Skip to main content

मुक्त कविता

नवलाई...

लेखक राजेंद्र देवी यांनी गुरुवार, 06/10/2016 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
नवलाई... ही सवय तुझी का मला माहीत नाही? उशीरा येऊन लवकर जाण्याची घाई अंमळ थांब जराशी मन अजून भरले नाही नभी चंद्रमा झुलतो, अजून रात सरली नाही गाली फुलतो गुलाब त्यावर चंद्रकिरणांची झिलई तुझ्या लडिवाळं बोलण्याची रोज वाटते अपूर्वाई आपण दोघे जागे जग शांत झोपले पांघरून स्वप्नांची दुलई जागेपणी पाहतो आहे आपण उद्याच्या स्वप्नांची नवलाई राजेंद्र देवी

गुपित

लेखक राजेंद्र देवी यांनी बुधवार, 05/10/2016 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
गुपित थांब जरासा अजुनी अजून समईत वात आहे थांब जरासा अजुनी अजून चांदरात आहे कोमेजून जरी गेला चाफा कोमेजून जरी गेला गजरा थांब जरासा अजुनी रातराणी बहरात आहे उलटुनी गेला प्रहर रात्र संभ्रमात आहे थांब जरासा अजुनी चाहूल उदरात आहे राजेंद्र देवी

नव्या युगाची पहाट

लेखक राजेंद्र देवी यांनी मंगळवार, 04/10/2016 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
नव्या युगाची पहाट आल्हाददायक तुझे आगमन दिनकरा, जसे आमचे बालपण तळपत असते माध्यान्य भास्करा, जसे आमचे तरुणपण मलूल असते संध्याकाळ दिवाकरा, जसे आमचे म्हातारपण कापून टाक या किरणांनी मरिचया, संसाराचे हे मायाजाल घे कवेत मला हे अग्निरुप हिरण्यगर्भा, कर पापांचा नायनाट करून टाक भस्म हा नश्वर देह अदित्या, उगवू दे नव्या युगाची पहाट राजेंद्र देवी

झड श्रावणाची

लेखक राजेंद्र देवी यांनी सोमवार, 03/10/2016 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
झड श्रावणाची अचानक श्रावणाची झड ती आली अंग अंग भिजवून गेली ओल्या केसातून बट ही ओघळली चिटकून बसली गोऱ्या गाली मोहक हालचाल सुखावून गेली नकळत डोळे विस्फारून गेली कवेत घेता काया ही थरथरली चित्तवृत्ती मोहरून गेली त्रेधातिरपीट उडवून गेली यौवनास माझ्या खिजवून गेली जेव्हा जेव्हा आठवते रात्र ती ओली श्रावणात होते पापणी ही ओली राजेंद्र देवी

श्रावण...

लेखक राजेंद्र देवी यांनी शुक्रवार, 30/09/2016 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावण... फेकून चादर काळोखाची सोनपावली उन्हे उतरली वारा शीळ घाली धरती नवचैतन्याने थरथरली पावसाच्या शिडकाव्याने हिरवी काचोळी भिजली लेऊन हार नवकुसुमांचा नवयोवना जणू हि सजली घेण्यास बाहुपाशात नभ टेकले क्षितिजा पलीकडे उधळीत सप्तरंग आकाशी इंद्रधनुकली हि अवतरली राजेंद्र देवी

मनाचा एकांत - काळे पाणी

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 30/09/2016 07:55 या दिवशी प्रकाशित केले.
अंदमानातले काळे पाणी, कोलूबेड्याहंटरकदान्न सोबत तीव्र अपमानाचा overtime ! साम्राज्याचा उग्र दर्प अन देशाने केलेली प्रेमळ उपेक्षा....... असे सगळे, अन वरती थोडी जयहिंदची जाळी ! या जीवघेण्या विषाणूजिवाणूंमध्येही, काही काही रक्तांचे malnourishment कि काय ते झालेच नाही! उलट, तुरुंगाच्या अजस्त्र काळभिंतीही त्यांच्या जहालहळव्या लेखणीने cultured झाल्या! मातृभूमीच्या मृत्युंजय विरोत्तमांसाठी, . . . दुसरं काय होता एकांत म्हणजे तरी! - शिवकन्या

काजळरेषा

लेखक राजेंद्र देवी यांनी गुरुवार, 29/09/2016 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
काजळरेषा का भिरभिरते नजर तुझी? ओलांडू नको रेषा काजळाची वाटत नाही का भीती कोणा रावणाची ठेव जाणीव लक्ष्मणाच्या वचनांची नको देऊस कष्ट वनवासी रामाला नको देऊस प्रश्न या समाजाला अग्निदिव्य शेवटी तुलाच आहे भूमीत जन्म अन भूमीतच शेवट आहे राजेंद्र देवी

शब्द

लेखक अश्विनी वैद्य यांनी गुरुवार, 29/09/2016 03:54 या दिवशी प्रकाशित केले.

शब्द

लिहायचं तर खूप होतं, पण आज शब्दच हरवलेत कुठेतरी… संदर्भ चुकताहेत, अर्थ लागत नाहीयेत, वाक्य सुचत नाहीयेत, जुळवा-जुळव शब्दांची करावी की, त्याला चिकटलेल्या अर्थांची, कि नुसत्याच भाव हरवलेल्या अर्थहिन शब्दांची, काहीच स्पष्ट नाहीये, त्यात समोर असलेली डायरीची ती कोरी पानं स्वस्थ बसूही देत नाहीयेत…!
काव्यरस

ठिकरी

लेखक राजेंद्र देवी यांनी बुधवार, 28/09/2016 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
ठिकरी पडू दे चांगले दान मिळू दे यशाची शिडी नकोत ते सर्प जागोजागी आयुष्याची सापशिडी सापडू दे लगेचच लपलेले सुख नकोच सापडू दे दुःख आयुष्याचा लपंडाव मिळू दे सुखाचा झेल जिंकेन सर्वदा मी जाऊ दे दुःखाची विकेट आयुष्याच्या सामन्यात पडू दे चांगल्या घरात या देहाची ठिकरी नको होऊ दे स्पर्श या दुर्भाग्याच्या रेषांचा राजेंद्र देवी

व्यथा

लेखक राजेंद्र देवी यांनी मंगळवार, 27/09/2016 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
व्यथा भावनेचा कोंडमारा घाव जे जिव्हारा कसा आवरू आता आयुष्याचा पसारा सांगू व्यथा कोणाला आहे कोण ऐकणारा कसा आळवू न कळे सुना सुना देव्हारा गुंतलास कोठे तू कोणास उध्धारा व्याकुळले नयन दे दर्शन परमेश्वरा राजेंद्र देवी