[स्वैर] वाळवी वि० बुरशी
डाव्या अत्याचाराचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे तीनामेन चौकातील हत्याकांड.स्टालिन, माओ वगैरेंच्या दमनचक्रात मारले गेलेल्या लोकांची संख्या लक्षात घेता तिआनानमेन हत्याकांड म्हणजे शेषनागापुढे गांडुळच जणू.
In reply to तिआनानमेन हत्याकांड by चंद्रसूर्यकुमार
स्टालिन, माओ वगैरेंच्या दमनचक्रात मारले गेलेल्या लोकांची संख्या लक्षात घेता तिआनानमेन हत्याकांड म्हणजे शेषनागापुढे गांडुळच जणू.व्हय व्हय, खरंय. डीपसीक नव्यानं आलं होतं तेंव्हा त्याला तीनामेन चौकाबद्धल कुणीही काहीही विचारलं की अजिबात काही सांगायचा नाही. आता इथे लिहिताना तो संदर्भ लगेच डोक्यात आला. अजूनही डीपसीक तीनामेन चौकाबद्धल तेच सांगतो "क्षमा करा, ते माझ्या सध्याच्या परिघाबाहेरचं आहे, दुसरं काहीतरी बोलूया." असं म्हणतो. तीनामेन चौकाबद्धल पोलादी पडद्यामागे लपवण्यासारखं इतकं काय आहे त्यात बरे? आणि ते शेषनागाचे फणे कोणते?
In reply to खरे आहे, उजवेपणा म्हणजे by अमरेंद्र बाहुबली
In reply to भारताला डाव्यांचा धोका नाही पण मनुवाद्यांचा आहे. by मुक्त विहारि
In reply to मनुवाद्यांचा धोका म्हणजे पवार by श्रीगुरुजी
In reply to असेलही... by मुक्त विहारि
In reply to कोणीच घेत नाही. म्हणून तर by श्रीगुरुजी
In reply to मनुवाद्यांचा धोका म्हणजे पवार by श्रीगुरुजी
In reply to ज्याचे AI शी वाकडं त्याची by आग्या१९९०
In reply to हो ना.... by मुक्त विहारि
In reply to पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये by आग्या१९९०
In reply to खालील उत्तरे पण मिळतील का? by मुक्त विहारि
In reply to मुर्शिदाबाद ला मी गेलो नाहीय, by अमरेंद्र बाहुबली
In reply to लोचट माणसाचा मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
In reply to लेखाचा विषय काय? तुम्ही by अमरेंद्र बाहुबली
In reply to ज्याचे AI शी वाकडं त्याची by आग्या१९९०
नुकतेच वाचनात आलेले ताजे संशोधन असे सांगते की एखाद्या समाजगटातील एखादी व्यक्ती जितकी सुमार बुद्धीची तितकी ती डावीकडे झुकलेली असायची शक्यता असते.सुधारणा- नुकतेच वाचनात आलेले ताजे संशोधन असे सांगते की एखाद्या समाजगटातील एखादी व्यक्ती जितकी तल्लख बुद्धीची पण ती तल्लख बुद्धी गहाण टाकलेली असते तितकी ती डावीकडे झुकलेली असायची शक्यता असते. डावे-उजवे ही संकल्पना अर्थशास्त्रासारख्या समाजशास्त्रांमध्ये लागू असते मूलभूत शास्त्रात नाही. गणितावर आधारीत सगळी शास्त्रे (इंजिनरींग आणि मूलभूत शास्त्रे) यात 'मला काय वाटते' यावर काही आधारीत नसते- जे काही असते ते गणितातील मूलभूत सूत्रे आणि न्यूटनचे नियम, ओहमचा नियम वगैरे मूलभूत नियम यावर सगळे काही अवलंबून असते. पण समाजशास्त्रांमध्ये 'मला काय वाटते' यावर सगळे काही अवलंबून असते. हा फरक आहे. सरकार या प्राण्याचा अर्थकारणात किती सहभाग असावा यावरून डावे आणि उजवे यामधील फरक असतो. उजवे म्हणतात सरकारचा अर्थकारणात सहभाग कमी असावा तर डावे म्हणतात सरकारचा अर्थकारणात अधिक सहभाग असावा. अमेरिकेत सॉल्टवॉटर आणि फ्रेशवॉटर विद्यापीठे ही संकल्पना आहे. दोन्ही किनार्यांजवळची विद्यापीठे ही सॉल्टवॉटर विद्यापीठे आहेत (हार्वर्ड, प्रिन्सटन, न्यू यॉर्क युनिव्हर्सिटी, एम.आय.टी, बर्कले, युसी अॅट लॉस अॅन्जेलिस वगैरे) तर महासरोवरांजवळची विद्यापीठे ही फ्रेशवॉटर विद्यापीठे आहेत (शिकागो, रॉचेस्टर, मिन्नेसोटा वगैरे). सॉल्टवॉटर विद्यापीठात डाव्यांचे प्राबल्य आहे तर फ्रेशवॉटर मध्ये त्यामानाने उजव्यांचे प्राबल्य आहे. हार्वर्डविषयी वेगळे सांगायलाच नको. आमचे मिल्टन फ्रीडमन साहेब शिकागो विद्यापीठात होते. अर्थात सॉल्टवॉटरमधील १००% प्रोफेसर डावे आणि फ्रेशवॉटरमधील १००% प्रोफेसर उजवे असतात असे नाही. जगदीश भगवतींसारखे उजवे न्यू यॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये आहेतच. जगातील अर्थशास्त्राच्या विद्यापीठांची क्रमवारी (रँकिंग) बघितले तर त्यात उजव्या बाजूच्या विद्यापीठांची संख्या एकदम कमी दिसेल- त्यात सॉल्टवॉटर विद्यापीठे बरीच जास्त दिसतील आणि फ्रेशवॉटर खूप कमी. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स हे अमेरिकेबाहेरचे पण विद्यापीठ टॉप पाच मध्ये आहे. तिथे एकेकाळी आमच्या बाजूचे फ्रेडरीक हायेक हे एकदम उत्युंग व्यक्तिमत्व प्रोफेसर म्हणून होते. त्यांचे शिष्य बी.आर.शेनॉय यांनी भारताच्या समाजवादी छापाच्या दुसर्या पंचवार्षिक योजनेवर विरोधी मत दिले होते- तसे मत देणारे ते एकटेच होते. पण आज एल.एस.ई मध्येही उजव्या बाजूचे प्रोफेसर कमीच आहेत. शिकागो, रॉचेस्टर, मिन्नेसोटा ही त्यातल्या त्यात रँकिंगमध्ये वर असलेली उजवी विद्यापीठे आहेत व्यतिरिक्त उजव्या बाजूची आणखी दोन विद्यापीठे नावाजलेली (माझ्या माहितीत) आहेत जॉर्ज मेसन (फेअरफॅक्स, व्हर्जिनिया) आणि टेक्सस टेक. ही दोन विद्यापीठे रँकिंगमध्ये दिसलीच तर खूप खाली दिसतील. भारतातही जे.एन.यु, जादवपूर, सम्राट अशोक वगैरे विद्यापीठे रँकिंगमध्ये पुढे आहेत पण तिथे पण डाव्यांचे प्राबल्य आहे. युरोपमध्ये स्टॉकहोम, हेलसिंकी वगैरेंमध्ये पण फार वेगळी परिस्थिती नाही. यावरून मी म्हणतो की एखादा मनुष्य जितका अधिक हुशार तितका तो डावीकडे झुकायची शक्यता वाढते. आता त्यांची बुध्दी गहाण ठेवलेली असे का म्हणतो? कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय अर्थव्यवस्था अधिक चांगले काम करते हे अगदी इकॉन-१०१ मध्ये शिकवितात. तसेच पैसे छापून वाटले तर गरीबी मिटत नाही तर महागाईचा भडका उडून प्रश्न अधिक जटिल बनतो हे पण इकॉन-१०१ मध्येच शिकवतात. आणि हे नुसते 'मला वाटते' असे नाही तर तसे केल्यास प्रश्न वाढतात हे जगभरात बघितले गेले आहे. तरीही डावीकडचे प्रोफेसर बघितले तर ते जगभरातील अनुभवांकडे कानाडोळा करून नेमके तेच करावे असे सांगताना दिसतात. अभिजीत बॅनर्जी (एम.आय.