आस्वाद
गोठलेले सरोवर
गेले १०-१२ दिवस म्युन्स्टर मधले तपमान साधारण -७ ते -१२ याच दरम्यान होते. दिवसभर थंडगार वारे, रस्त्याची कडेला गोठलेले दंव, झाडाच्या पानांवर त्याच हिमदवाची झालेली नक्षी असे एकंदरीत चित्र होते. 'अशी थंडी सतत तशीच आहे म्हणजे उद्या परवा 'आझे' नक्कीच गोठेल' गेल्या शुक्रवारी आम्ही असा विचार करत असतानाच आमच्याच इमारतीत वरच्या मजल्यावर रहाणारा श्रीनिधी शनिवारी सांगायला आला, ' मी आत्ताच बाहेर जाऊन आलो, आझे पूर्ण गोठला आहे. आज दुपारी जाऊया का तिथे?' आम्ही दोघं लगेचच उत्साहाने तयार झालो.
आझे म्हणजे 'आ' नावाच्या म्युन्स्टरमधील नदीवरचे मोठे सरोवर. हे सरोवर साधारण २.५ किमी लांब आहे.
माझं काय चुकलं..
एका छोटीचे मनोगत..
कशाला गं आईनं असं मला माललं..
ललून ललून नाक माझं लाल लाल झालं..
खलं खलं शांग आजी माझं काय चुकलं???
अंगणामध्ये गेले होते बिश्किट खात खात..
टॉमी तिथे बसला होता त्याचा खाऊ खात..
माझ्यातलं थोलं बिश्किट मी त्याला शुद्धा दिलं..
त्याच्या भांड्यातलं थोलं मी ही खाल्लं..
सगल्यांना देऊन खायचं असं आईनीश शांगितलं..
खलं खलं शांग आजी माझं काय चुकलं??
बाबांचा पांधला पांधला रूमाल मला मिलाला
त्याच्यावर केचपचा मी लाल सूर्य काढला..
त्यावर मग मी थोडंसं दूध सुद्धा ओतलं..
गवार
समिधाताईंनी दिलेली गवारीच्या पुर्यांची ही पाककृती वाचून गवारीच्या आठवणीने जीव व्याकुळ झाला.
कविता अर्थातच रद्दड आहे, पण गवारीच्या प्रति व्यक्त केलेल्या भावना प्रामाणिक आहेत.
***
गवार
बारकुळी ती, हिरवी हिरवी,
छान कोवळी,
गवारशेंग मला हवी
कुटाबरोबर वाफवलेली,
छान रटरटीत शिजवलेली,
गवारशेंग मला हवी
भले कितीही गोड मटार,
फोलपटे बेचव त्याची,
पापुद्रयासहित दाण्यांची,
गवारशेंग मला हवी
आडदांड तो फ्लॉवर केवढा,
सात्विक तो श्रावण घेवडा,
दुध्याचा डौलदार आकडा
अहो घ्या ते शेकडा,
घ्या ते शेकडा,
पण गवारीचाच सडा
दारी माझ्या
Taxonomy upgrade extras
खास आवडीचे!!!
काही काही कलाकृती/प्रसंग अवचित आवडून जातात. ते का आवडले हे सांगण्यासाठीसुद्धा काही वेळा आपल्याकडे शब्द नसतात. त्यांचीच आठवण जागवण्यासाठी हा धागा.. माझ्यापासूनच सुरुवात करतो :) -
दिल चाहता है हा माझा खूप आवडता चित्रपट. भावून जातो. कलाकार, वातावरण, छायाचित्रण, पटकथा-संवाद, संगीत-गाणी; सगळं कसं मस्त जमून आलेलं! पण या चित्रपटाचा एक विशेष मला फार आवडतो. त्याची निळाई!! बहुतेक फ़्रेम्समधे हा निळा रंग कोणत्या ना कोणत्या स्वरूपात वापरल्या गेलाय. चित्रपटाच्या कथा-पटकथेच्या प्रकृतीनुसार निळा रंग अगदी चपखल आहेच, कारण त्याने येणारा शीतलतेचा तजेला आपल्याला त्या वातावरणाच्या जवळ घेऊन जातो.
