✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हिरवाईच्या गप्पा - भाग १

स
साहित्य संपादक यांनी
Fri, 08/18/2017 - 02:11  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी! 'हिरवाईच्या गप्पा' ह्या सदाहरित धाग्यामध्ये स्वागत आहे. ह्या धाग्याचे प्रयोजन हे बागकाम, परसबागेतील शेती, सेंद्रिय खतनिर्मिती, सेंद्रिय आणि जैविक पद्धतीने कीडनियंत्रण, बर्ड-फीडर बनवणे, झाडांचे संगोपन इत्यादी विषयांवर चर्चा करणे हे आहे. येथे मिपाकरांना वरीलपैकी आणि इतरही हिरवाईशी संबंधित विषयांवर चर्चा करता येईल. प्रश्न विचारता येतील, उत्तरे देता येतील, माहितीची देवाणघेवाण करता येईल, आणि अर्थातच, आपल्या बागेचे फोटो टाकता येतील. साधारणपणे पन्नास प्रतिसाद अथवा दोन पाने भरली की कोणीही सदस्य नवीन धागा सुरू करू शकेल. सुरुवात करून देण्याकरिता पहिला धागा साहित्य-संपादक आयडीने काढत आहोत. (फोटो प्रकाशित करण्यास मदत हवी असल्यास निःसंकोचपणे संपर्क साधावा). धन्यवाद! - साहित्य-संपादक
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
211973 वाचन

💬 प्रतिसाद (99)

प्रतिक्रिया

मस्त धागा.

रुपी
Tue, 08/22/2017 - 05:07 नवीन
मस्त धागा. मेथीबद्दल छान माहिती मिळाली, पण आता पुढच्या वर्षी प्रयोग करेन. सध्या जे आहे त्यातच वेळ जातोय. पुदिन्यावर कीड पडलीये, त्यासाठी लसूण पाकळीचा प्रयोग करुन बघते. लसणीची पात बारीक चिरुन फ्रेंच फ्राइजवर घातलेली एकदा खाल्ली होती. थंडी/पाऊस आणि त्यात ही पात घातलेले गरमगरम फ्राइज मस्त लागतात!
  • Log in or register to post comments

आता थोड घरगूतीच झाडांच्या

जागु
Tue, 08/22/2017 - 11:34 नवीन
आता थोड घरगूतीच झाडांच्या पौष्टीक खाद्या विषयी. आपण कडधान्य भिजत घालतो त्याचे पाणी टाकून न देता ते कुंड्यांमधे घाला. कंपोस्ट खत करायला वेळ मिळत नसेल तर घरातील भाजीपाल्याचा ओला कचरा कुंडीतील थोडी माती काढुन त्यात टाका आणि परत वरून थोडी माती पसरवा. मासे, मटण धुतलेले पाणीही एक उत्तम खत असते. तेही झाडांना घाला. झाडाला किड लागली की मिरच्या, लसूण, आल, हिंग, हळद यांची पेस्ट करा. ती भरपूर पाण्यात घालून ते झाडांवर फवारा. हे उत्तम किटक नाशक आहे.
  • Log in or register to post comments

आज प्राजक्ताची तीन फुले लागली

मोदक
Tue, 08/22/2017 - 18:09 नवीन
आज प्राजक्ताची तीन फुले लागली होती. Image removed. आणि एक घोसावळे काढले (यालाच बहुदा गिल्का असे म्हणतात) Image removed.
  • Log in or register to post comments

मस्तं घोसाळे आहे... याची भजी

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 08/28/2017 - 23:17 नवीन
मस्तं घोसाळे आहे... याची भजी यम्मी-यम्मी होतात. बटाट्यासारखेच मध्यम पातळ काप नेहमीच्याच यशस्वी बॅटरमध्ये, नेहमीच्याच यशस्वी पद्धतीने, तळायचे आणि आवडीच्या चटणीबरोबर किंवा तसेच गट्टम करायचे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

