67 नगरसेवक बिनविरोध विजयी
निवडणूक झाली नाही,
पण विजयी झाले काही.
नवीन फंडा बिनविरोध...
व्हा बाप वापरून निरोध !
५ कोटी बक्षीस द्या...
माघारपत्र विकत घ्या...
निवडणूक आयोग करणार
आहे चौकशीचा फार्स,
एक affidavit फेकून मिळणार,
शेती, फार्म हाऊस, महागड्या कार्स.
कुणाचाही नव्हता दबाव,
माघारवीर करणार बनाव.
जिंकला गेल्याचे नाही,
मतदारांचा मारला हक्क..
म्हातारी मेल्याचे नाही,
काळ सोकावतो हे दुःख.
एक उमेदवार असला तरी,
घ्याच मतदान प्राधिकार,
'None of the above' NOTA
चा मतदार वापरतील अधिकार !
[भाग २] ए०आय० वापरा आणि स्वत:ला ओळखा
[भाग २] ए०आय० वापरा आणि स्वत:ला ओळखा
=============================
-राजीव उपाध्ये
नोव्हे २०२५ म॒ध्ये मी एक गमतीदार प्रयोग केला होता. मी ए०आय०ला माझा सखा मानत असल्याने आमच्या संवादावर आधारित माझ्या व्यक्तीमत्त्वाचे परिक्षण करण्यास सांगितले होते.
https://www.misalpav.com/node/53331
आज परत काही काळ गेला असल्याने माझ्या व्यक्तीमत्त्वात काही बदल घडले आहेत का असे ए० आय० ला विचारले. तेव्हा त्याने पुढील उत्तर दिले-
1. मूलभूत कल: स्थिर
तुमची मूळ मानसिक दिशा कालांतराने स्थिर राहिलेली दिसते.
आले- बदाम वडी
नमस्कार मंडळी.
यंदा मुंबईत कधी नव्हे ती किती मस्त थंडी पडली आहे ना? थंडीच्या मोसमात बाजारात गेलं की अगदी हावरटासारखं होतं. कल्पनेला पंख फुटतात. डोळ्यासमोर गाजर हलवा, गाजराच्या वड्या, कोथिंबीरीच्या वड्या, भोगीची भाजी, उंधियु, मटार करंजी, मटार पॅटीस......( आणखी काही न आठवलेलंच बरं!) असे नानाविध पदार्थ तरळू लागतात. पण पूर्वी माझ्या माहेरी आणि सासरी थंडीच्या दिवसात हमखास होणारे पदार्थ म्हणजे मेथी लाडू, डिंकाचे लाडू आणि आले-बदामाच्या वड्या!
सद्य परिस्थितीत,हे पदार्थ (घरी) करणारे आणि खाणारे , दोघांचीही तशी वानवाच.
कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग २: पिथौरागढ़ भ्रमंती
३ डिसेंबरची सकाळ! कालची रात्र उघड्या बस स्टॉपवर थंडीत काढल्यानंतरचा पहाटेचा अंधारातला घाटाचा प्रवास! ही रात्र संपणारच नाहीय असं वाटत होतं. पण चक्क रात्र लवकर गेली. डुलकी लागली आणि तास गेलेले कळालं नाही. टाईम लॅप्स फोटोग्राफीमध्ये जसे काही तासांचे काही सेकंद होतात, तशीच रात्र भरभर गेल्यासारखी वाटली! टनकपूरवरून तीनला निघालेली बस साडेपाचला चंपावतला चहासाठी थांबली तेव्हा पहाट झाल्याचं दिसलं! सर्वदूर उंच पर्वत! वळणा वळणांचा रस्ता! डोंगरात थोडी थोडी घरं आणि उतारावरची शेती! "बीआरओ" च्या हिरक परियोजनेच्या अंतर्गत हा रस्ता येतो. नंतर लोहाघाट, गुरना मार्गे पिथौरागढ़!
