Skip to main content

ताज्या घडामोडी - फेब्रुवारी २०२५

लेखक माईसाहेब कुरसूंदीकर यांनी शुक्रवार, 07/02/2025 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि निवड्णुकपूर्व जाहीरनाम्यात जी वचने दिली होती, त्यांची पुर्ती करण्याची सुरुवात केली.अवैधरीत्या अमेरिकेत वास्त्वय करुन असणार्या परदेशी लोकाना परत पाठवणार हे एक वचन. अमेरिकेत एकंदर एक कोटीहुन अधिक परदेशी लोक बेकाय्देशीर वास्त्वव्य करून आहेत. ह्यात साधारण सात लाख भारतिय आहेत. ह्यातील १०४ लोकांची पहिली बॅच अमेरिकेच्या मिलिटरी विमानाने अम्रुतसर येथे उतरली.
"We thought we were being taken to another camp. Then a police officer told us that we were being taken to India. We were handcuffed, and our legs were chained. These were opened at Amritsar airport," he told news agency PTI. Singh added that he was kept in custody in the US for 11 days before being sent back home.
भारताची ह्यावर अधिक्रुत प्रतिक्रिया काय आहे?होती? की काहीच नाही? ह्या निमित्ताने ईतर देशांच्या सरकारानी दिलेल्या प्रतिक्रिया महत्वाच्या ठराव्यात. स्वाभिमान काय असतो ते हे प्रतिक्रिया बघितल्यावर लक्षात येते. "अशा पद्धतीने नागरिकांना नेणे अमानवी आणि अपमानस्पद आहे. अमेरिकेचे मिलिटरी विमान आम्ही उतरू देणार नाही" कोलंबियाचे अध्यक्ष गुस्ताव पेट्रो ब्राझील सरकारमधील मंत्र्यानेही अशीच प्रतिक्रिया दिली. मेक्सिको सरकारनेही अमेरिकेचे मिलिटरी विमान उतरवण्यास मनाई केली व चार्टड विमानाची व्यवस्था केली. https://www.indiatoday.in/india/story/us-deports-illegal-immigrants-don… भारताकडुन किंचितरी निषेध व्यक्त होईल अशी अंधुक आशा होती पण जयशंकर ह्यांच्या विधानाने तीही मावळली. "बेड्या घालुन नागरिकांना मायदेशी पाठवणे ही अमेरिकेची पद्धत आहे" असे जयशंकर म्हणाले. झालेला खर्च आम्ही देउ असेही विधान केल्याचे वाचले. आता ह्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी , डोनाल्ड ट्रम्प ह्यांच्या भेटीला चालले आहेत. "त्यांना आम्ही १२ तारखेला बोलावले आहे" असे व्हाईट हाउसकडुन सांगण्यात आले. "त्यांना आम्ही बोलावले आहे, म्हणजे?" ते नोकर आहेत अमेरिकेचे? प्रथमच भारत अमेरिकेचा एवढा मिंधा झाल्याचे दिसले. कोणाला वाचवण्यासाठी हे चालु आहे? ज्या कोलंबिया/मेक्सिको/ब्राझील ह्यांनी सणसणीत प्रतिक्रिया अमेरिकेला देउन स्वाभिमान दाखवुन दिला त्या देशात 'नेभळट' मानले जाणारे समाजवादी/डाव्या विचारांचे पक्ष सत्तेवर आहेत हे विशेष.

वाचने 34275
प्रतिक्रिया 253

प्रतिक्रिया

In reply to by रात्रीचे चांदणे

आहे की पण जायचच असेल तर.शेवटी आप आपली निवड असते. असं असेल तर सुशिक्षीत बेकारी कमी का होत नाही भारतात ? अकुशल कामगारांना सरकार इस्राएल, जर्मनीला पाठवतेय ते कशासाठी? इथेच रोजगार का देऊ शकत नाही?

In reply to by आग्या१९९०

सहमत, रोजगार हिथेच द्यायला पाहिजे. पण तरीही बेड्या घालूनच परत पाठवायला पाहिजे.