जाल चाळताना, कुंडीत फळझाडे

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 08/28/2017 - 23:20 नवीन
जाल चाळताना, कुंडीत फळझाडे वाढविण्याची, ही नवीन माहिती मिळाली... https://nurserylive.com/plantscaping-in-india/top-5-plants-pack/top-5-fruits-plants-to-grow-in-pot-plants-in-india?utm_source=facebook&utm_medium=fbadT170812&utm_campaign=Top+5+Fruits+Plants+to+Grow+in+Pot
  • Log in or register to post comments

मनात असलेल्या अनेक प्रश्नांची

दशानन
Mon, 08/28/2017 - 23:43 नवीन
मनात असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळत आहेत, फक्त एक प्रश्न आहे, विचंवाचे बिराडं असलेल्या लोकांना देखील असे प्रयोग सहज करणे शक्य आहे का? म्हणजे घर बदललं तर सहज शिफ़्ट करता येतील का या कुंड्या इत्यादी ?
  • Log in or register to post comments

कापडी पिशव्या वापरा.

कंजूस
Tue, 08/29/2017 - 06:47 नवीन
कापडी पिशव्या वापरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

मेथी

स्मिता.
Tue, 08/29/2017 - 03:19 नवीन
यावर्षी वसंत तसा लवकर सुरू झाला म्हणून मार्च ते जुलै दरम्यान मेथी आणि शेपूचे अने अयशस्वी प्रयोग केले. मेथी कधी उगवलीच नाही आणि शेपू पार जून झाला तरी केव्हा काढायचा कळलंच नाही. आज हा धागा वाचून मेथी न उगवण्याचं कारण समजलं. मी मेथीदाणे पसरून त्यावर मस्तपैकी एक-दोन इंच मातीचा थर देत होते :(
  • Log in or register to post comments

आज थोडे आश्चर्य वाटले. डॉ.

रेवती
Tue, 08/29/2017 - 07:22 नवीन
आज थोडे आश्चर्य वाटले. डॉ. म्हात्रे यांनी दिलेल्या फोटोंमध्ये बाळमेथीची पाने लंबगोलाकार आहेत. बाजारात अशा लहान लहान जुड्या आधी पाहिल्याही आहेत पण मी लावलेली मेथी काढायची वेळ झाली म्हणून पाहिले तर मोठ्या मेथीसारखी पाने आली आहेत पण रोपट्याची उंची तीनेक इंच आहे. एकदम मोठी मेथी कशी काय आली? लहानपण दिसलेच नाही. हे म्हणजे 'बाबूजी पैदा हुवे है' सारखे झाले. आता उद्या काढावी म्हणते.
  • Log in or register to post comments

प्रगती:-

पिलीयन रायडर
Mon, 09/04/2017 - 07:32 नवीन
प्रगती:- मेथी Image removed. मिरची Image removed. लसूण Image removed. मध्ये मैत्रिणीचा लहान मुलगा येऊन गेला. त्याने मेथ्या फेकल्याने नक्की कुठे काय उगवलंय तेच कळत नाहीये.
  • Log in or register to post comments

भारी..

मोदक
Mon, 09/04/2017 - 09:17 नवीन
भारी.. माझ्याकडे पण थोडे थोडे प्रकार उगवून आले आहेत. सवडेने फोटो टाकेन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

मुलगी (शेती) शिकली, प्रगती झाली..!!

विशुमित
Mon, 09/04/2017 - 16:56 नवीन
लसूण मस्त फुटलाय. पाती आल्यावर थोडी थोडी राख (लाकूड जाळून) टाकत राव्हा. काळोखी येईल आणि लसणाचा कांदा चांगला भरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

हो तो लसूण फायनली अचानक

पिलीयन रायडर
Mon, 09/04/2017 - 18:13 नवीन
हो तो लसूण फायनली अचानक रात्रीतून आला!! इथे लाकूड जाळून राख मिळवणं अवघड आहे. पण जुगाड होतोय का बघते. आणि हो, खरंच प्रगतीच झाल्यासारखं वाटतंय. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

भारी दिसतंय गं. मी फक्त

स्रुजा
Mon, 09/04/2017 - 18:17 नवीन
भारी दिसतंय गं. मी फक्त मेथी लावलीये - अजुन एवढी नाही वाढली. फोटो टाकेन आठवड्याभरात .. हुरुप आलाय तुझे फोटो बघुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

