✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ताज्या घडामोडी - फेब्रुवारी २०२५

म
माईसाहेब कुरसूंदीकर यांनी
Fri, 02/07/2025 - 10:34  ·  लेख
लेख
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि निवड्णुकपूर्व जाहीरनाम्यात जी वचने दिली होती, त्यांची पुर्ती करण्याची सुरुवात केली.अवैधरीत्या अमेरिकेत वास्त्वय करुन असणार्या परदेशी लोकाना परत पाठवणार हे एक वचन. अमेरिकेत एकंदर एक कोटीहुन अधिक परदेशी लोक बेकाय्देशीर वास्त्वव्य करून आहेत. ह्यात साधारण सात लाख भारतिय आहेत. ह्यातील १०४ लोकांची पहिली बॅच अमेरिकेच्या मिलिटरी विमानाने अम्रुतसर येथे उतरली.
"We thought we were being taken to another camp. Then a police officer told us that we were being taken to India. We were handcuffed, and our legs were chained. These were opened at Amritsar airport," he told news agency PTI. Singh added that he was kept in custody in the US for 11 days before being sent back home.
भारताची ह्यावर अधिक्रुत प्रतिक्रिया काय आहे?होती? की काहीच नाही? ह्या निमित्ताने ईतर देशांच्या सरकारानी दिलेल्या प्रतिक्रिया महत्वाच्या ठराव्यात. स्वाभिमान काय असतो ते हे प्रतिक्रिया बघितल्यावर लक्षात येते. "अशा पद्धतीने नागरिकांना नेणे अमानवी आणि अपमानस्पद आहे. अमेरिकेचे मिलिटरी विमान आम्ही उतरू देणार नाही" कोलंबियाचे अध्यक्ष गुस्ताव पेट्रो ब्राझील सरकारमधील मंत्र्यानेही अशीच प्रतिक्रिया दिली. मेक्सिको सरकारनेही अमेरिकेचे मिलिटरी विमान उतरवण्यास मनाई केली व चार्टड विमानाची व्यवस्था केली. https://www.indiatoday.in/india/story/us-deports-illegal-immigrants-donald-trump-military-flight-amritsar-india-handcuffed-2675486-2025-02-06 भारताकडुन किंचितरी निषेध व्यक्त होईल अशी अंधुक आशा होती पण जयशंकर ह्यांच्या विधानाने तीही मावळली. "बेड्या घालुन नागरिकांना मायदेशी पाठवणे ही अमेरिकेची पद्धत आहे" असे जयशंकर म्हणाले. झालेला खर्च आम्ही देउ असेही विधान केल्याचे वाचले. आता ह्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी , डोनाल्ड ट्रम्प ह्यांच्या भेटीला चालले आहेत. "त्यांना आम्ही १२ तारखेला बोलावले आहे" असे व्हाईट हाउसकडुन सांगण्यात आले. "त्यांना आम्ही बोलावले आहे, म्हणजे?" ते नोकर आहेत अमेरिकेचे? प्रथमच भारत अमेरिकेचा एवढा मिंधा झाल्याचे दिसले. कोणाला वाचवण्यासाठी हे चालु आहे? ज्या कोलंबिया/मेक्सिको/ब्राझील ह्यांनी सणसणीत प्रतिक्रिया अमेरिकेला देउन स्वाभिमान दाखवुन दिला त्या देशात 'नेभळट' मानले जाणारे समाजवादी/डाव्या विचारांचे पक्ष सत्तेवर आहेत हे विशेष.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
33696 वाचन

💬 प्रतिसाद (253)

प्रतिक्रिया

कुमार विश्वास...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 02/08/2025 - 18:57 नवीन
कुमार विश्वासचा पण आनंद लपत नव्हता, राज्यसभा दिली नाही. आणि दिल्ली सरकारात महत्वाचं पद दिलं नव्हतं म्हणून हे वनवासात होते. हींदी कविता आणि प्रवचन चांगलं बस्तान बसवलंय त्यांनी. अपने अपने अपने राम. छान मांडणी असते. श्री अण्णा हजारे आता थेट पुढील निवडणूकीत दिसतील आता. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

