Skip to main content

गाढवदादा गाढवदादा -

लेखक विदेश यांनी रविवार, 26/06/2011 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
गाढवदादा गाढवदादा - माणूस म्हणू का ? माणूस म्हणताच चिडून लाथा झाडाल का ? |१| मासेभाऊ मासेभाऊ - नापास झाला का हो ? रडून रडून सगळा टँक भरला की हो ! |२| पोपटराव पोपटराव - शीळ छान घालता राव ! मैनाताईला वाटतं का हो एकदा तरी वळून बघाव ? |३| कासवपंत कासवपंत - लढायला किती हळू जाता ? ढाल पाठीवरती घेता तलवार कुठे विसरता ? |४| भोलानाथ भोलानाथ - गुब्बू गुब्बू गुब्बू पैशाचं मी पेरलं झाड पैसे येतिल का रे ढब्बू ? |५|
काव्यरस

माझिया प्रियाला प्रीत कळेना

लेखक michmadhura यांनी शनिवार, 25/06/2011 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी नी माझी भेट ही क्षणोक्षणी का आठवे आधी कधी ना वाटले काहीतरी होते नवे सांगु कशा मी, तुल सख्या रे माझ्या ह्या भावना माझिया प्रियाला प्रीत कळेना! खरं सांगु तर हे गाणं तीने खास त्याच्यासाठीच म्हंटलं असणार. दोन अगदी वेगळ्या स्वभावाची माणसं लग्न होऊन एकत्र आली ना की हेच म्हणावं लागतं ना! आता हेच बघा ना! ती अगदी हळवी, इमोशनल आणि तो एकदम प्रॅक्टिकल आणि रो़खठोक. ती तिच्याच सुंदर स्वप्नवत जगात जगणारी आणि तो मात्र त्याचं प्रत्येक स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी धडपड करणारा. अगदी टिपीकल दाखवण्याचा कार्यक्रम होउन ठरलेले लग्न.पहिल्याच नजरेत तिला तो खूप आवडला. लग्न ठरलं तेव्हा तिचा आनंद गगनात मावत नव्हता.

तुका जातो वैकुंठाला

लेखक यकु यांनी शनिवार, 25/06/2011 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
न कळत्या वयात प्रभातचा संत तुकाराम पाहिला होता - खूप रडलोही होतो. अगदी काल-पर्वा युट्य़ूबवर संत तुकाराम चित्रपटातील दोन क्लिप्स पुन्हा एकदा पाहाण्यात आल्या. त्या उतरवूनदेखील घेतल्या. या चित्रपटातील तुकोबाची भूमिका विष्णुपंत पागनिसांची (पु.लं. च्या हंड्रेड पर्सेंट पेस्तनकाका मधली पेस्तनकांकाची "अरे साला काय ऎक्टिंग, तुला सांगतो साला ओरिजिनल तुकारामबी असा नसेल, ते विस्नुपंत आता वैकुंटमदी असेल, सिटिंग नेक्स्ट टू दी गॉड..." ही दाद आठवते का?). विष्णुपंत पागनीसांनी केलेल्या तुकारामाच्या या भूमिकेने त्या काळात अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले होते.

गो-ग्रिन नर्सरी-युसुफ मेहेर अली सेंटर

लेखक जागु यांनी शुक्रवार, 24/06/2011 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
गो ग्रिन नर्सरी ही युसुफ मेहेरअली सेंटरचीच शाखा आहे. तिथे गेल्यावर विविध झाडे दिसतात अगदी परीचयाची व अपरीचितही. भरपुर झाडे होती आणि माझ्याकडे वेळ कमी होता त्यामुळे जेवढे शक्य होतील तितके फोटो घेतले.

असे का?

