Skip to main content

ताज्या घडामोडी-मार्च २०२४

लेखक माईसाहेब कुरसूंदीकर यांनी शनिवार, 01/03/2025 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या दोन दिवसात ट्रम्प/व्हान्स आणी झेलिन्स्की ह्यांच्यातील चर्चा(की हाणामारी) जगभर चर्चेचा विषय झाली. युक्रेनमध्ये टिटॅनियम्,लिथियमच्या सम्रुद्ध खाणी आहेत. अमेरिकेबरोबर ह्या संबंधात करार करण्यासाठी झिलिन्स्की व्हाईट हाउसमध्ये गेले होते. चर्चा ,युद्धाचा विषय,त्यातुन वाद आणि मग होणारा करार फिस्कटला. जगातील महत्वाच्या राष्ट्रप्रमुखांनी ह्यावर तात्काळ प्रतिक्रिया दिल्या. जर्मनी ,नेदरलँड ,पोर्तुगाल,कॅनडा,पोलंड,आयर्लेंड,नॉर्वे,स्पेन,एस्टोनिया,लॅट्व्हिया ह्या देशप्रमुखांनी 'जर-तर' वगैरे गोल गोल प्रतिक्रिया न देता.. "आमचा रशियाला विरोध असुन युक्रेनला पाठिंबा आहे" असे सरळ सांगितले. https://indianexpress.com/article/world/global-reactions-zelenskyy-trum… https://www.aljazeera.com/news/2025/2/28/world-reacts-after-donald-trum… चीन ह्या प्रकरणावर मुग गिळुन गप्प बसणार ही अपेक्षा होती. https://www.scmp.com/news/china/diplomacy/article/3300688/chinas-media-…

वाचने 66386
प्रतिक्रिया 548

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

आणि मुख्य म्हणजे युक्रेन, आयातशुल्क, पुतीनबरोबर चर्चा वगैरे मुद्द्यांवर ट्रंपला खडसावून स्पष्टीकरण माग. ट्रंप आगाऊपणा करायला लागला तर तू छत्री घेऊन आणि 'हे' हातातल्या टेकायच्या काठीने ट्रंपला झोडपून काढा.

In reply to by श्रीगुरुजी

आणि मुख्य म्हणजे युक्रेन, आयातशुल्क, पुतीनबरोबर चर्चा वगैरे मुद्द्यांवर ट्रंपला खडसावून स्पष्टीकरण माग. ट्रंप आगाऊपणा करायला लागला तर तू छत्री घेऊन आणि 'हे' हातातल्या टेकायच्या काठीने ट्रंपला झोडपून काढा. आणि काही कळलं नाही तरी हॅ हॅ करायला आणि मिठ्या मारायला बाहुले असेलच सोबतीला.

भगवंत मान सरकारचे अभिनंदन! ४-५ वर्षांपूर्वी अगदी अश्याच आंदोलनावरून मोदींना झोडपून काढणाऱ्यांच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत.

ग्रोक ने दिलेली माहीत चुकीची ... पण आय टी सेल कडून व्हॅट्सऍप वरील माहिती ऑथेंटिक बर्का ... ग्रोक आंतरजालावर उपलब्ध माहिती वाचून सांगतो .. पण आय टी सेल प्रगाढ रिसर्च करून माहितीचे संकल करून , इतिहासाचा अभ्यास करून माहिती फॉरवर्ड करते ... ग्रोकने भक्तांचे धोतर फेडले ... तर भक्तगण म्हणतात , नाहीतरी उन्हाळा आला होताच ... आम्हीच काढू दिलं ग्रोकला आमचे धोतर ...