हींदी कविता आणि प्रवचन चांगलं

चौथा कोनाडा
Sun, 02/09/2025 - 18:50 नवीन
हींदी कविता आणि प्रवचन चांगलं बस्तान बसवलंय त्यांनी.
कुमार परिपक्व माणुस झालाय ! राजकारण म्हणजे वराहांची राडाक्रिडा हे ओळखुन वेगळं डोमेन शोधलंय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संभल : तख्तियां लहराकर पहुंचे हिंदू, कहा- हमें अल्पसंख्यक का दर्

मुक्त विहारि
Sun, 02/09/2025 - 00:56 नवीन
संभल : तख्तियां लहराकर पहुंचे हिंदू, कहा- हमें अल्पसंख्यक का दर्जा दो... https://www.amritvichar.com/article/520907/hindus-arrived-after-waving-the-careful-placards-give-us-the#gsc.tab=0 -------- "संभल" बद्दल जितकी माहिती गोळा करावी,तितकी कमीच आणि भविष्यात देखील "संभल" बद्दल बरीच माहिती येण्याची शक्यता आहे. ------
  • Log in or register to post comments

भारत-बांग्लादेश बॉर्डर पर BSF और घुसपैठियों में झड़प:बंगाल के दि

मुक्त विहारि
Sun, 02/09/2025 - 02:06 नवीन
भारत-बांग्लादेश बॉर्डर पर BSF और घुसपैठियों में झड़प:बंगाल के दिनाजपुर में हुए हमले में एक जवान घायल; हथियार लेकर घुसे थे, एक को पकड़ा https://www.bhaskar.com/national/news/india-bangladesh-border-infiltration-update-bsf-dinajpur-134419228.html --------
  • Log in or register to post comments

मुळात बेड्या का घालतात? याची कारणे काय आहेत ?

चित्रगुप्त
Sun, 02/09/2025 - 12:07 नवीन
कोणत्याही देशाचे पोलीस गुन्हेगारांना बेड्या का घालतात ? याची वास्तविक कारणे काय आहेत ? -- उदा. गुन्हेगाराने पळून जाऊ नये, स्वतःलाच जखमी करून घेऊ नये, पोलिसांची हत्यारे हिसकावून घेऊन गोळीबार करणे, दगडफेक करणे, मारामारी करणे वगैरे प्रकार करू नयेत म्हणून बेड्या घालत असावेत. अमेरिकेत पिस्तुले, बंदुका वगैरे सहज विकत घेता येत असल्याने अशी खबरदारी घेणे आवश्यकच आहे. --- जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा.
  • Log in or register to post comments

त्याना

माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 02/09/2025 - 12:48 नवीन
अमेरिकेत पिस्तुले, बंदुका वगैरे सहज विकत घेता येत असल्याने अशी खबरदारी घेणे आवश्यकच आहे.
त्या भारतियांना प्रवासाआधी १०/१२ दिवस जेलमध्ये ठेवण्यात आले होते.विमानात चढ्ण्याआधी त्यांची झडती घेतलेली असणारच.त्या सर्व १०४ प्रवाशांसाठी विमानात एकच टॉयलेट होते. मोदी आणी ट्रम्प मित्र आहेत असे अनेक्जण म्हणतात. त्यामुळे ट्रम्प्/अमेरिका जे काही निर्णय घेइल त्याचे आंधळे समर्थन करण्याचे प्रयत्न भारतात चालु होते/आहेत. मात्र विरोधी पक्षांनी आणी अनेकानी आवा़ज उठवल्यावर सरकारकडुन शेवटी सौम्य निषेध झाला. हे बरे झाले. आमचे रामदासबुवा आठवलेही ह्यावर बोलते झाले हेही नसे थोडके- Wrong to send undocumented immigrants in shackles: Union minister Athawale https://www.deccanherald.com/india/wrong-to-send-undocumented-immigrants-in-shackles-union-minister-athawale-3396927 भारतियांना मिळालेली ही वागणूक कोणाला अमानवी/अपमानास्पद वाटत नसेल तर कठिण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

