मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चला, डेकोपेज शिकू या!

मूनशाईन ·
. डेकोपेज म्हणजे हस्तकौशल्याच्या दुनियेतली एक अभिनव कला. चित्र काढता येत नसेल, तरी सौंदर्याची, रंगसंगतीची जाण असलेल्यांना सहज जमू शकेल अशी कला. जणू एखाद्या कुशल चित्रकाराने रेखाटलेले चित्र वाटावे ते प्रत्यक्षात एक साधे कागदाचे कात्रण असते. वॉर्निश, रेझिनसारखी लकाकी एका साध्या डिंकाच्या थरांनी येते. एकाहून जास्त हस्तकौशल्याच्या आणि कल्पक दृष्टीच्या बळावर साकारलेली रम्य अशी कलाकारी. कोणत्याही जागेचे सुशोभीकरण करताना एकमेकास पूरक गोष्टी आणि त्यात एक केंद्रबिंदू यावर भर असतो.

सविता००१ 09/03/2017 - 11:54
पायरोग्राफी ही तुझ्यामुळेच कळली होती आणि आता हे. भन्नाटच. आता मी पण करते काहीतरी यात. नक्कीच. खूप आवडलं हे.

रुपी 13/04/2017 - 03:04
मस्त! खरंच, तू आणि तुझ्या मैत्रिणीही ग्रेट आहेत. फार छान समजावलं आहे, करुन बघेन. समजा मला एखाद्या वस्तूवर थोड्याच भागावर एखादे चित्र लावायचे असेल तर तसे करता येईल का?

In reply to by रुपी

मूनशाईन 17/04/2017 - 09:03
होय लावता येईल. आधी वस्तू वाटल्यास रंगवून घे आणि वर चित्र लावता येईल. कधी कधी एखाद्या वस्तूचे पॉलिश निघते किंवा डाग पडतो. त्या ठिकाणी किंवा पूर्ण वस्तूवर डेकोपेज करून लूक बदलता येतो.

स्वयंसिद्धा

नूतन सावंत ·
. 'सामान्यातले असामान्य' हा विषय महिला दिनानिमित्त मिळाला नि खूप साऱ्या व्यक्ती डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. कोणाची बरे मुलाखत घेऊ या? या विचारात असतानाच महालक्ष्मी सरस २०१७च्या तारखा जाहीर झाल्या. महिला बचत गटाचे शासनातर्फे भरणारे हे प्रदर्शन सामान्यातून असामान्यत्वाचेच दर्शन घडवीत असते. सरससाठी एखादा दिवस पुरात नाही. किमान तीनचार फेऱ्या तर कराव्याच लागतात. त्यातून २००७पासून या प्रदर्शनात भेटणाऱ्या सख्या आठवल्या.

जुइ 10/03/2017 - 04:34
या स्वयंसिध्दांची ओळख आवडली. अतिशय प्रतिकुल परिस्थितीतही डगमगुन न जता आपले आणि आपल्यासारख्या इतरांचे जीवन पुन्हा वसवले!

पैसा 10/03/2017 - 08:57
नतमस्तक आहे! शिक्षण सुद्धा नसताना एवढे मोठे काम!!! सुरन्गी, हा लेख कसाही त्यांच्यापर्यंत पोचव. त्यांचं आम्ही कौतुक केलंय हे त्यांना कळू दे!

कपिलमुनी 10/03/2017 - 16:20
ओळख छान ! ( अवांतर : ३६ रुपये किलो असणारा इंद्रायणी तांदूळ आता ९० रुपये किलो झाला आहे ! फारच महाग आहे हो )

In reply to by कपिलमुनी

नूतन सावंत 13/03/2017 - 10:31
मुनिवर,त्यांचे कष्ट पाहता हा दर कमीच आहे,हाताने उखळात सडतात या बायका.आणि दीडशे बायका दोन टनांपेक्षा जास्त तांदूळ सडतात.शिवाय उत्पादनही त्यांचेच असते.तिथेही त्या स्वत:च राबत असतात.

मोनू 11/03/2017 - 17:16
खरोखर स्वयंसिद्धा...करीअरीस्ट बायका म्हणजे फक्त उच्चशिक्षीत या कल्पनेला छेद देणार्‍या स्त्रिया... त्रिवार वंदन ! सुरंगीताई खूप खूप आभार.

