Skip to main content

ते आहेत ना

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 02/07/2011 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
ते आहेत ना
मंगला ओक आपले अनुभव सांगताना – चंदननगरच्या डोळ्याच्या दवाखान्यात आई औषध घातल्याने डोळे मिटून होती, तेंव्हा मी आईला काही आठवणी सांगायला विनंती केली आणि मग आईच्या आठवणींचा खजिना उघडला. तो शब्दांकित...
ते आहेत ना येकंममरडी गावी कुलकर्णी म्हणून होते. त्यांच्या खेडेगावातील ते लहानसं देऊळ. पण फार जुनं. त्यांच्या पूर्वजांचं दोनशे-तीनशे वर्षांचं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते दत्ताचं जागृत देवस्थान होतं. लहानशीच मूर्ती होती. ते दरवर्षी तेथे दत्तजन्म करत असत. तिथे मी गेले.

कोकणस्थ (चित्तपावन/चित्पावन)

लेखक शरद यांनी शनिवार, 02/07/2011 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
कोकणस्थ (चित्तपावन/चित्पावन) इतिहास : कोकणस्थांचा १४ व्या शतकाच्या आधी कोकणात उल्लेख मिळत नाही. मग हे कोठून आले ? या बद्दल तीन मते आहेत. (१) हे बर्बर देशातून जलमार्गे कोकणांत आले. ह्या प्रदेशाचा उल्लेख जुन्या ग्रंथांत मिळतो. त्यातच यांचा व परशुरामाचा संबंधही सांगितला आहे. परशुरामाला समुद्र किनारी १४ शवे मिळाली. त्याने जिवंत करून त्यांची कोकणात स्थापना केली. शवे सोडा, आसन्नमरण माणसे मिळाली; त्यांची सुश्रुषा करून त्यांना वाचवले. मग त्यांना ब्राह्मणत्व दिले.म्हणून चित्तपावन परशुरामाचे भक्त. या मताप्रमाणे यांचा गोरा रंग,सरळ नाक वगैरेची व्यवस्था लावता येते.

मी असा जुगारी...

लेखक बन्या बापु यांनी शनिवार, 02/07/2011 08:03 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा खेळलो मी डाव तो जुगारी, कसे आवरू मी या मना विकारी ? झगडा तो जीवनाचा संपेल ना कधीही, पंख शोधेल कोण, मारेल कोण भरारी ? आहेत सगळे माझे, परके कोणी ना इथे, वार का त्यांचे लागले जिव्हारी ? श्वास संपले आता, खेळही संपला आता, कसे नाकारू सत्य हे विखारी. फासे फेकलेले, दान ते त्याचे, कसे जिंकेल कोणी जो तो इथे भिकारी ? येईन फिरून मीही एकदा असा कि, डाव सोडून जाईल नियती ही बिचारी..

अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट

लेखक इरसाल यांनी शुक्रवार, 01/07/2011 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
काही प्रतिष्ठित लोकाच्या समोर स्वतःच्या आईच्या थोबाडीत मारल्याचा बदला स्वतःचा जीव देवून चुकवावा लागला. ह्यासाठी आपल्याला मागे जावे लागेल.१९७५ ला लावण्यात आलेल्या आणीबाणीत आणि त्यानंतर निवडणुकीत हरल्याने पत्कराव्या लागणाऱ्या नामुष्कीमुळे ज्याची भूमिका अर्थात विवादास्पद होती त्याचा बळी जाणे हे काही तितकेसे मुश्कील नव्हते. ३० जून १९८० ला स्वतःच्या ऑफिस वरून विमान उडवून नेताना सफदरजंग विमानतळाच्या बाजूला असलेल्या झाडाला धडकून विमान अपघात ग्रस्त झाले.ज्याच्या साठी फिल्डिंग लावली गेली होती त्यासकट सक्सेना नावाचा कॅप्टन फुकट बळी गेला. विशेष म्हणजे आईला मेलेल

