Skip to main content

करुण

म्हातारपणीची प्रार्थना

लेखक अरुंधती यांनी रविवार, 21/11/2010 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
परवा ईमेलामधून इंग्रजी भाषेतील एक फार मार्मिक प्रार्थना वाचायला मिळाली. ''प्रेयर फॉर दि एजिंग''. खरे तर ती बर्‍यापैकी गंभीरपणे लिहिली गेली आहे. त्या प्रार्थनेत काही नर्म विनोदी छटा तर थोडासा उपरोधही जाणवला. कदाचित इतरांना जाणवणार नाही. असो.... ज्याचे त्याचे आकलन!! प्रार्थना असल्यामुळे ती ना धड काव्यप्रकारात मोडत आहे, ना गद्यात. पण तिचा आशय लक्षवेधक आहे. म्हातारपणीच्या किंवा वय वाढत जाईल तशा आढळत जाणार्‍या या स्वभावखुणा आणि त्यांची ह्या प्रार्थनेतून उमटलेली जाणीव मला आवडली. मूळ लेखक/ कवी माहीत नसल्यामुळे त्याचे/ तिचे नाव येथे देता येत नाहीए.

भस्म्या

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 17/11/2010 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
मधुकर घुसळे ह्यांचं एक सुंदर गाण मराठी चित्रपटात आहे. >>>डोक फ़िरलं या बयेच डोक फ़िरल या हाताला धरलया म्हणते लगीन ठरलय या ह्या चालीवर विडंबन (त्या गाण्याचे नव्हे!), समाजात माजलेल्या भस्म्या रोगावर विडंबन सादर करीत आहे. भ्रष्टाचाराला सगळेच नावे ठेवतात, अगदी तडस लागे पर्यंत चरत असतांना देखील.
काव्यरस

नाग !!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 16/11/2010 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
नाग जेव्हा सरपटत जातो तेव्हा खरेच नाही कळत मला की तो नाग आहे की साप आहे ? तुम्हाला कळतो का तो काय आहे ते ? साप की नाग ? कधी बघितलाय का त्याला सरपटताना ..? नि अचानक फणा काढताना ? ***** सळसळ सळकताना विजेच्या वेगाने नि फणा काढून जाभाड पसरताना ? अगदी वीतभर फणा नि पसरलेला आक्राळविक्राळ जबडा एखादे पाखरू ,उंदीर कसा भयभीत नि मत्रमुग्ध होऊन जातो त्याच्या नजरेच्या टप्प्यात नि जागच्या जागी कसे खिळून जातो त्याच्या जबड्यात कसा शिरतो अलगद आपले प्राण त्याच्या हवाली करत ? ****** मी पाहिलेय भर दुपारी बारा वाजता एका सरड्याला हताशपणे ...!! आपले प्राण त्याच्या हवाली करताना ….!!! मी बघितलाय ह्या त
काव्यरस

आई !!!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 16/11/2010 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
किती काळ गेला तुला जाऊन तुझी आठवण येत नाही असे होत नाही. पण तुझ्या आठवणीने डोळ्यात पाणी येते असे पण आता होत नाही !!
काव्यरस

हलक्या फुलक्या पिसासारखे फुलपाखरू !!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 16/11/2010 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
हलक्या फुलक्या पिसासारखे फुलपाखरू पंखावर मस्त रंगीत ठिपका गिरकी घेत झुलत असते फुलांच्या गंध भारल्या स्वप्नात फुले खुणावतात फुलपाखराना खुळावतात त्याला आपल्या मत्त गंधाने फुलपाखरू धुंद ! मंत्रमुग्ध !! खेचले जातात आपोआप नकळत स्पर्श करते फुलांना फुलपाखरू एक शहारा फुलाच्या रोमारोमात अग आईग केवढा काटा फुलला माझ्या गर्भ कोशात सरसरून !! पाकळी पाकळी मत्त असते रेशीम रेशीम मस्त मुलायम पाकळीच्या स्पर्श सुखाने फुलपाखरू जाते मत्त होऊन आस कळीला जन्म घालण्यास फुले जातात वेडात हरवून नि ध्यान लागते फुलपाखराला दोघेही जातात स्वप्नात हरवून ...!!!!
काव्यरस

