Skip to main content

कलि...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 07/05/2010 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
एकदाचे विशेष कोर्टाने निकाल दिला…! अ‍ॅड. उज्वल निकमांच्या कारकिर्दीत अजुन एक मानाचा तुरा खोवला गेला. कृरकर्मा अजमल ‘कसाब’ ला फ़ाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. एकुण चार गुन्ह्यांसाठी मरेपर्यंत फाशी आणि पाच गुन्ह्यांसाठी जन्मठेप. फाशी : १६६ निरपराधांची हत्या व हत्येचा कट, हत्येसाठी मदत करणे, भारताविरुद्ध युद्ध पुकारणे, दहशतवादी कृत्य इ. गुन्ह्यांसाठी फ़ाशी. जन्मठेप : हत्येचा प्रयत्न, कटकारस्थान व स्फोटकेविषयक कायदा याच्याशी संबंधीत पाच गुन्ह्यांसाठी जन्मठेप. शिक्षा ऐकली आणि त्या तीन दिवसात मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळवणार्‍या पत्थरदील कसाबचा घसाच कोरडा पडला.

पुणे ते नासिकः गडकोटांच्या साक्षीने, रेल्वेच्या मार्गाने

लेखक प्रचेतस यांनी शुक्रवार, 07/05/2010 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे ते नासिक व्हाया पनवेल हा रेल्वे मार्गाचा प्रवास इतरांसाठी सर्वसाधारणपणे लांबचा (बसमार्गापेक्षा १ तास जास्त) व कंटाळवाणा असला तरी आम्हा सह्याद्रीप्रेमींसाठी खूपच आनंददायक कारण ह्या सबंध प्रवासात सह्यधारेवरील २ घाट व अनेक किल्ले व सुळके यांचे उत्कट व उत्कृष्ट दर्शन होते. रेल्वेने पुणे सोडताच दापोडी नंतर डावीकडे सिंहगडाचे त्याच्या चिरपरीचित मनोर्‍यासह दर्शन होते ते थेट देहूरोड पर्यंत. आता उजवीकडे तुकोबारायांच्या वास्तव्याने पावन झालेला भंडारा डोंगर दिसू लागतो व लगेचच डावीकडे घोराडेश्वराची लेणी लक्ष्य वेधून घेतात.

न लिहिलेल्या खरडी

लेखक सन्जोप राव यांनी शुक्रवार, 07/05/2010 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
प्रास्ताविकः खरडवह्या व त्यांचा वापर याविषयी नव्याने काही लिहिण्याची गरज नाही. पण खाली दिलेल्या खरडी कोणीही कुठेही लिहिलेल्या नाहीत. या खरडींचे लेखक प्रत्यक्षात अस्तित्वात असले तरी हे लिखाण पूर्णतः काल्पनिक आहे. खरड लिहिणार्‍याच्या नावाचे फक्त आद्याक्षर लिहिले आहे. ती खरड कुणी कुणाच्या खरडवहीत लिहिली असेल ते ज्याने त्याने ठरवायचे आहे. 'ता' म्हणजे 'ताकभात' समजा वा 'ताडी' समजा. पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना. सदर लेखन गंभीरपणे घेण्यास सक्त मनाई आहे. तसा प्रयत्न करणारे परिणामास 'खुद जिम्मेदार' राहातील याची कृपया नोंद घ्यावी. प्रास्ताविक संपले. टा: ओ काका, तुमचं लक्ष कुठं आहे?

जिंगल्स ते सिनेमा

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शुक्रवार, 07/05/2010 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
चला म्हणल आज डीएसके गप्पांना जाउ यात. डीएसकेंना मराठी मध्यमवर्ग-उच्चमध्यमवर्गाची नाडी अचुक सापडलीय म्हणुनच ते गेली १०-११ वर्ष सांस्कृतिक गप्पांचा महोत्सव करतात. चकटफु असल्याने आम्ही अर्थातच गेलो होतो. या वेळी सगीतकार अशोक पत्की यांच्याशी गप्पांनी पहिले पुष्प गुंफले."जिंगल्स ते सिनेमा' या गप्पांच्या कार्यक्रमात पत्की यांच्याशी राजेश दामले आणि मिलिंद कुलकर्णी यांनी संवाद साधला. वयाच्या पाच वर्षापासुन बॆंडवाल्यांचे आकर्षण असलेल्या अशोक पत्कींना आपल्यातील सुप्त गुणांची चाहुल लागली.