”राज्यातील सरकारी अधिकारीआणि कर्मचारी समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत. समाज माध्यमावरील समुहात ते अनेकदा सरकारविरोधी भूमिका मांडतात. त्यांचे संदेश अनेकदा समाजहिताच्या विरोधात असतात. त्यामुळे सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समाजमाध्यमातील सक्रियतेवर निर्बंध आणण्याची गरज आहे. तीन महिन्यांत त्या बाबतची नियमावली जाहीर केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली”’ (दै. लोकसत्ता,छापील आवृत्ती) सरकारी कर्मचारी व्यवस्थेच्या ढुंगणाला कायम चिमटे घेत असतात, त्यांच्या माध्यमांवर व्यक्त होण्यावर बंदी घातली पाहिजे. जमलंच तर, गोबरयुगातील गोबर कार्यकर्ते चहापाण्याच्या अटीवर जागोजागी सोशल माध्यमांवर उभे केले पाहिजेत. सरकारला चिमटे घेतले किंवा सरकार सरकारच्या धोरणाविरुद्ध कोणी बोलतांना आढळले की प्रतिबंधात्मक कार्यवाही झाली पाहिजे. साले लै बोलत असतात. -दिलीप बिरुटे

In reply to by अमरेंद्र बाहुबली

हा हा हा! भारी! गोबरयुग हा शब्द आवडला!
शेणपट्ट्यात वळवळणाऱ्या किड्यांना गोबरयुग हा शब्द आवडणारच, नाही का? बाकी, गोबरयुग, गोबरवादी, शेणपट्टा हे शब्द तुम्ही आणि प्रोफेश्वरांनी आधीही वापरले आहेत. तुम्हाला त्यात नवीन काही नाही. --- शेणपट्ट्यात वळवळणारे किडे साजूक तुपातही शेणच शोधतात.

भाजप आणी अंधभक्तांची चांगलीच धुलाई चालूय, माईदी ग्रेट ने सुरू केलेला दंडपट्टा थांबता थांबायचे नाव घेत नाहीये. मीपकरांच्या इतिहसासात पहिल्यांदा भाजप समर्थक गायबलेत! एकटे श्रीगुरुजी किती ठिकाणी ठिगळ लावतील? खिक्का!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अबा.. जास्त खुश होउ नका. तुम्हा लोकांना जास्त सिरीयसली घेतले जात नाहिये. तेव्हा करा जे काय करायचे ते. बोला काय बोलायचे ते.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

"उपदेशो हि मूर्खाणां प्रकोपाय न शान्तये। पयःपानं भुजङ्गानां केवलं विषवर्धनम्॥" किंवा "मूर्खाणां विवादेन तर्कशास्त्रं प्रवर्तते। विवादात् जायते वैरं ततः सत्यं न भाषते॥"

In reply to by अमरेंद्र बाहुबली

एकदा जंगलात एक हत्ती आणि माकड यांच्यात जोरदार वादावादी होते. हत्ती म्हणत असतो की सूर्य पूर्वेला उगवतो तर माकड म्हणत असते की सूर्य पश्चिमेला उगवतो. दोघेही आपल्याच बाजूवर अडून राहिले असतात. शेवटी प्रकरण वनराज सिंहाकडे जाते. दोघांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर सिंह म्हणतो- सूर्य पश्चिमेला उगवतो आणि हत्तीला चांगलेच खडसावले. आपले म्हणणे वनराजाने मान्य केले या आनंदात माकड तिथून निघून जाते. माकड गेल्यावर हत्तीने सिंहाला विचारले- "महाराज, सूर्य पूर्वेला उगवतो हे तुम्हालाही माहीत आहे मग तुम्ही माकडाचे म्हणणे मान्य का केलेत?" त्यावर सिंह म्हणतो- "हो मला पण माहीत आहे. पण मुळात तू माकडाशी वाद घालायला गेलासच का? म्हणून मी तुला खडसावले" असो.

गोबरकालाच्या काही वर्ष्यापुर्वीचीच गोष्ट आहे ... इकॉनॉमी चा ग्रोथ रेट ८%-९% सगळ्यांनीच कन्सिडर्ड करून ठेवला होता ... माझा एक ओळखीचा, आय टी ज्ञान पाजळवायचा जिथे तिथे .. देश लोकसंख्येत वाढतोय म्हणून आपोआप इकॉनॉमी वाढतेय ...या पंतप्रधानाने (डॉ सिंग) असं काय केलंय ... त्याचं लॉजिक .. इंडिया हॅज अचिव्हड सो मच डेव्हलोपमेंट , नॉट ' बिकॉज ' ऑफ काँग्रेस बट 'इंस्पाईट ' ऑफ काँग्रेस. अशे छपरी गोबर शब्दबंबाळ इकॉनॉमिस्ट असतात पहा, आपल्या आजूबाजूला, एक्झॅटली तसा बरळायचा ... काही महिन्यापूर्वी त्याला कॅनडात नागरिकत्व मिळालं तर लगेच पळून गेला कॅनडाला ... पण तिकडनं देशभक्तीच्या पिंका टाकतो .. त्याला एकदा फोनवर म्हटलं , नालायका आता देशाची इकॉनॉमी ५.५% टक्क्याने मोठ्या मिनातवारीने चाललीये .. आता का नाही तुझं छपरी लॉजिक लावत ?? तर गप्प बसला ... शरमेने (म्हणजे त्याला जनाची नाही तर निदान मनाची लाज होती म्हणून असेल कदाचित ) त्याला म्हटलं , त्यावेळी साजूक तुपात किडे शोधात होतास , आता ये शेण चिवडायला ...

