मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

महिला दिन विशेषांक २०१७

महिला दिन कशाला?

सस्नेह ·
. (प्रस्तुत लेखात मांडलेले विचार हे प्रातिनिधिक नसून माझे वैयक्तिक विचार आहेत. इतर कुणी महिला त्यांच्याशी असहमत असू शकतील.) महिला दिन. मीडियाचा महिला-कळवळा-दिन. सोशल मीडियाचा महिला शुभेच्छा दिन. फेसबुक-व्हॉट्स अॅिप-ट्विटरवर संदेशांना, शुभेच्छांना उधाण. सरकारी खात्यांमध्ये महिलांसाठी एक(तरी) दिवस सगळ्या जाच-काचातून सुटकेचा दिन. सार्वजनिक समारंभांना प्रसिद्धीचा दिन. एकूणच, 'महिला महान' हे एक(च) दिवस मान्य करण्याचा दिन. याव्यतिरिक्त इतर ३६४ दिवस मग काहीही धुमाकूळ घाला.

एकला चॉलो रे, मुख फुटे तोर मोनेर कोथा, एकला बोलो रे.....चैताली खटी

कवितानागेश ·
. ...लोक जमलेले असतात. कार्यक्रमासाठी! काही मनापासून आलेले. काही कुणीतरी पकडून आणलेले. काही केवळ उत्सुकता म्हणून. काही परीक्षा पाहण्यासाठी. काही करमणुकीसाठी. काही थोडेसे कंटाळून. पण तरीही सगळे जण एका काहीशा वेगळ्या कार्यक्रमाची वाट पाहत असतात... आणि ती येते. चक्क घोड्यावरून!!! जिजाऊमाता लहानग्या शिवबाला घेऊन घोड्यावरूनच येते. थेट १६व्या शतकातून आजच्या २१व्या शतकात आपल्या लोकांशी थेट संवाद साधायला येते आणि प्रत्येकाच्या मनाला हाक घालते. आपल्या गाण्यातून, बोलण्यातून प्रत्येकाच्या हृदयाला भिडते.

Utterly Butterly

पियुशा ·
.

इ. स. १९६६ला अवतरली ही बाला .. लागे पोस्टर्स चहूकडे अमूलचा बोलबाला

निळे केस, लाल गाल, पोलका डॉट फ्रॉक न भलीमोठी हेअरपिन, गोडुली, बबली, छबिली, बिना नोजवाली ब्युटी क्वीन

क्रिकेट, सिनेमा, राजकारण, सीमा प्रश्न, युद्ध .. अमूल गर्लच्या दोन ओळी वाचून येते हरपलेली शूद्ध

कधीकधी खुसखुशीत, कधीकधी गोड लाथा अमूल गर्लच्या तोंडी आपल्या मनीच्या बाता

कधी खेळी, कधी कोपरखळी .. कधी गंभीर, कधी खुळी ..

वात्सल्यसिंधू माझी आजी

मोनु ·
. माझी आजी... अत्यंत कठीण परिस्थितीतील धैर्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझी आजी. तिच्याबद्दल खूप काही लिहायचे बर्‍याच दिवसांपासून मनात आहे, पण काय काय लिहू आणि काय अलिखित ठेवू ते कळत नव्हते. महिला दिन विशेषांकाच्या निमित्ताने ही संधी मिळाली. जगाच्या दृष्टीने तिचे कर्तृत्व काही असामान्य नाही, पण माझ्या नजरेने पाहिले तर नक्कीच आहे. वयाच्या अवघ्या २०-२२व्या वर्षी नियतीने वैधव्याचे दान पदरात टाकले. पदरात दोन लहान लेकरे.

स्वयंपाकातली सुपरस्टार : अनघा गोडबोले

रुपी ·
. 'Cooking demands attention, patience, and above all, a respect for the gifts of the earth.' अगदी असंच मानून वाटचाल करणार्‍या सोलापूरच्या अनघा गोडबोलेने सॅन फ्रान्सिस्कोपासून मास्टरशेफ इंडियाच्या ५व्या भागात सेमी-फायनलपर्यंत मजल मारली! सेलिब्रिटी होऊनही जमिनीवर पाय असणार्‍या अनघाने खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि स्वतःचे अनुभव, विचार, आणि फोटोही आनंदाने या मुलाखतीसाठी दिले.

. प्रश्नः अनघा, नमस्कार.