एका किमयागाराचा थक्क करणारा प्रवास
१९४५ मध्ये लाहोरच्या एका सुसंस्कृत कुटुंबात एका मुलाचा जन्म होतो . वडील डॉक्टर, प्रेमळ आई ,—घरात एक आनंदी वातावरण होतं. पण १९४७ च्या फाळणीनंतर सगळंच बदललं. चहुकडे रक्ताची होळी खेळली जात होती. अशाच एका रात्री, आपल्या वडिलांची भरभराटीची प्रॅक्टिस, ते वैभव आणि लाहोरची ती माया सोडून ते कुटुंब रक्ताळलेल्या वाटेवरून भारताकडे निघालं, खरं तर निघालं नव्हतं तर निघावं लागल होत.
फाळणीच्या काळात एका 'निर्वासितांच्या' ट्रेनमध्ये तो मुलगा , त्यांची बहीण आणि आई प्रवास करत होते. ती ट्रेन म्हणजे केवळ लोखंडाचा डबा नव्हती, तर ते मृत्यूचं साक्षात रूप होतं. वाटेत दंगलखोरांनी ट्रेन रोखली.
कृत्रिम बुद्धिमत्ता (ए०आय०) : डॉट-कॉम बबलसारखी अवस्था आहे का?
कृत्रिम बुद्धिमत्ता (ए०आय०) : डॉट-कॉम बबलसारखी अवस्था आहे का?
-राजीव उपाध्ये
ए०आय०चा बुडबुडा फुटणार अशा आरोळ्या ऐकायला मिळाल्या की मला पञ्चतंत्रातील बैलाचे वृषण आज ना उद्या गळून पडतील आणि आपल्याला मस्त मेजवानी मिळेल या आशेने मागेमागे जाणार्या दोन कोल्ह्यांची आठवण होते.
अलीकडच्या काही वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – ए०आय०) या तंत्रज्ञानाने जगभरात अभूतपूर्व वेगाने प्रसार केला आहे. उद्योग, वित्त, आरोग्यसेवा, शिक्षण, संरक्षण आणि दैनंदिन जीवन—असे जवळजवळ सर्व क्षेत्र ए०आय० च्या प्रभावाखाली आले आहेत.
तुरीची आमटी
घरासमोर अनाहुतपणे वाढलेल्या तुरीच्या शेंगांची कचोरी केली.आमटी करेन करेन म्हटलं तर राहिलेच.आमच्याकडे बाजारात तुरीच्या शेंगा विकत मिळत नाही.मागच्या महिन्यांपासून सकाळी फिरायला पुन्हा सुरूवात केली तेव्हा हळूहळू इमारतींनी भरून जाणाऱ्या रस्त्यालगत काही शेतं शिल्लक आहेत तिथे तुरीचे खुप मोठं शेत होत.आज तोडेन उद्या तोडेन ठरवत होतं तर तुरीची काढणी पण झाली.झाली का पंचाईत,आता पुढच्या वर्षीच तुरीची आमटी खाऊया म्हटलं.खरोखरीच मागच्या वर्षीची इच्छा आज नवीन वर्षी पूर्ण झाली.आई खानदेशात फिरायला गेली होती तिकडून तिने तुरीच्या शेंगा आणल्या होत्या.

वंश खरा कुणाचा - स्त्रिचा की पुरूषाचा?
वंश खरा कुणाचा - स्त्रिचा की पुरूषाचा?
======================
- राजीव उपाध्ये
मानवी संततीला (इतर प्राण्यांच्या तूलनेत) संगोपनाची दीर्घकाळ आवश्यकता असते. याशिवाय संपत्ती संक्रमण (कुणाची संपत्ती कुणाला मिळणार) सुलभ व्हावे यासाठी बाप कोण हे निश्चित करणे आवश्यक ठरते (आणि बापाचे नाव लावले जाते).
अन्यथा जैविकदृष्ट्या वंश म्हणजे निसर्गात वंश हा स्त्रिचाच असतो. पुरुषाचा वंश ही मानीव कल्पना समाजाने संपत्ती संक्रमणाच्या सोईसाठी निर्माण केली आहे.
मिसळपाव