Skip to main content

नव्या युगाची पहाट

लेखक राजेंद्र देवी यांनी मंगळवार, 04/10/2016 या दिवशी प्रकाशित केले.
नव्या युगाची पहाट आल्हाददायक तुझे आगमन दिनकरा, जसे आमचे बालपण तळपत असते माध्यान्य भास्करा, जसे आमचे तरुणपण मलूल असते संध्याकाळ दिवाकरा, जसे आमचे म्हातारपण कापून टाक या किरणांनी मरिचया, संसाराचे हे मायाजाल घे कवेत मला हे अग्निरुप हिरण्यगर्भा, कर पापांचा नायनाट करून टाक भस्म हा नश्वर देह अदित्या, उगवू दे नव्या युगाची पहाट राजेंद्र देवी
लेखनविषय:

वाचने 507
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया