ज्ञानेश्वरी- भाग-२- चंद्रबिंब झरतसे हिमार्त माळरानी या !

लेखनविषय:
लेखनप्रकार
॥ हा अनुरागु भोगितां कुमुदिनी जाणे ॥ ज्ञानेश्वरी वाचतांना वाचकाचे काय होते माझा अनुभव सांगतो सर्वात अगोदर ज्ञानेश्वर आपल्याला मराठी पहिली च्या वर्गात बसवतात. आपलं मराठी भाषेचं ज्ञान तर जाऊच द्या शब्दसंग्रह कीती तोकडा आहे हे दाखवुन देतात. ज्ञानेश्वरीतल्या नुसत्या मराठी शब्दांवर एक फ़ार मोठं प्रकरण होइल. वाचतांना अनेक ठिकाणी सेरेनडिपीटी चा अनुभव येतो अनेक सुखद धक्के अनेक ओव्यांमधुन आपल्याला बसतच असतात.ज्ञानेश्वरी तशी सरळ वाचता येत नाही, एक झालं की दुसरां अध्याय अस होत नाहीच.

पेडगाव -धर्मवीर गड-पारगाव

लेखनप्रकार
अ दोन-तीन महिन्यांत १२००-२००० वर्षे जुनं पुरातन काळ्या पाषाणात कोरलेल्या,सहज नैसर्गिक भावमुद्रेत अनंत काळापासून उभ्या मूर्ती पाहिल्या नाही की काळाच चक्र", पुढेच जात आहे ,जरा मागे डोकावून पहायला हवं असं वाटतं.

पुस्तक परिचय : लढा आळशीपणाशी

लेखनविषय:
लेखनप्रकार
पुस्तक परिचय पुस्तक : लढा आळशीपणाशी लेखक: चकोर शाह प्रकाशकः हेडविग मिडीया हाऊस. परिचय कर्ता : चकोर शाह. रात्रीर्गमिश्यति भविष्यति सुप्रभात भास्वानुदेष्यति हसिष्यसी पंकजश्री: इथ्थं विचिन्तयति कोषगते द्विरेफे हा हन्त हन्त नलिनिं गज उच्चहरः संध्याकाळ झाली आणि कमळाच्या पाकळ्या मिटल्या. त्या पाकळ्यात अडकलेला एका भुंग्याने विचार केला की रात्र सरेल सूर्योदय होईल. उगवत्या सूर्याला पाहून कमळाचे फूल पुन्हा हसेल ( उघडेल ) आणि मग आपण सहज उडून जाऊ. असा विचार करून भुंगा कमळातच निवान्त राहीला. ….. अरेरे हे काय झाले. कमळाचे ते फूल हत्तीनी तोडून टाकले की. या श्लोकाने पुस्तकाची सुरवात होते.

खेळ मांडीयेला-भातुकली खेळ

अ लेकीला म्हटलं "आज आपल्याला भातुकलीचा खेळ पाहायला जायचं आहे." ती म्हणाली "भातुकलीचा खेळ म्हणजे काय?" मनात‌ल्या मनात म्हणाले की "एका भातुकलीच्या खेळाची किंमत तुम क्या जानो, जेनझी(generation z)" तिला म्हणाले "अंग किचन सेट पाहायला जायचय" " ओके , बार्बीपण असेल का तिथे ?" "चल तुला ठकीच आणते" ती आपली शांतप

गीतारहस्य चिंतन -प्रकरण ५ (सुखदुःखविवेक)

लेखनविषय:
सुखदुःखविवेक -भाग-१ #सुखाचीव्याख्या/सुखाची संज्ञा अनेक प्रकारे सांगता येत असली तरी सुख हे दुःखाशीच निगडीत अधिक सुखकारक ठरते. व्याख्या १. नैयायिक - "अनुकूलवेदनीयं सुख' - जी वेदना आपल्याला अनुकूल असते ते सुख आणि "प्रतिकूलवेदनीयं दुःखं 'जी वेदना आपल्याला प्रतिकूल ते दुःख, या वेदना जन्मतःच सिद्ध आणि केवळ अनुभवगम्य आहेत. व्याख्या-२ मागील प्रकरणांतील कर्माप्रमाणे सुखही वेदांतांत "आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक' तीन प्रकारचे असे म्हणता येईल. -आधिभौतिक हे बाहय किंवा शरीराचे / इंद्रियाचे सुखदुःख • आध्यात्मिक हे सर्व मानसिक वा बाह्य संयोगावाचून उद्‌भवणारे सुखदुःख आहे. व्याख्या -3 प्रतीकारो व्

