Skip to main content

मुक्त कविता

शोर

लेखक अबोली२१५ यांनी गुरुवार, 29/12/2016 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
शोर एक बैरागी के मन का एक शोर, न पा सका खुद को न पा सका भगवान को, बस टूटता बिखारता चालता गया, न थम सका शोर न थम सकी सासें, बुंद, बुंद टपकाता शोर रुह को चिरता शोर, बैरागी थक गया शोर से छाल गया, गुमनाम शोर को साथ लकेर सो गया............ - अबोली

'बघणं' राहूनच गेलं

लेखक चित्रगुप्त यांनी गुरुवार, 29/12/2016 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
... शब्दांमागे धावण्यात 'बघणं' राहूनच गेलं रस्त्याकडेचं इवलं रोपटं कुणी न बघताच मेलं शब्दांचा पसारा हवा मोर-पिसारा नको शब्दात उलगडून सांगा 'नुस्तं बघणं' नको 'नुस्त्या' बघण्या-ऐकण्यात सौंदर्यगंध दरवळतो समजून घेण्याच्या नादात तोच नेमका हरपतो समोर अप्सरा उभी तिचं आधी नाव सांगा वय-जात-उंची-शिक्षण सगळं तपशील्वार सांगा सांदि-कोपर्‍यात डुलणारं फूल- त्यात विशेष क

स्वार्थाच्या बाजारी, मैत्री अशी रंगली

लेखक विवेकपटाईत यांनी शुक्रवार, 09/12/2016 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
सावळ्याच्या प्रेमात पडली राधा बाबरी काळ्या रंगात रंगुनी यमुनाही झाली काळी. द्वारकेचा राजा आला सुदामच्या द्वारी काळी लक्ष्मी झाली जनखात्यात पांढरी. यमुनेच्या काठी अवसेच्या राती स्वार्थाच्या बाजारी मैत्री अशी रंगली. द्वारकेचा राजा = काळा पैसे वाला सुदाम = गरीब माणूस दिल्ली यमुनेच्या काठावर आहे.
काव्यरस

चोरले जाणार नाही 'ते'

लेखक भारी समर्थ यांनी सोमवार, 05/12/2016 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
टागोरांचे नोबल आणि बिस्मिल्लांची चंदेरी सनई साहित्य, सुर नी अनुभुतीची सुरेख सुंदर उबदार दुलई ही दोन्ही प्रतिकं चोरली गेली! दोन दिवसांतच विसरतात सगळे वर्षानुवर्षांची मेहनत, श्रम, अन् झिजवलेले कैक उन्हाळ-पावसाळे चोराकडून ही चिन्हं विकत घेणारे, असणारच पूज्य संस्कृती त्यांना पण त्या चिजांमधून निर्मितीचा आत्मा गवसणारच नाही कधी त्यांना
काव्यरस

माणुसकी

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 05/12/2016 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा आज एका अंध माणसाचा हात धरून त्याला बस स्टॉपपर्यंत जायला मदत केली, बसमधे बसवून दिलं. हे सांगणं खरंच आवडलं नाही पण सांगितल्याशिवाय राहवलं नाही तोच तो प्रवाह तोच तो जमाव आयुष्य नावाचा धावता बनाव त्यात एक काठी माझ्या बाजूने वाट शोधत चालत होती वाटेवरची अवघी गर्दी काठीला त्या टाळत होती 'टक टक' काठीच्या त्या आवाजाची राखण होती 'काय मंदासारखे चालतात लोक' ही अनेकांची अडचण होती 'कुठे जायचंय काका?' आपसुक प्रश्न केला मी 'प्लाझा' म्हणाले आणि त्यांचा लगेच हात धरला मी गेलेही असते आपले आपण, त्यांना नव्हती भीड त्याची
काव्यरस

पहाट धुके

लेखक Pradip kale यांनी बुधवार, 30/11/2016 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार , माझं मिपावरील हे पहिलच लिखान आहे. आज पर्यंत फक्त एक मुकवाचक होतो. तर प्रथम थोडं कवितेबद्दल सांगतो. खरतर माझी ही चौथी कविता आहे. पहिल्या तीन कविता लिहलेले कागद हरवल्या नंतर मी एका वहीत कविता लिहायला सुरवात केली. काही दिवसाने ही वहीदेखील हरवली. पण मागच्या दोन महीण्याखाली जुनी पुस्तके चाळताना त्या गठ्ठ्या मधे ही वही सापडली. आणि खजिना सापडल्यासारखा आनंद झाला. आणि त्या कविता पोस्ट करू करू म्हणत आज मुहुर्त आला. हि कविता मी दहावीच्या वर्षाला असताना लिहली होती म्हणजे सहा वर्षापुर्वी. त्यावेळी कविता हा आमच्यासाठी नवीनच प्रांत होता. यमक जुळली की कविता तयार होते असाच आमचा समज होता.

