Skip to main content

वेगळ्या वाटेवरचा कोकणदिवा

लेखक बज्जु यांनी गुरुवार, 30/06/2011 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
वेगळ्या वाटेवरचा कोकणदिवा शनिवारी अचानक संध्याकाळी ६.०० वा. फोनाफोनी झाली, आणि आज रात्रीच कोकणदिव्याला जाऊ असं ठरल. आत्तापर्यंत बरेच वेळा रायगडाच्या टकमक टोकावरुन समोरचा कोकणदिवा पाहिला होता, पण प्रत्यक्षात जायची वेळ काही कधी आली न्हवती. अहो रायगडासारखा तेजस्वी तारा असताना या लुकलुकणा-या दिव्यावर कशाला कोण जातो. पण आता आमची वय झाली असल्याने (वय ३४) आणि शक्यतो तेच गड परत परत करायचे नाहीत असं ठरवल असल्याने (भिमाशंकर, राजमाची, हरिश्चंद्रगड ई. ई. सन्माननीय अपवाद वगळता) कोकणदिव्याला फिक्स केल. धावाधाव करुन सामान गोळा केलं आणि रात्री ८.०० वा. व्ह्यन घेऊन निघालो.

रागिणी MMS

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 30/06/2011 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
काल 'रागिणी MMS' हा बहुचर्चित (?) यशस्वी वैग्रे विशेषणे लागलेला आणि सेक्स थ्रिलर अशी जाहिरात झालेला चित्रपट पाहण्यात आला. यशस्वी थ्रिलर चित्रपटात जे काही असावे लागते ते ह्यात सगळे असूनही हा चित्रपट मनाची पकड घेत नाही. चित्रपटाला अगदीच टुकार म्हणता येणार नाही पण एकदा बघून पश्चात्ताप होणार नाही असे म्हणता येईल. हा खरेतर एक भयपट आहे कारण ह्यात भुताचा वावर आहे. भूत आहे, हिंसा आहे, खून आहे, झपाटणे आहे, भिती आहे आणि.... आणि सेक्स देखील आहे.

आंबाडयाची चटणी

लेखक जागु यांनी गुरुवार, 30/06/2011 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
आंबाडे पाहील्यावर अनेक जणांच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात. लहानपणी हे कोवळे आंबाडे खायला मजा यायची. झाडावर दगडे मारुनही आम्ही आंबाडे पाडायचो. मग त्याला मिठ मसाला लावुन खायचे. ती गम्मतच वेगळी होती. पिकलेले आंबाडे त्यांचा स्वाद मला खुप आवडायचा. आंबाडे मिठ घालुनही मुरवत ठेवायचो. आंबाड्यांचा सिझन गेला की मग आंबाड्यांची कोवळी पाने आणि त्यांचे देठ चावुन तो स्वाद मिळवण्या पर्यंत उपद्व्याप चालायचे. अश्याच आंबाड्याची आता चटणी पाहुया.

Crab meat cutlet

लेखक Mrunalini यांनी गुरुवार, 30/06/2011 02:04 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः रेडी क्रॅब मिट स्टिक्स - १ पॅकेट ब्रेड क्रम्ब्स - १/२ वाटी अंडे - १ आले-लसुण पेस्ट - २ चमचे तिखट - २ चमचे हिंग - १/२ चमचा हळद - १/२ चमचा धणे पावडर - १ चमचा लिंबु - १/२ मिठ चवीनुसार तेल कृती: १. रेडी क्रॅब मिट स्टिक्स ह्या frozen मिळतात. त्या defrost करुन घ्याव्यात. crab (हा फोटो internet वरुन घेतला आहे) २. ह्या सर्व स्टिक्स पॅन मधे थोड्या तेलावर shallow fry कराव्यात. ३.

ऑर्किड माझ्या घरी...

लेखक प्रीति सखि यांनी बुधवार, 29/06/2011 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
घरच्या कुन्डी मधे आलेला हा ऑर्किडचा बहर... हे फुल पानाला येते...२ वर्षातून एकदाच... बहर गेल्यावर फक्त पाने माती मधे खोवली की नवीन रोपटे येते!

बुद्धिवादी संस्थांचा व विचारांचा पराभव आधीच झाला आहे

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 29/06/2011 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, आंतरऱाष्ट्रीय कीर्तीचे प्रख्यात बुद्धिवादी नाडीग्रंथांच्या संदर्भातील आपल्या कलुषित विचारांचे मत प्रदर्शन कसे करतात. याचा नमुना सोबत मराठीवाचकांसाठी प्रथमच प्रकाशित करत आहे. (संदर्भ- इंडियन स्केप्टिक मासिकाच्या नोव्हेंबर १९९६ मधील अंकात नाडी ग्रंथांवर केले गेलेले भाष्य) आत्तापर्यंत अनेक बुद्धिवाद्यांच्या संस्था व व्यक्तींच्या विचार प्रदर्शनाला नाडीग्रंथ केंद्रांतर्फे उत्तरे पाठवण्यात कोणत्याही नाडीकेंद्राने रस दाखवला नव्हता. मात्र यावेळी नाडीकेंद्रांतर्फे पुण्यातील केंद्र संचालक श्री.

भडक वक्तव्ये

लेखक नितिन थत्ते यांनी बुधवार, 29/06/2011 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
काल संध्याकाळी दोन तीन न्यूज चॅनेलवर एक बातमी सारखी सारखी सांगत होते. माओवाद्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या पोलीसांच्या शवपेट्या वाहून न्यायला म्युनिसिपालिटीची कचर्‍याची गाडी वापरली गेली. सरकारने शहीदांचा अपमान केला वगैरे ठराविक प्रक्षोभक वक्तव्ये बातमीदार करीत होता. "सरकारको कोई हक नही कि इस प्रकार शहीदोंका अपमान करें" वगैरे. बातमी वाचल्यास असे दिसते की जिवंत असलेल्या जखमींना नेण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स वापरल्यामुळे मृतांसाठी कचर्‍याची गाडी वापरली.

हेज्यायची कटकट...

लेखक भारी समर्थ यांनी बुधवार, 29/06/2011 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच दिवसांनी काल माझी जात आठवली होती सहज बोलता बोलता कोणीतरी तिची आठव काढली होती आमची जात लागत नाही प्रवेशाला, फी माफीला की आंदोलनवाल्यांना पैसा बक्कळ पडलाय, कोण विचारतोय आम्हा ओपनवाल्यांना नाही, मान्य की देशाच्या गरीब जनतेचा उत्कर्ष झाला पाहिजे पण मग आमच्याच शिटातला का बरं सगळ्यांना वाटा पाहिजे आमचे शेजारचे सूचीतले गेल्याच महिन्यात फॉरेन ट्रीपवरून आले पोराला फार शीण झालेला परीक्षेचा, त्याने चांगले ९०% की हो काढले त्यांच्या सुपुत्राला मुंबईबाहेरील जागा नको होती म्हणून आग्रह धरला आणि आरक्षण कोट्यातील जागेसाठी त्याने आपला फॉर्म भरला आम्ही म्हटलं द्या ना काका सोडून ही जागा एखाद्या गरीबास