Skip to main content

मुक्त कविता

थोडे अंतर...

लेखक राजेंद्र देवी यांनी बुधवार, 19/10/2016 या दिवशी प्रकाशित केले.
थोडे अंतर... असावे तुझ्यामाझ्यात थोडे अंतर ठेवील ओढ ते निरंतर असावा तुझ्यामाझ्यात थोडा अबोला संपेल तो मनवल्यानंतर असावा तुझ्यामाझ्यात थोडा गैरसमज पडेल उमज समजल्यानंतर असावा तुझ्यामाझ्यात थोडा संशय वाढवेल प्रेम आशय कळल्यानंतर राजेंद्र देवी

अपहार...

लेखक राजेंद्र देवी यांनी मंगळवार, 18/10/2016 या दिवशी प्रकाशित केले.
अपहार... तीर तुझा घुसला आरपार घाल तूच फुंकर हळुवारं झाले असतील घायाळ बहू मीच झालो तुझी शिकार झंकारल्या तारा हृदयिच्या सांग कसा देऊ नकार भ्रष्ट या दुनियेत झाला माझ्या हृदयिचा अपहार राजेंद्र देवी

दिसत जावं माणसानं

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी सोमवार, 17/10/2016 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली मोबाईल आणि सोशल मिडियामुळे भेटीगाठी अधिकच दुर्मीळ होऊ लागल्या आहेत. याच विषयावर एका मित्राने आज एक सुंदर हिंदी कविता पाठवली आणि विषय जिव्हाळ्याचा असल्यानं चटकन मराठी रुपांतर/भाषांतर सुचलं. आधी मराठी आवृत्ती आणि मग त्याची मूळ हिंदी कविता असं देतो आहे. हिंदी कवी कोण ते मात्र समजू शकलं नाही.

नशीब...

लेखक राजेंद्र देवी यांनी सोमवार, 17/10/2016 या दिवशी प्रकाशित केले.
नशीब... जागोजागी फाटले नशीब किती ठिगळे लावू विरणावर काय काय भोगले हे न आठवे नाही विश्वास आता स्मरणावर आयुष्यभर रडत होतो कोण रडेल माझ्या मरणावर आजवर जळत राहिलो तरी टाकिती सरणावर राजेंद्र देवी

मनाचा एकांत - स्मरणाचा काटा

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 14/10/2016 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता इथे इतके वाजलेत, म्हणजे आपल्या घरी आता तितके वाजले असतील..... तिथे आता हे हे असे असे घडत असेल आणि इथे हे हे असे असे ..............! स्मरणाचा एक तास काटा तिथे तर एक इथे! बाकी मन, सेकंद काटा होऊन सांधणाऱ्या प्रिय समुद्रासारखे टिकटिकत राहते दोन किनाऱ्यांमध्ये अष्टौप्रहर.............. . . . दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी! -शिवकन्या

निसर्गाचं गाणं

लेखक राजेंद्र देवी यांनी शुक्रवार, 14/10/2016 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्गाचं गाणं ओला घाट, नागमोडी वाट केवड्याचे रान, घनदाट केवड्याचे रान, सळसळते नागीण वारा वाजवी सुमधुर बीन ओले रान, ओले पान ओंजळ छोटीसी, निसर्गाचे दान कडेकपारीतून वाहती निर्झरांचे पाट रानातून हुंदडे वारा पिसाट विसरुनी भान, तुडवितो रान ओठावरती फक्त निसर्गाचं गाणं राजेंद्र देवी

माझे स्वप्न...

लेखक राजेंद्र देवी यांनी गुरुवार, 13/10/2016 या दिवशी प्रकाशित केले.
माझे स्वप्न... तुझी नाजुकता फुलात आहे फुलाचा गंध तुझ्यात आहे तुझी अवखळता पाण्यात आहे पाण्याची झुळझुळता तुझ्यात आहे तुझ्या रागाची धग आगीत आहे आगीची तेजस्विता तुझ्यात आहे तुझा अबोला वाऱ्यात आहे वाऱ्याची दिशा तुझ्यात आहे तुझे अस्तित्व स्वप्न आहे माझे स्वप्न तुझ्यात आहे राजेंद्र देवी

अंधारलेल्या निशा...

लेखक राजेंद्र देवी यांनी बुधवार, 12/10/2016 या दिवशी प्रकाशित केले.
अंधारलेल्या निशा... पाहून स्वप्ने उद्याची सोकावली आहे निराशा आता कोठे जागू लागल्यात आठवणी जराश्या का करीशी वणवण या रखरखलेल्या वाळवंटात आता कोठे विसावल्यात उन्हात सावल्या जराश्या आजूबाजूला कोलाहल किती कोण ऐकेल माझे वाचाळ झाली आता कोठे माझी मौनाची भाषा ना भिजते मन माझे या कोसळत्या पावसात राहतं नाही माझ्या आठवणी पारोश्या भरकटत जात आहे मी दिशाहीन झाल्या या दिशा दाविती उजेड मज या अंधारलेल्या निशा राजेंद्र देवी

मोल...

लेखक राजेंद्र देवी यांनी सोमवार, 10/10/2016 या दिवशी प्रकाशित केले.
मोल... या दुनियेत कोणी कोणाचा नाही जो तो पैशात तोलुनी पाही नव्हता मजकडे पैसा जो आजपण नाही म्हणून तर आजपण कोणी मला ओळखत नाही सारी नाती गोती बेताची ठेवून अंतरे वितांची गळाभेट तर नाहीच नाही साधी विचारपूस पण नाही या दुनियेत कोणी कोणाचा नाही मी पैशाचा वा पैसा माझा नाही राहतील फक्त शब्द माझे त्याला काही मोल नाही राजेंद्र देवी

बासरी....

लेखक राजेंद्र देवी यांनी शुक्रवार, 07/10/2016 या दिवशी प्रकाशित केले.
बासरी.... मनमंदिरी वाजू लागली बासरी मनमोहना लागली तुझीच आस रत्नजडितं मुगुट त्यावर खोचलेले मोरपिसं घननीळा लागला तुझाच ध्यास कुंजवनी घुमू लागला पावा कृष्णा करिते तुझाच रे धावा हंबरती धेनू ऐकून तुझी वेणू वेड लावलेस या राधेला जणू शामल मूर्ती कमरेस खोचली मुरली पाहून आता ना जीवनाची आस उरली राजेंद्र देवी