टाळ्या ! प्रयोग यशस्वी होत

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 09/05/2017 - 00:26 नवीन
टाळ्या ! प्रयोग यशस्वी होत आहेत. थोड्या अनुभवाने आत्मविश्वास आला की सगळे हातचा मळ वाटू लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

मेथीसाठी वाळू घेतात पिकवणारे

कंजूस
Mon, 09/04/2017 - 08:09 नवीन
मेथीसाठी वाळू घेतात पिकवणारे कारण त्यांना ती भराभर काढून मुळं साफ करायला सोपे पडते. शेवटी आपण मुळांच्या वरचा भाग दांडे आणि पाने घेतो. १) घरी स्वत:साठी लावली असेल तर सरळ वरच्यावर कात्रीने कापून घ्यावी. मुळे,माती धुण्याचा प्रश्न येत नाही. २) ट्रेमध्ये गच्च पेरण्याऐवजी रेघा मारून ओळीत पेरावी. ३) कोणत्याही भाजी आमटीसाठी चवम्हणूनच हवी असेल तर दोनदोन ओळीत दाणे पेरल्यावर आठदहादिवसांनी पुढच्या दोनोळी याप्रमाणेपेरल्यास आता एवढ्या सगळ्या मेथीचं काय करायचं हा प्रश्न पडत नाही. ४) थोडक्यात वाळू हवीच असं नाही आणि प्रमाण कमीअधिक तसेच अंतराने केल्यास काम होते. -मेथीपुराण समाप्त.
  • Log in or register to post comments

एक मदत हवी आहे.

मोदक
Mon, 09/04/2017 - 14:17 नवीन
एक मदत हवी आहे. गोमय, गोमुत्र, डाळीचे पीठ, गुळ आणि माती यांच्या मिश्रणातून जीवामृत तयार केले आहे. दोनदा असे झाले आहे की जीवामृत केले की दुसर्‍याच दिवशी ती प्लॅस्टीकची बादली फुटते. याचे कारण काय असावे..? गॅस फॉर्मेशन वगैरे होत असले तरी गॅस जायला भरपूर जागा आहे कारण बादली घट्ट झाकलेली नाही. फक्त त्यावर पोते ठेवले आहे.
  • Log in or register to post comments

उष्णतेमुळे फुटत असावी.

एस
Mon, 09/04/2017 - 15:37 नवीन
उष्णतेमुळे फुटत असावी. त्यासाठी बादली उघडी ठेवायला हवी किंवा लोखंडी पिंप वगैरे वापरायला हवे असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

जीवामृत हा प्रकार काही नवीन

कंजूस
Mon, 09/04/2017 - 16:42 नवीन
जीवामृत हा प्रकार काही नवीन शोध केल्याचा दावा करतात त्यात नवीन काही नाही. आता तुम्ही गूळ,डाळीचं पीठ हे विघटन न करताच दडपले तर त्याचं रसायन होताना मिथेन,कार्बन डाय निघेल आणि तीन महिन्यांनी कुजल्यावरच झाडांना उपलब्ध होईल. डाळीतला तीस टक्के नत्र. गुळात फक्त कार्बन असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

ओके.

मोदक
Mon, 09/04/2017 - 17:26 नवीन
ओके. मी बागेतल्या कुंड्यांसाठी वापरले तर कांही हरकत नाही ना..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

मी लोखंडी मोठ्या पेंटच्या

जागु
Fri, 09/08/2017 - 11:41 नवीन
मी लोखंडी मोठ्या पेंटच्या डब्यात केले होते. प्लास्टीकमधे असा प्रॉब्लेम होतो हे नव्हत माहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

मी लोखंडी मोठ्या पेंटच्या

जागु
Fri, 09/08/2017 - 11:41 नवीन
मी लोखंडी मोठ्या पेंटच्या डब्यात केले होते. प्लास्टीकमधे असा प्रॉब्लेम होतो हे नव्हत माहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

अति युजफूल धागा..

पुंबा
Mon, 09/04/2017 - 16:56 नवीन
अति युजफूल धागा..
  • Log in or register to post comments

छान चाललाय धागा.