आई.. मिटलेला श्वास - ७

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 16/11/2010 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ६ :- http://www.misalpav.com/node/15395 पार्श्वभुमी : शेतवस्ती वरती राहणारा कवितेचा नायक. शेतातील फ़ुले , बांधावरील माळवादाचे घर, वाहणारा पाट , चंद्र यांची अवस्था ही आता त्यास त्याच्या मोडलेल्या मना प्रमाणे वाटते.. सुर हरवलेले जग त्याच्या मनाच्या बांधावरुन.. बांधावर पडलेल घर रानफ़ुलांचा एकेरी सूर भळभळणारा आठवांचा पाट डोळ्यामध्ये भयसंध्या दाट चंद्राची ढगात हूल सुनसान विचारांची भूल निशब्द एक काहूर मन व्याकुळ सैरभैर श्वास हवेत निस्तब्ध कळेना माझे प्रारब्ध स्मरणात तुझीया सुकलेले दोन नेत्र ------- शब्दमेघ
काव्यरस

((निशाण))

लेखक नगरीनिरंजन यांनी शुक्रवार, 12/11/2010 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
जय नावाचा इतिहास जो घडले तसेच सांगत आहे? पराजित सारे मरून गेले जेत्यांचा भाटगण गात आहे मानवबुद्धी श्रेष्ठ कर्तबगारी वचन गीतेत महान आहे? पौरुषहीन जो संन्यस्त झाला कामलालसा घेते प्राण आहे पांडवास हरवण्या दान करुनी सूर्यपुत्र अधर्माने वागत आहे? धर्म रक्षणासाठी कवचाचे अधर्म्यांकडूनच दान आहे 'पांडव' तो जरी इंद्रपुत्र गादीवर हक्क सांगत आहे पान्हा तोडून टाकले जिने पाचांचे जीवदान मागत आहे रजस्वलेची फेडुनी वस्त्रे अंकी बसण्या बोलवत आहे? जी राज्य स्वतःचे मिळाले असता फजिती करून हसत आहे नरो वा कुंजरो वा 'धर्मराजाचा' प्रताप आहे नि:शस्त्र वृद्ध घेरून वधला सूड पुत्राचा पाप आहे? नसे धर्मवान सर्वदा क
काव्यरस

निशाण

लेखक नगरीनिरंजन यांनी शुक्रवार, 12/11/2010 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
जय नावाचा इतिहास जो सारे जेत्यांचेच लिखाण आहे पराजितांना अधर्मी ठरवून उंच विजेत्यांचे निशाण आहे राजपुत्रच श्रेष्ठ धनुर्धारी वचन गुरुंचे महान आहे एका अंगठ्याच्या कर्जापायी गुरुधर्म तो गहाण आहे सूताघरी सूर्यपुत्र दानी वंचनाच नियतीचे दान आहे धर्माची चौकशी करतो ईश्वर उरी भावाचाच बाण आहे जरी सुयोधन अंधपुत्र तू राजपदीही अपमान आहे सत्तालोभ धर्माधर्म कधी कमरेखालीच प्रहार आहे कर्मयोगाची करुनि भलामण हरला गुरुचाच प्राण आहे सूडाग्नीत जीवन गुरुपुत्राचे चिरंजीव विराण आहे पराजितांना अधर्मी ठरवून उंच विजेत्यांचे निशाण आहे.....
काव्यरस

आई.. मिटलेला श्वास - ६

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 11/11/2010 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ५: http://www.misalpav.com/node/15255 पार्श्वभुमी : गावाकडे शांत तळ्यावर बसल्यावर, त्याची सुक्ष्म लाट ही मनावर आघात करते आणि विचारधारेच्या प्रवाहात मन हळुच वाहु लागते तळ्याकाठी निशब्द निरव सांजवेळ नक्षत्रांच्या फेर्‍यामध्ये आठवांचा खेळ सोनेरी क्षणांचा हा क्षणिक कवडसा अभिषेक सूर्यास्तास ओघळणार्‍या आसवांचा तरंगीत सुक्ष्म लाट मनपटलावर विरता तिमिरात सामावते अखंड विचारधारा ---------- शब्दमेघ
काव्यरस

(पुन्हा दिवाळी)

लेखक मेघवेडा यांनी शुक्रवार, 05/11/2010 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : प्राजुतैच्या दिवाळीच्या सुंदर कवितेची अशी चिरफाड केल्याबद्दल तिची जाहीर माफी मागतो. प्रस्तुत कवितेत नवर्‍याचे कपडे धुवून धुवून वैतागलेली बायको आपली व्यथा मांडते आहे. समस्त स्त्रीमुक्तीवाद्यांनी कृपया ह. घ्यावे!