मनाचा एकांत - सरोवरातील नाव

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 26/11/2016 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
['मनाचा एकांत' ही शृंखला इथे संपत आहे. सगळ्या कवितांना मनापासून दाद देणाऱ्या, त्यातल्या काहींचे विडंबन पाडणाऱ्या सर्व रसिकजनांचे दिल से आभार! :)] पहाडातला जख्ख दद्दू सरोवरात नाव सोडून पलीकडे निघून गेला तेव्हापासून, नाव हलत नाही, डुलत नाही, पण जराशीही कुजत नाही! सरोवरात कुणाला येऊ देत नाही, सरोवरातून कुणाला जाऊ देत नाही! सरोवरभर तिचीच प्रतिबिंबे खोलवर.... भरल्या सरोवरातल्या रित्या नावेसाठी, . . . दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी! शिवकन्या

कुण्या गावचा कोण?

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 24/11/2016 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
ते गाव मला माहित नाही, म्हणून बरं आहे. तिथल्या सावल्या, चांदणे, उन्ह .. सारं काही माझ्याकडे सहज येतं. कुठल्याही प्रकारच्या नात्याचा अडसर लागत नाही त्यात! मी ही त्याच्याच सारखा 'सहज' .., म्हणून त्याला सहजपणे सामावून घेतो माझ्यात. एकदा त्या गावाने मला विचारले, "अरे मुला.. , येत का नाहिस इकडे आत.. वेस ऒलांडून!? " मी म्हटले, "नको रे , कशाला उगाच गावकरी होऊ मी? त्यापेक्षा हेच चांगलं आहे." गाव म्हणते, " जे तुझ्याकडे न मागता सहज येतय, त्याच्याकडे तू नाही येणारं.. सहज... एकदातरी? " मग म्हटलं सांगावच याला सर्व, "अरे गावा... " तू ज्या गोष्टिंना 'तुझ्या गावातल्याच' समजतो आहेस..

!! जीवना.. !!

लेखक कवि मानव यांनी शुक्रवार, 18/11/2016 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
!! जीवना.. !! जीवना....तू फार मज छळले, कधी निवांत जगलो नाही तू फुलात दिलेस काटे, मी तरी ही रडलो नाही !! कस लावून मी जीवाचा, दर पाऊल टाकत गेलो, तू क्षणात न्हेले मागे, मी तरी ही दमलो नाही !! कधी दिलेस ऋतू तू हिरवे, मग माझी बहरली पाने, कधी दिलेस वादळ वारे, मी तरी ही पडलो नाही !! तू अमृत देऊन जन्माचा, मज फार लावली आशा, मग दिलेस शाप मरणाचा, पण मी तरीही घाबरलो नाही जीवना....तू फार मज छळले, कधी निवांत जगलो नाही !!
काव्यरस

मळमळ

लेखक चाणक्य यांनी गुरुवार, 10/11/2016 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
रोजचा पेपर कुठले कुठले लेख पुस्तकं मॅगझीनस् ईंटरनेटवरचं मटेरीअल सग्गळं आपल्याला झेपणा-या परीघात . . . काढ टिपणं मार स्टॅटस् तोंडावर फेसबुक वर नोटस् व्हाॅटस् अप वर पोस्टस् लिहीता येतंय, लिहीता येतंय लाव धडाका . . मिळेल त्यावर टीका सेफ टार्गेटस् शोधायची कॅबीनेट मिनिस्टर्स वगैरे नगरसेवक डेंजर, येऊन मारू शकतो किंवा हवेत बाण सोडायचे समाज-बिमाज, शिक्षण व्यवस्था, पोलिस वगैरे गेला बाजार जुने दिवस, बालभारती, संस्कृती अगदीच काही नाही सुचलं तर बळीराजाची कैफियत, सैनिकाचे बलिदान जय जवान, जय किसान कोरडे उमाळे तिच्यायला....पण हमखास हिट . . . हिरीरी महत्त्वाची कुंपणावर बसायचं पटकन उडी मारता येते, कुठेही. मेगा
काव्यरस