सर्व मिपाकरांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
"जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा" असे राज्यगीत असलेल्या आपल्या मराठी राज्याची स्थापना होऊन आज ६६ वर्षे पूर्ण झाली.
आज जागतिक कामगार दिन आहे. पांढरे, निळे, करडे - सर्व प्रकारचे श्रमिक, हे जग निर्माण करण्यासाठी जे कष्ट उपसतात त्यांच्या श्रमाचा हा गौरव दिन.
आज वैशाखी पौर्णिमा आहे. भगवान विष्णूंनी आजच्या दिवशी गौतम बुद्धांच्या रूपाने भूतलावर अवतार घेतला होता. केवळ हिंदूंनाच नाही, अवघ्या मानव जातीला शांतीचा संदेश त्यांनी दिला.
या महिन्यात राजकीय, सामाजिक, धार्मिक पातळीवर अनेक घडामोडी होणार आहेत.
तमिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, पश्चिम बंगाल, असम या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे मतदान पार पडले आहे. सोमवार, ४ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित होतील. यावर मिपाकरांची मनमोकळी चर्चा / काथ्याकूट अपेक्षित आहे.
दर अडीच-तीन वर्षांनी येणारा, हिंदूंचा पवित्र महिना - अधिक ज्येष्ठ मास रविवार १७ मे रोजी सुरू होत आहे. नाना व्रतवैकल्ये करून पुण्य प्राप्त करण्याची ही पर्वणी आहे.
या अधिक मासात (म्हणजेच धोंड्याच्या महिन्यात!) जावयांचा यथाशक्ती आदर-सत्कार करण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. मिपाकर जावयांना त्यानिमित्त आगाऊ शुभेच्छा! ;-)
मिसळपाव
प्रतिक्रिया
सह्याद्रीचा सिंह गर्जतो
यमुनेचे त्याला पाणी पाजा.
मुंबई पुणे महामार्गावर…
मुंबई पुणे महामार्गावर मिसिंग लिंक चे आज उद्घाटन आहे.
हा मार्ग पूर्णत: लहान वाहने आणि बसेस याम्च्या साठी ठेवावा.
लोणावळा घाटात वहातूक गुंता होण्याचे मुख्य कारण आहे ते अवजड ट्रक.
हे ट्रक संथ गतीने चालतात पण ते इतरांची वाट देखील अडवतात
आज घाटात जबरदस्त ट्रॅफिक जाम…
आज घाटात जबरदस्त ट्रॅफिक जाम आहे. तीन दिवस सलग सुट्या आल्यात.
आज उद्घाटन करण्यापेक्षा काल करायला हवे होते.
In reply to आज घाटात जबरदस्त ट्रॅफिक जाम… by शाम भागवत
चुकीचा दिवस.
उलट एकदम बरोबर दिवस
In reply to आज उद्घाटन करण्यापेक्षा काल करायला हवे होते. by कंजूस
मिसिंग लिंक प्रोजेकटसाठी आणखी काही हजार कोटी रूपयांची तरतूद केल्याची बातमी गेल्या दोन दिवसांत वाचली होती. ती आता दिसत नाही.
प्रचंड हाल झाले नाहीत तर जनतेला या दुसऱ्या प्रकल्पाचे महत्त्व कसे पटेल?
तथाकथित इन्फ्रामॅनला व कंत्राटदारांची भूक...
बातमी लोकसत्ताची आहे, खरी…
In reply to आज घाटात जबरदस्त ट्रॅफिक जाम… by शाम भागवत
बातमी लोकसत्ताची आहे, खरी आहे की खोटी माहित नाही. कुणा मिपाकरांचा अनुभव आहे का?
सलग सुट्ट्या, मिसिंग लिंकच्या लोकार्पणामुळे मुंबई-पुणे महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांब रांगा, उकाड्याने प्रवासी त्रस्त
बातमी खरी असावी. काल गुगल…
In reply to बातमी लोकसत्ताची आहे, खरी… by कांदा लिंबू
बातमी खरी असावी. काल गुगल मॅप घाटात लाल रेष दाखवत होती. पण अशा सुट्या आल्या की दोन तासाचा टॅफीक जॅम हा आता नॉर्मल म्हणायला पाहीजे.
पण त्याचा उपयोग फडणवीसांविरूध्द करता येत असेल तर ती संधी कोण सोडेल?😀 त्यामुळे त्यात काही गैर आहे असे वाटत नाही. शेवटी ते राजकारण आहे.
