Skip to main content

छंदशास्त्र

कविता (देवद्वार छंद)

लेखक आरसा यांनी गुरुवार, 29/04/2010 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
पुढील दोन वर्षासाठी महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारी समिती मधे सहभागी होण्याचे ठरवले आहे. नव्या जोमाने, काही बदल घडवून आणण्याच्या उमेदीने वार्तापत्र मराठी मधे काढण्याचा हट्ट नवीन समितीने धरला आहे, अन त्या कामाला सुरुवात देखील झाली आहे. घरी माझी आई, बाबा, मुलगी , नवरा, सगळेच मराठी कविता करतात, पण मी कधी त्या वाटेला गेले नाही, हा माझा प्रांत नव्हे ... परवा अचानक मनातले विचार या रचनेत प्रकटले...

चक्रव्यूह

लेखक राजेश घासकडवी यांनी गुरुवार, 29/04/2010 04:37 या दिवशी प्रकाशित केले.
(हे मात्रावृत्तातलं काव्य आहे, पण वृत्ताचं नाव माहीत नाही. जाणकारांनी सांगावं) पूर्वेपासुनि परवामधुनी उजव्या बाजुस आणि उद्या पसरूनी जणु रक्त शरीरा भिंति सदोदित खड्या उभ्या सूर्य उगवतो अन् मावळतो काही सावल्या हालवतो स्थितप्रज्ञासम स्तब्धस्थित त्या स्थितिक्कणांना न्याहळतो चंद्रप्रकाशी न्हाउन जाउन भिंति दुग्धिमा पांघरती भव्य भयानक भीषण सुंदर आणि विषण्ण त्या दिसती जगड्व्याळ या जंजाळातुन उगीच उंदिर शोधे वाट अडवणुकीचे सुखही न त्यांना ना सुटकेचे दु:ख मनात कुरतडूनही जरा न तुटती अशाश्वताच्या शाश्वत गाठी निराश उंदिर चाले पुढल्या चक्रव्युहा अभिमन्यूपाठी

सौंदर्यामधुन नित्य ती चालते

लेखक प्रशांत उदय मनोहर यांनी रविवार, 14/03/2010 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
लॉर्ड बायरन् यांची "शी वॉक्स इन् ब्यूटी" ही कविता इंटरनेटवर मिळाली. आणि स्वैर अनुवाद करण्याची हुक्की पुन्हा आली. यात प्रत्येक ओळीसाठी बाराक्षरी छंद (६+६) वापरला असून शेवटल्या अक्षरांच्या आकार-इकार-उकारांमध्ये मूळ कवितेनुसार (१२१२१२; ३४३४३४; ५६५६५६) यमकांची मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे.

बदक आणि राजहंस

लेखक प्रशांत उदय मनोहर यांनी शनिवार, 12/12/2009 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
"नको लाजवु बदकास राजहंसा पुरे आता लटकी तुझी प्रशंसा दैवयोगे तू हंस जाहलासी मित्र बदकाला परी विसरलासी लाभली तुजला मान डौलदार मानसात तुझा त्यामुळे विहार रसिकजन ते भाळले मानसाला राजहंसाचा होय बोलबाला." राजहंसाला बदक वदे ऐसे हंसमन ते जाहले हरवलेसे आठवे त्याते बाल्य लोपलेले कुरूपाला तै लोक हासलेले मित्र बदकाला राजहंस बोले "स्मृती बाल्यातिल आठवू नको रे जरी मैत्री दृढ आपुली असे रे भेटता दोघां यातना किती रे! कटू बाल्यावर सोडिले जळासी रसिकजन मी रिझविले मानसासी जाणतो मी, लटकी असे प्रशंसा मानसास्तव पाहती राजहंसा जोवरी माझी डौलदार मान तोवरी माझा मानसात मान लोपता हे सौंदर्य विसरतील बदकरूपाते कोण भाळती

कृष्णकमळ

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शुक्रवार, 27/11/2009 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
श्यामल सुंदरी रूप मनोहारी लोभस गोजीरी हाय हाय ! ओठ ते मधाळ पिकलं जांभूळ आनंद कल्लोळ चुंब चुंब ! सजल नयन कमल कोमल नासिका सरल चाफेकळी ! अबोल अबोल उमल उमल हे कृष्णकमल फुलेलना...?

