Skip to main content

करप्शन

लेखक श्रीराम पेंडसे यांनी मंगळवार, 09/03/2010 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
करप्शन श्री. संदीप खरे यांच्या 'नेणिवेची अक्षरे' या काव्यसंग्रहात त्यांची "दाढी काढून पाहिला....." अशी एक कविता आहे. ही कविता ते " आयुष्यावर...." कार्यक्रमातही खूपच प्रभावीपणे सादर करतात. ही कविता म्हणजे माझ्या या कवितेमागची प्रेरणा आहे. आणि म्हणून श्री. संदीप खरे यांची क्षमा मागून ही कविता सादर करत आहे.........

ईशान्य भारताविषयीचे महाराष्ट्र टाईम्स मधील काही लेखांचे दुवे

लेखक Dipankar यांनी मंगळवार, 09/03/2010 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
ईशान्य भारताविषयीचे महाराष्ट्र टाईम्स मधील काही माहितीपूर्ण लेखांचे दुवे http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5406091.cms http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5624861.cms http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5597631.cms http://maharashtratimes.indiatime

चला जोडीनं तण हे काढू, चला ठिबकसिंचन करू

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 09/03/2010 06:29 या दिवशी प्रकाशित केले.
चला जोडीनं तण हे काढू, चला ठिबकसिंचन करू पिक आलंया जोमात औंदा त्येच्यात तणं लागलं वाढू ... अहो राया चला जोडीनं तण हे काढू ||धृ|| अहो सजणा चला जोडीनं तण हे काढू अहो सख्या चला जोडीनं तण हे काढू अहो धनी चला जोडीनं तण हे काढू अहो दिलवरा जोडीनं तण हे काढू बांधानं या येता जाता काटं बोचत्यात पायी /* (बांधावर असणारे चुबूक काटे हे सुद्धा एका तणाचाच प्रकार आहे.) */ काढून काढून मी गं थकले उपाय गावंना काही काट्याकुट्यात कशाला फिरता?... अहो काट्याकुट्यात कशाला फिरता? काटं

शेषप्रश्न/सव्यसाची कुठे मिळेल ??

लेखक अर्धवटराव यांनी मंगळवार, 09/03/2010 03:08 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी !! आत्ताच "वल्लीं"चा उत्क्रुष्ट मराठी कादंबर्‍यांबद्दलचा काथ्याकुट वाचत होतो. अचानक 'श्रीमानयोगी'ला नरहर करुंदकनांनि दिलेल्या प्रस्तावनेची आठवण झाली. त्या प्रस्तावनेत करुंदकरांनी कुठल्या 'शेषप्रश्न' (आत्ता नेमकं नाव आठवत नाहि) या सव्यसाची वर अधारीत कादंबरीचा उल्लेख केला आहे. त्या कादंबरीचे नेमके नाव/प्रकाशक वगैरे माहिती कोणास असेल तर क्रुपा करुन सांगणे. या जुजबी माहितीवर मी ति कादंबरी पुण्यात अप्पा बळवंत चौकात बरीच शोधली... पण नाहि सापडली :( (शोधात असलेला) अर्धवटराव -रेडि टु थिंक

वादाचा रबर..............

लेखक मंगेशपावसकर यांनी मंगळवार, 09/03/2010 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक वाचकांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे वादाचा रबर हा ओढल्याने बळावतो ही नक्कीच खरी गोष्ट आहे. वाचकांचा आधारामुळे व काल सकाळी तात्यांबरोबर झालेल्या सामंजस्यपूर्ण वार्तालापामुळे हा चिघळलेला वाद संपुष्टात आला आहे. मी माझे काव्य,व्यंग तसेच प्रसंग लेखन या पुढेही मिपावरच समर्पित करणार आहे. अनेक गोष्टी बद्दल सल्लामसलत करत असताना दस्तुरखुद्द तात्यासाहेबांनी लेखन करा वाचा व प्रतिक्रिया देत रहा व संपर्कात राहा असे प्रेमाने सांगितले, अगदी मित्रासारखे अर्थात त्यांचा दैनंदिन कारभाराची मला जाणीव होतीच.