अकायदेशीर मार्गाने घुसलेल्यांना अनेक देश अत्यंत कडक वागणूक देतात. २०१२ मध्ये फेबुवर ओळख झालेल्या पाकी मुलीशी लग्न करण्यासाठी मुंबईतील एक मुस्लिम तरूण अवैध मार्गाने अफगाणिस्तानातून घुसल्यानंतर पकडला गेला. त्याला ६ वर्षे तुरूंगात टाकून अमानुष अत्याचार केले होते.

कितीही सारवासारव केली तरीही इतर देशांनी जसं कडक निषेध नोंदवला तसा निषेध नोंदवायला हिंमत लागते, अशी हिम्मत इंदिरा गांधी वगैरेंसारख्या नेत्यांकडे होती. आजकालचे नेते म्हणजे……

In reply to by अमरेंद्र बाहुबली

गेल्या 20 वर्षांत 25000 हून जास्त लोकांना अमेरिकेने परत पाठविले आहे. गेल्या वर्षी 2500 हजार लोकांना. बाकी तेंव्हा बाइडेन सरकार होते म्हणून अमरेन्द्र चूप होते.

In reply to by विवेकपटाईत

हातात बेड्या घालुन आणले होते का? पायात साखळ्या? बायडेन ह्यांच्या कारकीर्दीतही अनेकांना परत पाठवले आहे पण अपमानास्पद पद्धतीने नसावे. https://san.com/cc/dhs-says-it-just-deported-a-charter-plane-full-of-ch… बायडेन वाईट आणि ट्रम्प चांगले ही ठराविक लोकांची मांडणी आहे. कारण ट्रम्प आणी मोदी चांगले मित्र आहेत असे ते म्हणतात. ट्रम्प ह्यांची सध्याची विधाने पाहिली तर हा ग्रुहस्थाचे वेडसर असेच वर्णन करावे लागेल. कॅनडाला ५१ वे राज्य करणार, ग्रीनलॅन्ड घेणार, गाझा पट्टी ताब्यात घेणार.. वगैरे. अर्थात ही विधाने जाणुन बुजुन , त्यांच्या समर्थकांना खूष करण्यासाठी केलेली असतात.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

>>>ट्रम्प आणी मोदी चांगले मित्र आहेत असे ते म्हणतात. ट्रम्प ह्यांची सध्याची विधाने पाहिली तर हा ग्रुहस्थाचे वेडसर असेच वर्णन करावे लागेल. इकडेही, अखंड भारत, पाकव्याप्त काश्मीरचा समावेश, चीनने गीळलेला प्रदेश ताब्यात घेऊ, हिंदूराष्ट्र करु अशा लेमनगोळ्या छुप्या पद्धतीने पंथीय मतदारांना लुभावण्यासाठी दिल्या जातात. करोना काळातील त्या टाळ्या, तो घ्ंटानाद, ती दिवाबत्ती, ती सगळी नाटकं पाहिली की एखाद्या देशाचा प्रमुख काय काय करायला लावतो आणि जनताही कशी हिप्टोनाइज होते त्याची गम्मत आठवून कायम हसायला येत असते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मोदी परत पंतप्रधान झाले, तात्या परत आले, हरयाणा गेले, महाराष्ट्र गेला, दिल्ली गेली, पंक्चर असलेल्या एका चाकात १०-११ वर्षात वारंवार हवा भरूनही चाक सपाट . . . माणसाने सहन तरी किती करायचं. सांगता येत नाही आणि सहनही होत नाही.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

महालक्ष्मी मंदिराजवळ मूळव्याधाचे औषध मिळते. गुणकारी असते. पाठवून देउ का?

भारतात संधी नाहीत म्हणून ते अमेरिकेत गैरमार्गाने गेले ना? हायला गैरमार्गाने जायचे मग ते आम्रविकेतच का? गेला बाजार कुवेत / बर्हिन / सौदि / दुबै वेग्रे वेग्रे का नाही ब्रे? शिन्गापुर पन जवळच आहे ..

