Skip to main content

इमर्जन्सी! -१

लेखक प्राजु यांनी रविवार, 07/03/2010 23:10 या दिवशी प्रकाशित केले.
इमर्जन्सी.. दि. मार्च १, २०१०. सकाळपासून चहाशिवाय चालत नाही या सबबी खाली टमरेल भरून चहा, आणि सोबत बरंच सटरफ़टर खाऊन झालं होतं. वेळ जात नव्हता म्हणून की काय अधे मध्ये (खाण्यातून ) वेळ मिळेल तेव्हा, इमेल चेक करणे, त्यांना उत्तरे देणे, आणि घरातलं काम हे ही करत होते. आदल्या दिवशी होळीरे होळी पुरणाची पोळी असा शंख करत पुरणाच्या पोळ्या हादडल्या होत्याच. पुरणाची पोळी दुसरे दिवशी सुंदर लागते, त्यामुळे ती खायला हवीच, अशी मनाची समजूत घालून भरपेट नाष्टा केल्यावर , दुपारचं जेवणंही तितकंच व्यवस्थित केलं होतं.

हे पाहा बाबांनो, हे आहे हे असं आहे.. पटलं तर र्‍हावा इथं, नायतर आग्रह नाही...

लेखक मंगेशपावसकर यांनी रविवार, 07/03/2010 18:32 या दिवशी प्रकाशित केले.
आपले लेखन आपल्या मित्रांना व खोलवाचकांपर्यंत पोहोचविण्याकरिता मिसळपाव हे अतिशय सुंदर जाल आहे. पण मला वाटत कि काही माणस आपल्या संपादकीय अधिकाराचा गैर फायदा घेऊ पाहत आहेत. नव्या लेखकांना काही चांगले शिकवून शहाणे करण्यापेक्षा त्यांचा बुडत्याचा पाय आणखी खोलात ढकलला जातोय. वर अरेरावी ची भाषा हि वापरली जात आहे. मी माझ्या मागील संपादित केलेल्या लेखनाचे एडीट केल्याचे कारण विचारले असता मला सरळ " हे पाहा बाबांनो, हे आहे हे असं आहे.. पटलं तर र्‍हावा इथं, नायतर आग्रह नाही... तात्या." असे बजावण्यात आले. हि यांची भाषा !!

ठाकरे आणि पवार नाकर्ते राजकारणी - पुष्पा भावे यांचे मत

लेखक सन्जोप राव यांनी रविवार, 07/03/2010 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
आयबीएन लोकमतवर निखील वागळेंनी घेतलेल्या मुलाखतीत पुष्पा भावेंचे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या महाराष्ट्रातील दोन बुजुर्ग राजकारण्यांविषयीचे सडेतोड विचार ऐकले / पाहिले. त्यांच्या मते: १. बाळासाहेब ठाकर्‍यांनी गेली चाळीस वर्षे मराठी मनाचे ब्लॅकमेलिंग यापलीकडे काहीही केले नाही. मराठी माणसाला 'तू पीडीत आहेस, तुझ्यावर अन्याय होतो आहे' असे ब्रेनवॉशिंग शिवसेनेने केले, पण प्रत्यक्षात मराठी माणसाला पुढे आणण्यासाठी ठोस असे काहीही शिवसेनेने, आणि विशेषतः बाळासाहेब ठाकर्‍यांनी केले नाही.

तात्यांचे आणि मिसळपावचे अभिनंदन ( लोकसत्ता ०७/०३/२०१०)

लेखक JAGOMOHANPYARE यांनी रविवार, 07/03/2010 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या लोकसत्तामध्ये मिसळपाव आणि तात्या यांची एक बातमी आहे. अभिनंदन. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=52…

बीटी पोर!

लेखक अरुंधती यांनी रविवार, 07/03/2010 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्याकडे सध्या नवा वाद रंगलाय. आमच्या ओळखीचे एक शेतकरी दादा परवा तावातावाने घरात शिरले. त्यांच्या व माझ्या भावामधला हा संवाद! "तुम्ही ते बीटी वांग्याचं, बीटी भाज्यांचं आमच्या बायकूकडं येवढं कवतिक का हो करून राहिला भाऊ? " "का? काय झालं? मी तर वर्तमानपत्रातल्या बातम्या मोठ्यानं वाचत होतो!" "अहो, तुमचं वाचन आमच्या बायकूनं आयकलं आन आमच्या 'हिच्या' डोक्यात तवापास्नं किडा वळवळाया लागलाय बघा... म्हनत्ये की भाजीत जर त्या ब्यॅक्टेरियाचा जीन टाकता येतो तर मग मानसात का नाही?" "म्हणजे? मी नाही समजलो... " "अहो, आता बघा, त्यो जीन घालून पिकवल्येलं वांगं म्हने कीड, रोगाला जवळ फटकू द्येत न्हाय...

(मनुष्य विरुद्ध प्राणी !!!)

लेखक प्रशांत उदय मनोहर यांनी रविवार, 07/03/2010 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
माणसांचा प्रश्न दिवसेंदिवस भारत, अमेरिकेत गंभीर होत चालला आहे. अर्थातच इतर देशांतसुद्धा असेलच. रात्रीसुद्धा आणि विशेषकरून दिवसा उजेड पडल्यावर या माणसांचे साम्राज्य सुरू होते. त्यांच्या दिवसाच्या मोठमोठ्या महत्त्वाकांक्षामुळे जंगलतोडसुद्धा होते. झाडे, पशु-पक्षी, सगळ्यांनाच या माणसांपासून त्रास होत असतो. रात्री दुचाकी वाहनांमागे पळत असल्याने अपघात होऊन प्राण्यांचा मृत्यू होण्याचा संभव असतो. मनुष्यप्राणी सोडून सर्वांनाच माणसांचा त्रास होतो. माणूस (वाहन) चालवून/लचका तोडून प्राण्याला मरण देवू शकतो.

कोलाज

लेखक क्रान्ति यांनी रविवार, 07/03/2010 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
चिऊताईला काल नुकतंच तिसरं संपून चौथं लागलं होतं. आज चिऊताईची झोप नेहमीपेक्षा लौकरच उघडली. खरं तर काल रात्री वाढदिवसाच्या भेटी उघडून पहाता पहाता झोपायला बराच उशीर झाला होता. पण स्वप्नात भेटीत आलेल्या वेगवेगळ्या रंगपेट्या, चित्रांच्या वह्या, स्केच पेन यांनी धमाल केली होती, सकाळी उठून कितीतरी चित्रं काढायची ठरली होती. मग वेळ नको पुरायला? चित्रांच्या नादात आज अगदी शहाण्या मुलीसारखं आईला त्रास न देता दात घासून, दूध पिऊन झालं, बाबाच्या आधीच आवरूनही झालं. एरवी जबरदस्तीनं भरवावी लागणारी पालकाची नावडती भाजी पण आज विनासायास पोटात गेली. "मग आज काय, मस्त मस्त चित्रं काढणार तर?" बाबानं विचारलं.

श्वानत्रस्त विरुद्ध श्वानप्रेमी!!!

लेखक निमिष सोनार यांनी रविवार, 07/03/2010 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस पुणे, मुंबईत गंभीर होत चालला आहे. अर्थातच इतर शहरात सुद्धा असेलच. दिवसा सुद्धा आणि विशेषकरून रात्री अंधार पडल्यावर या भटक्या कुत्र्यांचे साम्राज्य सुरू होते. त्यांच्या रात्री च्या मोठमोठ्याने ओरडण्याने झोपमोड सुद्धा होते. लहान-थोर सगळ्यांनाच या भटक्या कुत्र्यांपासून त्रास होत असतो. रात्री दुचाकी वाहनांमागे पळत असल्याने वाहनांचे अपघात होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू होण्याचा संभव असतो. पायी चालणाऱ्या सर्वांनाच कुत्र्यांचा त्रास होतो. कुत्रा चावून लचका तोडून व्यक्तीला मरण ओढावू शकते.