इडली डोसा 14/03/2017 - 00:17
बेबीबाई, गऊबाई, शांताबाई आणि सुमनताई यांच्या कष्टाला आणि जिद्दीला सलाम. सुरंगीताई अश्या दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अफाट कार्यशक्ती असलेल्या स्वयंसिद्धांची ओळख करुन दिल्याबद्दल खूप खूप आभार!

एमी 23/03/2017 - 18:34
वा!! मस्त लेख!! अतिशय प्रतिकुल परिस्थितीतही डगमगुन न जता आपले आणि आपल्यासारख्या इतरांचे जीवन पुन्हा वसवले! >> +1 __/\__

साथ

सानिकास्वप्निल ·
. आज सकाळपासूनच मधुराची खूप धावपळ चालली होती. कसेबसे घरचे सगळे काम आटपून ती ऑफिसला निघाली. आज पटवर्धन फूड कंपनीबरोबर तिची महत्त्वाची मीटिंग होती. काही कॉन्ट्रॅक्ट्स मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. मधुरा तशी खूपच साधी, सरळ, अत्यंत हुशार, शिस्तबद्ध, स्वाभिमानी आणि महत्त्वाकांक्षी होती. एम.बी.ए. करून ती सामंत ब्रदर्समध्ये मार्केटिंग मॅनेजरच्या पदावर अनेक वर्षे काम करत होती. अतिशय मेहनती आणि कर्तबगार अशी ही मधुरा लगबगीने ऑफिसला पोहोचली, तोच ऑफिसच्या मुख्य दरवाज़ात तिला एक चेहरा ओळखीचा दिसला.

विनिता००२ 09/03/2017 - 15:40
सुरेख !! >> लग्नानंतर थोड्याच महिन्यांनी अनघाने कंपनी बदलली आणि चा॑गल्या, भरगच्च पगाराची, चांगल्या हुद्द्याची नोकरी >> इथे मधुरा हवेय का?

कथा टिपीकल वाटली..पुरुषाला अहंकारी, व्यसनी आणि बेजबाबदार आणि स्त्रीला जबाबदार , मेहनती , स्वाभिमानी ई रंगवणं हा एक ट्रेंड झाला आहे असं वाटतं. पण लेखनशैली चांगली आहे.
पण म्हणतात ना, केलेल्या कर्माची मुक्ताफळे.
, यात 'मुक्ताफळे' हा शब्द योग्य नाही असे वाटते. पुढील लेखनास शुभेच्छा.

वज्रासारखी कणखर, सामान्यांमधील असामान्य स्वाती

सविता००१ ·
. आंतरराष्ट्रीय महिला दिनासाठी कुणीतरी खासम खास व्यक्ती मला हवी होती. अहो, का म्हणून काय विचारताय? इथे अनाहितावर हा धुरळा उठलेला. कोण काय करतंय, कोण काय लिहितंय असा. आणि आम्हाला आपलं कुण्णी कुण्णी म्हणून सापडेचना. लिहायचं तरी काय हो? आणि अचानकच एक दिवस लायटिंग झाली ना डोक्यात. मस्त प्रकाशच प्रकाश. अगदी आजि सोनियाचा दिनु म्हणत उठलेच. अहो, एक मैत्रीण सापडली ना मला. हे म्हणजे काखेत कळसा अन गावाला वळसा झालं हो. पण देर आये, दुरुस्त आये म्हणत ताबडतोब तुळशीबागेत कूच केलं. (नाय वो, शॉपिंग नाय.

मनिमौ 08/03/2017 - 16:31
अगदी नेटकी ओळख. स्वाती ला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.

KanchanKarai 10/03/2017 - 08:11
किती गुणी आहेत स्वातीताई! त्यांनी इथवर केलेली वाटचाल सोपी नाही, हे दर दिसतंच आहे पण त्यांनी ते मनमोकळेपणे सांगितलं हे फार आवडलं. त्यामुळे इतर स्त्रियांनाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये खंबीर राहण्याची प्रेरणा मिळते. एवढं जबाबदारीचं काम स्वातीताईंसारखी एक स्त्री हाताळते हे पाहून स्वत:च्या स्त्री असण्याचा अभिमान वाटतो. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आणखी एका कर्तृत्ववान महिलेची ओळख करून दिल्याबद्दल, सविता तुझे आणि मिपाचेही आभार.

