वैचारीक भिन्नता
लॉबसंग रांपा चं "यु फॉरेव्हर" पुस्तक बरेच दिवसांनी परत एकदा वाचनात आलं. यातील एक लेख आहे "ऑरा" या विषयावर. मानवी शरीराभोवती असणारे वलय जे सामान्य डोळ्यांना दिसू शकत नाही परंतु "कर्लियन फोटोग्राफी" ने दिसू शकते.
लेखकाने एक मुद्दा मांडला आहे की - २ व्यक्तींचे ऑरा काही बिंदूंना अगदी व्यवस्थित जुळतात तर काही बिंदूना "टँजेन्शिअल" छेदून जातात. जितके अधिक ते जुळतात तितकी आपल्याशी समविचारी अशी ती व्यक्ती असते. आणि जितक्या अंशात छेदून जातत तितकी आपली मते फारकत घेतात.
मला या मुद्द्यात तथ्य वाटते. अगदी निकटच्या व्यक्तींशी देखील १००% कधीच पटत नाही.
मिसळपाव