पुण्याच्या पर्यटकाला हात-पाय बांधून बेदम मारहाण, कुडाळातील घटना; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल https://www.lokmat.com/sindhudurga/pune-tourist-brutally-beaten-in-kuda… --------

Tirupati Laddu Case: सीबीआई SIT ने चार लोगों को गिरफ्तार किया, 'लड्डू प्रसादम् मिलावटी घी' मामले में कार्रवाई https://www.amarujala.com/photo-gallery/india-news/andhra-tirupati-ladd… ------

महाराष्ट्र बोर्ड परीक्षाओं में बुर्का पहनने को लेकर विवाद, प्रतिबंध लगाने की मांग फिर से उठी https://www.jagran.com/maharashtra/mumbai-controversy-over-wearing-burq… ------ निलेश राणे यांनी, हा मुद्दा जानेवारी महिन्यात पण उचलला होता....

बुरख्याच्या आत काय आहे? एका प्रश्नाने मुंबई विमानतळावर खळबळ, चारही महिलांना अटक https://news18marathi.com/mumbai/what-is-behind-burqa-dri-officers-ask-… -----

कोण आहे विलास खेडकर? मनोज जरांगेंच्या मेहुण्याची गुन्हेगारीची कुंडली ओपन https://news18marathi.com/maharashtra/manoj-jarange-brother-in-lawa-who… --------

वसंतपंचमीनंतर कुंभमेळ्यातील गर्दी ओसरेल असे वाटत असतांना गर्दी वाढायला लागली आहे, आकाशवाणी आणि विविध माध्यमातून कुंभमेळ्यात गर्दी गोळा करण्याचे काम सुरुच आहे. चेंगराचेंगरी मृत्यू पावलेल्या भक्तगणांचा विसर पडून पूण्य मिळवण्यासाठी गर्दी होतच आहे. प्रयगराज मधे सात सात किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. वाहतूक कोंडी होत असून भक्तांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याच्या बातम्या येत आहेत. कालच राष्ट्रपती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही सोमवारी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. 'महाकुंभनिमित्त भरलेला श्रद्धेचा मेळा हे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे लक्षण आहे, म्हणुन त्यांचाही एक इव्हेंट झाला. अजुन अजुन कुंभमेळ्यात कोण कोण दर्शनार्थी येतात आणि महाकुंभ इव्हेंट आधुनिक भारतात कसा कसा पुढे जातो ते वाचत आणि विविध माध्यमातून बघत राहुया. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

(मी सध्या तरी अपंग असल्याने जाऊ शकत नाही.) माझा मित्र जाऊन आला. त्याने सांगितलं की, अतिशय उत्तम व्यवस्था आहे. तुम्ही स्वतः जाऊन खात्री का करून घेत नाही?

राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याच्या खोट्या बातमीने सोमवारी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. मात्र, प्रत्यक्षात तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या मुलाचे अपहरण झाले नव्हते तर तो मित्रांसोबत बँकॉकला (Bangkok) गेल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर या 'अपहरण' नाट्यावर पडदा पडला असला तरी याप्रकरणातील तपशीलाची खमंग चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत सोमवारी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट कारमध्ये बसून पुण्याच्या लोहगाव विमानतळावर गेले. तिकडून ऋषिराज सावंत (Rishiraj sawant) हे मित्रांसोबत चार्टर्ड विमानाने बँकॉकच्या दिशेने रवाना झाले होते. >> अरे व बँकॉक काय? मज्जाच मज्जा! ऋषिराज सावंत यांनी या बँकॉकच्या वारीसाठी तब्बल 68 लाख रुपये खर्च केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. :) फक्त ६८? https://marathi.abplive.com/news/politics/tanaji-sawant-son-rishiraj-sa…

In reply to by अमरेंद्र बाहुबली

एकीकडे मध्यम्वर्गीय मिळेल ती फ्लाईट/ट्रेन पकडुन प्रयागराजच्या दिशेने जाताना दिसतात. आणि हा ऋषिराज भलत्याच मेळ्याला निघाला होता. enlightenment का काय म्हणतात ते मिळण्याची प्रत्येकाची ठिकाणे वेगळी.

