Skip to main content

बासरी....

लेखक राजेंद्र देवी यांनी शुक्रवार, 07/10/2016 या दिवशी प्रकाशित केले.
बासरी.... मनमंदिरी वाजू लागली बासरी मनमोहना लागली तुझीच आस रत्नजडितं मुगुट त्यावर खोचलेले मोरपिसं घननीळा लागला तुझाच ध्यास कुंजवनी घुमू लागला पावा कृष्णा करिते तुझाच रे धावा हंबरती धेनू ऐकून तुझी वेणू वेड लावलेस या राधेला जणू शामल मूर्ती कमरेस खोचली मुरली पाहून आता ना जीवनाची आस उरली राजेंद्र देवी
लेखनविषय:

वाचने 1189
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

मला यात वापरलेले शब्द खूप आवडले पण एकूण विचारांची आणि शब्दांची जुळवा-जुळव अजून छान झाली असती तर चार चांद लागले असते पण प्रयत्नांती परमेश्वर