मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उकळी

कावळ्यांची फिर्याद -२

कर्नलतपस्वी ·
लेखनविषय:
कावळ्यांची फिर्याद पिंपळाच्या झाडावर कावळ्यांची भरली होती सभा.... चला,चला,चला...समोर मास भादव्याचा उभा. संतप्त सारे काक होते,काकरव आसमंती गुजंला.... पितृपक्षी दुर जाऊ,प्रस्ताव त्यांनी मांडला. कर्म कुणाचे फळं कुणाला, का दर्भ मागे लावला ? क्रुद्ध होऊनी प्रभूने, पूर्वजांचा एक चक्षू फोडला. लंपट,लुब्ध,छद्मवेषी गंधर्व होता ,काकवेष धारूनी.....

चांद्रयान ३

कर्नलतपस्वी ·
लेखनविषय:
चांद माझा हांसरा, उधाण येई सागरा चंद्र उगवला नभी, लाजली वसुंधरा स्मरणातील रुप तुझे जे कवीने रेखले चांदभरल्या रातीतले स्वप्न आज भंगले चंद्रमुखी तू मेघसावळी कसे म्हणू मी.... क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणाचा कसे म्हणू मी..... आता कसे म्हणू मी चंद्र उगवले दोन एक चंद्र अंबरी,एक मंचकावरी कसे म्हणू मी..... ...... ...... होईल वर्षाव लाटण्यांचा. जेव्हां तुझ्या नजीक चांद्रयान तीन पोहचले अन् नव रुप तुझे यान चक्षुंनी पाहिले यान चक्षुंनी जे दाविले,ते मी ही पाहिले.... ओळखीचे रुप तुझे न उरले बघुन पाहता नव रुप तुझे, आले डोळे भरून झेपावतील का लाटा,करतील का कवने? पाहीले खरे जे रूप तुझे चंद्र

स्वतःचे खरे रूप .

अत्रुप्त आत्मा ·
स्वतःचे स्वरूप ,पाहू दे मज डोळा नाही मी भोळा , कळेल मज . जाऊ दे मला , माझीया आत्म्याकडे अन्य कुणीकडे , कळेल निजरूप??? पहीला मी खादाड , नंतरचा आसक्त त्यानंतर अजून काही (?), भ्रम हा गेला ! आसक्ती हे मूळ , त्यावरी अनंत बांडगूळ वेगवेगळे खूळ , पोशिले मी आवडीने . ऐश्या निरंतराची , आहे मज गाठी याशिवाय पाठी , नाही काही ! आत्मा म्हणे आता , पाहूनी मूळ रुप होऊ नको तद्रूप , पुन्हा एकदा . मूळ रुप खरे , जन्मांतरीचे बरे .

सखये,बाई ग.....

कर्नलतपस्वी ·
सख्या रे... प्राचीताई यांची तरल,मोरपंखी कविता वाचल्यावर एकांगी वाटली. सखीने शंका उपस्थित केली तर सखा तीचे शंका समाधान कसे करेल हा एक विचार डोक्यात आला. काही सुचले, लिहून काढले व ताईंची परवानगी काढली.

आयुष्याचा डीएने:मॉलिक्य़ूलर बॉयोलॉजीच्या भाषेत:

Bhakti ·
भागो यांच्या साय फार कथा वाचून अभ्यासाचे जुने दिवस आठवले.बरोबरीने कवितेचा ही अभ्यास जोरात असायचा :).DNA replication शिकत होते तेव्हा लिहिली ही साय फाय कविता होती ;)....

बोले चिडीया (मिडीया ?) बोले कंगना.....

कर्नलतपस्वी ·
बोले चिडीया (मिडीया ?) बोले कंगना हाय मै हो गयी बेघर साजना... तोडलंस माझं घर, तुटेल तुझा गुरूर एक दिवस येशील, तू पण रस्त्यावर जरूर बोले चिडीया बोले कंगना हाय मै हो गयी बेघर साजना... सुटेल तुझं धनुष्य, पुसेल तुझ नाव तुझाच बाण करेल, तुझ्याच XXत घाव बोले चिडीया बोले कंगना हाय मै हो गयी बेघर साजना... नको समजू मला गाव की गोरी मै तो बागड की छोरी,गोरी गोरी ( https://youtu.be/zVPTjJ0blWs ) XX XXX हाती जाईल धनुष्याचा दोरी भात्यात उरतील तुझ्या फक्त बाण तेरा घड्याळा बरोबर, वाजतील तुझे पण बारा बोले चिडीया बोले कंगना हाय मै हो गयी बेघर साजना... केलेस पाप म्हणून लागेल शाप छातीवर लोटेल अस्तीन क

अशीच एक धुंद, सोनेरी सायंकाळ - (आणि अंतिम वगैरे सत्य)

चित्रगुप्त ·
अशाच एका धुंद, सोनेरी संध्याकाळी सहज फिरायला निघालो होतो सहज मंजे मुद्दामच … – मला स्वतःशीच मोठ्याने बोलण्याची खोड आहे – घरात उगाच तमाशा नको म्हणून बाहेर पडलो. नकळत पाय तळ्याकाठच्या शांत रस्त्यावर वळले – मनात तात्त्विक वगैरे विचार घोळत होते. कोs हं ? … मी कोण आहे ? मै कौन हूँ ? व्हू आयाम ? सोs हं ! … मी तो आहे. तो मी आहे. या साडेचार फुटी कुडीत अडकलेला - अविनाशी,अमर, स्वयंप्रकाशी आत्मा आहे मी निर्विकार चेतना आहे मी ब्रम्ह, मी सत्य, मी कैवल्य आहे मी कर्ता, मी भोक्ता, मी ज्ञाता आहे मी साक्षी, मी सर्वसाक्षी, मी निर्लिप्त- निखळ जाणीव आहे.

(झाली किती रात सजणी...)

कर्नलतपस्वी ·
लेखनविषय:
मुळ कवी दिपक पवारांची क्षमा मागून.... (आली जरी रात सजणी...) आली जरी रात सजणी झाली किती रात सजणी, नावडे मजला "थांब जरा येते", सांगणे. अधिरला जीव माझा, असे कसे तुझे हे वागणे. खडबड, खडबड आवाजास, ताल देती तुझी काकणे. बरे वाटते का असे, सारखे सारखे वाकून माझे पाहणे.

(चारोळी विडंबन)-लसं....ग्रहण

कर्नलतपस्वी ·
पेरणा-चारोळी विडंबन चहात इडली चहात गुलाबजाम चहात जिलेबी आणि आमची चारोळी संपली (उगाच इकडं तीकडं भटकू नये म्हनून वरीजनल चारोळी इथं डकवली आहे,अर्थात वरिजनल चारोळीकारांची इक्क्षमा मागुन) &#128540,&#128540 वरील चारोळी खुपच हुच्च दर्जाची असावी असे वाटते म्हणून दुर्बोध वाटण्याची शक्यता आहे. खोलवर जाऊन पाहिले तर ही चारोळी राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक वाटते.