टी मधील) २०१९ मधील राहुल गांधींच्या न्याय योजनेचे सल्लागार होते. तेव्हा रागा दरमहा पाच हजार द्या म्हणत होते तर अभिजीत बॅनर्जी त्यापेक्षा कमी (मला वाटते अडीच हजारच) द्या असे म्हणत होते म्हणून अभिजीत बॅनर्जींनी त्या योजनेला जाहीर समर्थन दिले नव्हते पण तत्वतः त्यांचा असे पैसे वाटायला विरोध नव्हता. या मोठ्या प्रोफेसरना मोठ्या सरकारी समित्यांवर जायचे असते. तसे सदस्यत्व त्यांचा 'स्टेटस सिम्बॉल' बनतो. आता सरकार अशा समित्यांवर 'मुळात सरकारने अर्थकारणात पडूच नये' असे म्हणणार्यांची नियुक्ती करणार नाही हे उघड आहे. त्यामुळे प्रश्न पडतो की ही मंडळी आपल्या क्षेत्राशी प्रामाणिक असतात का? गणितात मूलभूत सूत्रांचे उल्लंघन करणार्याला (समजा कोणी २+२ = ५ म्हणू लागला तर) नोबेल सोडाच पहिली पास होणे मुश्किल होईल. पण अर्थशास्त्रात मात्र पैसे छापा आणि वाटा म्हणणार्यांना नोबेल मिळू शकतो. डेमॉक्रॅटिक सोशालिस्ट हा एक नवा प्रकार गेल्या काही वर्षात आला आहे. म्हणजे आम्हाला लेनिन, स्टालिन, माओ, चे गव्हेरा यांच्या कत्तली नकोत पण त्यांचे अर्थकारण हवे असे म्हणणारा. असे मत असलेले लोक केवळ राजकारणातच असतात असे नाही. या आणि इतर संबंधित मुद्द्यांवर मिपावर मागे झालेल्या एका चर्चेत लिहिले होते. https://www.misalpav.com/comment/1127541#comment-1127541 सत्तेत येण्यापूर्वी लेफ्ट लिबर्टेरिअन असलेले लोक सत्तेत गेल्यावर लेफ्ट ऑथोरेटेरिअन बनतात हा अनुभव जगभरात आला आहे आणि त्याचे कारण त्या प्रतिसादात लिहिले आहे. तरीही अशा गोष्टींकडे हे लोक दुर्लक्ष करताना दिसतात. मग त्यांनी बुध्दी गहाण ठेवली असे का म्हणू नये?
In reply to सुधारणा by चंद्रसूर्यकुमार
In reply to तल्लख बुद्धी गहाण टाकलेली असते by मुक्त विहारि
In reply to सुधारणा by चंद्रसूर्यकुमार
In reply to मनमोहन सिंग केंब्रिजचे. by श्रीगुरुजी
In reply to शेतकऱ्यांना केंद्र आणि by आग्या१९९०
In reply to डावे उजवे by वामन देशमुख
In reply to हायब्रीड म्हणा की. डाव्यांचे by आग्या१९९०
In reply to भारतातील सगळेच पक्ष आर्थिक by वामन देशमुख
In reply to वयाच्या विसाव्या वर्षी जर by सुबोध खरे
In reply to वयाच्या विसाव्या वर्षी जर by सुबोध खरे
In reply to गडी पंच्याहत्तरीला आला तरी by आग्या१९९०
In reply to खिक्क! सोडा, संघ आणी भाजपने by अमरेंद्र बाहुबली
In reply to नंतर झोला घेणार का ? by आग्या१९९०
In reply to :) लोकांना घ्यायला लावणार! :) by अमरेंद्र बाहुबली
In reply to सुरूवात तर झाली आहेच की... by मुक्त विहारि
In reply to शेतकऱ्यांना केंद्र आणि by आग्या१९९०
शेतकऱ्यांना केंद्र आणि महाराष्ट्र सरकार वर्षाला १२००० रुपये आणि लाडकी बहीण योजनेत दरमहा १५०० रुपये देणारे सरकार डावे की उजवे?भारतातील कोणताही राजकीय पक्ष आर्थिक दृष्ट्या उजवा नाही. काही कमी डावे आहेत तर काही अधिक डावे आहेत. आपल्याकडे हा एक समजुतीतला मोठ्ठा घोटाळा असतो. राजकीय उजवे (भाजप, संघ वगैरे) हे आर्थिक दृष्ट्या पण उजवेच असतील असे गृहित धरून हे सगळे प्रश्न विचारले जातात. सत्य परिस्थिती तशी नाही. जनसंघाच्या काळापासूनही भाजप आर्थिक दृष्ट्या कधीच उजवा नव्हता. दिनदयाळ उपाध्यायांचे इंटिग्रल ह्युमॅनिझम आर्थिक उजवे थोडीच होते? मोदी सरकारच्या शेकडो योजना म्हणजे सरकारचे अर्थकारणातील स्थान वाढवायचाच प्रयत्न आहे. त्या योजना आर्थिक दृष्ट्या उजव्या थोडीच आहेत?
