Skip to main content

संवादाची ऐशी तैशी

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 10/04/2008 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, बर्‍याच दिवसांनी लिहितोय. जरा बिझी होतो. पण आधी सातत्याने लिहूनही आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळूनही, `सध्या कुठे उलथलायंस बाबा?' असं विचारणारा एकही `माई का लाल' इथे भेटला नाही, याचं आश्चर्य वाटतंय. असो. सध्या हे वाचा. ----------------------- तसे ते रोजच्या बोलण्यातलीच प्रश्‍न आणि वाक्‍ये. पण काही काही वेळा डोकं उठविणारी. तुम्हालाही अशाच प्रश्‍नांचा सामना अनेकदा करावा लागला असेल. बघा बरं आठवून...! 1. हा...कोन बोल्तय? - अरे गाढवा! फोन तू केलायंस ना? मग तू आधी सांग, तू "कोन' बोल्तोय्स ते! मग माझं बघू. --- 2. कुठे आहेस? - मसणात! तुला काय करायचंय?

मद्य काव्य... मदिरेचे हाणतो पेले, धुंद तळीराम

लेखक तळीराम यांनी गुरुवार, 10/04/2008 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
मदिरेचे हाणतो पेले, धुंद तळीराम बेवड्या या भक्तासाठी, रोज असे शाम* (संध्याकाळ) एक एक प्याला हाती, भक्त जाई पीत एक एक पेगा जोडी, अखेरीस चीत रोजचेच काम दास `रम'नामी रंगे, मुखा येई वास एक एक धाबा धुंडे, होऊनिया लास हाती ना छदाम पिऊन रिक्त झाला पेला, सरे सर्व `जाम' ठायि ठायि वाटेवरती, ट्रॅफीक ही जाम जागीच आराम हळु हळु उघडी डोळे, पाहि दिवा-खांब नाकावरी नाही चष्मा, जोडे तिथे लांब खांबातळी राम! *(संध्याकाळ)

('रेशमीया' मेल्यानी)

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 10/04/2008 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा 'ती' गाढवी आरोळी आणि अर्थातच शांताबाईंचे सुंदर गीत 'रेशमाच्या रेघांनी' (टीप - आधी प्रकाशित केलेली आवृत्ती सुधारणा करुन पुनःप्रकाशित करतो आहे.) 'रेशमीया' मेल्यानी, गाढवाच्या जोरानी पुन्हा आहे गळा आज काढीला खरारा करावा जसा घोडीला! जुनी सारी गाणी लाखमोलाची काय सांगू गोडी सूरतालाची ऐकते मी 'पंचम'दा, 'मदना'च्या जोडीला खरारा करावा जसा घोडीला! लावलेला 'किशोर' मी तोर्‍यात अवचित आले त्याच्या मार्‍यात त्यानं माझ्या कानाचा, मुडदा का पाडीला? खरारा करावा जसा घोडीला! भीड काही ठेवा 'रफी''मन्नाची' मुर्वत राखा साता सुरांची
Taxonomy upgrade extras

मी (गंभीर) मराठी

लेखक आनंद घारे यांनी गुरुवार, 10/04/2008 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी भाषेच्या शुध्दतेचा आग्रह धरण्यावर ' मी मराठी' या लेखात मी मिसळपावावर उपहासाने लिहिले होते. त्यावर बर्‍याच जणांचे प्रतिसाद आले. " त्यातला विनोदाचा भाग सोडला तरी हा लेख गंभीरपणे विचार करायला प्रवृत्त करतो." अशा प्रकारचे कोणीतरी लिहिले होते. असा थोडासा 'गंभीर विचार' मी लेख लिहिण्यापूर्वीच केलेला होता. हातासरशी तो सांगून टाकावा, त्यासाठी उगाच वाचकांच्या डोक्याला वेगळा शीण नको म्हणून मीच त्यावर एक गंभीर स्वरूपाचा प्रतिसाद लिहिला. पण बहुधा कोणीच तो वाचला नसावा. ते ही तसे बरोबरच आहे. मिसळ तयार झाल्यावर ती लगेचच फस्त करतात. ती शिळी झाल्यानंतर कोणीही तिच्याकडे पहात नाही.