निफा वायनरी - नाशिक

ज्योत्स्ना आणि अशोक या उच्चशिक्षित शेतकरी जोडप्याची भेट मनाला अन पोटाला देखील आनंद देणारी ठरली. नाशिक निफाड रस्त्यावर पिंपळस रामाचे या गावी सुरवडे परिवाराची निफा वायनरी हे कौटुंबिक युनिट आहे. स्वतःच्या शेतात स्वतः पिकवलेल्या द्राक्षापासून स्वतःच वाइन बनवायची आणि या छोटेखानी फार्म कम आउटलेट मध्ये उपलब्ध करून द्यायची DIY हा अशोकाचा मंत्र. अगदी वेब पेज देखील त्याने स्वतःच बनवलय. दक्षिण ध्रुवावर जाऊन आलेल्या अशोक सोबत निवांत गप्पा झाल्या. स्व विनायकदादा पाटील या समान धाग्याने सुरू झालेल्या गप्पा Sustainable Solution या समवायि विषयात सहजी रमल्या.

'भारताच्या ललाटरेषा' -लेखक- शं .रा.देवळे (ऐसी अक्षरे -२४)

लेखनविषय:
सिंधूनदी sindhu हिमालयातील मानसरोवर जलाशयातून निघालेला सिंधूचा तो स्रोत तेथून सरळ वायव्येकडे धावत जातो. काश्मीरच्या लद्दाख भागातून हिमालयाला वळसा घालून काराकोरम पर्वताच्या पायथ्याशी जातो. गिलगिटजवळून ही नदी दक्षिणेकडे वळते. तेथे सिंधूला स्वाती नदी येऊन मिळते.

द स्टोरीटेलर (सिनेमा)

लेखनविषय:
लेखनप्रकार
कोणतीही गोष्ट अभ्यास करून नाकारायची किंवा स्वीकारायची असा माझा पिंड आहे.मी बरोबरीनेच उजव्या विचारसरणीचा अभ्यास करताना त्यासंबंधी पोस्ट व्हायच्या.डायटविषयी समजून घेतांना वैज्ञानिक पोस्ट असायच्या.भारतीय तत्वज्ञानचा, पाश्चात्य तत्वज्ञान वगैरे वगैरे त्यावेळी तशा..

शिक्षण आणि विटाळ पाळणे

लेखनविषय:
लेखनप्रकार
"शिक्षण प्राप्ती नंतर तुम्ही शहाणे नाही झाला तर तुम्ही अशिक्षित आहात". हे विधान शंभर टक्के खरे आहे. पण शिक्षित म्हणजे कोण? हा प्रश्न मनात येणारच. ज्ञान आपण गुरु/ शिक्षकाकडून मौखिक आणि पुस्तकी स्वरुपात प्राप्त करतो. या शिवाय जगाचा व्यवहार पाहून ही आपण ज्ञान प्राप्त करतो. ज्याला प्राप्त ज्ञानाचा अर्थ कळतो आणि प्राप्त ज्ञान कृतीत उतरवू शकतो तो व्यक्ति शिक्षित, असे म्हणता येईल. एक निरक्षर व्यक्तीही शिक्षित असू शकतो आणि उच्च शिक्षित डॉक्टर, इंजीनियर आणि अर्थशास्त्री ही अर्ध-शिक्षित असू शकतात.

गीतारहस्य चिंतन -३

लेखनविषय:
#गीतारहस्य प्रकरण तिसरे -कर्मयोगशास्त्र "तस्माद‌योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्"(गीता २.५०) "म्हणून तू योगाचा आश्रय कर, कर्म करण्याची जी शैली, चातुर्य किंवा कुशलता त्यास योग म्हणतात." योग शब्दाची व्याख्या लक्षण आहे. कर्माकर्माच्या विवंचनेत अनेक अडचणी उद्‌भवतात, तेव्हा ते काम सोडून कर्माचा लोप न करता', योग' म्हणजे युक्ती शहाण्या पुरुषाने स्वीकारली पाहिजे, तुहि स्वीकार. ' तस्माद‌द्योगाय युज्यस्व' हे श्रीकृष्णाचे अर्जुनास प्रथम सांगणे आहे, आणि हा योग म्हणजे कर्मयोगशास्त्र होय. कर्म कर्म शब्द 'कृ' धातूपासून निघाला आहे.
Subscribe to आस्वाद