Skip to main content

हैयोहैयैयो नाडी ग्रंथ ताडपट्टयातील नावाच्या उल्लेखांचे प्रात्यक्षिक दाखवणार

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 01/07/2011 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, नाडीग्रंथांवर अनेकांनी बरेच लिखाण दोन्ही बाजूनी केले आहे. या धाग्याने नाडीग्रंथांचे प्रात्याक्षिकाचा अनुभव घेणाऱ्यांसाठी माहिती.... ....आज दि, १ जुलै ला इतिहास संशोधन मंडळाच्या पोतदार सभागृहात सायंकाळी ६ वाजता भाषण आहे. त्यात हैयोहैयैयो नाडी ग्रंथ ताडपट्टयातील नावाच्या उल्लेखांचे प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. इच्छुकांनी नोंद घ्यावी. मिपाच्या धोरणांत अशी माहिती देणे बसणारे नसेल तर धागा काढून टाकावा.

बदल ----लघुकथा ----जयनीत दीक्षित

लेखक जयनीत यांनी शुक्रवार, 01/07/2011 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
नारायण! नारायण!! नारदमुनी प्रवेश करते झाले. या मुनीश्रेष्ठ या! काय हालहवाल आहे पृथ्वीतला वरचा? ब्रम्हदेव म्हणाले. अहो आश्चर्यम्! खलु आश्चर्यम्!! नारदमुनी म्हणाले! विराजमान व्हा, अन जरा विस्ताराने सांगा मुनीवर! कसले आश्चर्य? ब्रम्हदेव म्हणाले. फार थोडया काळात खूपच बदल घडला आहे पृथ्वी वर देव. नारद मुनी म्हणाले. कसला? ब्रम्हदेवांनी विचारले. काही काळा पूर्वी तेथे सर्वत्र राजेशाही होती ह्यावर विश्वासच बसत नाही देव, आता तिथे सगळीकडे लोकशाहीचा बोलबाला आहे. नारदमुनी म्हणाले. असं! मग? ब्रम्हदेव म्हणाले. ह्या लोकशाही बद्दल सर्वत्र फार गोड गोड बोलल्या जाते आणि फार छान सुंदर सुंदर लिहिल्या जाते.

नानासाहेब फडणवीसांचे चित्र विकणे आहे

लेखक यकु यांनी शुक्रवार, 01/07/2011 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
भारतातील सर्वात महत्त्वाच्या ऐतिहासिक मुत्सद्यांपैकी एक नाना फडणवीसांचे पोट्रेट लंडनच्या सोथबी ऑक्शन हाऊसमध्ये लिलावासाठी ठेवण्यात आले आहे. हे चित्र ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीचा चित्रकार थॉमस सीटनने सन १७७८ मध्ये काढले असल्याची चित्राच्या मागे नोंद आहे. मूळ नाव बालाजी जनार्दन भानू असलेले नाना फडणवीस हे पेशवाई दरम्यानच्या मराठा साम्राज्यातील एक आघाडीचे मंत्री होते. सन १७७३ मध्ये नारायणराव पेशव्यांचा खून झाल्यानंतर, फडणविसांच्या नेतृत्वाखालील बारभाईचे कारस्थान इतिहासात प्रसिद्ध आहे.

गणितप्रेमींसाठी मोठ्ठा खाऊ!

लेखक निनाद यांनी शुक्रवार, 01/07/2011 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
विकीपिडियावर गणिताच्या शाखा हा लेख आहे. या लेखात,
  • गणिताच्या शाखा
  • मोजणी
  • संरचना
  • अवकाश
  • बदल
  • पाया आणि तत्त्वज्ञान
  • विसंधी गणित
  • उपयोजित गणित
  • सामान्य गैरसमज
  • गणित आणि भौतिक वास्तव
असे अनेक विषय चर्चिलेली आहेत. लेखनाचा अंदाज येण्यासाठी लेखाचा काही भाग देत आहे.

रागांचा महासागर आता एका क्लिकवर

लेखक यकु यांनी गुरुवार, 30/06/2011 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
बाराशे रागांचा डेटाबेस आणि सहाशे रागांच्या ऑडिओ क्लिप्स उपलब्ध करून देणारी 'ओशन ऑफ रागाज्' ही वेबसाइट म्हणजे संगीतप्रेमींसाठी तसेच अभ्यासकांसाठी एक पर्वणीच ठरली आहे. यामुळे भारतीय संगीतातील सगळी घराणी जवळ आली आहेत. त्याविषयी... [ सौजन्यः म. टा. ] टाटा मोटर्स कंपनीतून निवृत्त झालेले गदे यांचा हा वैयक्तिक संग्रह वेबसाइटवर आल्यामुळे आता सर्वांसाठी खुला झाला आहे. आपल्या पंचवीस वर्षांच्या संग्रहाचे रुपांतर 'ओशन ऑफ रागाज्' मध्ये करण्यासाठी त्यांना दीड वर्ष लागलं.

गाजराचा हलवा

लेखक स्मिता. यांनी गुरुवार, 30/06/2011 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच्या लक्षात आलंच असेल की हा केवळ 'गाजर हलवा' नाहीये तर रितसर गाजराचा हलवा आहे ;) लहानपणापासून मला गाजराचा हलवा फार आवडतो. आणि सध्या फ्युजन म्हणून गरम-गरम हलवा आणि त्यावर व्हॅनिला आइसक्रिम मिळते, ते तर...

...... नेहमीसारखा...

लेखक अज्ञात यांनी गुरुवार, 30/06/2011 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
आवडायला लागलाय मला आता तो कर्नकर्कश्य गोंगाट... कारण विसरायला लावतो तो मला स्वतःला... कुठेतरी त्या गोंगाटात दाबले जातात माझे हुंदके... एवढे कि स्वतःचेच स्वतःला ऐकू येत नाहीत... एकटेपणा खायला उठतो... एकटा असलो कि भूतकाळाच्या आठवणी फेर धरून नाचू लागतात भोवती.. जशी गिधाड घिरट्या घालतात आभाळात... वाट पहात कि कधी होतोय लाचार... मग तोडतात लचके... त्या वेळी मग मुठीत निखारे दाबून, गुढग्यात डोकं खुपसून बसतो...नेहमीसारखा... जगायलाच विसरलोय आता.. आता तर मला पावसाचीसुद्धा भीती वाटायला लागलीय... सरीबरोबर त्याच्या कोसळतात तुझ्या आठवणी अंगावर... त्या वेळी डोळे झाकून चिंब भिजण्याचा प्रयत्नही मी करतो...

चार आणे

लेखक ऋषिकेश यांनी गुरुवार, 30/06/2011 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
काही गोष्टी असतात छोट्या, त्यांच्या असण्याने किंवा असताना फारसा फरक पडलेला नसतो / पडत नाही. मात्र तरीही त्या गेल्या / नसल्या कि मात्र चुकल्यासारख होतं. मागे टाइपराइटरने शेवटचे कडकटट केले आणि आज 'चार आणे' बंद होत आहेत. माझ्या लहानपणी (म्हणजे वीसेक वर्षांपूर्वी) ह्या चार आण्याला किंमत होती.