नूतन सावंत 15/03/2017 - 18:15
अतिशय वेगळे काम ,परमेश्वराच्या मूर्ती घडवताना अगर चित्रे रेखाटताना पर्मेस्वराची मर्जी बहाल असल्याशिवाय काम पूर्णत्वाला जात नाही असे मानले जाते.हळदकुंकू,शेंदूर यांच्या पुतांमध्ये गुद्मरणाऱ्या परमेश्वराला मोकळा श्वास घेऊ देणाऱ्या आणि मुल्रू देणारऱ्या स्वातीताईवर परमेश्वर खुश असणारच. सविता तू ओळखही सविस्तर आणि छान करून दिली आहेस.

पुष्करिणी 16/03/2017 - 17:01
अमेझिंग, खूप नाजूक, कलाकुसर, नाविन्य, अवघड आणि धडाडीच काम. स्वातीताईंना खूप खूप शुभेच्छा, त्यांच्या दुकानाला भेट द्यायला आवडेल (मिपावर जाहीरात करता येत नाही हे माहित आहे पण खरच मला त्यांचं दुकान बघायला आवडेल )

साडी आणि बरंच काही

अजया ·
. सातत्याने बदलत गेलेले पण कायम सांस्कृतिक, सामाजिक मान्यतेचा मानदंड बनून स्थिरावलेले असे काय आहे आपल्या भारतीय वस्त्र संस्कृतीत? तर उत्तर येते 'साडी'! बदलत गेलेले पण तरीही सातत्याने हजारो वर्षे वापरात राहिलेले, लज्जा झाकणारे पण स्त्रीच्या अंगप्रत्यंगाचे अतिशय मादक दर्शन घडवू शकणारे असेही हेच वस्त्र! आपल्या भारतीय विविधतेतील एकता याचे अत्यंत मार्मिक उदाहरणही तीच.. साडी! हजारो वर्षांपासून स्त्रीचे सौष्ठव दाखवू शकणारे, चित्ताकर्षक, देखणे, न शिवता परिधान करता येणारे असे हे वसन. त्याचा इतिहासही तसाच रोचक आहे.

मनिमौ 08/03/2017 - 16:38
पण साडी प्रकार विशेष आवडता नसल्याने बाकी कोणी साडी चापून चोपून नेसली असेल तर मात्र बघायला आवडते

लाडू 09/03/2017 - 15:37
लेख छानच! मलाही साडी आवडते, ऑफिस मधेही आठवड्यातून एक दिवस आम्ही मैत्रिणी साडी नेसतो. ("चंदनाची चोळी" चा अर्थ पं. ह्रिदयनाथ मंगेशकरांनी एका कार्यक्रमात समजावून सांगितलं होता, तो वेगळा होता. ती "साडी-चोळी" मधली चोळी नव्हे...)

अंजु मुद्गल कदम (Anju M Kadam) आणि आली माथन (Ally Mathan) या दोघीनी भारतीय साडीचा विश्वात प्रसार करण्याची मोहीम उघडली आहे. या दुव्यावर वेगवेगळ्या देशातील स्त्रिया साडीमध्ये दिसतात https://pbs.twimg.com/media/CnkXnKEWIAATqdI.jpg या दुव्यावर अधिक माहिती मिळेल http://100sareepact.com/

पिशी अबोली 13/03/2017 - 14:48
हम भी साडी प्रेमी हैं, इसलिये लेख अति आवडा हैं.. 100 साडी pact करायचा विचार होता, पण फार सुंदर दिसण्यासारख्या जागी नाही राहत मी सध्या. तरीही जमेल तेव्हा साडी नेसतेच नेसते.

मारवा 13/03/2017 - 21:30
त्याविषयी थोडे व्यावहारीक मार्गदर्शन करावे काही रोचक प्रकार उदा नारायणपेठ साडी तसेच येवला पैठणी व ती कूठली मावळ कडची फेमस साडी त्याविषयी जमल्यास सचित्र माहीती द्यावी ही विनंती

मदनबाण 17/03/2017 - 08:06
सुंदर लेख ! दागिन्यां नंतर पाखरांचा सगळ्यात मोठा विक पॉइंट ! ;) यावर बरंच काही लिहता आलं असत मला... पण फक्त एक गाणं देउन काम भागवतो !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- We don't talk anymore, we don't talk anymore, We don't talk anymore, like we used to do... (feat. Selena Gomez) :- Charlie Puth [Official Video]

आरोही 22/03/2017 - 11:34
अतिशय सुंदर लेख. खूप माहिती मिळाली . साडी नेसायला आवडतेच.आणि भारतात तर इतक्या विविध पद्धतीने साडी नेसली जाते.त्यामुळे या वस्त्रावर खूप प्रेम आहे.या मस्त लेखासाठी खूप सारे आभार अजयाताई

बरखा 24/03/2017 - 16:43
साडी बद्दल खुप छान माहीती दिलीत. जुना ईतिहास ते आत्तपर्यतचा साडीचा वापर या बद्दल छान माहीती मिळाली.