इगतपुरीचा पाऊस

लेखक प्रकाश बाळ जोशी यांनी शुक्रवार, 01/07/2011 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
इगतपुरीचा पाउस म्हणजे धोधो कोसळणारा. पंधरा पंधरा दिवस सूर्याचे दर्शन घडू न देणारा. सर्वांगात मुरणारा पाउस. घाट चढून येणाऱ्या ढगांनी वेढलेल्या इगतपुरीत इतका मिट्ट काळोख कि कुणी डोळ्यात बोट घातले तरी कळणार नाही. वार्‍यावर स्वार होऊन येणाऱ्या ढगांशी लपंडाव खेळण्यातली गम्मत काही न्यारीच आणि तासान तास न संपणारी. त्या इगतपुरीच्या पावसाचा आवेग , ती अंग भिजवणारी ओल, भिजलेलं रान आणि काळ्या कुट्ट ढगांच्या मध्येच डोकावणारे करड्या रंगाचे प्रकाश झोत पकडण्याचा एक प्रयत्न " इगतपुरी रेन्स" या पेंटिंग मध्ये केला आहे. बऱ्याच वर्षापूर्वी काढलेलं हे पेंटिंग आर्टीस्ट सेंटर इथे भरवलेल्या प्रदर्शनात लोकांपुढे आले आ

मनाचं मंथन

लेखक स्वप्ना_तुषार यांनी शुक्रवार, 01/07/2011 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
आज पुन्हा आभाळ भरून आलं होतं असं कित्तीदा तरी होतं..कित्तीदा तरी झालंय आणि होतंच राहलंय ... का कुणास ठाऊक पण आज मात्र बरसेल असं वाटलं आणि तस्संच झालं .. बरसून गेलं आणि सारा आसमंत कसा शांत झाला. गुलजारच्या इजाजत मधल्या "त्या" - बरस जायेगी तो अपनेआप थम जायेगी डायलॊगची आज पुन्हा आठवण झाली. खरतर बरसत आत होतं बाहेर तर फ़क्त पाऊस पडत होता ..!! पण आजचा पाऊस जरा वेगळाच होता..मनातली जळमटं, काजळी धुवून काढणारा! नेहमीसारखा पुन:पुन्हा त्याची वाट पहायला लावणारा उकाडा आज पावसानंतर नव्हता. ब-याच दिवसांच्या आत दाटलेल्या वेदनेला मोकळी वाट मिळाली ..हो डोळ्यांनीच ती करून दिली.

पिंगु आणी शाळा(बालकाव्य)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 01/07/2011 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
एक छोटा पिंगु नेहमी शाळेत जातो आई ओरडेल म्हणुन पटकन डबा खातो खाताना झाली गंमत घश्यात अडकला घासं लवकर खायला लागलं म्हणुन झाला त्रासं घरी आल्यावर आई डबा पाहुन चिडली नीट खाल्ला नाही म्हणुन वरात काढली मग आमी शांगतो नीट डबा खाल्ला त्या येडपट चिंगुनी धक्का देऊन पाडला माझी चूक नाही मला नको ओरडू मग तूच म्हणतेस? चिडलं माझं करडू उद्या पासुन शाळेत देऊ नको डब्बा मधल्या सुट्टीत खेळेन लपंडाव-पाणी-धप्पा डबा खायची कटकट आमच्या मागुन जावी त्याच्या ऐवजी फक्त मधली सुट्टी रहावी आसा आहे पिंगू आणी त्याची शाळा वाजली शेवटची घंटा चला आता प---ळा.... पराग दिवेकर...

छोटे वारकरी ---

लेखक निवेदिता-ताई यांनी शुक्रवार, 01/07/2011 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या गावातील बालकमंदिरातील छोट्यांची दिंडी (पाउले चालती पंढरीची वाट) निघाली आहे.
From