संडे स्पेशल (उंदियो)

लेखक स्वाती राजेश यांनी गुरुवार, 10/04/2008 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
उंदियो हा गुजराथी प्रकार आहे..तरला दलाल च्या रेसिपी मधे थोडा बदल केला आहे. साहित्यः १/२ किलो सुरती पापडी १/२ किलो कंद १/४ किलो बटाटे लहान १/४ किलो रताळी १/४ किलो वांगी लहान ३ कच्ची केळी मेथी पकोडा: १ मेथी पेंडी बेसन १ टे.स्पून ओवा, हळद, पाव चमचा खायचा सोडा मीठ मसाला: अर्धा नारळ खोवलेला तीन चतुर्थांश कप कोथिंबीर अर्धा कप पातीचा लसूण(पाती सकट चिरणे) २ टी.स्पून धने पावडर २ टी.स्पून जिरे पावडर १ टे.स्पून हिरवी मिरची, आलं पेस्ट २ टी.स्पून तिखट ४ टी.प्सून साखर १ टे.स्पून लिंबु रस मीठ चवीनुसार हिंग आणि तेल फोडणीसाठी १.प्रथम सुरती पापडी अर्धवट सोलावी.
Taxonomy upgrade extras

उपकरणे घेताना

लेखक वरदा यांनी गुरुवार, 10/04/2008 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
मला स्वयपाकघरात बर्‍याचशा गोष्टी घेताना कळत नाही काय घ्यावं इथं अमेरीकेत सुमीत चा मिक्सर मिळत नाही (म्हणजे मिळतो पण फारच महाग)आणि बाकीचे साधे मिक्सर जाम रद्दड असतात. अगदी साध्या सुरीत सुद्धा इतके प्रकार असतात की समजत नाही काय घ्याव. मी मेसीज मधून मस्त ४ सुर्‍यांचा सेट आणला आणि तो एवढा घाण आहे १ महिन्यानंतर आता कांदा कापायलाही त्रास होतो. ह्या विकेंडला जाऊन परत द्यावा लागेल. तुम्ही कुठुन कुठल्या ब्रँडची उअपकरणे घेता हे इथे सांगाल का? आणि मग ही कुठलीही उपकरणे असतील अगदी स्क्रू ड्राईव्हर आणि तत्स्म गोष्टी असल्या तरी चालेल. सुरुवात करु कॉफी मेकर आणि मिक्सरने.

भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग ..... भंगडा पॉप आर्टिस्ट ... भाग १

लेखक भडकमकर मास्तर यांनी गुरुवार, 10/04/2008 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या स्पर्धेच्या युगात नवयुवक भांबावून गेला आहे.... मागे पडण्याच्या भीतीने घाबरला आहे, पण आता चिंता नको...आम्ही आलो आहोत आमचे करीअर गायडंस वर्ग घेऊन...प्रत्येक भागात एका नवीन करीअर ची ओळख करून द्यायचा प्रयत्न करू... आपल्याला गायक व्हायचे आहे काय? .. सुरेल गळा नाही, मेहनत नको, गुरूकडे शिकायला वेळ नाही? काही हरकत नाही...

एप्रिल फळ (४)

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 10/04/2008 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
विजूभाऊंनी सांगितल्याप्रमाणे हे लेखन आता अद्ययवत करण्यात आलेले आहे. - जनरल डायर. बाजारात आंब्यांचा दरवळ असतो. कोठेही नजर फिरवली तरी आंबेच आंबे नजरेस पडतात.

टोमॅटो पुलाव

लेखक प्रभाकर पेठकर यांनी गुरुवार, 10/04/2008 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः जुना बासमती तांदूळ - २ वाट्या लालबुंद टोमॅटो - ५-६ नग आलं - १ इंच कढी लिंब - २ काड्या काश्मिरी मिरची पावडर - १ टी स्पून (अथवा तिखट रंगहीन असेल तर किंचीत लाल रंग) मीठ - चवीनुसार. साखर - चवीनुसार. तेल - ३ टेबल स्पून जिरं - १ टी स्पून बारीक चिरलेली कोथिबीर - सजावटीसाठी. तयारी: तांदूळ २०-२५ मिनिटे भिजत टाकावेत. गॅस वर पाणी उकळवून त्यात टोमॅटो टाकावेत. २-३ मिनिटे उकळवून ते उकळत्या पाण्यातून काढून बर्फाच्या (किंवा साध्या) पाण्यात टाकावेत.
Taxonomy upgrade extras

भक्ति-शक्ति

लेखक झकासराव यांनी बुधवार, 09/04/2008 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
भक्ति शक्ति- निगडि येथील हे शिल्प. अर्थात हे पुर्ण शिल्प नाही. ह्याची कल्पना छान आहे. शिवाजी महाराजांच्या मागे मावळे आहेत आणि तुकाराम महाराजांच्या मागे वारकरी आहेत. आणि त्यांची भेट अस शिल्प आहे. हे पुर्ण शिल्प मला एकत्रीत कॅमेर्‍यात बंदिस्त नाही करता आल. त्याला कसलेला आणि अनुभवी छायाचित्रकार हवा :) ध्यास घेवुन आभाळाएवढी कामगिरि करणार्‍या ह्या दोन महामानवाना वंदन करतो.