दंगा तो एक कांड, अमानतुल्लाह पर दिल्ली पुलिस ने ठोक दीं 11 धाराएं, खुशी मनाने की जगह भागे-भागे क्यों फिर रहे? https://hindi.news18.com/news/delhi-ncr/amanatullah-khan-latest-update-…

In reply to by मुक्त विहारि

हमारा इलाका है,पता भी नहीं चलेगा कहां चले गए; FIR में दर्ज हो गई अमानतुल्लाह खान की https://www.livehindustan.com/ncr/aap-mla-amantullah-khan-threatened-de… -------

In reply to by मुक्त विहारि

यावर ऊर्दू माध्यमांतून आलेली प्रतिक्रियाही वाचायला मिळावी.

यूपी पुलिस का बड़ा ऐक्शन, महाकुम्भ को लेकर भ्रामक पोस्ट करने वाले 14 एक्स एकाउंट पर https://www.livehindustan.com/uttar-pradesh/up-police-takes-big-action-… ----

PCMC : चिखली कुदळवाडी येथील दीड हजारांहून अधिक बेकायदा बांधकामांवर बुलडोझर; पिंपरी चिंचवड महापालिकेची धडक कारवाई https://marathi.hindustantimes.com/maharashtra/pcmc-razes-more-than-100…

प्रिय माई स.न.वि.वि. आज सकाळची दैनिकं वाचत होतो. एका बातमीने लक्ष वेधून घेतलं. बातमीचं शीर्षक होतं ' मोफत योजनांमुळे नागरिक पूर्णपणे निष्क्रिय' मग बातमी तपशीलवार वाचली. आशय असा होता. निवडणूकीच्या तोंडावर मोफत ( रेवडी ) जाहीर करण्याच्या राजकीय पक्षांच्या कार्यपद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी टीका केली. 'मोफत रेशन' आणि पैसे मिळाल्यामुळे नागरिक निष्र्किय होत असून, आपण परजीवींचा एक वर्ग तरयार करत नाही का ? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. शहरी भागातील बेघर व्यक्तीच्या निवारा हक्क संबंधित एका प्रकरणातील सुनावणी दरम्यान न्या.बी.आर.गवई आणि न्या.ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या खंडपिठाने आपले मत व्यक्त केले. दुर्दैवाने लाडकी बहीण आणि मोफतच्या योजनांमुळे लोक काम करण्यास तयार नाहीत. त्यांना मोफत रेशन मिळत आहे. त्यांना कोणतेही का न करता पैसे मिळत आहेत, कोणतेही अतिरिक्त कष्ट न करता सरकारी योजनांचा लाभ घरबसल्या होत आहेत. खिशात पैसे येत आहेत. असेही न्या. गवई म्हणाले. पुढे ते म्हणाले आपण परजीवींचा एक वर्ग तयार करत नाही का ? असा प्रश्नही उपस्थित केला. ( मटा छापील) सकाळची कामं आणि चहा बाकी आहे, आवराआवरी करायची आहे. आपल्या मतांच्या प्रतिक्षेत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मोदी महाशय स्वत रेवडी कल्चरवर टीका करायचे नी नंतर त्यांचा पक्ष नी ते स्वत रेवड्या वाटू लागले, कसा विश्वास ठेवतात त्यांच्यावर त्यांचे भक्तगण देव जाणे! :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

photo_2025-02-13_09-58-11
श्री-गोबरबाबा प्रसन्न

सद्य व्यवस्थेत खोटेपणा आणि विसंगती व्यक्तीचा नव्हे तर, देशाच्या राजकारणाचा प्रशासनाचा चेहरा बनत चालला आहे, नव्हे बनला आहे. लोकांचा कशावरच विश्वास राहणार नाही, इतकी अव्यवस्था आत्ताच्या घडीला आहे. कोणत्याही माध्यमात काहीही उमटलं की ते लोकांना खोटं वाटतं. शहनिशा करुन घेतली पाहिजे. इतका अविश्वास सद्य काळात उभा राहिला आहे. लोक महागाई, बेरोजगारी, शेतमालाचा भाव, कृषी कायदे, यावर बोलू इच्छितात आणि हे प्रगायराजच्या जाहिराती करण्यात व्यस्त आहेत, त्यांचंही काही चुकत नाही, आपला चाहता कोण आहे त्यांना माहिती आहे. रेवड्या वाटल्या की पब्लिक खुश. बजाव टाली.

