प्रेमेय
'झिंग' ह्या शब्दाचा अर्थ इंग्रजी आणि मराठीत जवळ जवळ एकच आहे.
"काल जास्त लोड होता का"?
नेहेमीपेक्षा जरा जास्त. का ग?
"लग्न झाल्यापासुन जेवताना पेंगुळलेला मी पहील्यांदा पाहीले तुला मी. आल्यावर आंघोळ पण केली नाहीस"
लोकल ला जरा जास्तच गर्दी होती त्यामुळे असेल.
"रात्री झोप लागली ना"/
हो.
"डोळे अजुनही तांबारलेले दिसताहेत".
कालची झोप म्हणजे स्वप्नांची मालिका होती त्यामुळे असेल. स्वप्नात तु आलीस.
"अग बाई. काही तरीच हां"
खरच सांगतोय
"घरातल्या घरात मी स्वप्नात? कुठे बाहेर गावी असलास तर समजु शकते."
स्वप्न तर ऐक.
"सांग"
स्वप्नात तुच होतीस. शाळेच्या युनिफॉर्म मधे. दोन शेपट्या घालुन. शाळेच्या मैदानात रिबिनीबरोबर खेळ खेळ्त माझ्याकडे नोट्स मागणारी. दोन रांगा सोडुन बसलेली , तरीसुद्धा वर्गाच्या लक्षात न येता पेपरमधले मार्क विचारणारी. गालावर खळी पाडुन हसणारी. घार्या डोळ्याची.
"मला गालावर खळी कुठे पडते? माझे डोळे काळे आहेत."
तेच तर सांगतोय.
चेहेरा तुझाच. पण खळी आणि आवाज माझ्या शाळेच्या मैत्रीणीचा. टीपिकल नाकातला कोब्रा आवाज. जमेल त्या शब्दावर अनुस्वार.
"हम्म."
दुसर्या भागात तर आणखीनच गंमत. परत तुच. चेहेरा तोच. पण आवाज वेगळा. ह्यावेळी नर्स च्या वेषात.
"आल लक्षात."
काय?
"लग्न झाल्यावर आपण एका समारंभाला गेलो होतो तेंव्हा आपल्याला ती भेटली होती तीच ना?"
तु कसे ओळखलेस?
"आम्हाला बरोबर कळते. तुझे होते की नाही ते माहीत नाही. पण तीचे तुझ्यावर खुप प्रेम होते हे नक्की."
बरोबर आहे तुझे.
"अचानक अशी स्वप्ने का पडावीत? कुठे भेट झाली का?"
नाही ग.एक आहे अमेरिकेला. एक ओरीसा मधे.
"म्हणजे त्या कुठे आहेत त्याचा ट्रॅक अजुन आहे."
वर्गमित्र सांगतात म्हणुन. इतक्या वर्षात नंतर काही संपर्क नाही.
ठीक आहे ठीक आहे. May be you are missing the zing level. तुला हवे असेल तर मी जाते ज्योती स्टोर्स मधे.
ते कशाला?
तीथे सर्व प्रकारचे युनिफॉर्म मिळतात.
याद्या
4197
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
प्रकटण
मलाही नाही
In reply to प्रकटण by टारझन
मलापण...
In reply to मलाही नाही by देवदत्त
हम्म्म्म्
चक्कर आली,
प्रेमेय
ओ मास्तर
श्री रा रा
वा वा छान छान!
लेख आवडला..
मास्तर, डोस
प्रेमाचे
गुमनाम है कोई....
हर्षदजी ले
In reply to गुमनाम है कोई.... by हर्षद आनंदी
- लेखकाने पत्नीला तुझा चेहरा दिसतो असे सांगितले, कदाचित खरा चेहरा सांगितला असता तर परिस्थिती वेगळी असली असती, नाही का?
- लेखकाने युनिफॉर्म मधे प्रस्तुत मुली दिसल्याचे सांगितले आहे. नक्की कशात दिसल्या हे पत्नीला सांगितले असते तर परिस्थिती वेगळी असली असती, नाही का?
- मास्तर प्रेमेय छान
पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984पेशवे महाराज
In reply to हर्षदजी ले by llपुण्याचे पेशवेll
मास्तर, तुमची झिंग लेवल हाय आहे!
छट, आमचं