नैसर्गिक दृष्ट्या समृध्द असणार्या ,अतिशय सुरेख अश्या वसई-विरार महानगरपालीकेतून ५३ गावे वगळावी यासाठी तेथील आमदार विवेक पंडित यांनी बेमुदत उपोषण केले.त्यांचे उपोषण मोडून काढण्यासाठी ५ मार्चला पोलीसांनी ज्या पध्द्तीने बळाचा वापर केला.स्रिया,वृध्द,लहान मुले,तरुण मुले ,मुली यांवर घरात घुसून बघाणार्यालाही चीड यावी असा अमानुषपणे लाठीमार केला,त्याचा निषेध करायलाच हवा.दुरचित्रवाणी वाहिन्यांवरून लाठीमाराचे दृष्य पाहताना इतिहासात वाचलेल्या इंग्रज सरकारच्या जुलुमाची आठवण झाली.एखादे आंदोलन चिरडण्यासाठी पोलीस ज्या पध्द्तीने वागतात ते लोकशाहीला धरून आहे का?असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.महाराष