तुझे सब है पता... चा भावानुवाद
मागे ऑर्कूट वरच्या "मराठी कविता" या समुहात माझ्यासकट अनेकांचे भावानुवादाचे प्रयत्न चालू होते. त्यात हे लिहिलं होतं. आज मिपा च्या मुखपृष्ठावर या गाण्याबद्दल वाचलं, आणि म्हटलं तुम्हालाही दाखवावं... :)
अर्थात, मी मुद्दामच याला भाषांतर च्या ऐवजी भावानुवाद म्हणतो. मीटर पूर्णपणे वेगळा घेतलाय. हिंदीत जो योग्य वाटतो, त्यातच मराठी लिहिणं जमलं नाही. खरंतर मीटरकडे पाहिलंच नाही. जसं सुचलं, तसं लिहीत गेलो. पण एकूण प्रकरण बरं वाटलं मला तरी... :)
| मूळ गीत | माझा भावानुवाद |
| मै कभी बतलाता नही, पर अंधेरे से डरता हूं मै माँ तुम से मै ये कहता नही, पर तेरी परवाह करता हूं मै माँ तुझे सब है पता, है ना माँ... भीड मे यूं ना छोडो मुझे, घर लौट के भी आ ना पाऊं माँ भेज ना इतना दूर मुझ को तू, याद भी तुझ को आ ना पाऊं माँ क्या इतना बुरा हूं मै माँ... जब भी कभी, पापा मुझे जोर जोर से झूला झुलाते है माँ, मेरी नजर ढूंढे तुझे, सोचू यही, तू आ के थामेगी माँ... उन से मै ये कहता नही, पर मै सहम जाता हूं माँ चेहेरे पे आने देता नही, दिल ही दिल मे घबराता हूं माँ... तुझे सब है पता, है ना माँ... आँखे भी अब तो गुमसुम सी है, और खामोश हो गयी है ये जुबाँ... दर्द भी अब तो होता नही... एहेसास कोई बाकी है कहां... तुझे सब है पता है ना माँ... | नाही सांगितलं कुणा, काळोखाची भीती मनी दाखवत नाही कधी, आई तुझी माया मनी आहे तुलाही ठाऊक, आई गं... नको गर्दीत गं सोडू, घरी कसा येईन मी? दूर नको पाठवू गं, आठवेन का तुला मी? रुसली का माझ्यावर, आई गं? बाबा देती खेळताना, झोपाळ्याला मोठ्ठा झोका तुला शोधते नजर, आधाराचा हात तुझा नाही बोललो मी त्यांना, जीव भांबावून जातो भीती दाटे मनी जरी, खोटाखोटाच हसतो आहे तुलाही ठाऊक, आई गं... डोळे मिटले मिटले , अन ओठ झाले बंद आता वेदना कुठली , जाणीवाच होता मंद... आहे तुलाही ठाऊक, आई गं... |
वाचन
3025
प्रतिक्रिया
0