Skip to main content

चालू घडामोडी । सप्टेंबर २०२६ | भाद्रपद २०४८

लेखक कांदा लिंबू यांनी मंगळवार, 01/09/2026 08:30 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार मिपाखरांनो 🙏 

१४ सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे त्याचबरोबर मिसळपावचा वर्धापनदिनसुदधा आहे! गणेशोत्सव व मिसळपाव वर्धापन दिन शुभेच्छा!

पावसाच्या बाबतीत जुलै ऑगस्ट महिने किमान मराठवाडा व विदर्भात निराशा जनक ठरले आहेत. सप्टेंबर महिन्यात पावसाची तूट काही प्रमाणात तरी भरून निघेल अशी अपेक्षा आहेत. देशभरात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून सप्टेंबरमध्ये पाऊस सरासरीतरी गाठेल का हे पहावे लागेल. 

चालू घडामोडी । जुलै २०२६ । आषाढ १९४८

लेखक कांदा लिंबू यांनी बुधवार, 01/07/2026 16:09 या दिवशी प्रकाशित केले.

जुलै २०२६ च्या चालू घडामोडींसाठी हा नवीन धागा काढत आहे. 

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यवर्ती सहकारी बँकांच्या (DCC Banks) निवडणुका सुरू आहेत तर काही ठिकाणी झालेल्या आहेत. ग्रामीण भागातील राजकारणात या निवडणुका व बँकांच्या माध्यमातून चालणारे अर्थकारण महत्त्वाचे असते. विविध सहकारी संस्था, सेवा सोसायट्या, गट वगैरेंची प्रतिनिधी या बँकांवर संचालक असतात.

ठाण्याची निवडणूक एकनाथ शिंदे प्रणित गटाने जिंकली. अहिल्यानगर व नांदेडची प्रक्रिया सुरू आहे. ग्रामीण राजकारणात रस असलेल्या मिपाकरांनी या निवडणुका follow करायला हरकत नाही.

चालू घडामोडी । जून २०२६ । ज्येष्ठ १९४८

लेखक कांदा लिंबू यांनी सोमवार, 01/06/2026 15:11 या दिवशी प्रकाशित केले.

जून २०२६ च्या चालू घडामोडींसाठी हा नवीन धागा काढत आहे. 
 

थोर गायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांचे वयाच्या ८९व्या वर्षी मुंबई येथे निधन झाले. अवीट गोडीची असंख्य गाणी त्यांनी गायिली आहेत. मराठी, हिंदी, आसामी, कन्नड, बंगाली आणि ओडिया यासह अनेक भाषांमध्ये त्यांनी सिनेमागीते, भक्तिगीते, गझला, ठुमरी इ प्रकारांत गाणी गायिली आहेत.

त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 

चालू घडामोडी । मे २०२६ । वैशाख अधिक ज्येष्ठ १९४८

लेखक कांदा लिंबू यांनी शुक्रवार, 01/05/2026 10:00 या दिवशी प्रकाशित केले.

सर्व मिपाकरांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

"जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा" असे राज्यगीत असलेल्या आपल्या मराठी राज्याची स्थापना होऊन आज ६६ वर्षे पूर्ण झाली.

आज जागतिक कामगार दिन आहे. पांढरे, निळे, करडे - सर्व प्रकारचे श्रमिक, हे जग निर्माण करण्यासाठी जे कष्ट उपसतात त्यांच्या श्रमाचा हा गौरव दिन.

आज वैशाखी पौर्णिमा आहे. भगवान विष्णूंनी आजच्या दिवशी गौतम बुद्धांच्या रूपाने भूतलावर अवतार घेतला होता. केवळ हिंदूंनाच नाही, अवघ्या मानव जातीला शांतीचा संदेश त्यांनी दिला.