आयुष्यभर शेणात वळवळणाऱ्या शेणकिड्यांना सर्व जग व सर्व युगे शेणच वाटणार कारण जन्मापासून मरेपर्यंत शेणातच त्यांची उत्पत्ती, जीवन आणि शेवट.

In reply to by श्रीगुरुजी

+1 मनुवादी प्रवृत्तीवर एवढी जहरी टीका कुणी क्वचितच केली असेल! आवडले गुरुजी!

In reply to by श्रीगुरुजी

आयुष्यभर शेणात वळवळणाऱ्या आजच्या शेणकिड्यांचे, तत्कालीन पूर्वज सावित्रीबाईंवर शेणगोळे फेकून मारतानाचे चित्र .. s

In reply to by आंद्रे वडापाव

ग्रोक उवाच : In the 19th century, the Phules faced opposition from conservative Brahmins, who were opposed to their efforts to educate women and lower-caste individuals. The Brahmins, who were influenced by the Manusmriti (a Hindu text that codified social hierarchy), saw the Phules' work as a threat to their social dominance. There are accounts of the Phules facing harassment and intimidation from these conservative Brahmins. For example, Savitribai Phule was allegedly pelted with cow dung balls and stones by a group of Brahmin women when she was teaching at the school she had established in Pune. Savitribai Phule's bravery and determination in the face of adversity are an inspiration to many. Her work continues to be celebrated and recognized as a crucial step towards women's empowerment and social reform in India.

In reply to by श्रीगुरुजी

पुन्हा ग्रोक उवाच : According to various accounts, including Godse's own confession and eyewitness testimony, Godse wore a Muslim or Pathan-style attire, including a turban and a beard, to disguise himself as a Muslim or Pathan while attempting to assassinate Gandhi on January 30, 1948.

In reply to by आंद्रे वडापाव

कट कारस्थानी प्रवृत्ती , अशीच वेशभूषा बदलून काम करते , पकडले गेले तर अफवा पसरवता येतें नं .. कुणाचे कवचकुंडल मागायचे तर बदला वेष कुणाचे राज्य मागायचे तर बदला वेष कुणाची हत्या करायचीय बदला वेष कुणाला शेण मारायचे बदला वेष

" Godse wore a Muslim or Pathan-style attire, including a turban and a beard, to disguise himself as a Muslim or Pathan while attempting to assassinate Gandhi on January 30, 1948." हे खरे आहे. मनोहर माळगावकर ह्यांच्या पुस्तकात(द मेन हु किल्ड गांधी) हा उल्लेख वाचल्याची आठवते. मुंबईचे तत्कालिन कमीशनर जीमी नगरवाला ह्यांनीही तसा उल्लेख केला आहे. तसा वेश केल्याने "मुस्लिमाने गांधीना मारले' अशी बातमी पसरेल आणि मग देशभर मुस्लिमांना मारले जाईल अशी आयडिया होती. आयडिया अर्थात गोडसेची नव्हती तर त्याला 'यशस्वी भव' म्हणणार्यांची होती.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

यशस्वी भव म्हणणारे इतके कपटी होते हे माहीत नव्हते! त्यांच्यामुळे अनेक निरपराध ब्राम्हण मारल्या गेले त्यांना श्रद्धांजली!