प्रवासी मजेत आले गेले असते ना या मोठ्या सुट्टीत
किंवा डिजिटल पडदा ओढायचा होता आणि एकदा फावल्या वेळात ड्राइविंगची हौस भागवायची होती. डिजिटल युग आलंय ना मग करा की अमलबजावणी सगळीकडे.
........
मागच्या आठवड्यात कर्नाटकात धारवाडकडे होतो. रस्त्यांवर, गावांत एकसुद्धा राजकीय फलक ( बॅनर) दिसला नाही . पण बेळगाव आल्यावर फलकच फलक वाढदिवसाच्या शुभेच्छा .
मतदान पेट्या ठेवलेली जागा
दहा वेळा उघडली गेली आहे......बातमी.
व्यावसायिक इंधन दरवाढ
पश्चिम आशियातील युद्ध सुरू झाल्यापासून क्रूड ऑइल च्या किमती प्रचंड वाढल्या होत्या. पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूकांचे मतदान पार पडले. आता अनेक प्रकारचे व्यवसायिक इंधन - आंतरराष्ट्रीय वाहतूक विमान इंधन, व्यावसायिक डिझेल, व्यावसायिक १९ किलो व ५ किलो एलपीजी, यांच्या दरात ४०% वाढ करण्यात आली आहे.
केवळ किरकोळ पेट्रोल डिझेल व घरगुती १४ किो एलपीजी यांचेच भाव वाढविलेले नाहीत. पश्चिम आशियातील युद्ध लवकर संपले नाही तर येत्या काळामध्ये तेही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
निवडणुकांपर्यंत इंधन दरवाढ रोखून धरणे हे प्रकार सगळीच सरकारे करतात त्यात केवळ मोदींना दोष देऊन उपयोग नाही. खरं तर कुणालाही दोष देऊन उपयोग नाही. क्रूड ऑइल च्या किमती वाढल्या तर इंधनाच्या किमती वाढणे हे नैसर्गिकच आहे. त्यांना कृत्रिम रित्या रोखून धरणे हेच अनैसर्गिक म्हणावं लागेल.
नि:शब्द 😢😥😡
नि:शब्द
😢😥😡
तो माणूस लोकांची हातात आधी…
In reply to नि:शब्द 😢😥😡 by श्रीगुरुजी
तो माणूस लोकांची हातात आधी सापडला, मग त्याला
पोलिसांकडे सोपवण्यात आले. आता म्हणत आहेत आमच्या ताब्यात द्या! माग आधी लोकांच्याच ताब्यात होता ना? त्याचे अजून वर्षभर तरी काही वाकडे होत नाही. मालेगाव केस मधील आरोपी अजूनही जेल मधे आहे, त्याला सरकारी वकील देण्यात आलाय, जिल्हा न्यायालय मग राज्य न्यायालय मग सर्वोच्च न्यायालय असे प्रकरण वर जाईल तो पर्यंत १० वर्षे निघून जातील, मधे कदाचित त्याला जामीनही मिळेल. भारतात जिवाला किंमत नाही त्यातही स्त्री असेल तर नी लहान मूल असेल तर आजिबातच किंमत नाही. :(
आता काय करायचं....
ममता दीदी सत्ता सोडणार नाहीत?
बंगालातील हत्याकांडांचे सत्र
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या ४८ तासांतच, भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे वैयक्तिक सहाय्यक, चंद्रनाथ रथ, यांची बुधवारी रात्री कोलकाताच्या उत्तर उपनगरात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेमुळे परिसरात तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटल्या असून तणाव वाढला आहे.
https://m.economictimes.com/news/elections/assembly-elections/west-bengal/bjp-leader-suvendu-adhikaris-personal-assistant-shot-dead/articleshow/130866607.cms
निवडणुकांच्या निकालानंतर आतापर्यंत किमान चार राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत.
जागतिक कीर्तीचे, जगर चर्चिल…
जागतिक कीर्तीचे, जगर चर्चिल जाणारे ख्यातनाम विनोदमूर्ती श्री. रा. रा. संजयराव राऊत यांनी थेट डोनाल्डतात्यांना पत्र लिहिले आहे. बंगालमधील निवडणुकीत प्रचंड प्रमाणात लबाडी, धाकदपटशा, पक्षपातीपणा करून भाजपने निवडणूक जिंकल्याने लोकशाहीवर प्रचंड आघात झाल्याचे नमूद करून सर्व लोकशाहीप्रेमी जागतिक नेत्यांनी या अन्यायाविरुद्ध हस्तक्षेप करावा अशी विनंती केली आहे.
