हिरवे मूग व पोह्याचे लाडू

जागु's picture
जागु in दिवाळी अंक
13 Nov 2012 - 11:07 am

हिरवे मूग व पोह्याचे लाडू
साहित्य :
१) दोन वाट्या पोहे
२) दोन वाट्या मूग
३) दोन वाट्या पिठी साखर
४) अर्धी वाटी सुक्या खोबर्‍याचा कीस
५) १ ते वाटी तूप
६) १ वाटी भाजके डाळे
७) १ वाटी मिक्स ड्रायफ्रूट
८) २ चमचे खसखस
९) १ चमचा वेलची पूड


पाककृती:
१) मूग, पोहे, डाळे, खोबर्‍याचा कीस, खसखस हे वेगवेगळे मंद आचेवर खरपूस भाजून घ्यावेत.
२) मूग व डाळे वेगवेगळे मिक्सरमध्ये दळून त्याचे रवाळ पीठ करावे.
३) पोहे व खोबर्‍याचा कीस एकत्र करून कुस्करून घ्यावे.
४) आता तूप सोडून सगळे साहित्य एकत्र करावे.

५) हळू हळू तुपाचा अंदाज घेत लाडू वळण्याइतपत मिश्रणात तूप घालावे.


६) मिश्रण झाले की हव्या तेवढ्या आकारात लाडू वळावेत.

हे लाडू पौष्टीक तर आहेतच शिवाय अतिशय रुचकर लागतात. दिवाळीतील इतर लाडवांच्या चवीपेक्षा हे चविष्ट लागतात.

प्रतिक्रिया

रेवती's picture

13 Nov 2012 - 8:26 pm | रेवती

खरच छान फोटो आणि कृती.

प्रचेतस's picture

22 Nov 2012 - 4:21 pm | प्रचेतस

हे अगदी शेंगदाण्याच्या उपवासाच्या लाडूंसारखे दिसत आहेत.
कोकणात दिवाळीच्या फराळाला पोह्यांचे ४/५ प्रकार करतात असे ऐकून आहे त्याबद्दलही अधिक माहिती येऊ देत जागुतै.