मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(आवाहन) अर्थात कसं काय एडीटर बरं हाय का?

केसुरंगा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
कालच्या मिपाच्या फडात रंगलेला 'आवाहना'चा कलगीतुरा बघून आपनबी थोडी धुळवड खेळावी म्हनून मग हा तमाशाचा बार ऊडवून द्यावा म्हनतोय! प्रेरना? तिला काय कमी मोप हायेत!!;) कसं काय एडिटर बरं हाय का, अहो बरं हाय का ? काल काय ऐकलं, ते खरं हाय का ? अहो राव तुम्ही, ते नाही तुम्ही, 'खोबार'वाले तुम्ही न्हाय, न्हाय, न्हाय, न्हाय, 'चाल'वाले तुम्ही सांगा काय ऐकलं ते खरं हाय का ? काल म्हनं तुम्ही 'खफ'ला गेला, तमाशा बघून भडकून आला खरं काय हो एडिटर ? प्रतिसादा ठायी, हिणकस काही, होतं काय लिवल ते खोडलंय का ? काल म्हनं तुम्ही 'आवाहन' केलं, खरडीतलं धाग्यांत डकवून दिलं आरंरं केली मारामारी, कालच्या पारी, आज काय लिवायच ठरलंय का ? काल म्हनं तुम्ही मालकांकड गेला, अन्‌ बघता बघता राजिनामा दिला आगं बया बया काय झालं पुढं, सांगा तरि थोडं, तंगड्यात शेपुट घातलंय का ? -केसुरंगा

वाचने 3153 वाचनखूण प्रतिक्रिया 13

केशवसुमार 23/12/2009 - 10:47
केसुरंगाशेठ, लाई बारीक लक्ष दिसताय तुमच मिपावरच्या कलगीतुर्‍यांवर काय बेक्कार चोपलाय..टाळ्या आणि शिट्या... (पिठातला)केशवसुमार माग तुम्ही विजुभै ना धुतला होता त्याची आठवण झाली (स्मरणशील)केशवसुमार

श्रावण मोडक 23/12/2009 - 11:30
केसुरंगासेठ, जोरदार. आम्ही डोक्यावरचा फटका उडवला...

In reply to by श्रावण मोडक

३_१४ विक्षिप्त अदिती 23/12/2009 - 14:09
माझ्या डोक्यावर पटका नसल्यामुळे मी फक्त एवढीच दाद देऊ शकते: =)) =)) =)) =)) =)) =)) अदिती

प्रसन्न केसकर 23/12/2009 - 13:52
लय भारी लावणी लिव्हली तुमी. चाहता झालो तुमचा. मुजरा घ्यावा.

नाटक्या 23/12/2009 - 15:05
वाट लावली. स्वगतः आता या धाग्यावर पण बंदी येणार.. शिरां पडली ती नाटक्या तुझ्यार, तुका किती येळला सांगला मोट्यान खरे बोलू नकोस म्हनून??? - नाटक्या (अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)

धमाल मुलगा 23/12/2009 - 16:05
केसुरंगा, बर्‍याच काळानं म्यान केलेली लेखणी तळपली की तुमची :) येऊ द्या अजुनही.

विशाल कुलकर्णी 23/12/2009 - 18:01
पटका उडीवला बर्का पावनं आमी..... नाचनारीन नाय दिसली , नाय तर दौलतजादाबी केला आसता ! लै जबरा, लै जबरा ! ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

चतुरंग 23/12/2009 - 18:13
एकदम जोर्रात इडंबन हाये!! टिट्या आणि शाळ्या....नाय नाय नाय, शिट्या आणि टाळ्या...!!!! ;) (पैल्या रांगेतला)चतुरंग

बिपिन कार्यकर्ते 23/12/2009 - 19:17
दंडवत... बिपिन कार्यकर्ते

प्राजु 23/12/2009 - 20:07
हम्म! बरंच लक्ष आहे मिपावर तुमचं. चालूद्या! - प्राजक्ता http://www.praaju.com/

प्रभो 23/12/2009 - 21:10
येक नंबर --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!