लोकशाही वाचविण्याचे राऊतांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. भारतात २ दशकांपासून मतयंत्रात गडबड केली जात आहे हेसुद्धा त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
२ दशकांपासून म्हणजे अंदाजे २००६ पासून. २००६ ते २०१४ या काळात तर कॉंग्रेसचे सरकार होते.
ज्या डोनाल्डतात्यांना हे पत्र लिहिलंय त्यांनी तर २०२० च्या निवडणुकीत निर्णायक पराभवानंतरही अध्यक्षपद सोडण्यास नकार दिला होता व समर्धक जमवून दंगल करण्याचा प्रयत्न केला होता.
जर चुकुनमाकून तात्यांनी पत्र वाचले तर ते गडाबडा लोळत हसत राहतील. समजा वाचले किंवा नाही वाचले तरी हे पत्र ते वाया घालविणार नाहीत. उद्या सकाळी नेहमीच्या "सामना"ऐवजी हे पत्र "त्या" कामासाठी वापरतील.
_________________
हेच ते राऊतांचे ट्विट व पत्र.
I had written an open letter to President Trump,
as he has always spoken about democracy and fair elections, and wanted to bring the truth to his attention. As a responsible Indian, and Member of Parliament, it is my duty to shed light on the fact that this election was carried out in an absolute lopsided manner.
To begin with, the Opposition Parties that represent more than half of India’s vote share officially in 2024, have raised doubts over the fairness and neutrality of the Chief Election Commissioner and his motives. The Election Commission, under the CEC’s guidance has barred 9 million voters from voting overnight, without a fair appeal or any further justice. More so, even while Manipur burnt with violence, this election saw the deployment of central forces in millions, including tanks and encounter specialists, as a mark of force.
It is my duty, to ensure that everyone is aware, the world over (be it a president of an important democracy or a citizen of any country) that the elections haven’t been as free and fair as shown by sections of media to the world. The disenfranchised voters, and those who faced fear while casting their vote raise questions even today. EVMs have been doubted for 2 decades and rigging issues have been raised by India’s leader of opposition. I strongly believe that leaders of democracies around the world cannot be kept away from the fact that the institutions that once ensured our elections to be free and fair, are now being questioned.
जगर चर्चिल जाणारेजगभर…
In reply to जागतिक कीर्तीचे, जगर चर्चिल… by श्रीगुरुजी
जगभर चर्चिले जाणारे
मिष्टीदोई....
उघडले डिजिटल पेटारे
कमळाबाईचे वारेन्यारे
झाली दिदीची विदाई
शुभेंदूला मिष्टीदोई
बेतुक्या म्हणे............
जशी दहा रू ची झालमुरी
तशी पराठे लस्सी भारी
आता भगवंताची बारी
बेतुक्या म्हणे..........
आमी भालो तुमी भालो
XXको गढ्ढे मे डालो
आता,बल्ले बल्ले, शावा शावा
नकळे गनिमी कावा
बेतुक्या म्हणे..........
अश्वमेधाचा वारू
गंगोत्री ते गंगासागरू
पादाक्रांत हिन्दमहासागरू
सकल जनांसी आधारू
बेतुक्या म्हणे............
शुभहिंदू अधिकारी यांना…
शुभहिंदू अधिकारी यांना भाजपने मुख्यमंत्री म्हणून निवडले हे चांगले झाले.
नाहीतर त्यांनी यावेळी तमिळनाडूमध्ये अण्णा मलाई यांचा व मागच्या मधल्या वेळी महाराष्ट्रात फडणवीस यांचा गेम केला होता.
माजपा चे राजकारण नक्की कसे…
माजपा चे राजकारण नक्की कसे चालते ? म्हणजे पडध्या मागे हात ठेवून सोशल मिडियाचा वापर करून काय केले जाते ? हे अनेक जणांना माहित नसते.
१] भाडोत्री पाळलेले असतात.यांचे एकच काम असते, दिवस रात्र प्रत्येक सोशल मिडियावर राजकीय कोलांट्या उड्या मारून प्रत्येक निवडणुकी आधी हा पक्ष कसा हिंदुत्ववादी आहे हे जनमानसावर बिंबवत राहायचे. [ नाहीतर भाडोत्रीपणाचे पैसे कसे मिळतील? ]
२] पक्षाच्या अधिकृत हॅडल वरून ज्या ज्या नेत्या विरुद्ध भूमिका घेतली असेल त्याच्या विरुद्ध रान पेटवायचे मग तो व्यक्ती पक्षात आला की कोलांटी उडी मारायची. त्याची कशी गरज आहे हे आता सगळीकडे सांगत सुटायचे. [ अगदी ताजे ताजे उदाहरण बंगालचे ]
३] निवडणूक झाली की जातीयवादी राजकारण सुरु करायचे आणि चुकीच्या निर्णया बद्धल सोयीस्कर मौन बाळगायचे.
