Skip to main content

मुक्त कविता

तू आणि मी

लेखक Bhagyashri satish vasane यांनी शनिवार, 05/11/2016 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
अशी एक फक्त कल्पना असावी. सोनेरी त्या क्षणाला एकांताची साथ असावी...! गुलमोहराचा बहर, आणि तिथेच आपली भेट असावी...! जसे एखाद्या पाखराची, गोड ड्रीम डेट असावी...! तू मात्र,,, आवडत्या आकाशी रंगाच्या, पोशाखात असावी...! आकाशालाही हेवा वाटावा, इतकी तू सुंदर दिसावी...! निरोप घेतांना डोळ्यांमध्ये, अश्रूची एक झलक असावी...! डोळ्यामधले भाव जाणूनी, नाजुकशी ती मिठी असावी...! जीव ओतला तुझिया पायी, आशा तुझीही हीच असावी...! एकमेकांची साथ अशी ही, दरवेळी रम्य असावी...!

!! आता !!

लेखक कवि मानव यांनी शुक्रवार, 04/11/2016 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
आता माझी कोणाला तमा होतच नाही प्रियजन म्हणून मी "त्यांना"...केली थोडीशी घाई, मी जगलो ज्यांच्यासाठी ते दूरवर निघून गेले, आता खांद्यांवर घेउनी ओझे, घरट्यात एकटा राही !! इमारतीच्या माडीमध्ये कधी तरी दरवळतो ही गंध , तिथल्या भिंती ही साक्षी, मी कैसा होतो बेधुंद, पण जसे पावसात गज गंजावे तश्या गांजल्या सऱ्या नाती, पडक्या इमारतीला आता परत दुरुस्ती होणे नाही !! पारिजात होऊन दारी, मी घातला सडा फुलांचा, घेऊन आश्रय माझा, काही पिल्ले मोठी होत होती, जे बळ आले त्या पंखांना, खग होऊन ते ही उडाले, सारे तसेच होते नंतर ही तरी पारिजात पुन्हा मोहरले नाही !! आयुष्याच्या या वळणावरती आता हा एकटेपण छळतो, "माणूस
काव्यरस

जरा जपून

लेखक Bhagyashri satish vasane यांनी गुरुवार, 03/11/2016 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
बोलतांना जरा जपून बोलावं शब्द ही अर्थ बदलतात चालतांना जरा जपून चालावं कधी रस्ते ही घात करतात झुकतंना जरा जपून झुकावं कधी आपलेच खंजिर खुपसतात ओळखतांना जरा जपून ओळखावं कधी मानसे आपला रंग बदलतात पाऊल टाकतांना जरा जपून टाकावं कधी फुले ही काटे बनतात मागतांना जरा जपून मागाव कधी आपलेच भाव खातात नात जोडतांना जरा जपून जोडावं कधी नकळत धागे तुटून जातात...!

आयुष्य

लेखक Bhagyashri satish vasane यांनी बुधवार, 02/11/2016 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
पायाला लागली ठोकर तिथे बांधायचे घर जिथे काहिच नाही तिथे आभाळ आहेच वर जिवनाचे पुस्तक लिहिले मी स्वत:च्या चेहर्यावर वाचता आले तर विश्वास ठेव वेदनांच्या त्या शब्दांवर तूला कधीच ह्या मनाचा मजकूर समजला नाही मी बंद लिफाफा आहे जो कुणी उघडलाच नाही मी समजवण्याचा प्रयत्न केला पण तो कुणाला समजलाच नाही मन माझे कुणाला कळलेच नाही, तळ हातावर पोट घेऊन कष्टकरी बनवत फिरत होते, इवल्याशा पोटाची भुक भागावी म्हणूनच तर रक्त जाळत होते...!

