Skip to main content

चाललो मी....

लेखक स्वानंद मारुलकर यांनी बुधवार, 01/09/2010 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
व्याकूळसे उसासे टाकीत चाललो मी आवेग आसवांनी झाकीत चाललो मी माथ्यावरील जाचे ओझे युगायुगांचे हा भार सोसवेना वाकीत चाललो मी हा देह दग्ध होतो वणव्यात अंतरीच्या वाटेवरी निखारे फेकीत चललो मी मद्यास पूर येतो डोळ्यात आज माझ्या प्याले उदासवाणे झोकीत चाललो मी नाही कुणीच आले वाटेवरी पुसाया का कोरडे खुलासे ऐकीत चाललो मी ? हा क्रूर जीवघेणा रस्ता मला हवासा होऊन पूर्ण त्याच्या अंकीत चाललो मी -स्वानंद http://amrutsanchay.blogspot.com/
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1681
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

खूपचं छान! खास करुन........... माथ्यावरील जाचे ओझे युगायुगांचे हा भार सोसवेना वाकीत चाललो मी

>> नाही कुणीच आले वाटेवरी पुसाया का कोरडे खुलासे ऐकीत चाललो मी ? >> वाचून गलबलून आलं. एकंदर कविताच करूण आहे.

आपले काव्य आवडले. काव्याचा झोक गझलकडे झुकणारा वाटला. गजलेच्या नियमा प्रमाणे आपल्या चार पाच कडव्यान्ची एक गजल होउ शकते. मराठीत गजला लिहील्या गेल्या पाहिजेत. आपले अभिनन्दन.

मद्यास पूर येतो डोळ्यात आज माझ्या प्याले उदासवाणे झोकीत चाललो मी व्वा ! क्या बात है ! ! ! अतिशय आवडली गझल

कविते तुझी आठवण होते... जेव्हां रक्तिम वर्ण पहातो असो उषेचा वा क्रांतीचा दिसतो कृषिवल वा श्रमजीवी रण्रणत्या उन्ही विषमतेच्या अंतर्मन घामेजते कविते तुझी आठवण होते...