In reply to मनमोहन सिंग केंब्रिजचे. by श्रीगुरुजी
मनमोहन सिंगांनी १९९० च्या दशकात आर्थिक सुधारणा आणल्या (म्हणजे मूळ कल्पना नरसिंहरावांच्या असल्या तरी अंमलबजावणीकार मनमोहन सिंग होते) म्हणजे ते उजवे असावे.मनमोहनसिंग आणि नरसिंहरावांनी सुध्दा सुधारणा आणल्या त्या किती स्वतःच्या प्रेरणेने आणल्या आणि किती आय.एम.एफ ने घातलेल्या अटींमुळे आणल्या हा पण एक प्रश्नच आहे. कारण मनमोहनसिंग १९९१ पूर्वीच्या २० वर्षांपासून प्रशासनात वेगवेगळ्या पदांवर होते. त्यांना समजा प्रशासनात असताना सरकारच्या नितींची अंमलबजावणी करणे हेच करावे लागले. तरीही जसे बी.आर. शेनॉय यांनी समाजवादी छापाच्या दुसर्या पंचवार्षिक योजनेला प्रशासनात असतानाही विरोध केला तसे मनमोहनसिंगांनी कोणत्याही सरकारी निर्णयाच्या बाबतीत केल्याचे मी तरी वाचलेले नाही. इंदिरा गांधींच्या काळात एस.जगन्नाथन या रिझर्व्ह बँक गव्हर्नरने संजय गांधींच्या मारूतीला कोणत्याही रिस्क मॅनेजमेंट किंवा ड्यू डिलिजन्स शिवाय सरकारी बँकांकडून कर्ज दिले गेले होते त्याला विरोध केला म्हणून त्यांची उचलबांगडी करून त्यांना आय.एम.एफ मध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून पाठविले गेले. तसा कोणताही विरोध मनमोहनसिंगांनी मंत्रालयांचे सचिव किंवा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना केल्याचे ऐकिवात नाही. नरसिंहराव तर केंद्रात वरीष्ठ मंत्रीपदांवर राहिलेले होते. तेव्हाही कधी त्यांनी समाजवादी छापाच्या निर्णयांना विरोध केल्याचे मी तरी वाचलेले नाही. त्यामुळे त्या १९९१ च्या आर्थिक सुधारणा खरोखरच स्वयंप्रेरणेने झाल्या होत्या का आणि आपली आर्थिक स्थिती १९९१ मध्ये खालावली नसती तरी त्या सुधारणा झाल्या असत्या का हा प्रश्नच आहे.
In reply to बहुतांशी डाव्यांचे प्राबल्य by चंद्रसूर्यकुमार
In reply to २१ मे १९९१ या दिवशी अत्यंत by श्रीगुरुजी
In reply to सुधारणा by चंद्रसूर्यकुमार
In reply to सुधारणा by चंद्रसूर्यकुमार
In reply to १. एखादी व्यक्ती जितकी तल्लख by युयुत्सु
कृपया लिंक द्यावी.एकूणच मिरची बरीच झोंबलेली दिसते. तुमच्या मुळातल्या धाग्याचा उपहास म्हणून हा धागा आहे आणि या धाग्यातील दाव्याचा- "एखाद्या समाजगटातील एखादी व्यक्ती जितकी सुमार बुद्धीची तितकी ती डावीकडे झुकलेली असायची शक्यता असते" उपहास म्हणून मी हा दावा केला आहे की सुमार बुद्धीचे नाही तर तल्लख बुध्दीचे पण बुध्दी गहाण ठेवलेले लोक डावीकडे झुकतात. तरी लिंकच हवी असेल तर अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये डावीकडे झुकणार्या प्रोफेसरांची संख्या उजवीकडे झुकणार्यांपेक्षा गेल्या काही वर्षात बरीच वाढली आहे याविषयी https://www.washingtontimes.com/news/2016/oct/6/liberal-professors-outnumber-conservatives-12-1/ ही एक लिंक आहे आणि तो बुध्दी गहाण टाकणारा प्रकार आहे असे मला का वाटते त्याची कारणे https://fee.org/articles/why-most-academics-tilt-left/ या लिंकमध्ये बरीचशी आहेत. दोन्ही लिंक २०१८ मधील आहेत.
In reply to लिंक by चंद्रसूर्यकुमार
भारी! आवडलं.