ते फक्त भारतीयच नव्हते तर

रात्रीचे चांदणे
Sun, 02/09/2025 - 13:05 नवीन
ते फक्त भारतीयच नव्हते तर गुन्हेगार भारतीय होते. अजून वाईट वागणूक मिळायला पाहिजे होती. अतिशय शांत डोक्याने गुन्हे करणारे गुन्हेगार होते. अमेरिकेत जाताना दिवसेंदिवस उपाशी राहून, मगरी असलेल्या पाण्यातून, हिंस प्राणी असलेल्या जंगलातून, जीवघेण्या थंडीतून आणि वाटेत लागणाऱ्या देशांचे कायदे मोडून गेलेल्या लोकांना ४० बेड्या घालून प्रवास म्हणजे काहीच नाही. याची जबाबदारी म्हणून अमेरिकेने झालेला सगळा खर्च भारताकडून वसूल केला पाहिजे. बेड्या नसत्या घातल्या तर कदाचित वैमनिकावराही hlla केला असता त्या लोकांनी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

पण मी काय म्हणतो, मोदींसारखा

अमरेंद्र बाहुबली
Sun, 02/09/2025 - 13:21 नवीन
पण मी काय म्हणतो, मोदींसारखा हिरा पंतप्रधान भारताला मिळाला असताना नी भारतात अमृतकाळ सुरू असताना ती लोक जीवावर उदार होऊन अमेरिकेत गेलीच का? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

सहमत

चंद्रसूर्यकुमार
Sun, 02/09/2025 - 13:24 नवीन
सहमत. असल्या लोकांचा पुळका का इतक्या जणांना येतो आहे समजत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

ते फक्त भारतीयच नव्हते तर

आग्या१९९०
Sun, 02/09/2025 - 14:05 नवीन
ते फक्त भारतीयच नव्हते तर गुन्हेगार भारतीय होते. आणि याची जबाबदारी म्हणून अमेरिकेने झालेला सगळा खर्च भारताकडून वसूल केला पाहिजे. किती हा विरोधाभास ? भारतीय ( गुन्हेगार असले तरी ) आहेत म्हणून बेड्या घालून पाठवू नये असे सरकारने अमेरिकेला सांगितले ह्यात काय चूक आहे. चुकीचे असले तरी भारत सरकारने का खर्च सोसावा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

जबाबदारी म्हणून. आणि

रात्रीचे चांदणे
Sun, 02/09/2025 - 15:59 नवीन
जबाबदारी म्हणून. आणि गुन्हेगारांना बेड्याच घालायला पाहिजे. जे भारतात पाठवले गेलेत त्यांच्यावर भारतीय कायद्याप्रमाणे गुन्हे नोंदवायला पाहिजे आणि लवकरात लवकर शिक्षा होईल ह्याची काळजी घ्यायला पाहिजे, नाहीतर आपल्याला भारतात सहानुभूती मिळत आहेत हे लक्षात आल तर अजून गुन्हे करायला मागे पुढे पाहणार नाहीत. अखिलेश यादव ने तर सरकार ने भरपाई करावी म्हणून मागणी केली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

भारतात संधी नाहीत म्हणून ते

अमरेंद्र बाहुबली
Sun, 02/09/2025 - 16:41 नवीन
भारतात संधी नाहीत म्हणून ते अमेरिकेत गैरमार्गाने गेले ना? संधी नसण्याला सरकार जबाबदार नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

कोण म्हणतं संधी नाही?

