते जागतिक पातळीवरची कथा असं सगळं या परिघात येऊ शकतं .
वाचक, प्रतिसादक , विशेषतः कथालेखक - लेखिका आणि इतरही सर्वांसाठी हे आवाहन.
वाचने
3380
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
उत्तम सुरुवात
कथा हा माझ्या मते अत्यंत
In reply to कथा हा माझ्या मते अत्यंत by गवि
इथे आहे ती कथा.
In reply to इथे आहे ती कथा. by कानडाऊ योगेशु
येस. धन्यवाद...
In reply to इथे आहे ती कथा. by कानडाऊ योगेशु
अप्रतिम कथा...
In reply to कथा हा माझ्या मते अत्यंत by गवि
शेतकरी ते ग्राहक थेट योजना.
कथा हा माझाही अत्यंत आवडता
In reply to कथा हा माझाही अत्यंत आवडता by कांदा लिंबू
कथेची लिंक?
असं म्हणतात की कथा हा प्रकार मूळचा आपला नाही .
वाचक मंडळी
कर्नलजी
शेकडो कथा सांगितल्या, पण...