Skip to main content

सही

सही

Published on बुधवार, 01/09/2010
चांदण्यात न्हालेलं ते रंगमंदिर आणि तो पूर्ण चंद्र अत्तराचा सुवास फुलांचे रंग नि सनईचे सूर मंद्र शिफॉन साड्या मलमली कुर्ते अभिजनांची गर्दी तिला पाहायला आलेले प्रेक्षक चाहते आणि दर्दी कोपर्‍यात तो उभा गुलाबांतल्या निवडुंगासारखा दखल घ्यायला अपात्र नि एका नजरेसही पारखा हातात एक पत्र अन् प्रतीक्षा त्या स्वप्नसुंदरीची जरी स्थिर उभा तरी उघड व्याकुळता अंतरीची स्मरतील का तिला दिवस मुग्ध किशोरवयातले तासनतास गप्पा ती गाणी ते क्षण पावसातले जरी आज ती श्रीमती अन् विख्यात अभिनेत्री जपली असेल का तिने ती बालपणीची मैत्री 'आल्या आल्या'चा गलका अन चाहत्यांचा गराडा धावला तोही ओढीने आणि घुसला तोडून वेढा उभा क्षणभर तिच्यापुढे नजरेस नजर भेटली हसला तो डोळ्यांत तिच्या ओळख ना उमटली सरकला घोळका पुढे पण तो उभा तसाच खिळून भंगलेले हृदय छातीत अन् स्वप्ने गेलेली जळून सूर सनईचे छळती आता चांदणे अंग अंग दाही हातात ते पत्र तसेच आणि त्यावर.. तिची सही (पूर्वप्रकाशित)
काव्यरस
लेखनविषय:

याद्या 1950
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

जबाब नही ! सुन्दर ! ! ! काळजात कालवाकालव झाली..

कविता खुप खुप आवडली .. आणि विशेषता खालील ओळी मनात घर करुन गेल्या सूर सनईचे छळती आता चांदणे अंग अंग दाही हातात ते पत्र तसेच आणि त्यावर.. तिची सही

>> सूर सनईचे छळती आता चांदणे अंग अंग दाही हातात ते पत्र तसेच आणि त्यावर.. तिची सही शेवट साधारण अपेक्षित असूनही विशेषतः ह्या ओळींमुळे कविता खूप आवडली

फारच सुरेख.