प्रवास

लेखक प्रशांत उदय मनोहर यांनी बुधवार, 25/11/2009 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
एड्गर्ड अल्बर्ट गेस्ट यांची क्षमा मागून "मिस मी बट लेट मी गो" या त्यांच्या कवितेचा स्वैर अनुवाद - ------------------------------------------------------------------- मजसाठी जेव्हा वाट ही संपणार मावळेल भास्कर अन् होइल अंधार सोपस्कार नको मजला काळोखातिल का खंत करावी कुणी मुक्त झाल्यावर? मज स्मरा तुम्ही परि थोडक्याच वेळाला नच अश्रू ढाळा आणिक मज स्मरताना आठवा प्रेम जे दिले-घेतले आपण आठवा कधी मजला तुम्ही जाउ द्या पण हा प्रवास अपुल्या सर्वांना अनिवार्य एकटेच जाणे पुढे, संपता कार्य चालला ख

अंतरीच्या कळा

लेखक नेहमी आनंदी यांनी शुक्रवार, 30/10/2009 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
नभी आसवांचे तळे दाटलेले मुक्यानेच डोळ्यात पाणावलेले निघालाच त्या आठवांचा फुलोरा कधी साठताना मनी टोचलेले . असे मीलनाने खुशीच्या महाली तरी अंतरीच्या कळा सोसलेले ,, सुखाची करू कामना मी कितीही नशीबात दुःख असे साचलेले न चिता मनी ना जिवाची खुशाली तुला आज मी प्राण हे वाहलेले प्रसन्ना जीके

काहीच्या काही ...

लेखक मनीषा यांनी गुरुवार, 29/10/2009 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
आभास कविता कि र्‍हास कविता व्यत्यास कविता वाचलेली | हे कडकडीत ना फडफडीत ना जळजळीत काव्य कसे ? अर्थ गर्भ ओळी मती कशी जाळी गूढ कधी काळी घे जाणोनी | शब्दांचा कंटाळा अर्थांचा घोटाळा काव्याचा पाचोळा फार झाला | तो श्वास, नि: श्वास फुलपंखी रास सार बाजू त्यांस आज तूही | मागणी प्रमाणे काव्य प्रसवावे

लुटा 'लुत्फ' उर्दू गज़ल-अशयारांचा!

लेखक सुधीर काळे यांनी बुधवार, 21/10/2009 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
एका ’इजिप्शियन’ सभासदाने मला अशी सूचना केली कीं मी दर वेळेला नवीन ’धागा’ सुरु न करता एकच धागा सुरू ठेवावा व तिथेच नवीन-नवीन गझला, शेर (खरं तर शेरचे वचन आहे 'अशयार') यांची वेळो-वेळी भर घालत जावे व तिथेच प्रतिसाद येऊ द्यावेत. यामुळे वाचकांना एकच धाग्यामागे जाणे सोपे पडेल व आपोआप चांगल्या शेरांचे एक झकास संकलनही होईल. ही कल्पना मला आवडली व आता हा धागा लोकांना आवडेल तितके दिवस किंवा याहून जास्त चांगली व्यवहार्य कल्पना सुचेपर्यंत चालू राहील. एकच उणी गोष्ट आहे की हा धागा 'ब्रॉडवे'सारखा लांsssब होईल.

उद्दिष्टावर पोचणे-एक उर्दू शेर!

लेखक सुधीर काळे यांनी मंगळवार, 20/10/2009 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
जहीर आलमलिखित हा शेर माझा आवडता आहे! शायर म्हणतो कीं दुसर्‍याला पाडून पुढे जाण्यापेक्षा दुसर्‍या रस्त्याने आपल्या उद्दिष्टावर पोचणेच जास्त चांगले! गिरा कर दूसरोंको आगे बढ़ जाना हमाकत है, हमें तो दूसरे रस्ते से मंजिलपर पहुंचना है! - ज़हीर आलम हुमाकत = stupidity