मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माहेर, सासर

पाषाणभेद ·
माहेर, सासर नदीच्या त्या किनारी साजण माझा उभा कधीचा वाट बघतो माझी जीवाचा तो सखा अल्याड गाव माझे त्यात मी राहिले पल्याड त्याचे गाव कधी नाही पाहिले चिरेबंदी साचा भक्कम असे माझे घर नाही दिसत येथून घर त्याचे आहे दूर मनात त्याची सय मध्येच जेव्हा येते त्याचाकडची वाट नजरेला खुणावते मनी लागली हुरहुर कसे असेल सासर कसे का असेना मी शेवटी सोडेन माहेर - पाषाणभेद ०८/१२/२०१९

वेदनाच मला मिळू दे

पाषाणभेद ·

खिलजि 25/11/2019 - 12:33
छान झाली आहे पण वेदना मागून मन कठोर का करावे .. नकोच त्या , त्यापेक्षा दुःख झेलण्याची ताकद मागा ================================================================== वृथा व्यथा मागू नये मन कठोर करावयासी मन निर्मळ गंगेजैसे असे फक्त आप्तस्वकीयांसी ढाळ अश्रू दुःखात दुज्या देउनी खांदा त्या भाराप्रती ओढ लागू दे जरा मनाला ओथंबुनि जाऊ दे प्रीती धर्म कोणता कोणा समजला ? कळण्यातच सारे जन्म गेले मनाचेही ऐसेच काहीसे कधी कठोर तर मृदू झाले द्यावयास तो वरती बैसला मागून व्यथा पदरी तू त्यातच फसला

लेखनविषय:
नकोत आनंददायी संवेदना हे प्रभो वेदनाच मला मिळू दे हरवू दे माझा मी पणा त्यासाठी मजला धिर दे सुख असे हे की डाचते मला ते तेच ते कणखर मनाला पंगू बनवते भौतिकाच्या मागे न लागो शाश्वत असा अशिष दे ऐहीक श्रीमंत असूनही मदतीचा हात नाही कशाला मग उगाचच मी दानशूर मिरवत राही तुझ्या हातांची सर येण्याची मजला बुद्धी दे तावून निघावे भट्टीत सोने मग दागिणा बनण्या त्यासम माझे मन होवूदे तयार तुझ्या कडे येण्या घण संकंटांचे घाल पाठी, मळली वाट मला न दे - पाषाणभेद १७/११/२०१

कविता : भेट मित्रांची…

bhagwatblog ·

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

bhagwatblog 06/11/2019 - 10:49
धन्यवाद दिलीप!!! लिहीते राहण्याचानक्कीच प्रयत्न राहील...

आठवणींना उजाळा भावनांचा उमाळा शब्दात जिव्हाळा दोस्तीचा सोहळा…. भेट मित्रांची… मित्रांची सतत मस्ती कधी मस्तीची सक्ती सख्याची जीवापाड दोस्ती कधी दोस्तीत कुस्ती…. भेट मित्रांची… मित्र कमी बोलणारा परी डोळ्यात जपणारा दोस्त शब्दात खेळणारा पण शब्दासाठी धावणारा…. भेट मित्रांची…

भक्ति गीत: सप्तशॄंग गडावर जायचं

पाषाणभेद ·
लेखनविषय:
काव्यरस
Taxonomy upgrade extras
मला ग बाई वाट गावली, माझ्या नशिबानं सप्तशॄंग गडावर जायचं, नवरात्रीत चालून ||धृ|| हाती धरली कावड गोदेच्या निर्मळ पाण्यानं ||१|| गड झाला हिरवा साथ दिली पावसानं ||२|| घर माझं भरलं धन धान्याच्या राशीनं ||३|| जगण्याची रीत दावली देवी सप्तशॄंगीनं ||४|| नवसाला पावली आई आशीर्वाद दिला तिनं ||५|| पुजा करून ओटी भरीन कुंकू लावीन हातानं ||६|| सगे सोयरे झाले सोबती पायी चालती आनंदानं ||७|| दर्शनाची आस लागली घाईनं उचलते पाऊलं ||८|| कृपा असू द्यावी भक्तांवरी विनवणी करी पाषाण ||९|| सप्तशॄंग गडावर जायचं, नवरात्रीत चालून ||धृ|| १७/१०/२०१९

तुझ्या भेटीला आलो दत्ता

पाषाणभेद ·
लेखनविषय:
तुझ्या भेटीला आलो दत्ता सत्वरी या आता || तुझ्या मंदीराची केली वाट सोपी नसे काही चिंता, मनी आस मोठी वाट पाही दर्शनाची, तुम्ही प्रकटा || भक्तांची दु:खे करुनीया दूर दिले जीवनात सुख भरपूर सर्वांचा वाली तू तूच आमचा त्राता || पाहूनिया रुप होईल मनाची शांती नसे आस कसली, तिच विश्रांती सखा तूच गुरू तूच तूच होई दाता || ब्रम्हा विष्णू महेश तिन लोक शक्ती तुझ्या ठाई एक झाले, व्यापूनी सृष्टी रुप दाखवा तुम्ही दारी आलेल्या भक्तां || - पाषाणभेद २८/०९/२०१९