लोकशिक्षण ही गुरुकिल्ली

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी सोमवार, 08/03/2010 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
लोकशिक्षण ही गुरुकिकिल्ली
सांडपाण्याच्या व्यवस्थापनाला पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्व आहे. अमेरिकेसारख्या देशातही ही समस्या आहे. समरव्हील या शहरात त्या दृष्टीने अभ्यास करण्यात आल. भारतातही या प्रश्नी खुप काही करणे शकय आहे फक्त त्यासाठी लोकशिक्षण सर्वात महत्वाचे आहे. ....... पुढे वाचा हा दैनिक सकाळ दि. ८ मार्च २०१० च्या पुणे आवृत्तीत लेख वाचल्यावर लिखाण ओळखीचे वाटायला लागले. पण हे विठ्ठल देशपांडे कोण बाबा?

२ सेकन्दात स्वर्गानुभुति

लेखक तुका म्हणे यांनी सोमवार, 08/03/2010 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, पहिलेच लेखन. जवळपास सहा महिन्यांपासून पाहुणा म्हणून हजेरी लावतोय. काय करणार तात्यांनी आज कृपा केली आणि खाते मान्य केले :) तरीही सहा महिने रेगुलर पाहुणा म्हणून येत असल्याने, जवळपास सगळ्या सदस्यांना बर्यापैकी ओळखतो (ओळखून आहे हे सुद्धा चाललं असत). टंकवायला तसे काही विशेष नाही, पण नवे पणाची खाज जाणार कशी? असो, सध्या हेडफोन मध्ये खालील गाणे चालले आहे. या गाण्यातला फ़क़्त ०.०२ सेकंद ते ०.०४ सेकंद एवढाच भाग ऐका. बागेश्री मधली हि तान केवळ "दैवी" या एकाच विशेषणात बसणारी आहे. केवळ अशक्य! मी बरेचदा हे अशा लोकांना ऐकवलं आहे, ज्यांना शास्त्रीय संगीतात फारसा (किंवा अजिबात) रस नाही.

सुरेश भट यांची अप्रतिम कविता 'लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी' : शब्द हवे आहेत

लेखक दिपोटी यांनी सोमवार, 08/03/2010 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, मला श्री सुरेश भट यांची 'लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी' ही अप्रतिम कविता पूर्ण व लिखित स्वरुपात हवी आहे. मला आवडलेल्या या कवितेच्या बर्‍याचशा ओळी मला माहित आहेत / पाठ आहेत पण तरीही पूर्ण कविता तिच्या मूळ स्वरुपात मला अद्याप तरी कोठेही मिळलेली नाही. तेव्हा या कवितेचे अचूक शब्द / ओळी कोणी देऊ शकेल काय किंवा निदान ही माहिती कोठे मिळेल हे सांगू शकेल काय ? मिळणार्‍या माहितीसाठी आधीच धन्यवाद देतो. - दिपोटी

तिखटी

लेखक अस्मी यांनी सोमवार, 08/03/2010 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
तिखटी हा कोकणात केला जाणारा तोंडीलावण्याचा प्रकार आहे...मोस्टली मुगाच्या डाळीच्या खिचडी बरोबर खाल्ला जातो... साहित्य : १ वाटी दही २-३ हिरव्या मिरच्या कोथिंबीर ३-४ लसूण पाकळ्या मीठ कृती : १.आधी मिरच्या भाजून घ्याव्यात आणि ठेचून घ्याव्यात. २.दही घुसळून घ्यावे. ३.लसूण सोलून ठेचून घ्यावी. ४.कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. ५.आता दह्यात ठेचलेली लसूण, मिरची, आणि कोथिंबीर घालावी. ६.चवीनुसार मीठ घालावे आणि चांगले मिक्स करुन घ्यावे. ७.तय्यार आहे एक चटकदार तोंडीलावणे.... :)