Skip to main content

चुका

लाख चुका असतील केल्या...

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 02/01/2021 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
निसटले वर्ष मला पाठमोरेसे दिसले त्याची बघून हताशा माझे काळीज द्रवले म्लान वदनाने त्याने हलकेच विचारले जगशील का रे पुन्हा दिस चार माझ्यातले विचारात मी पडलो चार कोणते निवडू आनंदात गेले ते, की चुकांनी जे केले कडू निवडले मग चार चुका मोठ्या केल्या ज्यात सुधारेन म्हणताना गेलो आणखी गर्तेत नवे वर्ष नव्या चुका करण्याची आहे संधी असे असता कशाला भूतकाळा द्यावी संधी?
काव्यरस

गणितं..

लेखक मन्या ऽ यांनी शनिवार, 16/05/2020 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
गणितं.. आयुष्याच्या पाटीवरची गणितं माझी चुकली चुका लपवण्यासाठी मी ती पटापट पुसली मनाचा शिक्षक आहे थोर कडक शिस्तीचा पुसलेली गणितं परत परत विचारली उत्तर देता येईनात झाली पळता भुई थोडी माझे मनच होऊनी मैत्र आता माझी शिकवणी घेई शिकवणी झाली चांगली मास्तरांनी सांगितला एक जालिम उपाय जुनी शिदोरी पाठीला नवे अनुभव बांध गाठीला निर्धास्त होऊन जग मी आहेच तुझ्या सोबतीला उपाय कामी आला अन् आनंदीआनंद झाला नवे लोक नवी आव्हानं असतील रोज रोज कशाला दडायचे आता थेट भिडायचे मनसोक्त जगायचे पण ह्यावेळी गणितं सोडवताना भान मात्र ठेवायचे! -दिप्ती भगत (६ डिसेंबर, २०१९)
काव्यरस
Taxonomy upgrade extras