ऐसें कैसें झाले भोंदू। कर्म करोनि म्हणती साधु ।। अंगा लावुनिया राख। डोळे झांकूनि करिती पाप ।। दावूनि वैराग्याची कळा। भोगी विषयांचा सोहळा ।। तुका म्हणे सांगों किती। जळो तयांची संगती ।। (छायाचित्र जालावरुन साभार ) -दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्तच! तुकारामांचा अभंग आजच्या राजकीय परिस्थितीला तंतोतंत लागू पडतो! छायाचित्रावरून कळते की साधूचा वेष धारण केले तरी माकड ते माकडच राहणार! गोबरयुग दुसरे काय?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

प्रचंड सहमत.... नालंदा विद्यापीठ जाळले आणि.... बटाट्या पासून सोने, शाकाहारी अंडे, लक्ष्मणाला जिवंत करण्यासाठी द्रोणाचार्यांनी आणलेली संजीवनी विद्या.... हे या गोबरयुगातलेच शोध.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आपण खरोखरच स्वतः हून काहीच वाचत नाही का? थोडे महाभारत वाचलेत तरी आकलन झाले असते...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुमच्या बाबतीतच लिहिले आहे... नालंदा विद्यापीठातील वाचनालय जळाले आणि त्याच बरोबर तुमची सर्वांगीण वाचनाची सवय गेली का? आता ते वाचनालय कुणी जाळले? हे पण विसरून गेला असाल तर गोष्ट वेगळी आहे....

तानाजी सावंत ह्यांच्या मुलाने दुबईत ५८ लाख नी नंतर बँकॉक साठी ६८ लाख खर्च केले अश्या बातम्या आहेत. तानाजी सावंत ह्यांचा व्यवसाय काय? इतके पैसे त्यांचा मुलगा कसेकाय खर्च करतो? ह्याचा शोध ईडीने घेतला असता पण सावंत भाजपसोबत असल्याने तिथे इडीला काहीही स्कोप नाही. विरोधी पक्षात वगैरे असते सावंत तर इडी ने धाडी टाकून त्यांना भाजपात तरी आणले असते. अश्या गोष्टी मोदींच्या काळातच सॉरी सॉरी अमृतकाळातच शक्य आहे. जय भारत! जय महाराष्ट्र! जय विश्वगुरत्व! :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ठाकरे कुटुंब खाजगी विमानाने महिनाभर लंडनमध्ये होते. किती कोटी खर्च असेल? ठाकरे कुटुंबाचा व्यवसाय काय? इतके पैसे कसे खर्च करतात? इतके पैसे आणले कोठून?

In reply to by मुक्त विहारि

तुमच्या सगळ्याच प्रतिसादांना हे लागू नाहि का? तुम्ही का इथे बोंबाबोम्ब करता. रिकामे आहात तर टाका की ढीगभर आरटीआय? . ना रहेगा वक्फ ना रहेगा संभल. जो भी है कोर्ट मे जाके बोंबल.

In reply to by सुरिया

अजिबात नाही... कारण, वक्फ असो किंवा संभल, त्या छापील स्वरूपातील माहितीचा स्रोत आहे. आणि त्यासाठी RTI ची गरज नाही. बाय द वे, रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर मुस्लिम, यांच्या बाबतीत पण काही बातम्या आल्या आहेत. त्यांच्या बाबतीत तुमची काही टिप्पणी असेल तर उत्तम...

संभल हिंसा के मास्टरमाइंड शारिक साठा की पत्नी से पुल‍िस ने की पूछताछ, फंड‍िंग और संपत्ति के बारे में जुटाई जानकारी https://www.jagran.com/uttar-pradesh/sambhal-city-police-questioned-the… ------ शारिक साठा, बद्दल अधिक माहिती... संभल हिंसा का पाकिस्तानी लिंक, दुबई में छिपे गैंगस्टर शारिक साठा से है कनेक्शन, जानिए पूरी कहानी https://www.aajtak.in/uttar-pradesh/story/pakistani-link-of-sambhal-vio… ------ तीर्थक्षेत्र ते आतंकवादी व्यक्तीचा अड्डा, संभलचा हाच प्रवास आहे..... संभल बद्दल जितके वाचावे तितके कमीच आहे.