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या आयचा घो! - २

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 07/05/2010 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी मी सुरु केलेल्या "अंधश्रद्धेच्या आयचा घो" ही चर्चा प्लासिबो परिणामाच्या व्याख्येवरून न होताच संपली. (पहा - http://misalpav.com/node/11586). वैद्यकेतर क्षेत्रात प्लासिबो परिणाम असू शकतो हे मान्य करण्यास घासकडवी तयार नव्हते. आजच ही बातमी वाचनात आली.

झटपट प्रॉन्स बिर्याणी

लेखक मीली यांनी शुक्रवार, 07/05/2010 06:18 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : १ कांदा उभा चिरलेला ,आले लसून पेस्ट ,दही ,तिखट ,मीठ चवीप्रमाणे,जिरे,मोहरी बिर्याणी मसाला (परंपरा ,रसोई मॅजिक छान लागतो),प्रॉन्स,मोकळा भात, तेल,तूप,खडा मसाला (लवंग,तेजपान,वेलदोडा) कोथिंबीर बारीक चिरून. कृती : प्रॉन्स धुवून त्याला लिंबाचा रस आणि आले ,लसून पेस्ट,थोडे दही लावून १० मिनिटे ठेवले. फोडणी साठी तेल तापत ठेवले त्यात जिरे , मोहरी तडतडल्यावर,तेजपान ,लवंग(३),वेलदोडा टाकून ,कांदा परतवून घेतले. त्यात आले, लसून, पेस्ट टाकून परतवून घेतले.मग बिर्याणी मसाला टाकला.मग त्यात प्रॉन

कसब, फाशी आणि फायदे-तोटे

लेखक ऋषिकेश यांनी गुरुवार, 06/05/2010 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
चला! एकदाची त्या युद्धखोर कसबला फाशीची शिक्षा सुनावली गेली. भारतीय संघराज्यविरूद्ध त्याने पुकारलेल्या युद्धाबद्दल भारतीय कायद्याप्रमाणे कोर्टाने ही शिक्षा ठोठावली. कसबला फाशी व्हायला हवीच होती असे मलाही वाटते. मात्र मला असे वाटण्याचे कारण माझ्या अतिरेक्यांविरूद्धच्या तीव्र भावना आहेत. हा भावनावेग बाजूला ठेवला व राष्ट्रप्रेमापलिकडे थोडं डोकं शांत ठेऊन बघितलं तर डोक्यात अनेक प्रश्न उभे रहातात. त्यावरच मला लोकांची मते जाणून घ्यायची आहेत. १. कसबला फाशी झाली.

त्या कथेचा निषेध्,धिक्कार!!

लेखक शानबा५१२ यांनी गुरुवार, 06/05/2010 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
खुप दीवसांपासुन लिहीन म्हणात होतो,तर आज लिहतो. काही दीवसांपुर्वी Star प्रवाह ह्या गरज नसताना चालु असलेल्या वाहीनीवर "गोष्ट एका आनंदीची" ही मालिका चालु होती.ती मालिका म्हणजे मालिकांची 'मालिका' होती,म्हणजे 'गोष्ट एका लग्नाची'.नंतर "गोष्ट एका कॉलेजची"............वगैरे आणि नंतर हे "गोष्ट एका आनंदीची". त्या कथेत आनंदी एक आंधळी मुलगी असते,दीसायला सुदंर....लग्नाच्या वयात आलेली.आई बाबांची लाडकी,त्या आईबाबांना सारखी तिची काळजी.......तिच लग्न कस होईल,नवरा हीला प्रेम देइल का,सासरची माणस कस वागवतील वगैरे.हीच ऑपरेशन करुन तिला द्रुष्टी येणार नाही अस त्यांच्या डॉ़क्टरांच मत असत. काही काळाने तिच्या लग्नासाठी