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आयडिया अर्थात गोडसेची नव्हती तर त्याला 'यशस्वी भव' म्हणणार्यांची होती.
'यशस्वी भव' म्हणणारा कारस्थानी y

In reply to by आंद्रे वडापाव

'यशस्वी भव' म्हणणारा कारस्थानी आणि ट्रिगर ओढणारा हत्यारा, यांच्यातील खोलवर रुजलेले प्रेमाचे संबंध a

स्वतःचे अपयश लपविण्यासाठी काहीही महत्त्व नसलेल्या इतिहासात रमून इतरांवर दोषारोप करणाऱ्यांचा नेहमीच कपाळमोक्ष होतो.

"Unlawful Regulation": Elon Musk's X Sues Centre, Alleges Censorship केंद्रसरकारचे बेकायदेशीर नियमन. " एलॉन मस्क ह्यांच्या एक्सचा कर्नाटक हाय कोर्टात खटला. The lawsuit alleged that the government is using the section to create a parallel content-blocking mechanism, bypassing the structured legal process outlined in Section 69A. https://www.ndtv.com/india-news/unlawful-regulation-elon-musks-x-sues-c… आमच्या पंतप्रधानांनी मस्क आणि बच्चे कंपनीबरोबर गप्पा मारल्या, स्टार-लिंकला होकार दिला, टेस्ला गाडी विकायला परवनागीही दिली. मग हा मस्क असा अडुन का बसतो?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

स्टार-लिंकला होकार दिला, टेस्ला गाडी विकायला परवनागीही दिली. कधी होकार दिला? कधी अनुमती दिली? कळू दे तरी आम्हाला. नंतर पुढील प्रतिसाद लिहितो.

In reply to by श्रीगुरुजी

रेल मंत्री वैष्णव ने मस्क की कंपनी स्टारलिंक का भारत में स्वागत किया https://www.prabhasakshi.com/national/railway-minister-vaishnav-welcome… मुख्य मुद्दा हा आहे की भारत मस्कसाठी पायघड्या घालत असताना मस्क असे का वागत आहेत ? मस्क ह्यांना परवाने मिळणार नाहीत असे तुम्हाला वाटतय का?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

स्टारलिंक व टेस्ला यांना भारतात व्यवसायासाठी भारत सरकारने अनुमती दिली या निर्णयाचे पुरावे आहेत का? असेल तर लिंक द्या. त्यानंतर पुढील प्रतिसाद देईन.

In reply to by श्रीगुरुजी

शब्दांचे मनोरे रचले तर भारत सरकार सॉरी मोदी सरकार ट्रम्प समोर अडाणीला वाचवायला लाळघोटेपणा करतय हे खोटे ठरते का?

In reply to by श्रीगुरुजी

Starlink ला भारतात परवानगी देण्यापूर्वीच ह्या उतावळ्या महाशयांनी स्वागत केले होते. नंतर चूक सुधारली. परंतु starlink ला २जी प्रमाणेच स्पेक्ट्रम वाटप होईल असे वाटते. २ एप्रिल नंतर कळेल. https://english.jagran.com/india/starlink-in-india-row-ashwini-vaishnaw…

In reply to by आग्या१९९०

परंतु starlink ला २जी प्रमाणेच स्पेक्ट्रम वाटप होईल असे वाटते. वाटू दे, वाटू दे. अजून बरेच काही वाटू दे. अकायदेशीर नेपाळ्यांना अमेरिकेने बेड्या न घालता परत पाठविले होते असंही काही जणांना वाटत होतं. ग्रॉक भाजपविरोधात, मोदींविरोधात बोलतो म्हणून मोदींनी ग्रॉकला नोटीस पाठविली असंही काही जणांना वाटलं. भारताने टेस्ला व स्टारलिंकला भारतात व्यवसाय करण्याची अनुमती दिली असंही काही जणांना वाटलं. सावित्रीबाईंशी संबंधित चित्रातून तर वेगळंच सत्य बाहेर आणलं. मी सगळीच थापेबाजी उघडकीस आणून थापेबाजांना तोंडावर आपटवलं.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्ही ज्या ५६ इंचीला सोने समजता ते पितळ आहे हे ट्रम्प आणि मस्कने जगाला दाखवून दिले आहे. तुमचा साबण स्लो असल्याने तुम्हाला ते उशिराने समजेल.

In reply to by आग्या१९९०

वारंवार आपल्या थापा उघडकीला आल्याने 'पडलो तरी नाक वर' अशी आपली केविलवाणी व हास्यास्पद अवस्था झाली आहे. सोबतीला पाठीमागे उजवा हात पुढे पसरून व डावा हात कानावर ठेवून 'जीजी रं जीजी रं जी जी जी' कोरस म्हणणारे कितीही भाट आणले तरी गेलेली आता परत येणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

स्टारलिंकला भारतात व्यवसाय करण्याची अनुमती दिली असंही काही जणांना वाटलं. अगदी बरोबर बोललात. अश्विनी वैष्णव हे त्यापैकी official नग.

In reply to by श्रीगुरुजी

माईडीकडे लिंका दिसत नाहीत. म्हणजे स्टारलिंक आणि टेस्लाच्या नावाने पुडी सोडली. माईडीची अवस्था म्हणजे, आग्या शेजारी कुरसुंग्या बांधला, वाण नाही पण (पुड्या सोडण्याचा) गुण लागला. सुधार गं माईडे. नक्की माहिती असल्याशिवाय सैल विधाने करू नकोस.

दिशा सालीयान प्रकरणात आठांचा उल्लेख वारंवार केला जातोय. पुढे काय होईल माहीत नाही. राऊत मात्र इनोदी डरकाळ्या फोडत बसले आहेत सुशांतसिंग प्रकरण आता थंड्या बासनात गेलंय. त्या बिचार्‍याला तर आता कोणीच न्याय देऊ शकणार नाहिय्ये. तसेच अंटीलीया प्रकरणदेखील मागे पडलंय. तो बळी गेलेला गाडी मालक त्याचे तर नावही आठवत नाहिय्ये कोणाला परमवीरसिंग रीटायरमेंट होऊन पेन्शन खात बसलेत.

In reply to by विजुभाऊ

'यशस्वी भव' म्हणणारा कारस्थानी आणि ट्रिगर ओढणारा हत्यारा, यांच्यातील खोलवर रुजलेले प्रेमाचे संबंध... ते प्रकरण पन आता थंड्या बासनात गेलंय. त्या बिचार्‍याला ट्रिगर ओढणारा ..त्याचे तर नावही आठवत नाहिय्ये कोणाला d

In reply to by विजुभाऊ

देफच्या काळात कोणते प्रकरण पूर्णत्वास गेले? विरोधी पक्षातील नेत्यांनी आपल्याला पाठिंबा द्यावा यासाठी परमार आत्महत्या प्रकरण, करमुसे मारहाण प्रकरण, नबाब मलिक दाऊद इब्राहिम प्रकरण, सचिन वाझे प्रकरण, दिशा सेलियन व सुशांतसिंग राजपूत प्रकरण, रश्मी ठाकरे अलिबागमधील १९ घरे प्रकरण अशी सर्व प्रकरणे टांगत्या तरवारीसारखी डोक्यावर टांगून दडपण ठेवण्यासाठी वापरली जात आहेत. संजय राठोड, अजित पवार, रवींद्र वायकर, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव इ. प्रकरणे त्यांनी देफला पाठिंबा दिल्याने कायमस्वरूपी बंद करण्यात आली. मला पाठिंबा द्या आणि निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र घ्या, नाहीतर प्रकरणाच्या तपासाची तलवार डोकी सहन करा, हे धोरण २०१४ पासून यशस्वीपणे राबविले आहे. यातील कोणतेही प्रकरण पूर्णत्वास जाणार नाही. पाठिंबा देत नाही तोपर्यंतअधूनमधून तपासाची धमकी देऊन दडपण आणले जाईल व पाठिंबा देताक्षणीच निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र प्रदान केले जाईल. आव्हाड, राऊत, मलिक, राठोड, परब, पवार, ठाकरे इतके निवांत का आहेत हे आता समजलं असेल.

In reply to by श्रीगुरुजी

वाल्मिक कराड, स्वारगेट बस स्थानकातील बलात्कारी गाडे वगैरेंनी भाजपत प्रवेश करावा. निर्दोष सुटका होईलच, वर एखादे पदही मिळेल.

In reply to by रामचंद्र

नक्कीच करू शकतात. अजित पवार, ठाकरे इ. ना वाचविण्यात वरिष्ठांची संमती असू शकते. परंतु राठोड, आव्हाड, सत्तार, मुश्रीफ इ. फुटकळांना वाचविणे हे यांचेच निर्णय असणार. पुण्यातील माफिया मोहोळच्या बायकोला पक्षात आणणे असले निर्णय तर वरिष्ठांच्या कानावर गेले सुद्धा नसतील.

In reply to by श्रीगुरुजी

माफिया मोहोळच्या...> ??? अधिक माहिती मिळेल का? कारण एक मोहोळ हे महापौर, खासदार अशी वाटचाल करत आता केंद्रीय मंत्री आहेत हे माहीत आहे.

In reply to by रामचंद्र

नाही, नाही. ते मुरलीधर मोहोळ जे सध्या मंत्री आहेत. मी म्हणतोय तो पुण्यातील माफिया गुंड शरद मोहोळ. तो १०-११ वर्षे तुरूंगात होता व सुटल्यानंतर विरूद्ध टोळीने त्याला गोळ्या घालून मारले.

In reply to by विजुभाऊ

"दिशा सालीयान प्रकरणात आठांचा उल्लेख वारंवार केला जातोय" दिशाचा मृत्यु झाल्यावर तिचे आई-वडिलांनी पत्रकार परिषद घेतली होती. "आमच्या म्रुत मुलीची बदनामी थांबवा. आमचा कुणावरही संशय नाही" असे सांगत होते. तरीही कोकणातल्या नेपाळी नेत्यांनी तिची बदनामी सुरुच ठेवली. तिच्यावर बलात्कार झाला व तिला ढकलले असे हे नेपाळी नेते सांगत होते. जर पुरावे आहेत तर पोलिसांना द्या ना? मुंबई पोलिसांवर विश्वास नाही तर सी बी आय ला द्या. पण पुरावे काही दिले नाहीत. आता पडद्यामागे आपले नेते कशा चाव्या फिरवतात ते सर्वाना ठाउक आहे. दिशाचे वडिल सतिश सालियान ह्यांनी दिशावर बलात्कार करुन तिचा खून झाला असे म्हणत आहेत. ही घटना घडली(जून २०२०) मध्ये. "We are very hurt by her death. People are spreading rumours on social media platforms that she was thrown off the building and her body was found naked. There is no truth in these claims. This kind of talk is highly offensive and hurts us," Satish said. हे त्यांचे विधान आहे ऑगस्ट २०२० मधले. Talking about Disha's friends who were in her Malvani flat the day she died, Satish said, "They are Disha's childhood friends and belong to good families. We knew them and their families very well." https://203.112.159.176/amp/mumbai/mumbai-news/article/Disha-Salian-fat… मग आता ह्या सतिश रावांचा कान पकडुन विचारायला हवे, की असे काय झाले की आता पलटी मारताय?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अशा बातम्यांकडे दुर्लक्ष करावे. चर्चा करण्याच्या अजिबात लायकीची नाही ही बातमी.

In reply to by आग्या१९९०

+१ दिशा सालियन, आत्महत्या केलेला सुशांत राजपूत ही प्रकरणे कधीच बंद झाली आहेत, हे विषय फक्त मूर्ख लोकांच्या चर्चेचे विषय आहेत.

दिशा सालीयान आणि सुशांतसिंग प्रकरणांचा वापर फक्त आदित्य ठाकरेंना बदनाम करण्यासाठीच केला जातोय. थोड जरी तथ्य असल असत तर नक्कीच कारवाईच नाटक तरी केलं असतं. ह्यात फक्त फडणवीसांना दोष देऊन उपयोग नाही, भाजपच केंद्रीय नेतृत्व पण हेच करतय. एकदा भाजप प्रवेश केला की कारवाई बंद.

In reply to by रात्रीचे चांदणे

तथ्य असणार आणि पुरेसे पुरावेही असणार. पण याचा वापर फक्त दडपण आणून पाठिंबा मिळविण्यासाठी केला जातोय. म्हणून तर प्रकरण बंद केले जात नाही, पुढे नेले जात नाही किंवा पूर्णत्वास नेले जात नाही.

In reply to by श्रीगुरुजी

होय आणि समजा एकदा का पाठिंबा मिळाला ... कि हे महाराष्ट्रात असलेले आणि आपण मराठी आहोत हे भासवणारे गुज्जू (स्लीपिंग सेल) आणि कावकाव करणारे काही भटजी ... गुपचूप मूग गिळून गप्प बसतील ... सगळं काही शांत शांत होईल ... कुठली दिशा अन कुठला सुशांत ...

लोकशाही मूल्ये, भाषण/मत स्वातंत्र्य हे शब्द केवळ भाषणात असून चालत नाहीत. आपणास 'अमुक गुरु,तमुक गुरु'असे जगाने म्हणावे असे वाटत असेल तर ते क्रुतीतून्/बोलुन दाखवावे लागते. नुसतेच हसून वेळ मारुन नेउन चालत नाही. सुदैवाने फ्रान्समध्ये ही मुल्ये जपण्याची परंपरा दिसते एक फ्रेंच संशोधक अमेरिकेत ह्युस्टन येथे ९ मार्च रोजी परिषदेसाठी आले असताना त्यांना विमानतळावर उतरल्यावर 'रँडम चेक' मध्ये अडवण्यात आले व त्यांचा फोन तपासण्यात आला. ह्यात ट्रम्प्/सरकार व त्यांच्या संशोधनात्म्क धोरणांवर टीका केली होती. According to an unnamed source cited by AFP, US authorities labelled the messages as “hatred towards Trump” that “could be qualified as terrorism”. ह्या संशोधकाला पुन्हा फ्रान्सला पाठवण्यात आले. ह्यावर फ्रान्सचे उच्च शि़क्षण आणि संशोधन मंत्री फिलिप ह्यांनी सरळ highly deplorable म्हणुन निषेध व्यक्त केला. देशात कोणाला घ्यायचे हा अमेरिकेला अधिकार आहेच पण हे झाले ते अयोग्य आहे.असे मत नोंदवले. https://www.france24.com/en/americas/20250320-french-scientist-denied-u… दुसरे एक भारतिय संशोधक(ह्यांच्याकडे ग्रीन कार्ड आहे) बादर खान सुरी ह्यांना डिटेन करण्यात आले आहे. 'हमासशी संबंध' आहे म्हणुन ह्यांना भारतात पाठवण्यात येणार होते. मात्र तेथील न्यायाधीशांनीच सुरी ह्यांना तसे करता येणार नाही असा निर्णय दिला आहे. सुरी पत्नी पॅलेस्तेनियन आहे व वडिल तेथे हमासशी संबंधीत आहेत म्हणुन बादर सुरी ह्यांचे हमासशी संबंध असणार..हे तार्किक अमेरिकन सरकारचे आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

हा खान व त्याची पालिस्तिनी बायको अमेरिकेतच राहछ दे. ही घाण भारतात नको. पण ते जाऊ दे. स्टारलिंक व टेस्लाचे पुरावे कधी देणार?

लोकं पण फार खोडसाळ झाले आहेत आजच्या काळात एकाने विचारले कि औरंगजेब आज असता तर कोणत्या राजकीय पक्षात गेला असता सगळे गुन्हे करून :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

औरंगजेबाची कबर, छत्रपती संभाजी महाराजांच्या वंशजांनी सुद्धा उखडली नाही किंवा कबरीची विटंबना केली नाही. ३०० वर्ष्यानंतर हे आज कालचे छपरी नेपाळी छत्रपतींचे प्रतिनिधी असल्याच्या थाटात बोलतात .. मोदीजी किंवा अमित शहांकडे जाऊन यांचा आवाज बाहेर येत नाही, येऊही शकत नाही, कारण त्यांनी ह्यां नेपाळी पोरांच्या तोंडांत दिलेला असतो ना चोखायला ... आपला अंगठा ..

In reply to by अमरेंद्र बाहुबली

औरंगजेब कशाला भाजपत किंवा दुसऱ्या पक्षात जाईल? त्याचा स्वत:चा वेगळा पक्ष आहे की.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

असता तर? आहे की महाराष्ट्रात औरंगजेब आणि तो कशाला भाजपत किंवा दुसऱ्या पक्षात जाईल? त्याचा स्वत:चा पक्ष आहे की महाराष्ट्रात.