रेवती
Mon, 09/04/2017 - 18:22 नवीन
छान चाललाय धागा. धन्यवाद कंकाका. पिरा, चांगली प्रगती आहे.
  • Log in or register to post comments

शंभर रु किलोच्या डाळीच्या

कंजूस
Mon, 09/04/2017 - 19:26 नवीन
शंभर रु किलोच्या डाळीच्या पिठाच्या किंमतीत बारा किलो शेणखत मिळेल. ते मातीचा पोत सुधारेलच शिवाय जो काही ०.५ टक्के नत्र विखुरलेला मिळतो तो मुळांना सहन होतो. व्हॅल्युफर मनी पाहावे. पूर्ण कुजल्याशिवाय कुंडीतल्या फुलझाडांना खत देऊ नका. पंधरा दिवसांनंतर मुठभरपेक्षा जास्ती नको
  • Log in or register to post comments

काका, ह्या विषयावर अजून लिहा

पिलीयन रायडर
Mon, 09/04/2017 - 19:51 नवीन
काका, ह्या विषयावर अजून लिहा ना. किंवा पुढचा हिरवाईचा धागा तुम्हीच काढा आणि त्यात ही महिती द्या. हे काहीच माहिती नाहीये. फार उपयोगी होईल सगळयांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

उत्तम माहिती. ही व आणखी

पलाश
Mon, 09/04/2017 - 20:23 नवीन
उत्तम माहिती. ही व आणखी माहिती एका धाग्यात मिळाली तर फार उपयोगी होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

मागे एकदा बागकाम एक छंद-(

कंजूस
Mon, 09/04/2017 - 21:06 नवीन
मागे एकदा बागकाम एक छंद-( http://www.misalpav.com/node/30818 ) धागा काढलेला त्यात सगळ्यांनी फोटो दिले होतेच. परंतू आता तो धागा फारच मोठा झाला. पुन्हा नवीन माहिती लिहिनच. बॅल्कनित झाडे लावायची असतील तर तीनचार तास उन यावेच लागते. साहजिकच उत्तर/दक्षिणेकडे पाहणारी बॅल्कनी असेल तर सहा महिने सरळ सावली येते. बाहेर अंगणातली बाग असेल तर मोठी झाडे लावताना विचार करावा लागतो. सावली पडते खाली. ओपन टेरेस असेल तर खालच्या मजल्यावर गळणार का/ अचानक सर्वजण बाहेरगावी जाऊ शकत नाहीत. खूप झाडे ठेवताना विचार करावा लागतो. मातीच्या कुंड्यांतले पाणी उन्हाळ्यात लवकर सुकते,प्लास्टिकच्या तडकतात कारण ऊन भरपूर असते. व्याप फार असतो. सोसायटीच्या मोकळ्याजागेत { आपली हौस भागवण्यासाठी} झाडे लावू नये. मनस्ताप फक्त होतो. शहरातले,सोसायटीतले डास आपण लावलेल्या झाडांमुळेच होतात हा भांडणाचा विषय होतो. शिवाय यांनीच सगळी जागा बळकावली हा आरोपसुद्धा होतो.
  • Log in or register to post comments

खरच! डासांचा आणि झाडांचा काय

रम्या
Wed, 09/06/2017 - 07:58 नवीन
खरच! डासांचा आणि झाडांचा काय संबंध काही कळत नाही. पण झाडांमुळे डास होतात ही हटकून सगळ्यांची समजूत असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

आज नवीन पॉटींग मिक्स

रेवती
Mon, 09/04/2017 - 21:24 नवीन
आज नवीन पॉटींग मिक्स कुंड्यांमध्ये घालून धणे पेरलेत. आता बर्‍या हवेचे फारसे दिवस हाती नाहीत म्हणून ही मिनी शेती चालूए.
  • Log in or register to post comments

गांडूळखत कसे तयार करावे किंवा

मोदक
Mon, 09/04/2017 - 21:47 नवीन
गांडूळखत कसे तयार करावे किंवा गांडूळे कशी पाळावीत / वाढवावीत..?
  • Log in or register to post comments

याचे माहितीपट डीडी नॅशनल अथवा

कंजूस
Tue, 09/05/2017 - 10:43 नवीन
याचे माहितीपट डीडी नॅशनल अथवा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश सह्याद्री इत्यादी चानेल्सवर असतात मोदकराव. परंतू हे लोक कार्यक्रम रूपरेषा देत नसल्याने हुकतात. तरी थोडक्यात- तुमच्याकडे गोठा असेल अथवा ओला कचरा जमा होत असेल तर शक्य आहे. एक दहाएक किलो शेण,कचरा एका ठिकाणी टाकून त्यावर गांडुळं सोडायची. माल अगदी सुका होणारनाही अथवा पाण्याने पचपचीत ओला होणार नाही इतकेच पाणी शिंपडायचे.वरती ओले गोणपाट आणि वरती झावळ्यांची शेड ऊन लागू नये म्हणून. आणखी दोनतीन दिवसांनतरचा मालयाजुन्या मालावर न टाकता त्याला चिकटूनच पुढे टाकावा. अगोदरच्या शेणाला खाऊन झाले की गांडुळे पुढे सरकतात तेव्हा ते खत झालेले असते. विकायचे असल्यास ते चाळून विकायचे अथवा तसेच झाडाला विशेषत: हर्बजसाठी उत्तम. जे तळाला पाणी वाहते तेही स्प्रेसाठी वापरू शकतो. टेरेससाठी ओलाकचय्रावर प्रयोग करता येईल. बॅच कराव्या आणि योग्यवेळी गांडुळं नव्या ओल्या कचय्रावर सोडून झालेले खत वापरायला घ्यावे. स्वयंपाकघरातील बाहेरपडणाय्रा कचय्राचे नीट तुकडे करून थोडी माती मिसळून ओलसर ठेवा. विकण्यासाठीच्या खतात माती देता येत नाही. घरच्यासाठी चालेल. फळझाडांना कंपोस्टच लागते. टोमॅटो,मिरची,झेंडू,शेवंती आणि मोगरा यांना शेणखत. चमेली, सायली , जाइ ,जुई ,पानवेल यांना खत नको - नवीन डोंगरातील उन खाल्लेली माती हवी
  • Log in or register to post comments

प्रयत्न करतो.

मोदक
Tue, 09/05/2017 - 12:16 नवीन
प्रयत्न करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

वेलवर्गिय भाज्या दुधी ,कारली

कंजूस
Tue, 09/05/2017 - 10:51 नवीन
वेलवर्गिय भाज्या दुधी ,कारली वगैरे- हे वेल ओला कचरा थेट पचवू शकतात. कुजताना निर्माण होणारी गरमी चालते. एका प्लास्टिक पिशवीला (२ किलोची) तळाला भोके पाडून ओला कचरा अधिक माती भरा. ही पिशवी उलटी वेलापासून पाचसहा इंच दूर मातीवरच दाबा. वरतीच राहील. वेलाची मुळे यातलं खत खातात. वास येत नाही. थोडेसेच पाणी तळाच्या वर असलेल्या भोकांतून सोडून ओले ठेवा. पिशवीच्या तोंडाच्या भागाला थोडी माती लावा. कचरा कुजताकुजताच वापरला जातो. ही पद्धत घेवडा,चवळी,वाल यांनाही चालेल.
  • Log in or register to post comments

फारच चांगली माहिती देताय काका

पिलीयन रायडर
Wed, 09/06/2017 - 03:47 नवीन
फारच चांगली माहिती देताय काका. मी आज मेथी काढली आणि वरणात टाकली. ताज्या मेथीचा घरभर वास सुटला होता. आता पुदिना लावावा म्हणतेय. इथे फोटो टाकेनच. लसणीची पात भराभर वाढतेय. ती नक्की किती वाढू शकते हे शोधलं तर अशा इमेजेस मिळाल्या. इतकी वाढ लहान कुंदीत होईल ना? Image removed.
  • Log in or register to post comments

आज अशा भल्या मोठ्या इमेजेस का

पिलीयन रायडर
Wed, 09/06/2017 - 03:48 नवीन
आज अशा भल्या मोठ्या इमेजेस का पडताएत काय माहिती. जरा मापात बसवा ना कुणी तरी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