श्रीगुरुजी
Sun, 02/09/2025 - 17:01 नवीन
कोण म्हणतं संधी नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

नक्कीच आहे त्यासाठी लोकशाही

रात्रीचे चांदणे
Sun, 02/09/2025 - 17:13 नवीन
नक्कीच आहे त्यासाठी लोकशाही प्रकियेत भाग घेऊन सरकार बदलता येऊ शकत. जस दिल्लीच्या लोकांनी कालच केल. किंवा जायचच असेल तर आपले स्किल्स वाढवून नियमाप्रमाणे जायला हव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

जायचच असेल तर आपले स्किल्स

आग्या१९९०
Sun, 02/09/2025 - 19:04 नवीन
जायचच असेल तर आपले स्किल्स वाढवून नियमाप्रमाणे जायला हव. का? जास्त स्कीलला भारतात संधी नाही का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

पंजाब

माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 02/09/2025 - 19:30 नवीन
पंजाब/गुजरातमधुन परदेशात जाणार्यांची संख्या सर्वात जास्त आहे.आताच्या भाषेत म्हणतात तो FOMO(Fear of missing out) प्रकार आहे. माझे भाउ न्युयॉर्कला आहेत, मित्र सिडनीला/लंडनला आहेत.. मग मलाही वाट्टेल ते करुन बाहेर गेले पाहिजे ही मानसिकता तिकडे आहे. "माझा मुलगा भारतात रेल्वेत ईन्जिनियर आहे ह्यापेक्षा माझा मुलगा न्युयॉर्कला टॅक्सी चालवतो हे सांगण्यात तिकडे लोकांना अभिमान वाटतो. ९०/२०००च्या दशकात एच-वन बी व्हिसाचे सर्वात जास्त आकर्षण आंध्र/तामिळनाडुत होते. बायोडेटात वाट्टेल ते फेरफार करायचे, खोट्या डिग्र्या/कोर्सेसची सर्टिफिकेट्स जोडायची आणि पैसे देउन व्हिसा मिळवायचा. कायद्याच्या चौकटीत राहुन ,कसा फ्रॉड करायचा ते ह्यांच्याकडुन शिकावे. त्यांच्या सुदैवाने हे लोक तिकडे ग्रीन कार्ड/नागरिकत्व मिळाल्यावर स्थिरावले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

पंजाब/गुजरातमधुन परदेशात

अमरेंद्र बाहुबली
Sun, 02/09/2025 - 19:45 नवीन
पंजाब/गुजरातमधुन परदेशात जाणार्यांची संख्या सर्वात जास्त आहे. पंजाबच ठिकाय पण गुजरातमधूनही? गुजरात मध्ये भाजपची सत्ता कितीतरी वर्षापासून आहे, खुद्द मोदी कितीतरी वर्षे मुख्यमंत्री होते, महाराष्ट्रातून अनेक प्रकल्प नि सरकारी कार्यालये गुजरातला हलवली तरीही गुजरातची ही अवस्था?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
Mon, 02/10/2025 - 04:31 नवीन
मनोरंजक प्रतिसाद.... तुम्ही खरेच काही अभ्यास न करता लिहायचा पण केला तर का? थोडी तरी परिपक्वता दाखवा की.... किती वर्षे इतरांच्या कडून तोंडघशी पडणार? चार ठिकाणी फिरा. स्वतः माहिती घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

राखीव जागा व वाढता जातीद्वेष

श्रीगुरुजी
Sun, 02/09/2025 - 20:14 नवीन
राखीव जागा व वाढता जातीद्वेष यामुळे सुशिक्षित सवर्ण बाहेर जाण्याची संधी शोधतात. गुजराती, पंजाबी इ. मुळातच स्थलांतर व स्वतंत्र व्यवसाय मनोवृत्तीचे आहेत. त्यासाठी दुसऱ्या प्रदेशात जाऊन कितीही कष्ट, साहस करण्याची त्यांची तयारी आहे. भारतात किराणा दुकान कितीही जोरात चालत असले तरी अमेरिकेत तसेच दुकान डॉलर्समध्ये उत्पन्न देते याचे प्रचंड आकर्षण त्यांना असते. भारतात आर्थिक स्थिती सुधारली असली, नवीन तंत्रज्ञान अनेक स्वरूपात उपलब्ध असले तरी कोणताही राज्यकर्ता भारतातील प्रचंड गर्दी, अस्वच्छता, जातीयवाद, राखीव जागा, अत्यंत शिस्तहीन समाज इ. बदलू शकत नाही. त्यामुळे परदेशाचे आकर्षण कमी होणे अशक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

आहे की पण जायचच असेल तर.शेवटी

रात्रीचे चांदणे
Sun, 02/09/2025 - 19:34 नवीन
आहे की पण जायचच असेल तर.शेवटी आप आपली निवड असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

आहे की पण जायचच असेल तर.शेवटी

आग्या१९९०
Sun, 02/09/2025 - 19:58 नवीन
आहे की पण जायचच असेल तर.शेवटी आप आपली निवड असते. असं असेल तर सुशिक्षीत बेकारी कमी का होत नाही भारतात ? अकुशल कामगारांना सरकार इस्राएल, जर्मनीला पाठवतेय ते कशासाठी? इथेच रोजगार का देऊ शकत नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

सहमत, रोजगार हिथेच द्यायला

रात्रीचे चांदणे
Sun, 02/09/2025 - 20:26 नवीन
सहमत, रोजगार हिथेच द्यायला पाहिजे. पण तरीही बेड्या घालूनच परत पाठवायला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

अकायदेशीर मार्गाने

श्रीगुरुजी
Sun, 02/09/2025 - 13:52 नवीन
अकायदेशीर मार्गाने घुसलेल्यांना अनेक देश अत्यंत कडक वागणूक देतात. २०१२ मध्ये फेबुवर ओळख झालेल्या पाकी मुलीशी लग्न करण्यासाठी मुंबईतील एक मुस्लिम तरूण अवैध मार्गाने अफगाणिस्तानातून घुसल्यानंतर पकडला गेला. त्याला ६ वर्षे तुरूंगात टाकून अमानुष अत्याचार केले होते.
  • Log in or register to post comments

कितीही सारवासारव केली तरीही

अमरेंद्र बाहुबली
Sun, 02/09/2025 - 13:57 नवीन
कितीही सारवासारव केली तरीही इतर देशांनी जसं कडक निषेध नोंदवला तसा निषेध नोंदवायला हिंमत लागते, अशी हिम्मत इंदिरा गांधी वगैरेंसारख्या नेत्यांकडे होती. आजकालचे नेते म्हणजे……
  • Log in or register to post comments

मिळमिळीत हिम्मत केली म्हणून

आग्या१९९०
Sun, 02/09/2025 - 14:09 नवीन
मिळमिळीत हिम्मत केली म्हणून काहींचा तिळपापड झाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

:)

अमरेंद्र बाहुबली
Sun, 02/09/2025 - 14:17 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
Mon, 02/10/2025 - 04:27 नवीन
मनोरंजक प्रतिसाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

गेल्या 20 वर्षांत 25000 हून

विवेकपटाईत
Mon, 02/10/2025 - 16:59 नवीन
गेल्या 20 वर्षांत 25000 हून जास्त लोकांना अमेरिकेने परत पाठविले आहे. गेल्या वर्षी 2500 हजार लोकांना. बाकी तेंव्हा बाइडेन सरकार होते म्हणून अमरेन्द्र चूप होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

हाता

माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 02/10/2025 - 17:29 नवीन
हातात बेड्या घालुन आणले होते का? पायात साखळ्या? बायडेन ह्यांच्या कारकीर्दीतही अनेकांना परत पाठवले आहे पण अपमानास्पद पद्धतीने नसावे. https://san.com/cc/dhs-says-it-just-deported-a-charter-plane-full-of-chinese-immigrants/ बायडेन वाईट आणि ट्रम्प चांगले ही ठराविक लोकांची मांडणी आहे. कारण ट्रम्प आणी मोदी चांगले मित्र आहेत असे ते म्हणतात. ट्रम्प ह्यांची सध्याची विधाने पाहिली तर हा ग्रुहस्थाचे वेडसर असेच वर्णन करावे लागेल. कॅनडाला ५१ वे राज्य करणार, ग्रीनलॅन्ड घेणार, गाझा पट्टी ताब्यात घेणार.. वगैरे. अर्थात ही विधाने जाणुन बुजुन , त्यांच्या समर्थकांना खूष करण्यासाठी केलेली असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 02/11/2025 - 09:02 नवीन
>>>ट्रम्प आणी मोदी चांगले मित्र आहेत असे ते म्हणतात. ट्रम्प ह्यांची सध्याची विधाने पाहिली तर हा ग्रुहस्थाचे वेडसर असेच वर्णन करावे लागेल. इकडेही, अखंड भारत, पाकव्याप्त काश्मीरचा समावेश, चीनने गीळलेला प्रदेश ताब्यात घेऊ, हिंदूराष्ट्र करु अशा लेमनगोळ्या छुप्या पद्धतीने पंथीय मतदारांना लुभावण्यासाठी दिल्या जातात. करोना काळातील त्या टाळ्या, तो घ्ंटानाद, ती दिवाबत्ती, ती सगळी नाटकं पाहिली की एखाद्या देशाचा प्रमुख काय काय करायला लावतो आणि जनताही कशी हिप्टोनाइज होते त्याची गम्मत आठवून कायम हसायला येत असते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

मोदी परत पंतप्रधान झाले,

श्रीगुरुजी
Tue, 02/11/2025 - 09:36 नवीन
मोदी परत पंतप्रधान झाले, तात्या परत आले, हरयाणा गेले, महाराष्ट्र गेला, दिल्ली गेली, पंक्चर असलेल्या एका चाकात १०-११ वर्षात वारंवार हवा भरूनही चाक सपाट . . . माणसाने सहन तरी किती करायचं. सांगता येत नाही आणि सहनही होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमच्या कोल्हापूरला...

वेडा बेडूक
गुरुवार, 02/20/2025 - 11:09 नवीन
महालक्ष्मी मंदिराजवळ मूळव्याधाचे औषध मिळते. गुणकारी असते. पाठवून देउ का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारतात संधी नाहीत म्हणून ते

सुक्या
Mon, 02/10/2025 - 03:03 नवीन
भारतात संधी नाहीत म्हणून ते अमेरिकेत गैरमार्गाने गेले ना? हायला गैरमार्गाने जायचे मग ते आम्रविकेतच का? गेला बाजार कुवेत / बर्हिन / सौदि / दुबै वेग्रे वेग्रे का नाही ब्रे? शिन्गापुर पन जवळच आहे ..
  • Log in or register to post comments

पुण्याच्या पर्यटकाला हात-पाय बांधून बेदम मारहाण, कुडाळातील घटना;

मुक्त विहारि
Mon, 02/10/2025 - 04:20 नवीन
पुण्याच्या पर्यटकाला हात-पाय बांधून बेदम मारहाण, कुडाळातील घटना; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल https://www.lokmat.com/sindhudurga/pune-tourist-brutally-beaten-in-kudal-case-registered-against-six-people-a-a746/ --------
  • Log in or register to post comments

Tirupati Laddu Case: सीबीआई SIT ने चार लोगों को गिरफ्तार किया, '

मुक्त विहारि
Mon, 02/10/2025 - 04:55 नवीन
Tirupati Laddu Case: सीबीआई SIT ने चार लोगों को गिरफ्तार किया, 'लड्डू प्रसादम् मिलावटी घी' मामले में कार्रवाई https://www.amarujala.com/photo-gallery/india-news/andhra-tirupati-laddu-case-updates-sit-led-by-cbi-arrests-accuseds-milawati-ghee-in-laddu-hindi-news-2025-02-10 ------
  • Log in or register to post comments

बुरखा पांघरलेल्या 4 भावांची 'लाडकी बहीण' योजनेतून माघार

मुक्त विहारि
Mon, 02/10/2025 - 05:13 नवीन
बुरखा पांघरलेल्या 4 भावांची 'लाडकी बहीण' योजनेतून माघार https://www.jaimaharashtranews.com/maharashtra/four-burqa-clad-brothers-withdraw-from-the-ladki-bahin-scheme/33059 -------
  • Log in or register to post comments

महाराष्ट्र बोर्ड परीक्षाओं में बुर्का पहनने को लेकर विवाद, प्रति

मुक्त विहारि
Mon, 02/10/2025 - 05:16 नवीन
महाराष्ट्र बोर्ड परीक्षाओं में बुर्का पहनने को लेकर विवाद, प्रतिबंध लगाने की मांग फिर से उठी https://www.jagran.com/maharashtra/mumbai-controversy-over-wearing-burqa-in-maharashtra-board-exams-23880003.html ------ निलेश राणे यांनी, हा मुद्दा जानेवारी महिन्यात पण उचलला होता....
  • Log in or register to post comments

बुरख्याच्या आत काय आहे? एका प्रश्नाने मुंबई विमानतळावर खळबळ, चार

मुक्त विहारि
Mon, 02/10/2025 - 05:25 नवीन
बुरख्याच्या आत काय आहे? एका प्रश्नाने मुंबई विमानतळावर खळबळ, चारही महिलांना अटक https://news18marathi.com/mumbai/what-is-behind-burqa-dri-officers-ask-passengers-at-mumbai-airport-four-women-arrested-1331636.html -----
  • Log in or register to post comments

मनोज जरांगेंच्या मेहुण्याची गुन्हेगारीची कुंडली ओपन

मुक्त विहारि
Mon, 02/10/2025 - 12:49 नवीन
कोण आहे विलास खेडकर? मनोज जरांगेंच्या मेहुण्याची गुन्हेगारीची कुंडली ओपन https://news18marathi.com/maharashtra/manoj-jarange-brother-in-lawa-who-is-vilas-khedkar-sand-jalna-maharashtra-marathi-news-1331748.html --------
  • Log in or register to post comments

प्रायगराज..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 02/11/2025 - 09:18 नवीन
वसंतपंचमीनंतर कुंभमेळ्यातील गर्दी ओसरेल असे वाटत असतांना गर्दी वाढायला लागली आहे, आकाशवाणी आणि विविध माध्यमातून कुंभमेळ्यात गर्दी गोळा करण्याचे काम सुरुच आहे. चेंगराचेंगरी मृत्यू पावलेल्या भक्तगणांचा विसर पडून पूण्य मिळवण्यासाठी गर्दी होतच आहे. प्रयगराज मधे सात सात किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. वाहतूक कोंडी होत असून भक्तांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याच्या बातम्या येत आहेत. कालच राष्ट्रपती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही सोमवारी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. 'महाकुंभनिमित्त भरलेला श्रद्धेचा मेळा हे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे लक्षण आहे, म्हणुन त्यांचाही एक इव्हेंट झाला. अजुन अजुन कुंभमेळ्यात कोण कोण दर्शनार्थी येतात आणि महाकुंभ इव्हेंट आधुनिक भारतात कसा कसा पुढे जातो ते वाचत आणि विविध माध्यमातून बघत राहुया. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

उगी उगी

मुक्त विहारि
Tue, 02/11/2025 - 13:18 नवीन
(मी सध्या तरी अपंग असल्याने जाऊ शकत नाही.) माझा मित्र जाऊन आला. त्याने सांगितलं की, अतिशय उत्तम व्यवस्था आहे. तुम्ही स्वतः जाऊन खात्री का करून घेत नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

त्यांना वरुन आदेश नाही.