पाहूणा पाऊस

पाषाणभेद ·
लेखनविषय:
काव्यरस
मी म्हणाले पावसाला तू येतोस कधी ब-याच दिवसात भेटला नाही तो म्हणाला मी तर येतच असतो नेहमीसारखा पण तूच माझ्याशी बोलत नाही मग मी त्याचे स्वागत करायचे ठरविले अगदी जवळ गेल्यासारखे भासविले पण त्याचे मनात काही वेगळेच असेल जवळ येवून त्याने सा-यांनाच कवेत घेतले

ओले केस

पाषाणभेद ·

गामा पैलवान 26/09/2019 - 13:28
पाभे, सुंदर कविता आहे. मन हरखून गेलं. पाऊस = सांबार गौरकाय = इडली गाली लाज = सांबारातल्या टॉमेटोचा लाल तुकडा ओले केस = सांबारातल्या शेकटाच्या शेंगेवरच्या रेषा शृंगाराविना सजलेली = फारसे मसाले न घालताही चविष्ट असलेली लपेटलेली (हिरवी) साडी = इडलीवर पसरलेली तिखटजाळ (हिरवी) चटणी तोंपासु! धन्यवाद! आ.न., -गा.पै.

In reply to by खिलजि

पाषाणभेद 28/09/2019 - 00:12
कविता आवडल्याबद्दल धन्यवाद. सा-यांनाच. >>> केस ओले न्हालेते >>> आले प्रेमाचे भरते >>> (पावसात केस ओले >>> प्रेमाचे भरते आले) ( आपआपल्या मगदुराप्रमाणे केस ओले >>> करावेत!) कंसातले दुसरे कडवे हे पहिल्या कडव्याला पर्याय आहे. ज्याला जे आवडेल ते कडवे निवडावे. काय आहे की पार्श्वभुमी निराळी आहे. आधीच माझ्या कविता हलक्या असतात. त्यात पहिले कडवे न्हाऊन ओले झाल्यामुळे केसांचे आहे. त्यामुळे कुणाला नाही आवडणार. म्हणून मी दुस-या कडव्याचा पर्याय ठेवला. त्यामुळे पावसामुळेही कुणी केस ओले करू शकतो. आवड ज्याची त्याची. तुमची आवड काय मग?

केस ओले न्हालेते आले प्रेमाचे भरते (पावसात केस ओले प्रेमाचे भरते आले) ( आपआपल्या मगदुराप्रमाणे केस ओले करावेत!) शिडकावा ओल्या थेंबांचा चिंब भिजवून देण्याचा गोरी काया ओलेती तुझे लावण्य दाखवती गाली लाज आलेली शृंगाराविना सजलेली अशी सामोरी ललना मन हरखले ना ! साडी लपेटून उभी येते कवेत कधी? - पाषाणभेद २६/०९/२०१९

इंद्रधनू

पाषाणभेद ·

In reply to by जॉनविक्क

पाषाणभेद 28/07/2019 - 16:16
मुलीने नाहीच केलेहो. लहान आहे ती. तिच्या भावना मी व्यक्त केल्यात. अन वर हरखली असा शब्द हवा. केदारनानांचे धन्यवाद.

इंद्रधनू (आकाशात इंद्रधनुष्य पाहील्याने माझी मुलगी हरकली आहे अन ती मला बोलावते आहे.) आकाशी ते इंद्रधनू आले अहा! चला बाबा बघा ते पहा!

निर्झर

पाषाणभेद ·
लेखनविषय:
काव्यरस
निर्झर निर्झर होता एक बारीकसा; हिरव्या डोंगरातून वाहतसा असुनी तो लहान छोटा; ठावूक नव्हत्या पुढल्या वाटा || धरतीवरच्या वर्षावाने; जीवन त्याचे सुरू जहाले धरणी जाहली माता ती; अल्लड खट्याळ उदकाची || नित नवीन भरून जलाने; ठावूक त्याला भरभरून वाहणे चंचल उत्कट उल्हासीत पाणी; घेवूनी जायी दो काठांनी || पुढेच मिळाली सरिता त्याला; सवे वाहण्या पुसे खळाळा विचारही न करता तो मिळाला; निर्मळ नदीत एकरूप जाहला || - पाषाणभेद १५/०७/२०१९

कविता पिंपळपान

अत्रुप्त आत्मा ·

यशोधरा 01/07/2019 - 15:26
घरट्याच्या अवती भवती पाऊस थेंबांची गर्दी मी मिटून घेता दारे पाऊस करी मूकगान ही कविता पिंपळपान! म्हटले या पावसाला मन हळवे नकोच सोडू भिजवूनि जा चिंब मनाला मग लाभे पाऊस-दान ही कविता पिंपळपान!
वा! वा!

''घरट्याच्या अवती भवती पाऊस थेंबांची गर्दी मी मिटून घेता दारे पाऊस करी मूकगान ही कविता पिंपळपान!'' केवळ सुरेख. लेखनाचा पोत सुधारतोय. लिहित राहा. -दिलीप बिरुटे

नाखु 02/07/2019 - 08:38
भावविभोर कविता,आवडली आहे. लेकाने कवीला नैसर्गिक कार्यापासून निसर्गाच्या सानिध्यात नेलेले आहे. वाचकांची पत्रेवाला नाखु

In reply to by अत्रुप्त आत्मा

पाषाणभेद 03/07/2019 - 03:40
पावसाळ्यात काम नसल्याने कवीला व्यावहारीक कार्यापासून निसर्गाच्या सानिध्यात नेलेले आहे - दुष्ट दुम्न. :-) बाकी प्रा. डॉ. बोलले ते बरोबरच आहे. साहित्य संमेलनात वाचन करण्याच्या पातळीची कविता आहे. पुरस्कारप्राप्त वगैरे. आणि पिंपळपानामुळे आध्यात्मिक बैठकदेखील मिळालेली आहे.

In reply to by नाखु

>>>लेकाने कवीला नैसर्गिक कार्यापासून निसर्गाच्या. सुचू द्या भो त्यांना दुसरं असंचं काही चांगलं. ही पहिली कविता असावी ज्यात तांब्या पीतळ आणि 'विधी'विषयाचा उल्लेख नाही. ;) -दिलीप बिरुटे

लीलाधर 02/07/2019 - 10:59
विडंबन ही कविता पिंपळपान याचे विडंबन करण्याचा प्रयत्न कविता सुचत नाही मन ही रितेच काही लिहू काय? म्हणता म्हणता सापडले भोला पान ही कविता पानच पान ! चुना चुना आग झाली रेष रेषा बोलू लागली न खाता आले कैसे मज लेखणीस भान ही कविता पानच पान! हे असेच असते सारे न खाता हलते सारे पाचोळा नसता कोठे गर्द लालच होते पान ही कविता पानच पान! टपरीच्या अवती भवती खवय्यांची अतूट गर्दी तो मिटून देता पाने करीतो मूकगान ही कविता पानच पान! म्हटले या पानवाल्याला पान हळवे नकोच सोडू भिजवूनी दे खवय्याला मग लाभे दानच दान ही कविता भोला पान! ===×====×====×===×=== संत्रुप्त

महासंग्राम 02/07/2019 - 12:58
कविता सुचत नाही पान ही रितेच काही लावू काय? म्हणता म्हणता सापडले ओले पान. हे १२०-३०० फुलचंदपान! थेंब थेंबा जाग आली रेष रेषा बोलू लागली ना लावता आले कैसे या चुन्यास भान? हे १२०-३०० फुलचंदपान! हे असेच असते सारे ना सुचता हलते वारे किवाम नसता का कोठे गर्द जागे होते रान हे १२०-३०० फुलचंदपान! ठेल्याच्या अवती भवती पिचकाऱ्यांच्या थेंबांची गर्दी मी मिटून घेता दारे गिर्हाईक करी मूकगान हे १२०-३०० फुलचंदपान! म्हटले या काथ्याला मन हळवे नकोच सोडू भिजवूनि जा चिंब पानाला मग लाभे तारेचे दान हे १२०-३०० फुलचंदपान! ===×====×====×===×=== अतृप्त..पानवाला

राघव 02/07/2019 - 20:00
हे असेच असते सारे ना सुचता हलते वारे पाचोळा नसता कोठे गर्द जागे होते रान ही कविता पिंपळपान!
आवडले. :-)

सस्नेह 04/07/2019 - 17:25
पावसाबरोबरच गुर्जींचीसुद्धा दमदार हजेरी ! बंधुद्वयांची जुगलबंदी फारा दिवसांनी पहायला मिळाली. वेल्कम रे लीलाधरा

चामुंडराय 05/07/2019 - 08:17
सुरेख, छान आहे कविता... आवडली परंतु आत्मु बुवांची कविता आणि विधी नाही, कुंथणे नाही, तांब्या नाही ... छे चुकल्या चुकल्या सारखे वाटतेय. थोडी कसर भरून काढावी म्हंतो पिंपळाच्या पानावर तांब्या अजून ओततो ग ... डब्बा टाकताना मिरची अजून सलते ग !

अभ्या.. 05/07/2019 - 09:22
गुर्जी नेहमीच छान लिहितात, पिंपळपानापेक्षा नागवेलीत अधिक रंगतात हे सत्य.

कविता सुचत नाही मन ही रितेच काही लिहू काय? म्हणता म्हणता सापडले ओले पान. ही कविता पिंपळपान! थेंब थेंबा जाग आली रेष रेषा बोलू लागली ना लिहिता आले कैसे मज लेखणिस भान? ही कविता पिंपळपान! हे असेच असते सारे ना सुचता हलते वारे पाचोळा नसता कोठे गर्द जागे होते रान ही कविता पिंपळपान! घरट्याच्या अवती भवती पाऊस थेंबांची गर्दी मी मिटून घेता दारे पाऊस करी मूकगान ही कविता पिंपळपान! म्हटले या पावसाला मन हळवे नकोच सोडू भिजवूनि जा चिंब मनाला मग लाभे पाऊस-दान ही कविता पिंपळपान!