वेदनाच मला मिळू दे
लेखनविषय:
नकोत आनंददायी संवेदना
हे प्रभो वेदनाच मला मिळू दे
हरवू दे माझा मी पणा
त्यासाठी मजला धिर दे
सुख असे हे की डाचते मला ते
तेच ते कणखर मनाला पंगू बनवते
भौतिकाच्या मागे न लागो शाश्वत असा अशिष दे
ऐहीक श्रीमंत असूनही मदतीचा हात नाही
कशाला मग उगाचच मी दानशूर मिरवत राही
तुझ्या हातांची सर येण्याची मजला बुद्धी दे
तावून निघावे भट्टीत सोने मग दागिणा बनण्या
त्यासम माझे मन होवूदे तयार तुझ्या कडे येण्या
घण संकंटांचे घाल पाठी, मळली वाट मला न दे
- पाषाणभेद
१७/११/२०१
वाचने
4964
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
कुंतीने श्रीकॄष्णाकडे
मस्त. अतिशय आवडले.
खरय! वेदना आणि दुःखामुळेच
मस्तच. ...
आवडली कविता
छान झाली आहे पण वेदना मागून मन कठोर का करावे ..