Skip to main content

ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी ऑगस्ट २०२५

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी शुक्रवार, 01/08/2025 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदी चित्रपटसृष्टीतील असामान्य निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते गुरूदत्त यांची आपल्याबरोबर चित्रपट करावा अशी शेवटची इच्छा होती असा दावा महागुरू सचिन पिळगावकर यांनी केला आहे. अधिक माहिती https://marathi.indiatimes.com/entertainment/entertainment-news/bollywo… वर.

१००-१ यांच्या भारताबाहेरील सिक्सर

लेखक चौकस२१२ यांनी बुधवार, 18/09/2024 07:47 या दिवशी प्रकाशित केले.
ओवेसी परवडले पण राजपूत्र राहुल ला आवरा असे म्हण्य्याची पाळी आली आहे नुकत्याच राजपुत्तर १००-१ राहुल यांनी त्यांच्या अमेरिक दौऱ्यात शिखानबद्दल बद्दल एक महान व्यक्तव्य केले आहे एक शीख माणसाने सभेत त्यांना विचारले तर हे म्हणतात " बघ शीख माणसा या पुढे भारतात तुला तुझ्या धर्माप्रमाणे कृपण बाळगणे, पगडी घालणे येवढेच काय गुरुदवरात जाणे दिवसेंदिवस अवघड होत जाणार आहे ...." पुढे ते हिंदी विरुद्ध तामिळ, केरळ असली काडी घालतात ..

ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग ६)

लेखक मदनबाण यांनी बुधवार, 29/06/2022 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १४५ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. थोड्या वेळा पूर्वीच उदयपुर च्या कन्हैया लाल नावाच्या व्यवसायाने शिंपी [ टेलर ] असणार्‍या व्यक्तीच्या हत्येचा व्हिडियो पाहण्यात आला. आपल्या देशात पिसाळलेले जिहादी कुत्रे कसे मोकाट सुटलेत आणि त्यांचे पाकिस्तानी आका त्यांचे पोषण करत आहेत ते कळुन आले. पाकिस्तानला आपण अजुनही भस्म केलेले नाही आणि त्याचाच हा परिणाम आहे की आपल्या देशात आत अनेक जिहादी कुत्र्यांनी भरलेले पाकिस्तान पोसले गेले आहेत.

ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग ३)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी बुधवार, 22/06/2022 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील प्रतिसादांविषयी काही लिहायचे असेल तर त्या भागात लिहावे आणि नवीन मुद्दा लिहायचा असेल तर तो या भागात लिहावा ही विनंती. एकनाथ शिंदे यांनी अपक्ष मिळून आपल्या गटात ४६ आमदार आहेत असा दावा केला आहे.

ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग २)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी शनिवार, 18/06/2022 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात २५० प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील चर्चेसंदर्भात प्रतिसाद द्यायचा असल्यास त्या भागात आणि नवीन काही लिहायचे असल्यास या भागात लिहावे ही विनंती. लोकप्रिय व्यक्तीमत्व अभिजीत बिचुकले यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उडी घ्यायचे ठरविले आहे. विविध राज्यातील १०० आमदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आपल्याला राज्यघटना आणि कायदा याची चांगली जाण असून आपण राष्ट्रपती व्हायला योग्य आहोत असा त्यांचा दावा आहे.

ताज्या घडामोडी- जानेवारी २०२२ (भाग ३)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी बुधवार, 19/01/2022 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
गोव्यात प्रमोद सावंत यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री फिलीप नेरी रॉडरीग्ज यांनी मंत्रीपदाचा आणि आमदारपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर विफ्रेड डिसा या आमदारांनीही भाजप सोडून काँग्रेसमध्ये जायचा निर्णय घेतला आहे. हेच दोन आमदार जुलै २०१९ मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आले होते. ते आता स्वगृही चालले आहेत. परवाच बघितले की २०१७ मध्ये निवडणुका झाल्यानंतर गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या ४० आमदारांपैकी २४ आमदारांनी पक्षांतर केले आहे.आता हे आणखी दोन आमदार दुसर्‍यांदा पक्षांतर करत आहेत.

ताज्या घडामोडी- जानेवारी २०२२ (भाग २)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी शनिवार, 08/01/2022 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. निवडणुक आयोगाने पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशात १०, १४, २०, २३, २७ फेब्रुवारी आणि ३ आणि ७ मार्चला ७ टप्प्यात मतदान होणार आहे. पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात १४ फेब्रुवारीला तर मणीपूरमध्ये २७ फेब्रुवारी आणि ३ मार्चला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी गुरूवार १० मार्चला होणार आहे. कोरोनाच्या वाढत्या आकड्यांच्या पार्श्वभूमीवर सध्या १५ जानेवारीपर्यंत रोड शो, प्रचारसभांना बंदी असेल. तसेच मतदानकेंद्रांची संख्या वाढवून मतदारांची गर्दी कमी करण्याचा प्रयत्न असेल.

यालदा हकीम

लेखक चौकस२१२ यांनी शुक्रवार, 20/08/2021 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
यालदा हकीम https://en.wikipedia.org/wiki/Yalda_Hakim हि अफगाणिस्तानांत जन्मलेली , ऑस्ट्रेलियात वाढलेली आणि बीबीसी साठी काम करणारी पत्रकार भारतबद्दल ती बातमी बनवताना तिचा रोख वेगळा असतो त्यामुळे तिने अफगाणिस्तान वरती एक कार्यक्रम बनवला आहे ( काबुल पाडण्याचं आधी ) हे पाहून मनात प्रथम आले कि त्यात तालिबान ची छुपी भलावण असणार पण प्रत्यक्ष तसे नाहीये ,, तिने अफगाणिस्तानात जाऊन आणि दोहा मध्ये पण तालिबानी लोकांशी जी बोलणी केली त्यातून हे इतकं स्पष्ट होत्या कि कठोर इस्लामिक शरिया या एकमेव गोष्टीवरच तालिबान २. चा भर असणार आहे...

चालू घडामोडी - जुलै २०२१

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी शुक्रवार, 02/07/2021 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री डॉनल्ड रम्सफेल्ड यांचे २९ जून २०२१ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. rumsfeld त्यांनी प्रशासनिक जबाबदारीची पदे सांभाळायला सुरवात रिचर्ड निक्सन अध्यक्ष असताना १९६९ मध्येच केली. त्यानंतर अध्यक्ष झालेल्या जेराल्ड फोर्ड यांनी त्यांना सुरवातीला १९७४ मध्ये व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ आणि १९७५ मध्ये संरक्षणमंत्री म्हणून नेमले.

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१ (भाग ३)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी बुधवार, 10/02/2021 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात २००+ प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी तिसरा भाग काढत आहे. पहिल्या आणि दुसर्‍या भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यांवर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती. २६ जानेवारीला शेतकरी आंदोलनातील झालेल्या हिंसाचारात भडकावायचे काम केल्याबद्दल भारत सरकारने दिलेल्या यादीतील काही ट्विटर खाती भारतातून बघता येणार नाहीत असे ट्विटरने जाहीर केले आहे. मात्र सिविल सोसायटीमधील 'अ‍ॅक्टिव्हिस्ट'ची खाती ब्लॉक करण्यात आलेली नाहीत असे ट्विटरने म्हटले आहे.