अतिशय छान धागा. चारच महिने

रम्या
Wed, 09/06/2017 - 08:04 नवीन
अतिशय छान धागा. चारच महिने झाले बाग बनवून. फोटो पाठवतो.
  • Log in or register to post comments

झाडावर कीड पडली तर काय काय

सही रे सई
गुरुवार, 09/07/2017 - 00:15 नवीन
झाडावर कीड पडली तर काय काय उपाय करावे या बद्दल पण तज्ञांनी माहिती द्या. माझ्या कडच्या झेंडूच्या झाडावर पांढरी बुर्शी टाईप काहीतरी रोग आलेला दिसतोय. काय करावे?
  • Log in or register to post comments

ऊन कमी पडते. सावलीत वाढते ही

कंजूस
Fri, 09/08/2017 - 02:09 नवीन
ऊन कमी पडते. सावलीत वाढते ही कीड. शिवाय दमटपणाही वाढला आहे. एकदोन झाडे असतील तर खळ ( मैद्याची पातळ कांजी ) लावा.
  • Log in or register to post comments

इथे मोबाईलवरून फोटो टाकता

जागु
Fri, 09/08/2017 - 11:42 नवीन
इथे मोबाईलवरून फोटो टाकता येतील का?
  • Log in or register to post comments

हो. फेसबुकवर चढवा>>full story

कंजूस
Fri, 09/08/2017 - 18:16 नवीन
हो. फेसबुकवर चढवा>>full story>>view full size>>address bar मध्ये - scontent_fbcdn असलेली लिंक कॅापी करून ती इथे वापरा. फक्त width 480 (उभा फोटोसाठी) अथवा 640 ( आडव्या फोटोसाठी ) देणे. height रकाना रिकामा ठेवणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु

हो. फेसबुकवर चढवा>>full story

कंजूस
Fri, 09/08/2017 - 18:16 नवीन
हो. फेसबुकवर चढवा>>full story>>view full size>>address bar मध्ये - scontent_fbcdn असलेली लिंक कॅापी करून ती इथे वापरा. फक्त width 480 (उभा फोटोसाठी) अथवा 640 ( आडव्या फोटोसाठी ) देणे. height रकाना रिकामा ठेवणे.
  • Log in or register to post comments

आता दुसरा भाग काढा कुणीतरी.

एस
Sat, 09/09/2017 - 00:08 नवीन
आता दुसरा भाग काढा कुणीतरी. माझ्या मोबाईलवर हा धागा लवकर उगवत नाही - आपलं ते, लवकर लोड होत नाही आता! ;-)
  • Log in or register to post comments

आता दुसरा भाग काढा कुणीतरी.

एस
Sat, 09/09/2017 - 00:08 नवीन
आता दुसरा भाग काढा कुणीतरी. माझ्या मोबाईलवर हा धागा लवकर उगवत नाही - आपलं ते, लवकर लोड होत नाही आता! ;-)
  • Log in or register to post comments

तो मान कंजूस काकांचा!!

पिलीयन रायडर
Sat, 09/09/2017 - 02:53 नवीन
तो मान कंजूस काकांचा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

दुसरा भागही सासं ने काढावा.

कंजूस
Sat, 09/09/2017 - 15:23 नवीन
दुसरा भागही सासं ने काढावा. ओपन सोर्स.
  • Log in or register to post comments

ओके. मग तो मान एस भाऊंचा!!

पिलीयन रायडर
Sat, 09/09/2017 - 16:16 नवीन
ओके. मग तो मान एस भाऊंचा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

पुढील भाग इथे आहे. (धाग्याला

एस
Tue, 04/03/2018 - 00:53 नवीन
पुढील भाग इथे आहे. (धाग्याला अनुक्रमणिका नसल्याने प्रतिसादात देत आहे.) हिरवाईच्या गप्पा - भाग २
  • Log in or register to post comments

वा मस्त धागा मिळाला

राजेंद्र मेहेंदळे
Tue, 08/18/2020 - 16:45 नवीन
प्रतिक्रिया वाचताना बरीच माहिती मिळतेय. सध्या पावसाळा चालु आसल्याने गॅलरीतील झाडांना मस्त फुले येताहेत. सवडीने फोटो टाकतो.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा