मराठी ब्लॉग
थिंक महाराष्ट्र डॉट कॉम ह्या मराठी संकेतस्थळाच्या उदघाटनाचा (लॉचिंग) कार्यक्रम ५ मार्च २०१०, शुक्रवार, रोजी सायंकाळी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रांत साजरा झाला. श्री. दिनकर गांगल यांनी या संकेतस्थळाची थोडक्यात पण चांगली ओळख करून दिली. श्री.गांगल आणि ग्रंथाली यांच्याबद्दल मनात जे आदराचे स्थान आहे त्याला साजेसे असेच हे संकेतस्थळ असावे असे त्यावरून दिसले.
ह्या कार्यक्रमाचा एक महत्वाचा भाग म्हणून मराठी ब्लॉग्ज व संकेतस्थळांशी संबंधित मान्यवरांचे एक चर्चासत्र झाले. 'ब्लॉग्ज, वेब माध्यम आणि मराठी' हा त्याचा विषय होता. त्यात वेगळ्या प्रकारे उद्बोधक अशी माहिती मिळाली.
मिसळपाव