आजची मुक्ताफळे (Quote of The Day)
काल माझ्या एका जीवलग मित्राने quote of the day असा मथळा देऊन एक वाक्याचा विरोप पाठविला. त्यावर झालेली चर्चा आणि देवणघेवाण येथे मांडत बसत नाही. पण झाले असे की ते वाक्य उगाचच मनात रेंगाळत राहिले. बर्याचदा असेच कोणाचे तरी, कोठेतरी ऐकलेले एकच वाक्य मनात घोळत राहते. कधी मन मोहरून जावे असे तर कधी विचारात पडावे असे. कधी अंगाचा भडका उडावा असे तर कधी हसून हसून गडाबडा लोळावा असे. तर कधीकधी उगाचच आवडून जावे असेही.
तसेही अलिकडे आपण जगतो ते Sound Bites च्या जगात.
तिचा मोकळा वावर
तिचा मोकळा वावर
तिचा मोकळा वावर
माझ्या अवती भवती
माझ्या रोमरोमातून
तिचे रोज येणे जाणे
माझ्या ह्रद्यी रहाणे
कशी जाइल ती दूर
तिचा मोकळा वावर
तिची रुणूझुणू चाल
पायी कळ्या होती फुलं
गंध फुलत्या फुलांचा
दाटे तिच्या सभोवार
तिचा मोकळा वावर
तिच्या जीवघेण्या अदा
सारे जग होइ फीदा
परि माझीच ती सदा
माझ्या डोळ्याची झालर
तिचा मोकळा वावर
तिचे बोलणारे डोळे
जणू चांदणे कोवळे
त्या डोळ्यांमध्ये खेळे
माझ्या प्रेमाची पाखंर
तिचा मोकळा वावर
तिचे माझे एक होणे
नभ धरती मिळणे
माझ्या मनातिल गाणे
येइ तिच्या ओठावर
तिचा मोकळा वावर
अशी तीची माझी साथ
किती युगांच हे नात
माझे ह्रद्य छेडते
Taxonomy upgrade extras
प॑चमदा॑ना सलाम
प्रदीपशेटचा घर आजा' वरचा लेख मी जरा उशीराच वाचला. परवाच म्हणजे चार जानेवारीला प॑चम तथा राहुलदेव बर्मन या॑ची प॑धरावी पुण्यतिथी होती. त्या निमित्ताने ह्या छोट्या लेखा द्वारे मी प॑चमदा॑ना आदरा॑जली वाहात आहे.
प्रदिपशेटने म्हटल्याप्रमाणे 'प॑चम' हा एव्हढा प्रच॑ड विषय आहे की त्यावर एक महाकाव्य लिहिता येईल! वोह मेरे बस कि बात नहि॑. म्हणून त्या॑च्या पहिल्या चित्रपटातल्या एका गाण्यावर मी लिहायचा मी थोडा प्रयत्न करतो आहे.
छोटे नवाबची गाणी प॑चमदा॑चा तसे पहिला प्रयत्न नव्हता. दादा॑बरोबर आराधनातली बरीचशी गाणी प॑चमदा॑नीच केली होती (कोरा कागज था, मेरे सपनो॑ कि).
नाताळी बाजार
जर्मनीत आल्यापासूनच नाताळचा सण कसा साजरा होतो ते पाहण्याची उत्सुकता होती. नाताळ हा जर्मनीतील एक मुख्य सण. आपल्याकडे जशी दिवाळी तसाच इथे नाताळचा सण अतिशय आनंदात, उत्साहात आणि आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा करतात असे ऐकून होते. नाताळच्या आधीच्या चार रविवारी ऍडवेंट साजरे केले जात असल्याने साधारण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासूनच सगळीकडे सणाचे वातावरण होऊ लागले होते. बाहेर वातावरणात गुलाबी थंडी तर घराघरांत सर्वत्र झगमाट दिसू लागला. इथे प्रत्येक जण आपले घर सुशोभित करतो. आता घराघरांत दिव्यांच्या माळा आणि आकाशदिवे दिसू लागले. अनेकांनी बागेतली झाडे सुद्धा दिव्यांच्या माळा सोडून उजळवून टाकली.
मिसळपाव