प्रारब्ध

लेखक राजेंद्र देवी यांनी बुधवार, 02/11/2016 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
प्रारब्ध मुक्त आम्ही मृगद्वय विहरत होतो रानावनात कांचन वल्कले भरली सीतेच्या मनात टाकुनी मंत्र मरीच शिरला सख्याच्या तनात मोहवुनी रामास केला त्याने घात रामाच्या हाती पारध सख्याचे झाले आठवणीच्या ज्वाळेत मी मात्र सती गेले राजेंद्र देवी

कुशी

लेखक राजेंद्र देवी यांनी बुधवार, 02/11/2016 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
कुशी अलगद जेंव्हा तू वळतो कुशीवर रात्र पण करवट घेते अनावर होते झोप अन डोळ्यात स्वप्न उतरते स्वप्नात जेंव्हा तू उतरतो पहाट अपुरी पडते वियोगाच्या कल्पनेने झोप माझी उडते देईन साथ मी कल्पांतापर्यंत देशील ना तू पण ? विचाराने या मी रोज कुशी बदलते राजेंद्र देवी

फक्त तुझ्यासाठी...! 2

लेखक Bhagyashri satish vasane यांनी मंगळवार, 01/11/2016 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
तु गेलीस पण हा मावळता सुर्य पौर्णिमेचा चंद्र आणि चांदण्या तेथेच स्तब्ध राहिल्या फक्त तुझ्यासाठी मनामध्ये प्राजक्तांच्या फक्त तुझ्यासाठी एकदा वादळ ही सुटले पण ते ही शांत झाले फक्त तुझ्यासाठी येत्या पावसाळ्यात आनंदाचे झरे वाहणारे फक्त तुझ्यासाठी शेवटी-शेवटी या फुलांमधील गंध ही सुगंधीत होणार फक्त तुझ्यासाठी आकाशातील तार्यांचा शितल गारवाही मंदावणार फक्त तुझ्यासाठी तो रोजचा वारा आहे पण तो रोजचा आहे पण तो तुला विसरणारा आहे फक्त तुझ्यासाठी माझ्या प्रेमाच्या फुलांची ओंजळ फक्त आणि फक्त तुझ्यासाठी...!

तुझ्या आठवणीत...

लेखक राजेंद्र देवी यांनी मंगळवार, 01/11/2016 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या आठवणीत... बहरलेल्या वेलीवर एक कळी खोळंबली तुझ्या आठवणीत ति अजून नाही उमलली गाभाऱ्यातील ज्योत मंदपणे तेवली तुझ्या आठवणीत हळूच लवलवली आभाळातील चांदणी रात्रभर गुरफटली तुझ्या आठवणीत पहाटे ति चमचमली राजेंद्र देवी

स्मरशील का?

लेखक राजेंद्र देवी यांनी सोमवार, 31/10/2016 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
स्मरशील का? सदोदित आईच्या कुशीत कधी माझ्या कुशीत शिरशील का? सदोदित आईच्या मागे मागे कधी माझ्या मागे फिरशील का? सारे हट्ट आईला सांगतोस कधी कधी मला मागशील का? साऱ्या गुजगोष्टी आईला सांगतोस कधी कधी मला सांगशील का? पोटासाठी दूरदेशी मी कधीतरी मला स्मरशील का? राजेंद्र देवी

क्षणाचे सोबती....

लेखक राजेंद्र देवी यांनी शनिवार, 29/10/2016 08:28 या दिवशी प्रकाशित केले.
क्षणाचे सोबती.... कशाला हवेत नगारे नौबती आपण सारे क्षणाचे सोबती जुळुनी येती जेव्हा प्रेमाची नाती कशाला हवीत रक्ताची नाती नुसतेच फोफावती वृक्ष सारे भगवंताच्या माथी तृणाचीच पाती वृथा तळपती सूर्याची किरणे तिमिरात तळपती समईच्याच ज्योती रोवून दाव एकतरी निशाण जगात आहेत मोजकेच जगज्जेती राजेंद्र देवी