सूड 24/03/2017 - 18:33
व्यवस्थित साडी नेसलेल्या आणि ती कॅरी करता येणार्‍या मुली-बायका-काकूज चारचौघींत नक्कीच उजव्या दिसतात. काही जणी साडी नेसल्यानंतर गौर सजवल्यासारख्या ढिम्म बसतात किंवा काहींनी जे काही नेसलंय त्याला साडी का म्हणावं हा प्रश्न पडतो.

अजया 25/03/2017 - 12:38
मार्मिक निरीक्षण ! सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद !

आकाशाशी जडले नाते - रचना भाटवडेकर

सानिकास्वप्निल ·
. .

--(मुलाखत भाषांतरः अजया)

. आपल्यापैकी प्रत्येकाने लहानपणी काही स्वप्ने बघितलेली असतात. मोठे झाल्यावर अमुक क्षेत्रात करिअर करायचे किंवा मी तमुक होईन. पण सगळ्यांनाच आपले स्वप्न पूर्ण करता येत नाही. काही वेळेला परिस्थिती साथ देत नाही, तर काही वेळेला आपल्या आवडी बदललेल्या असतात, तर काही वेळेला काळाची गरज आणि त्यानुसार आपल्या गरजा पूर्ण करण्याचा मार्ग बदललेला असतो. फार कमी लोक त्या पूर्ण करतात. खरेच, सामान्यातील असामान्य असे ते लोक असतात.

सविता००१ 09/03/2017 - 10:37
अतिशय सुरेख मुलाखत गं सानू. आपलं कुतूहल आपल्याला छंदात आणि व्यवसायातही बदलता आलं की किती छान.. नाही का? कंटाळा हा फॅक्टरच नाही. फारच सुंदर, सहज समजेल असं त्यांनी समजावलंय. बेस्ट

पैसा 10/03/2017 - 10:57
सुरेख ओळख! आपल्या आवडीला रोजचे काम बनवणे सगळ्यांनाच जमत नाही! छान मुलाखत सानिका आणि अजया!

छान झाली आहे मुलाखत सानिका आणि अजया ताई... इतकी कर्तृत्ववान, स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेगळ्या वाटेने जाणारी रचना ताई आणि तिला साथ देणारे तिचे आई बाबा यांना जवळून ओळखते याचा अभिमान आहे...तिला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!!

रुपी 13/04/2017 - 01:33
फार छान आणि प्रेरणादायी मुलाखत. खूप कमी लोकांना स्वतःचे स्वप्न जगायला आणि त्यासाठी इतके कष्ट घ्यायला जमते. हेडर-फूटरही खूप सुंदर आहेत.

काSssहे लायेssss परदेssssस

पलाश ·
. बदली बदली दुनिया है मेरी। जादू है ये क्या तेरे नैनन का? आपलं जग बदलत जातं, हे अगदी खरं!! या बदलाचंं तरुण वयात असणारंं 'नैनका जादू' हे एक कारण भलतंच गोड!! बदलांसाठीची इतर कडू-गोड व्यावहारिक कारणं मात्र अनेक. वाढणारं वय व अनुभव हे या कारणांपैकीचे दोन मानकरी. नवर्‍याच्या नोकरीत बदली चालू झाल्याने गेली १६ वर्षं घरं आणि गावंही बदलली. अशी एकूण ६ घरं बदलली. घर बदललं की परिसर बदलतो आणि शेजारही. प्रत्येक वेळी वेगवेगळे अनुभव आणि शहाणपण मिळालं. याचंच एक उदाहरण म्हणजे माझी मुंबईतली एक शेजारीण.

मनिमौ 08/03/2017 - 15:53
ताई. मला कधीकधी मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलय म्हणून महाराष्ट्रात जन्म झाला अस वाटत. आता तुझा लेख वाचून समज दृढ झाला

पद्मावति 08/03/2017 - 16:03
मला कधीकधी मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलय म्हणून महाराष्ट्रात जन्म झाला अस वाटत. आता तुझा लेख वाचून समज दृढ झाला
अगदी अगदी. लेख आवडलाच.

रॉजरमूर 08/03/2017 - 16:15
छान लेख ....! तिकडच्या लोकांची शुद्ध हिंदी मात्र ऐकण्या सारखी असते . शीर्षक वाचून आधी असं वाटलं की , झी मराठी वर सध्या सुरु असलेल्या त्या भंगार मालिकेवर धागा आला की काय ....?

In reply to by रॉजरमूर

प्रीत-मोहर 09/03/2017 - 11:03
हा हा मलाही असच वाटलं होत. लेख फार छान आहे ताई हे असं वातावरण अजूनही आहेच. फार नाही १ दिड वर्षापुर्वी नवर्‍याच्या एका मित्राच्या मेवणीच्या लग्नातल्या गोष्टी अजून आठवताहेत. ह्या दोन्ही मुली आणि त्यांचा भाऊ आर्मी किड्स. एकदम मोडर्न. गोव्यात वाढलेली. त्यात आई नसल्याने घरात टिपीकल वातावरण नाही. पण तिथे युपीमधे धाकट्या बहिणीच्या लग्नात गेल्यावर स्त्रीयांनी घुंघटशिवाय रहायचं नाही, एक्टं फिरायच नाही हे नियम. वधुपक्ष नवरदेवाची आणि कुटुंबियांची सम्जुत काढत होताच. पण मोठे जावई देखील मग रुसुन बसले मलाही गाडी हवी!!! आणि जिच लग्न होत होत तिला तिच्या माहेरच्यांचे हाल होत असताना या सगळ्याच कौतुक होत आणि!! तुमची लग्नं पचकी असतात कुणी रुसतच नाही हे आणि वरून. हात जोडून नमस्कार केला आणि दुसर्‍या दिवशी घरची वाट धरली .

उत्तर भारतात मीही बऱ्याचदा फिरलो कामानिमित्ताने. अगदी अशीच परिस्थिती आहे काही ठिकाणी. हुंड्याच्या कथा तर एकाहून एक सरस. माझ्या ओळखीचा एक तरुण ज्याला एक वाक्यही इंग्रजीत लिहिता येत नाही त्याला प्रिन्सिपल बायका आणि १८ लाख हुंडा मिळाला. मुंबईत नोकरीला आहे एवढेच कारण. तीही बापाच्या जोरावर.

रेवती 09/03/2017 - 18:55
बापरे! हे असं अजूनही भारतात आहे याबद्दल कल्पना नव्हती. परराज्यात जाऊन तेथील नव्या गोष्ती शिकणं ही मोठी गोष्ट आहे त्यांच्यासाठी. पलाशजी, अब आप भी हमें पनीर बनाना सिखा दिजिए.......क्रिप्या. हमी भी आपकी हटकून आठवण काढेंगे.

चिगो 16/03/2017 - 16:10
गावातच माहेरी जायचं असेल तर एक तर वडील/भाऊ किंवा या घरातला कोणी पुरुष सोबत हवा. असं घरचं पुरुषमाणूस सोबत नसताना जाऊ नाही शकत आम्ही कुठे!
अजुनही मुल झाल्यावर नवरा किंवा सासरचं कुणी घ्यायला आलं नाही, म्हणून माहेरीच राहतात पोरी कित्येक दिवस.. आणि ही सो कॉल्ड उच्चशिक्षीत घरांमधलीदेखील परीस्थिती आहे. पन्नास-साठ वर्षांपुर्वी महाराष्ट्रातदेखील पोरीला न्यायला सासरचे आले नाहीत, म्हणून आयुष्य माहेरीच कुंठत जगणार्‍या बायका होत्या.. :-(

मदनबाण 17/03/2017 - 08:25
सु रे ख ले ख न ! क्षणभर मला अम्माजी आणि ढम्माजीच्या कटकारस्थांनवर लेख आहे की काय ? असं वाटुन गेलं होत ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- We don't talk anymore, we don't talk anymore, We don't talk anymore, like we used to do... (feat. Selena Gomez) :- Charlie Puth [Official Video]

पलाश 20/03/2017 - 11:31
सर्व वाचकांना व प्रतिसाद देणार्‍या सदस्यांना धन्यवाद!! शीर्षक सध्या प्रसिद्ध असलेल्या मराठी मालिकेच्या नावाशी साधर्म्य असणारे आहे. नायिकेला अपरिचित ठिकाणी करावे लागलेले स्थानांतरण हा मालिकेशी समान धागा जाणवल्यावर सुरवातीला ठरवलेले "बदली बदली दुनिया है मेरी" शीर्षक बदलले. मालिका आवडणारे व मुळीच न आवडणारे हे दोन्हीही गट या शीर्षकामुळे लेख वाचून गेले असे जाणवले. :) परिस्थिती अजूनही फारशी बदलली नाही हे प्रतिसादांवरून कळालं. हळूहळू का होईना योग्य तो बदल होईल अशी आशा आहे.

जागु 20/03/2017 - 12:19
लेख छान. अनेक ठिकाणी सुधारणा होत आहेत. ज्यांना अशा रुढी परंपरा पटत नाहीत असे कोणीच नसावेत तिथे ज्यांनी ह्या गोष्टी विरोधात बंड पुकारावा? लवकरच तिथली परिस्थितीत सकारात्मक बदल घडो.

मला भावलेल्या नायिका

सपे-पुणे-३० ·
. कोकण ही माझी जन्मभूमी. रत्नागिरी जिल्ह्यातल्या एका लहानशा गावात माझं बालपण गेलं. नंतरचं शिक्षण पुण्यात, काही काळ होस्टेलवर आणि मग लग्नानंतर आता पुण्यात स्थायिक झाले. ह्या आत्तापर्यंतच्या प्रवासात खूप वेगवेगळ्या स्वभावाचे, पार्श्वभूमी असलेले लोक भेटले. त्यांपैकी विशेषकरून स्त्रिया माझ्या कायमच्या लक्षात राहिल्या. अगदी चारचौघींसारख्या असलेल्या ह्या बायका त्यांच्या स्वभावातील एखाद्या विशेष चांगल्या पैलूमुळे किंवा प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करण्याच्या त्यांच्या धडाडीमुळे आजही माझ्या मनात घर करून आहेत.

सविता००१ 09/03/2017 - 11:26
खूप मस्त लिहिलं आहेस. मलाही वाचता वाचता अशा अनेक नात्या-गोत्यातल्या आणि ओळखीच्या नायिका भेटल्या गं. किती गृहित धरलेलं असतं आपण यांना की ही आजी अशीच आहे, ती मावशी अशीच आणि लाडपण करून घेतो आपण. पण त्यांचं खरच कौतुक करावस वाटतंय हे वाचून.

रेवती 10/03/2017 - 02:22
लेखन आवडले. एकदा कोणत्याश्या लेखात उल्लेख होता की आजकालच्या मुलांना पुढे आयुष्यात सहजी न मिळणारी एक गोष्ट असेल. ती म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेल्या माणसांचे आदर्श! पूर्वी आपण पाहिलेल्या इतक्या व्यक्ती आदर्श म्हणाव्यात अश्या होत्या व आपले जीनव सुसह्य केले त्यांनी. आपल्या मुलांसाठी एका दोघांनी आदर्श म्हणून उभे राहणे फार अवघड काम आहे.

मोनू 11/03/2017 - 17:06
खूपच सुरेख शब्दचित्र...अनेक अशा स्त्रिया आठवल्या...हे किती खरंय ना की आपण आदर्श मानण्यासाठी त्या व्यक्ती कोणीतरी नावाजलेल्याच किंवा वलयांकीतच असायला हव्यात असे नाही. सपे बारकावे खूप छान टिपले आहेस गं !

मिसळपाव 11/03/2017 - 19:51
दर वेळेला अहिल्याबाई नी मारी क्युरीच आठवायला लागतात असं नाही. आपल्या आजूबाजूला, कुटुंबात सुद्धा अशी माणसं असतात. गुणांचा ठेवा बाळगून असतात. अहिल्याबाई नी मारी क्युरीचं स्मरण जरूर करावं पण रोजच्या जीवनात या अशा आपापल्या "सुभद्रा" आणि "मामी"च उभारी देतात हे नि:संशय. आणि शेवटचा परिच्छेद
आजकाल मनःशांतीसाठी .............................. मला नव्या जोमाने काम करण्याची ऊर्मी देतात.
हा रोज वाचावा - सगळं व्यवस्थित चालू असताना लक्षात ठेवावा आणि कसोटीचा प्रसंग आल्यावर डोकं शांत ठेउन परिस्थितीला जिद्दिने तोंड देण्याची उर्मी मिळवण्यासाठी वाचावा - असा आहे. (खरं तर लेखाचं शीर्षक वाचून, नायिका = सिनेनायिका समजून, उघडणार नव्हतो. एका सुंदर लेखाला मुकलो असतो!)