चालू घडामोडी: मार्च २०२६ / चैत्र १९४८

लेखक कांदा लिंबू यांनी रविवार, 01/03/2026 07:41 या दिवशी प्रकाशित केले.
या महिन्यात १९ मार्चला गुढीपाडवा व हिंदू नववर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने मिपाकरांना नववर्षाच्या आगाऊ हार्दिक शुभेच्छा. केंद्र सरकार व इतर संस्थांचे वार्षिक अर्थसंकल्प मांडायला सुरुवात झाली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प विकसित 'भारत@२०४७' च्या ध्येयावर आधारित आहे असे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे.‌ आखाती प्रदेशात पाच-सात देशांमध्ये युद्धसदृश्य लढाया होत आहेत. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.‌ हे युद्धाचे प्रकरण कुठवर जाईल याबद्दल काही अंदाज जाणकार मिपाकर व्यक्त करतील का?

चालू घडामोडी: फेब्रुवारी २०२६

लेखक कांदा लिंबू यांनी रविवार, 01/02/2026 05:04 या दिवशी प्रकाशित केले.
चालू घडामोडी: फेब्रुवारी २०२६ पाहता पाहता नवीन वर्षाचा पहिला महिना संपला. थर्टीफर्स्टची धुंदी अजून उतरलेली नसतानाच, स्नेहीजणांनी दिलेल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा अजून मनात असतानाच, त्यांनी दिलेल्या संक्रांतीच्या तिळगुळाचा गोडवा अजून जिभेवर असतानाच येत्या महाशिवरात्रीच्या उपवासाचे वेध लागले आहेत. नवीन वर्षाचा साडेआठ टक्के काळ संपून फेब्रुवारी महिना सुरूही झालाय. काळ कुणासाठी थांबत नाही हेच खरे! मागच्या महिन्यात स्थानिक व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या.

महापालिका निवडणूक निकालांचे चर्वितचर्वण

लेखक कांदा लिंबू यांनी शुक्रवार, 16/01/2026 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
(उर्फ: “निकाल आले, पण अर्थ कुणाला लागला?”) महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांचे निकाल आज अखेर जाहीर झाले आणि लगेचच राज्यातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा “आम्ही जिंकलो”, “नैतिक विजय आमचाच”, “जनतेने स्पष्ट कौल दिला” अशा घोषणांची आतषबाजी सुरू झाली. निकाल कोणताही असो, प्रत्येक पक्षाच्या गळ्यात विजयाची माळ, तर पराभवाची माळ मात्र नेहमीच “जनतेच्या चुकीच्या समजुतींनी” किंवा “ईव्हीएमच्या गडबडीने” दुसऱ्याच कुणाच्या गळ्यात पडलेली दिसते. महापालिका निवडणूक म्हणजे खरं तर ड्रेनेज, कचरा, पाणी, रस्ते आणि फुटपाथ यांवरचा लोकशाही उत्सव.

चालू घडामोडी - डिसेंबर २०२५

लेखक अभ्या.. यांनी सोमवार, 01/12/2025 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मिपावरच्या चालू घडामोडींचा परामर्ष घेता घेता "अ" च्या बाराखडीतले सदस्यनामे घेणारे आयडी सोडून बाकी सगळे आयडी सगळ्ळ्ळे समजून घेतील अशा अपेक्षेने चालू घडामोडींचा हा (माझा) पहिला धागा काढत आहे. चालू घडामोडींच्या धागानिर्मात्यांच्या लिस्टीत "अ" वर्गीय धागालेखक तसेही मायनॉरिटीत असल्याने म्हणले चला उपेक्षितांचा पण आवाज उठवुया.

मनाचे श्लोक आणि विवाद

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 13/10/2025 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदीत एक म्हण आहे—"बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो होगा!" नाव + कुप्रसिद्धी = पैसा या गणितीय समीकरणाचा लाभ अनेकांना झालेला आहे. मराठी सिनेमांचे बजेट तसेच कमी असते. त्यामुळे प्रसिद्धी मिळवण्यासाठी डोके वापरावे लागते. या निर्मात्यानेही डोक्याचा वापर केला आणि सिनेमाला प्रसिद्धी मिळवून दिली. ज्या सिनेमाचा समर्थ रामदास रचित मनाचे श्लोकशी काहीही संबंध नाही, त्या सिनेमाला मनाचे श्लोक हे नाव दिल्यावर जनता भडकली पाहिजे, विरोधात उतरली पाहिजे—अशी निर्मात्याची अपेक्षा होती आणि तसेच घडले. एक पैसा खर्च न करता सिनेमाला प्रसिद्धी मिळाली.