In reply to by मुक्त विहारि

संभल... 150 साल पुरानी सर्वे रिपोर्ट में मंदिर के सबूत, मूर्तियों को नीचे मोड़ा; सामने आई एक और नई जानकारी https://www.amarujala.com/uttar-pradesh/moradabad/up-samabhal-news-150-… ------- संभल बद्दल जितके वाचावे तितके कमीच आहे. त्यामुळे वेगळा धागा काढत आहे.

भारतीय चौक्यांवर गोळीबार करणं पडलं महागात, लष्कराच्या कारवाईत पाकिस्तानचे अनेक सैनिक ठार https://www.lokmat.com/national/firing-on-indian-posts-proved-costly-se… ------------ ये नया भारत हैं... झुकेगा नहीं....

आज पंतप्रधान मोदी आणि अमेरिकन अध्य़क्ष ट्रम्प ह्यांच्या भेटीचे औत्सुक्य असणार आहे. पॅरिस्/वॉशिंग्टनमधील मोदींच्या चाहत्यांची गर्दी पाहिली तर काँग्रेसवाले नाराज झाले नसतील तर नवल! दरम्यान ईतर देशप्रमुखांनी ट्रम्प विरोधात सरळ आघाडीच उघडलेली आहे.(निदान भाषणात तरी!). मॅक्डोनल्डचे बर्गर खाणार नाही पासुन ते आय-फोन वापरणार नाही.. https://www.youtube.com/watch?v=L-W_xv2PJts हा विरोध किती काळ टिकतो ते पहायचे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

आणि उघड करू पण नये. राष्ट्रीय गोपनीयता हा भाग सांभाळता आला पाहिजे. आठवा, डॉन व्हिटो कॉर्लिऑन आणि सोलोझो यांची भेट.... आणि डॉन व्हिटो कॉर्लिऑन आणि डॉन फेनुसी यांची भेट... गोपनीयता महत्त्वाची असते.

पाकिस्तान में तुर्की के 'खलीफा' ने अलापा कश्मीर का राग, शहबाज ने फेंका मुस्लिम भाईचारे का जाल तो एर्दोगन ने दिया बयान https://navbharattimes.indiatimes.com/world/pakistan/turkey-president-e… ------- ह्या बातमी वरून एक जुनी गोष्ट आठवली... ऐतिहासिक भूल के सौ साल: जब गांधीजी खिलाफत आंदोलन चला रहे थे तब तुर्क उसे खत्म करना चाह रहे थे https://www.jagran.com/editorial/apnibaat-hundred-years-of-historical-m… --------- परमपूज्य महात्मा गांधी यांनी तुर्की मुस्लिम जनतेला पाठिंबा दिला आणि आता तुर्की मुस्लिम हा उपकार विसरली. -------

जर्मनीत राजाश्रयाच्या शोधात आलेल्या अफगाणी तरूणाने गर्दीत घुसवली कार, २८ जण जखमी https://www.loksatta.com/desh-videsh/28-injured-afghan-asylum-seeker-ra… ------- ज्या ताटात खायचे, त्याच ताटात माती कालवायची... रोहिंग्या मुस्लिम आणि बांगलादेशी मुस्लिम यांना थारा देऊन, भारताने पण हीच चूक केली आहे. नूह आणि संदेशाखाली, येथील घटना हेच दाखवतात. ------