नूतन सावंत 13/03/2017 - 10:24
सपे,सुरेख,सरळ भाषेतला,पण मनाला भिडणारा लेख.आपल्या आजूबाजूच्या लोकांंमध्ये अशी कितीतरी व्यक्तिमत्वं दडलेली असतात,ती फक्त पाहता आली पाहिजेत.

जुइ 13/03/2017 - 20:31
रोजच्या जीवनातील नायिकांचे व्यक्तिचित्र अतिशय प्रेरणादायी.

फॅशनची दुनिया -अमला काळे

स्वप्नांची राणी ·
. दोह्याच्या सोशल सर्किटमध्ये उंच, देखण्या अमलाचा सहज वावर डोळ्यात भरण्यासारखा असतो. प्रत्येक वेळी ती वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस तितक्याच आत्मविश्वासाने कॅरी करताना दिसायची. 'किती सुंदर आहे ही, एखाद्या मॉडेलसारखीच!!' असाच विचार नेहमी मनात यायचा आणि कळलं की अमला खरंच त्या ग्लॅमर विश्वामधलीच आहे. फॅशनच्या जगात मराठी नावं तशी अपवादानेच दिसतात. मग अमलाचा हा प्रवास कसा होता, हे तिलाच विचारायचं ठरवलं.

नूतन सावंत 10/03/2017 - 17:39
अमलाला सल्लाम.मुक्या प्राण्याविषयी जागरूक आत्मीयता दाखवणारी अमला खरंच खूप ग्रेट आहे.नाहीतर आम्ही पाहतो ना,भटक्या कुत्र्यांना रस्त्यावर खाऊ खाणारे ,पाळीव कुत्र्यांना रस्त्यवर विधी करायला नेणारे लोक. वस्तुस्थितीच्या पाळण्यात जिद्दीने आंदोळणारी एक अमला हजारोजणींसाठी स्फुर्तीदायक आहे. स्वर,तूही तिला बोलते केले आहेस.तू लिहिती हो.पुलेशु.

मोनू 10/03/2017 - 18:11
खूप आवडली मुलाखत. अमला चा प्रवास थक्क करणारा आहे. सौंदर्याबरोबरच दुर्दम्य इच्छाशक्ती पण दिसते. अमला ला पुढील वातचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ! स्वराताई खूप सुरेख शब्दबद्ध केले आहेस तू. वेगळ्या क्षेत्रातील महिलेची ओळख करून दिल्याबद्दल खूप खूप आभार.

मुखपृष्ठ

मूनशाईन ·
. .

In reply to by मोक्षदा

अभ्या.. 12/03/2017 - 21:59
मोक्षदाताई, डोन्ट माइंड पण मुखपृष्ठाला आपण सुंदर लेख म्हणताहात, तिकडे अनुक्रमणिकेला छान कविता म्हणताहात. मॅटर काय आहे नेमका?

In reply to by चौथा कोनाडा

अभ्या.. 12/03/2017 - 21:50
परफेक्ट चौको. आपल्या सेतूच्या शरद देशपांडेंचा हा फॉन्ट. आयएसएमचा शरद वेगळा आहे पण हा शरद७६ फॉन्ट अगदी अप्रतिम. अगदी हाताने लिहिल्याप्रमाणे.

In reply to by अभ्या..

चौथा कोनाडा 13/03/2017 - 21:46
धन्यु अभ्यादा ! खुपच आवडला हा फॉण्ट मला, क्लासिक ! माबोवर सेतू अ‍ॅडव्हरटाईझींग्च्या या कलंदर कलाकारवर सुंदर लेख वाचला होता. या हातवळणाची सुंदर गोलाई पाहून गवाणकर यांच्या गोल-गोल सुबक व्यंगचित्रांची आठवण झालीय !

ऋषिकेश 13/03/2017 - 14:44
मिपाच्या पहिल्या पानावर झुल्यावर दिसतेय ती मुलगी कोणी काढलीये? बाय एनी चान्स अवंती का? अगदी खरं सांगायचं तर मुखपृष्ठापेक्षाही मुलगी आवडली (मुपृ छानच ए.. पण तरी)