वेडा बेडूक
गुरुवार, 02/20/2025 - 11:10 नवीन
केवळ पट्ट्याला हिसडा मिळाला की भुंकायचे, एवढेच सांगित्लेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

अमेरीकेने आत्तापर्यंत १९०००

विजुभाऊ
Tue, 02/11/2025 - 18:06 नवीन
अमेरीकेने आत्तापर्यंत १९००० पेक्षाही जास्त घुसखोराना देशाबाहेर पोहोचते केले.
  • Log in or register to post comments

राज्याचे माजी मंत्री आणि

अमरेंद्र बाहुबली
Tue, 02/11/2025 - 20:28 नवीन
राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याच्या खोट्या बातमीने सोमवारी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. मात्र, प्रत्यक्षात तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या मुलाचे अपहरण झाले नव्हते तर तो मित्रांसोबत बँकॉकला (Bangkok) गेल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर या 'अपहरण' नाट्यावर पडदा पडला असला तरी याप्रकरणातील तपशीलाची खमंग चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत सोमवारी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट कारमध्ये बसून पुण्याच्या लोहगाव विमानतळावर गेले. तिकडून ऋषिराज सावंत (Rishiraj sawant) हे मित्रांसोबत चार्टर्ड विमानाने बँकॉकच्या दिशेने रवाना झाले होते. >> <अरे व बँकॉक काय? मज्जाच मज्जा! ऋषिराज सावंत यांनी या बँकॉकच्या वारीसाठी तब्बल 68 लाख रुपये खर्च केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. :) फक्त ६८? https://marathi.abplive.com/news/politics/tanaji-sawant-son-rishiraj-sawant-paid-68-lakh-rupees-for-bangkok-chartered-plane-1343676
  • Log in or register to post comments

हा हा हा

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 02/11/2025 - 22:23 नवीन
एकीकडे मध्यम्वर्गीय मिळेल ती फ्लाईट/ट्रेन पकडुन प्रयागराजच्या दिशेने जाताना दिसतात. आणि हा ऋषिराज भलत्याच मेळ्याला निघाला होता. enlightenment का काय म्हणतात ते मिळण्याची प्रत्येकाची ठिकाणे वेगळी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

'संभोगातून समाधीकडे' हा enlightenment चा सर्वोत्तम मार्ग

चित्रगुप्त
Tue, 02/11/2025 - 23:06 नवीन
'संभोगातून समाधीकडे' हा enlightenment चा सर्वोत्तम मार्ग. -- असे 'ह्यांचे' म्हणणे. -- बाईसाहेब फुर्रसुंघीकर.
  • Log in or register to post comments

अमानतुल्लाह पर दिल्ली पुलिस ने ठोक दीं 11 धाराएं

मुक्त विहारि
Wed, 02/12/2025 - 06:59 नवीन
दंगा तो एक कांड, अमानतुल्लाह पर दिल्ली पुलिस ने ठोक दीं 11 धाराएं, खुशी मनाने की जगह भागे-भागे क्यों फिर रहे? https://hindi.news18.com/news/delhi-ncr/amanatullah-khan-latest-update-know-about-fir-section-against-arvind-kejriwal-aap-mla-police-said-he-helped-murder-suspect-escape-9023803.html
  • Log in or register to post comments

हमारा इलाका है,पता भी नहीं चलेगा कहां चले गए;

मुक्त विहारि
Wed, 02/12/2025 - 07:01 नवीन
हमारा इलाका है,पता भी नहीं चलेगा कहां चले गए; FIR में दर्ज हो गई अमानतुल्लाह खान की https://www.livehindustan.com/ncr/aap-mla-amantullah-khan-threatened-delhi-police-officials-fir-says-it-all-full-details-201739280480290.html -------
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

स्वतः हून हिंदू धर्म स्वीकारलेल्या, वसीम रिझवी यांची घोषणा..

मुक्त विहारि
Wed, 02/12/2025 - 07:32 नवीन
https://www.lokmat.com/national/mahakumbh-2025-rs3000-per-month-if-leave-islam-and-return-to-sanatan-dharma-big-announcement-by-wasim-rizvi-who-himself-converted-to-hinduism-a-a653/
  • Log in or register to post comments

यावर ऊर्दू माध्यमांतून आलेली

रामचंद्र
गुरुवार, 02/13/2025 - 00:22 नवीन
यावर ऊर्दू माध्यमांतून आलेली प्रतिक्रियाही वाचायला मिळावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा