तीन घटना. तीन बातम्या. आणि तीन प्रकारे वागलेली तिथली माणसं. याबाबत मी गेले तीन दिवस विचार करतोय.
रत्नाकर मतकरींचं एक वाक्य आठवतं, 'माणूस वाईट नसतो; माणसं वाईट असतात.' याबद्दल विचार केला की त्यांचं म्हणणं किती खरं आहे ते जाणवतं. या घटना वृत्तवाहिन्यांनी, वृत्तपत्रांनी पुरेशा चघळल्यात त्यामुळे त्या सगळ्यांना माहित असतीलच. लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे तिथे उपस्थित असलेल्या जनसमुदायाचं वागणं, त्यांचा विचार.
शनिशिंगणापूरला, जिथल्या देवळात स्त्रीयांना प्रवेश निषिद्ध आहे, तिथे एका मुलीने जाऊन तेलाचा अभिषेक केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली.