कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ४: रोमांचक मुन्स्यारीच्या वाटेवर!
✪ उत्तराखंडमधल्या दुर्गम वाटेवरचा जीप प्रवास
✪ गोरी गंगेच्या तीरावर!
✪ जौलजिबी परिसरातल्या मदतकार्याच्या आठ्वणी
✪ मुन्सियारी- एक विलक्षण गाव
✪ नंदा देवी मंदिराचा ट्रेक
✪ पंचाचुली शिखरांच्या मागे होणारा चंद्रोदय!
६ डिसेंबरच्या पहाटे सत्गडवरून निघालो. जेमतेम उजाडायला लागलं आहे आणि जीप यायची वेळ झाली. आदित्यने मला खाली रोडवर सोडलं. सगळ्यांत मागच्या सीटवर बसून निघालो. सोबत टेलिस्कोप आणि बायनॅक्युलर असल्यामुळे ते सामान माझ्यासोबतच ठेवलं. सत्गडवरून मुन्सियारी अंतराने कमी म्हणजे फक्त १०८ किमी आहे. पण वाटेत सगळा पहाड़ी प्रदेश आणि बिकट रस्ता! त्यामुळे जायला निदान ४-५ तास तरी लागणारच.
मिसळपाव