काही पणत्या... त्यांच्यासाठी! - डॉ. प्रतिभा आठवले

मीराताई ·
. दिवाळी आली की सणाची तयारी, खरेदी, फिरणे या सगळ्याच्या योजना घरोघरी सुरू होतात. पण एक व्यक्ती अशीही आहे की, दिवाळीची चाहूल लागतानाच तिच्या बॅगा औषधांनी आणि कामाच्या इतर वस्तूंनी भरल्या जातात. ही व्यक्ती म्हणजे अहमदाबादच्या डॉ. प्रतिभा आठवले, दंतरोगतज्ज्ञ! गेली १६-१७ वर्षे त्या दर दिवाळीच्या सुटीत, कधीकधी मेमध्येसुध्दा ईशान्येकडील दुर्गम प्रदेशात नियमित जातात. दोन ते तीन आठवड्यांच्या तिथल्या मुक्कामात त्या तीन-तीन दिवसांची शिबिरे घेतात.

विरंगुळ्यातून व्यवसायाकडे

मूनशाईन ·
. लहानपणी घरी एखादे नवीन उपकरण घेतले की त्याचा मोठा रिकामा बॉक्स रिकामा व्हायची मी वाटच बघायचे. बागेमध्ये जाईच्या वेलाखाली बॉक्स उपडा ठेवून त्याचे छोटे घर करायचे. आम्ही दोघी मैत्रिणी दिवसभर तिथे रमायचो. एकदा वर्तमानपत्रातल्या नव्या इमारतीच्या जाहिरातीने आमचे फार लक्ष वेधले. दुसऱ्या दिवशी आमच्या कार्डबोर्डच्या घराबाहेर आम्ही ऑफिस थाटले. माझी मैत्रीण बिल्डर आणि मी तिची आर्किटेक्ट. बाबा घरी आल्यावर रोज त्यांना आमच्या ऑफिसमध्ये येऊन, एक घर बांधायचं असे बळजबरी म्हणायला लागे.

उंच माझा झोका - अभिवाचन

अनाहिता ·
. . **************************** **************************** . या वर्षीच्या महिला दिन विशेषांकात काही निवडक लेखांचे, उतार्‍यांचे किंवा कवितांचे अभिवाचन करावे, अशी कल्पना मितानने मांडली आणि त्याप्रमाणे लगेच तसे आवाहन करण्यात आले. काय वाचता येईल, किती वेळाचे असावे, कॉपीराईटचे काय, आपला आवाज बरा वाटेल का, कशावर रेकॉर्ड करायचे, कुठे स्टोअर करायचे अशा अनेक प्रश्नांवर चर्चा घडल्या.

ट्रेकहिता

कविता१९७८ ·
. माझा जन्मच डोंगराळ भाग आणि समुद्र याच्या आसपास झाल्याने लहानपणी टेकडी चढणे मला काही नवीन नव्हते. आमची शेती आणि माझे आजोळ हे अगदीच डोंगरालगत होते. त्यामुळे लहानपणी आजोळी गेले की जवळची टेकडी चढणे नेहमीचेच असे. त्या टेकडीचीही खासियत अशी की थोड्या अंतरावर अरुणा इराणीचे फार्म हाउस असल्याने कोणे एके काळी तिथे जुन्या सिनेमाचे चित्रीकरण झाले होते. त्या काळी गॅस गावात पोहोचले नसल्याने चुलीसाठी लागणारे सरपण गोळा करण्यासाठी बायका लांबवर मोठ्या डोंगरावर जात असत.

बदलते मातृविश्व

मधुरा देशपांडे ·
. ऑक्टोबर महिना नुकताच सुरू झाला होता. वातावरण गरम होतं. दुपारी झोप झाल्यावर निवांतपणे आपल्या बेडरूममध्ये एसी लावून शरयू पुस्तक वाचत बसली होती. कितीतरी वर्षांनी अशी शांततेत ती माहेरी आली होती. एरवी ऑफिस, सुट्ट्या, बाहेरच्या ट्रिप्स या सगळ्यात सतत येऊन-जाऊन असली, तरीही असा वेळ मिळाला नव्हता. तेवढ्यात आजीने हाक मारली, "शरू, ४ वाजले, चहा करू की मस्त लिंबू सरबत, की मग नारळ पाणी घेऊन येऊ खाली कोपऱ्यावर जाऊन?" शरयू नुसतीच हसली.