लेखक निवेदिता-ताई यांनी शुक्रवार, 24/06/2011 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव कडुनच येते - error असे...संपूर्ण मिसळपाव बंद होते- काही कालावधीसाठी, आणी पुन्हा लॉगिन करावे म्हटले तर काय घ्या नवा पासवर्ड - आम्हालाच हेल्लो गेस्ट--- ह्यामध्ये खुप वेळ जातो...पासवर्ड मागवा , पुन्हा काय तर एकदाच प्रवेश...हे ही ठीक आहे...पण आहेत त्या सभासदांना हेल्लो गेस्ट - हे काहीतरीच वाटते.... असे का????? संपादकीय टिपण्णी: या संदर्भात, "काही अडचणी आहेत का?" या नीलकांत यांनी घोषणे अंतर्गत काढलेल्या धाग्यात चर्चा करता येईल आणि ती एकाच ठिकाणी सर्व सभ

जीवन सत्व बी १२ आणि त्याची उणीव

लेखक खादाड अमिता यांनी शुक्रवार, 24/06/2011 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
आपले प्रोसेस्सेड पदार्थांचे वाढलेले सेवन आणि दिवसंदिवस कमी खाण्यात येणारा पारंपारिक स्वयंपाक- ह्यानी, हल्ली बऱ्याच व्यक्तींना जीवन सत्व बी १२ च्या डेफिश्यन्सी चा त्रास होतो. ह्या डेफिश्यन्सी ची सगळ्यात आधी आढळून येणारी लक्षणं म्हणजे दम लागणं, छातीत धड धड्ण, चेहरा निस्तेज होणं, अकारण थकवा, चिडचिड होणं इ. बरेचदा अगदी व्यवस्थित सकाळ संध्याकाळ पोळी भाजी आमटी भात- असा आहार असलेल्या व्यक्तींना पण अशी बी १२ ची उणीव होऊ शकते. हे असं का होतं? तेच आज जाणून घेऊया. आहारात बी १२ ची मात्रा कमी असणे किंवा शरीरात बी १२ कमी शोषले जाण्यानी त्याची उणीव होते.

नियतीचा खेळ

लेखक प्रास यांनी शुक्रवार, 24/06/2011 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
"डॉक्टर, नेमकं काय झालंय हो? मला तर काहीच सुचत नाही आहे. पंधरा दिवसांपूर्वीच्या रविवारपर्यंतपर्यंत हे असं काहीच नव्हतं हो! त्यादिवशी रात्रीच तर आम्ही ट्रेकिंगहून परतलो. गेल्या तीन वर्षांत या माणसाला कधी गप्प म्हणून बसलेलं पाहिलेलं नाही. अगदी उत्साहाचा धबधबाच जणू. सतत काही ना काही सुरूच असायचं. मित्रांच्या गराड्यात तर नेहमीच. येवढं करून एक पैशाचं व्यसन नाही. दारू नाही, विडीकाडी नाही, अगदी सुपारीच्या खांडाचंही नाही. कुठल्या कुठल्याशा गोष्टीत भयानक रस घेऊन अगदी जीव तोडून ती गोष्ट समजून घेणार, आत्मसात करणार असा स्वभाव.

पनिशमेन्ट

लेखक अरुंधती यांनी शुक्रवार, 24/06/2011 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
''पनिशमेन्ट! आता तुला नाऽऽ पनिशमेन्टच मिळणार!!'' आर्या चित्कारली. तिच्या आवाजात विजयाची झाक होती. ''पण मी काहीच केलं नाही!'' हर्षचा स्वर जरा रडवेला वाटत होता. '' नो, नो.... तूच तर माझा हेअरबॅन्ड वाकवत होतास... मी म्हटलं होतं तुला तो मोडेल म्हणून...'' ''ए, मी काय तो जास्त नाही वाकवला...'' ''पण मोडला बघ हेअरबॅन्ड.... आता तुला पनिशमेन्ट!!'' आजी आतल्या खोलीतून वर्तमानपत्र वाचता वाचता आपल्या दोन्ही नातवंडांचे संवाद ऐकत होती. आर्या आणि हर्षमधील भांडणे तिला काही नवीन नव्हती. दर पंधरा-वीस मिनिटांनी ह्या आते-मामे भावंडांची आपापसात कधी मुद्द्याने तर कधी गुद्द्याने बातचीत चालू असे.