मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शोधत होतो पुन्हा स्वत:ला

अनन्त्_यात्री · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
शोधत होतो पुन्हा स्वत:ला उपसत होतो पुन्हा पुन्हा मी पुरातनाची प्रचंड पडझड परंपरांची अपार अडगळ शोधत होतो अथक स्वत:ला ऐकत होतो पुन्हा पुन्हा मी वर्तमान हतबल करणाऱ्या भवितव्याचे भीषण पडघम ऐकत होतो अधीरपणाने माझीच अनोळखीशी चाहूल कळून चुकला पुन्हा, स्वतःचा शोध विफल ठरण्याचा संभव

वाचने 1546 वाचनखूण प्रतिक्रिया 2

तुमच्या या आधिच्या कवितांमधून तुम्हाला जे सांगायचे आहे ते स्पष्ट पणे समजते. पण इकडे वाचताना माझा थोडा गोंधळ झाला. कदाचित थोड्या वेळाने परत वाचले की समजेल. पैजारबुवा,