नाचत ने मज

बहुगुणी जनातलं, मनातलं
आवडलेल्या इंग्लिश गीतांच्या मराठी रुपांतराचा सिलसिला पुढे सुरू ठेवतोय. पिलियन रायडर यांनी अन्यत्र आम्हा घरी धन या धाग्यात म्हंटल्याप्रमाणे Scent of a Woman या चित्रपटातील अल पचिनो या कलाकाराच्या अंध पात्राने टँगो नृत्य करतांना हे गाणं चित्रित झालेलं आहे. मूळ कवी आणि गायक आहे लेनार्ड कोहेन. हे सुंदर गाणं मला कधीचं खुणावतं आहे, मराठीत त्या गाण्याचं रुपांतर व्हावं असं वाटलं म्हणून या मुक्त-भावांतराचा प्रयत्न. यावेळी थोडासा वेगळा प्रयत्न आहे, दृक-श्राव्य संस्करणाचा वापर केलेला आहे आणि मूळ गाण्याच्या एका चित्रफितीवर मराठी मुक्त-भावांतर ओव्हर-ले केलं आहे. अशी लुडबूड करण्याचा पहिलाच प्रयत्न असल्याने चालक अजून शिकाऊ आहे! सांभाळून घ्या! इंग्लिश शब्दः Dance me to your beauty with a burning violin Dance me through the panic 'til I'm gathered safely in Lift me like an olive branch and be my homeward dove Dance me to the end of love Dance me to the end of love Oh let me see your beauty when the witnesses are gone Let me feel you moving like they do in Babylon Show me slowly what I only know the limits of Dance me to the end of love Dance me to the end of love Dance me to the wedding now, dance me on and on Dance me very tenderly and dance me very long We're both of us beneath our love, we're both of us above Dance me to the end of love Dance me to the end of love Dance me to the children who are asking to be born Dance me through the curtains that our kisses have outworn Raise a tent of shelter now, though every thread is torn Touch me with your naked hand or touch me with your glove Dance me to the end of love
वर्गीकरण
लेखनप्रकार

2 टिप्पण्या 1,083 दृश्ये

Comments

पिलीयन रायडर नवीन

वाह!! मला हे गाणं आवडलं खुप पण बरचसं समजलही नव्हतं. आता तुमच्या भानुवादामुळे खुप काही लक्षात येतंय. अगदी ओघवता भावानुवाद झाला आहे! एक सुचवु का? काहींना युट्य्ब ला अ‍ॅक्सेस नसतो, त्यांच्या साठी इथेच गाणं टाका ना. अशीच काही अजुन गाणी तुम्हाला माहिती असतील तर सांगाल का? मला जुन्या.. क्लासिक.. इंग्रजी गाण्यांबद्दल काही फार माहिती नाही.

बहुगुणी नवीन

धन्यवाद, पिरा ताई! मी केलेल्या (मला आवडलेल्या!) Desiderata, First things first, The Last Thing on my Mind, The cab ride I will never forget, I give you the morning, Dance with my father again या इंग्लिश गीतांच्या आणि Tell me goodbye या इटालियन गीताच्या मराठी रुपांतराचे प्रयत्न इथे , इथे आणि इथे पहायला मिळतील. अर्थात्, मला पूर्ण कल्पना आहे की these are not even a tip of the iceberg! इंग्लिश आणि इतर भाषांमध्ये प्रचंड गीत-समृद्धी आहे. वरील व्हिडिओमध्ये दिलेला मराठी भावानुवाद खाली देतो आहे: सौन्दर्याशी नाचत ने मज तप्त सुरांची दाहक वीणा धुके भयाचे, नाचत ने मज आलिंगुनी तू कवेत घे ना नेई पारवा पल्लव अलगद उंच उभारून नेई घराला पुन्हा सखे तू नाचत ने मज प्रणयसुखाच्या परम सीमेला प्रेक्षक सगळे परतून जाता मला पाहू दे तव सुंदरता नयनमनोहर तव गात्रांचे विभ्रम जैसे पुरातनाचे मलाच केवळ ओळखीच्या त्या प्रणय सीमेच्या अशा खुणेला पुन्हा सखे तू नाचत ने मज प्रणयसुखाच्या परम सीमेला विवाहबंधनी नाचत ने मज लयीत, अविरत, नाचत ने मज हळूच, अलगद, नाचत ने मज कधी न थबकत नाचत ने मज आपण दोघे प्रणयी रंगुनी चराचरातील नव्या दिशेला पुन्हा सखे तू नाचत ने मज प्रणयसुखाच्या परम सीमेला अधीर थांबले येण्या जन्मून बालकांप्रती नाचत ने मज चुंबनी विरल्या परिवस्त्रातून मंदगतीने नाचत ने मज पुन्हा एकदा ये पट उचलून मंडपी सखये नाचत ने मज वेष्टनातुनी, विवस्त्र-हस्ते मला स्पर्शू दे प्रिय कराला पुन्हा सखे तू नाचत ने मज प्रणयसुखाच्या परम सीमेला