सोशल मिडिया वर एक भाडोत्री आहे, जो पक्षात नाही आणि ढोंगी हिंदुत्ववादी संघात नाही, पण कोबीजी त्याच्यावर मेहरबान असल्याने त्याला चक्क पद दिले आहे.
त्याची कथा खाली देत आहे.
कथा :
BJP Says Brahmins & Muslims Didn't Let Them Win | Bengal Results | Dilip Mandal | Ajeet Bharti
विशेष गंमत : सुधांशु त्रिवेदी आणि गाय
जाता जाता : कथा वाचकाला युजीसी आंदोलनाच्या वेळी त्याच्या घरात नजर कैदेत ठेवले होते. [हेच ते अच्छे दिन! बरं का मंडळी ]
दिल्ली मध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना आंदोलनाला परवानगी दिली जाते मात्र जेव्हा सामान्य वर्गातील हिंदूंनी युजीसी विरोधात पुन्हा शातंतापूर्ण आंदोलनाची तयारी केली असताना बहुतेक आंदोलन दिनाच्या आधीच्या दिवशी परवानगी नाकारली गेली .जर तुम्ही खरंच हिंदू म्हणून जगत असाल तर हिंदू म्हणून एकत्र रहा आणि सर्व प्रकारच्या जातीयवादी राजकारणाला विरोध करा.
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी: Jaan Se Guzarte Hain (Live at Dhurandhar The Revenge -Music Album Launch)
औरंगजेब
श्री.रा.रा.अरविंद केजरीवालांनी पंतप्रधान मोदींची तुलना औरंगजेबाशी केली आहे. एक गोष्ट कळत नाही. डापु गॅंग उर्फ जमात-ए-पुरोगामींना औरंगजेबाविषयी प्रेम असते, केजरीवालांविषयी तर प्रेम उतूच जात असते आणि मोदींविषयीचा द्वेषही तसाच उतू जात असतो. आता आली की पंचाईत. ज्याच्याविषयी प्रेम उतू जाते अशा व्यक्तीने ज्याच्याविषयी द्वेष उतू जातो अशा व्यक्तीची तुलना ज्याच्याविषयी प्रेम वाटते त्या व्यक्तिबरोबर केली. आता काय करायचे? औरंगजेब वाईट होता हे मान्य करायचे का? तसे मान्य केल्यास मग औरंगजेबाने आमच्या शंभूराजांना मनुस्मृतीतील आज्ञेप्रमाणे हाल हाल करून ठार मारले असला गुडघ्यातला नरेटीव्ह चालविला जात होता त्याचे काय? आणि औरंगजेब थोर पुण्यात्मा सुफी संत असेल आणि ती तुलना मान्य करायची तर मग मोदी पण पुण्यात्मा आहेत हे मान्य करायचे का?आणि तेही करायचे नसेल तर मग औरंगजेब आपल्याबरोबर ठेऊन केजरीवालांना आपल्या मनात दिलेले अढळपद काढून घ्यायचे काय?
जामच पेचात टाकले की केजरीवालांनी डापु गॅंगच्या उर्फ जमात-ए-पुरोगामीच्या लोकांना.
जशी पंजाबची विधानसभा निवडणूक…
In reply to औरंगजेब by चंद्रसूर्यकुमार
जशी पंजाबची विधानसभा निवडणूक जवळ येते आहे, तसा गेले वर्षभर भूमिगत झालेला केजरू आता परत उचल घ्यायला लागलाय. नाटकीपणा पुन्हा एकदा जोरात सुरू झालाय.
तमिळनाडूतला विजय.....
कसा झाला? त्यामागे काही गडबडगुंडा असणार तोही पत्रातून कळवला पाहिजे ट्रंपबाबांना राष्ट्रीय पत्रकारांनी. तिकडेही लोकशाहीचा खून पडला.
स्टेजवर वन्दे मातरम ऐकताना राहुलबाबा फारच गंभीर झाले. ये क्या हुआ इधर? कैसे हुआ?