मणिपुर मधे जवळ जवळ अडीच वर्षा नंतर आणि २५० पेक्षा अधिक लोकांचे हिंसाचारात प्राण गेल्यानंतर गुरुवारी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. मणिपुर मधे भाजपचं सरकार होतं. मुख्यमंत्री बीरेनसिंह यांनी नुकताच राजीनामाही दिला होता. विधानभेचा कालावधी २०२७ पर्यंत होता, लोकांनी निवडून दिलेलं सरकार आणि केंद्र यांच्या दोघांच्या समन्वयाने मणिपुरचं जळणं थांबलचं नाही. तसंही निष्क्रिय राजकीय लोकांकडून काही अपेक्षा नाहीच. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मणिपूर बद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे... ------- मणिपूर का पेटलंय? जाणून घ्या, मणिपूर हिंसाचाराशी संबंधित 7 प्रश्न 7 उत्तरं (https://www.bbc.com/marathi/articles/cgr1end5e34o) ------- मणिपूर हिंसाचार - कारणे व उपाय शोधण्याची गरज (https://www.evivek.com/Encyc/2023/6/27/Manipur-violenceNeed-to-find-rea…) ------ नागा आंदोलन, कुकीलँड आणि मीतेई जातीचा निषेध... मणिपूर हिंसाचारामागील तीन आंदोलनांची कहाणी, जाणून घ्या कोणाला काय हवे आहे? (https://marathi.aajtak.in/india/story/naga-movement-kukiland-and-meitei…) ------ मणिपूर का धुमसते आहे ? Manipur Violence in Marathi (https://www.joshmarathi.com/2023/07/manipur-violence-in-marathi.html) ------- कभी जंग तो कभी बना हिंसा का मैदान... आजादी के दो साल बाद भारत में शामिल हुए मणिपुर की कहानी (https://www.aajtak.in/explained/story/manipur-violence-updates-kuki-vs-…) -------- मणिपुर में ब्रिटिश काल के कानून की विरासत बदल गई (https://imphalreviews.in/mutant-legacy-of-a-british-era-law-in-manipur/) --------- अंग्रेजों के बोये इस बीज का नतीजा भुगत रहा है मणिपुर, जान लीजिए पूरा इतिहास और विवाद की असली जड़ (https://www.abplive.com/gk/manipur-violence-consequences-of-seed-sown-b…) ------- बिरुटे सर, तुम्हाला मनापासून धन्यवाद. तुमच्या प्रतिसादा मुळे मला मणिपूर बद्दल कणभर तरी का होईना, माहिती मिळाली. ब्रिटिशांची, फोडा, झोडा आणि राज्य करा, ह्या नीतीचे दुष्परिणाम आज भारतीय जनता भोगत आहे. हे परत एकदा अधोरेखीत झाले.

पण मी काय म्हणतो, बांगलादेश प्रकरण मोदींकडे सोपवणारे ट्रम्प कोण लागून गेलेत? आणि एकाने दुसऱ्याकडे सोपवायला बांगलादेश प्रकरण म्हणजे काही कांदे-पोह्याची प्लेट आहे का? अश्या बातम्या बहुतांश वृत्तसमूह कसे काय प्रकाशितात बुवा? माझा तर या बातमीवर काही विश्वास नाही हं!

He (PM Narendra Modi) is a much tougher negotiator than me and he is a much better negotiator than me. There is not even a contest," Trump said. नक्की काय म्हणायचे आहे ट्रम्पला? इंग्रजीत असल्याने समजले नाही.

संभल का उस्मान पाकिस्तान में गिरफ्तार, लाहौर जेल में है बंद https://www.jagran.com/uttar-pradesh/sambhal-city-sambhal-man-usman-arr… ------- छापील बातमी आहे. RTIची गरज नाही..... संभल विषयी जितके वाचावे तितके कमीच...

In reply to by मुक्त विहारि

संभल के दो तस्करों पर गैंगस्टर का केस, पुलिस जब्त कराएगी संपत्ति (https://www.jagran.com/uttar-pradesh/gorakhpur-city-sambhal-cattle-smug…) ------- संभल विषयी जितके वाचावे तितके कमीच...

बांगलादेशमध्‍ये हिंदूंवर हल्‍ले : 'युनो'च्‍या अहवालात मोहम्‍मद युनूस यांचा पर्दाफाश! https://pudhari.news/international/un-report-exposes-yunus-on-attacks-o… -------

In reply to by मुक्त विहारि

राहुल आणि इलॉन मस्कला जे समजते ते ट्रम्पच्या मित्राला कधी समजनार ? https://youtu.be/ozMrJVRukS0?feature=shared ट्रम्पने आपल्या मित्राबरोबर एका ' स्पेशल ' विमानातून ' वानोळा ' पाठवला. पत्रकार परिषदेत आपल्या मित्राचा झालेला अपमान कमी वाटला का ट्रॅम्पला? आता अमृतसर विमानतळाच्या भिंतीची उंची वाढवणे आले.