Skip to main content

मटा चे महान मद्यप्रेम!

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 24/06/2011 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
सरकारने मद्यपानचे वय किमान २५ केल्यामुळे समाजावर ओढवलेल्या भयानक संकटाच्या आणि झालेल्या घोर अन्यायाच्या निवारणार्थ मटाने मोहिम उघडली आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणुन आजच्या मटामध्ये पृष्ठ क्रमांक ११ वर १/३ पान भरेल अशी भव्य व काळी चौकट - लाल अंग - पांढरी मोठी अक्षरे असलेली एक जाहिरात मटा ने दिली आहे. ही जाहिरात म्हणते " देशाचे सीमारक्षण करण्यासाठी आपल्यावर वयाच्या १८ व्या वर्षी विश्वास ठेवला जातो. पण २५ वयापर्यंत जबाबदारीने मद्यपान करु शकत नाकी." खालोखाल लहान अक्षरात लिहिले आहे " आपल्या देशाचे कायदे सैन्यात भरती होण्यासाठी आणि सीमारेषेवर लढण्यासाठी १८ व्या वर्षी आपल्याला पात्र समजतात.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ - बुद्धीभेद करणारी एक भयानक संस्था?

लेखक आंसमा शख्स यांनी शुक्रवार, 24/06/2011 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या विषयी अनेक प्रकारची भीती प्रसारमाध्यमात ऐकू येते. हे संस्था उजव्या विचारसरणीची आहे वगैरे. आज राष्ट्रीय नेते माननीय दिग्विजय सिंग यांच्यासारखी समतोल व्यक्ती सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही बुद्धीभेद करणारी एक भयानक संस्था आहे असे म्हणतात. युवा नेते राहुल गांधी हे तर या संस्थेला देशविघातक शक्तीच म्हणतात. समाजाच्या एका भागात या संस्थी विषयी नक्कीच भीती आहे. मला माझ्या काही मित्रांनी या सम्स्थेच्या कारवायांबद्दल टोकाची मते मांडली. त्यात कदाचित अफवाही असतील. त्यामुळे मी अजूनच गोंधळून गेलो आहे.

कोयला चिकन

लेखक Mrunalini यांनी शुक्रवार, 24/06/2011 02:57 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः चिकन - ५०० ग्रॅम टोमॅटो - ३ टोमॅटोची प्युरी काजुची पुड - १/४ वाटी क्रिम - ४ चमचे लाल तिखट - ३ चमचे हळद - १ चमचा गरम मसाला - २ चमचे आले-लसुण पेस्ट - २ चमचे लिंबुचा रस - १ चमचा तुप - ४ चमचे कोळसा - १ मिठ चवीनुसार पाकृ: १. चिकनला आले-लसुण पेस्ट, लाल तिखट, हळद, मिठ व गरम मसाला लावुन marinate करावे. २. पातेल्यात ३ चमचे तुप गरम करावे. त्यात marinate केलेले चिकन टाकुन २-३ मिनिटे परतावे. ३. त्यात टोमॅटोची प्युरी टाकावी व झाकन ठेवुन २-३ मिनिट ठेवावे. ४. प्युरी घट्ट झाल्यावर त्यात काजुची पुड व लिंबुचा रस टाकावा. ५.

संथ पाडते गझला बाई ....

लेखक विदेश यांनी गुरुवार, 23/06/2011 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल : संथ वाहते कृष्णामाई ....) संथ पाडते गझला बाई - गझलेवरच्या प्रतिसादांची जाणिव तिजला नाही |धृ | संथ पाडते .... कधी न कामें करी लौकर ती , कूर्मगतीने सदा करी ती ; बॉसगिरीची काही पर्वा नाही तिज ठायी |१| संथ पाडते .... कुणी पुरे ना म्हणती गझला , कुणी वर्णिती उच्च गेयता ; मात्रागणाची करून जंत्री - मोजित कुणी राही |२| संथ पाडते .... सतत चालते काव्य-टंकणी , होई न व्यनितुनी बाई शहाणी ; वाचकास ही व्हावी कैशी , सांगा सुखदायी |३| संथ पाडते ....
काव्यरस

पालक बेसन पोळा (धिरडं)

लेखक जागु यांनी गुरुवार, 23/06/2011 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : १ जुडी पालक (थोडे पाणी घालुन वाफवुन पेस्ट करुन घ्या) गरजेपुरते बेसन १ चिरलेला कांदा थोडी चिरलेली कोथिंबिर २-३ चिरलेल्या मिरच्या हिंग हळ्द मिठ थोडा गोडा किंवा गरम मसाला (ऑप्शनल) तेल पाककृती : वरील साहित्यातील तेल सोडून सर्व जिन्नस एकत्र करुन घ्या.

हिरवा चाफा

लेखक जागु यांनी गुरुवार, 23/06/2011 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
हिरवी पालवी, हिरवी राई, हिरवागार परिसर, हिरवी पाने, गवत हेच ऐकायची आपल्याला सवय असते. पण हिरवे फुल म्हणजे जरा हटकेच. अगदी लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात. हिरवा चाफा ह्या नावकडे लक्ष केंद्रित केल की वेगळच फिल होत. लहानपणी मोठे झाड होते आमच्या घरी. फुल कधी दिसायचे नाही पण वास आला की समजायचे चाफा फुलला मग शोधायला जायचे. कुठल्यातरी पानाआई हे दिसायचे. मग काढून घरी आणुन त्याचा वास घेत बसायच. तसा त्याचा वास घेण्याची गरज लागत नाही. ज्या जागी ठेउ त्या परीसरावर हे फुल आपला सुगंध दरवळून आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन देतो. हिरव्या रंगामुळे झाडावर हे हिरव फुल लपाछुपीच खेळत असत.

निरागस चेहेर्‍याआडचे धर्मांतर

लेखक आंसमा शख्स यांनी गुरुवार, 23/06/2011 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
काही संस्था फार मोठ्या असतात. त्यांची पोहोच ही मोठी असते. कायदेशीर आणि बेकायदेशीर अशी अनेक हत्यारे त्यांच्याकडे असतात. अशा संस्थांविषयी लिखाण करतांना कसे करावे हा मोठा पेच आहे. कारण मी एक सामान्य माणूस आहे. मला अचानकपणे रहस्यमय रित्या गायब व्हायचे नाही. किंवा माझा अचानक अपघाती मृत्युही घडायला नको आहे. अशा परिस्थितीत मी एखाद्या बलाढ्य संस्थेच्या धर्मांतराच्या कामाच्या स्वरूपाचे अवलोकन कसे करणार? वल्ड विजन या संस्थेच्या स्वरूपाबद्दल माहिती देणारे काही लेखन मी केले होते. ते माझा हेतु फक्त पॉलिटिकली करेक्ट स्वरूपात लेखन करण्याचा होता.

तो पूर पावसाचा -

लेखक विदेश यांनी बुधवार, 22/06/2011 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
तो पूर पावसाचा डोळ्यांत साठलेला प्रेमात भंगता मी डोळ्यांत दाटलेला |१| आकाश भार झेले लाखो पतंग उडता माझा पतंग दिसतो तो खूप फाटलेला |२| लाभात खूप आता व्यवहार येथ झाले व्यवहार नेमका का माझाच घाटलेला |३| माझ्या मनांत घुसले तव वार पापण्यांचे जखमी कसा ग सांगू आनंद वाटलेला |४| रस्ते अनेक दिसती ओसाड चालता मी वाटयास मात्र माझ्या गर्दी झपाटलेला |५|